(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हरवले माझ्या कोकणातले काही तरी

    काही गोष्टी काळाच्या ओघात दिसेनाशा होणार असतात हे आपण जाणून असतो पण काही करू शकत नाही. पण त्या गोष्टी दृष्टीआड झाल्या की हुरहूर लागून राहाते. मी गावाकडे कोकणात बऱ्याच वेळा जात असतो. जेव्हा जातो तेव्हा काही जुन्या गोष्टींची आठवण होते आणि मनात त्या काळाची आणि आजची  तुलना सुरु होते. मग काय हरवले ह्याची एक यादीच मनात घेर धरू लागते.

  • कर्माचे फळ

    अरे बाबा काय होत तुला एवढे उपचार केले तू बरा का होत नाही रे बाळा

  • दगडांच्या देश

    हाराष्ट्र देशीचे हे राकट -कणखर दगड आतून अस्सल हिरे आहेत हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर नाशिक – शिर्डी मार्गावरील सिन्नर MIDC मधील, अशा अत्यंत बहुमोल किंबहुना ज्यांचे मोलच होऊ शकणार नाही अशा दगडांचे अप्रतिम “गारगोटी संग्रहालय ” पाहायला हवे.

  • विज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.

    ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.

    पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.

    हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.

    पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.

    .

  • WHO …!

    तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा....

    आज जागतिक मानसिक आरोग्य दिन !
    या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य .....

    या जगात शाश्वत फक्त 'बदल' आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच out dated होते आहे. या बदलत्या जगात या वर्षी WHO ने दखल घेतली आहे ती तरुणांची....

    आजची तरुण पिढी गृहीत धरली आहे ती वयवर्षं 14 ते 29. मुळात या वयात जग बदलू अथवा न बदलू पण त्यांच्या अंतर्गत मनपटला वर त्यांचं स्वतःच सारं विश्वच बदलत असतं. शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरे होतात ती नेमकी याच वयात. अंतर्गत सोबत बाह्यजग देखील झपाट्याने बदलत असेल तर त्यांना तो वेग साधावाच लागतो. नाहीतर मागे पडतात मग गर्तेत जातात.....

    तरुण म्हणजे घराचे आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ! या स्थंभा चा पायच कमजोर राहिला तर तो इतरांना सोडा, स्वतःला देखील आधार देऊ शकत नाही. कधी ते व्यसनांच्या जाळ्यात अडकतात तर कधी आत्महत्या करतात. वाममार्गाला जाऊन स्वहस्ते स्वआयुष्याला तिलांजली देतात.

    WHO ने दिलेली वयोमर्यादा पाहता, 30शी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कळत नकळत पालकत्व येतं. मग त्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं. राहिलं आजूबाजूच्या, कामाच्या ठिकाणच्या किंवा समोर दिसणाऱ्या पण किमान आपापल्या Friend List मधील जे तरुण आहेत त्यांची काळजी घेणं तर आपल्याला शक्य आहे न? हात पुढे करा, कुणीतरी गरजवंत नक्की पकडेल !
    करून तर बघा, तुम्हाला स्वतःला स्वतःचे मोठेपण जाणवेल. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. एक वेगळं समाधान लाभेल.....

    तळ टीप :- 70/80 विषयावर हलक्या फुलक्या पोस्ट लिहिल्या नंतर आज एका जड विषयावर, जड भाषेत भाष्य करण्याचे कारण, सर्व FB परिवाराला समजावे की,
    मी हुशार आणि बुद्धिजीवी वग्रे सुद्धा आहे.
    अधून मधून अशी वैचारिक पोस्ट टाकली तर त्या लोकांना "साहित्यिक" म्हणून मान्यता देखील मिळते, म्हणे...

    विनोद डावरे, परभणी.

    ##सहजच सुचलं - 81

  • दगडाचे मनोगत

    दगडात सुद्धा किती सौंदर्य आहे ते फक्त त्या दृष्टीने बघितले तरच कळत, बघणार्याचा भाव काय आहे यावर सर्व अवलंबून आहे.

  • चारोळ्या …………!!! (भाग २)

    चारोळ्या …………!!!

    (भाग २)

  • या वयात

    आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस‌ जमके‌ practice ‌केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही.

  • सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?

    हे तर अगदी फारच झाले.. आता पुरे झाले यांचे लाड... सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?

    ठाणे आणि पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनातून इतका पैसा उरला तो वापरा की.

    सुभाष जयवंत

  • पाताळ मोहीम

    चीलीत गेले 69 दिवस दोन हजार फूट खोल (म्हणजे अर्धा मैल) खाणीत 33 खाण कामगार अडकून पडले होते. त्यांना अक्षरश: पाताळातून बाहेर काढावे लागले. त्यासाठी सारा देश एक झाला. जगातली सर्वात आधुनिक साधने आणि यंत्रे वापरून आणि सर्वात आधुनिक तंत्र वापरून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या लढ्याची ही रंजक कथा.