(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एन.यु.जे महाराष्ट्राची दामिनी

    महाराष्ट्रातील असंघटीत पत्रकार, वार्ताहर, लेखक तसंस माध्यम क्षेत्रातील महिलांचे प्रश्न, व समस्या व त्यांच्या सुरक्षितते विषयी “नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट” ही संघटना कार्यरत आहे, राष्ट्रीय स्तरावर तिचं कार्य, तसं व्यापक प्रमाणावर असलं तरीसुद्धा महाराष्ट्रात अलिकडेच स्थापन झाली आहे, या संघटनेच्या भूमिकेविषयी माहिती देत आहेत “एन.यु.जे. महाराष्ट्र” च्या उपाध्यक्ष शीतल करदेकर फक्त “मराठीसृष्टी.कॉम” वर.

  • आशा भोसले यांची ८३ संस्मरणीय गाणी

    आठ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा ८३ वा जन्मदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या ८३ संस्मरणीय गाण्यांची यादी....

    1. आखोंसे जो उतरी है दिल में – ओ पी

    2. आज कोई प्यारसे - ओ पी

    3. आ ओ ना गले लगा लो ना – आर डी

    4. अब के बरस भेजो – एस डी

    5. जरा हौले हौले चलो - ओ पी

    6. मेरी जान तुमपे सदके - ओ पी

    7. बेचारा दिल क्या करे - आर डी

    8. भंवरा बडा नादान है – हेमंतकुमार

    9. कोई कहदे कहदे जमानेसे - ओ पी

    10. छोटीसी कहानीसे - आर डी

    11. वो हंसके मिले हमसे - ओ पी

    12. रातोंको चोरी चोरी - ओ पी

    13. चोरी चोरी सोलह सिंगार करूंगी - आर डी

    14. मुहब्बत हो गयी जिनसे - ओ पी

    15. आओ हुजूर तुमको - ओ पी

    16. दे दे प्यार दे – कल्याणजी आनंदजी

    17. दिल चीज क्या है आप मेरी – खय्याम

    18. चैन से हमको कभी - ओ पी

    19. इक तू है पिया - ओ पी

    20. आके दर्द जवां है - ओ पी

    21. बागमें कली खिली – सलील चौधरी

    22. दिल लगाकर हम ये समझे – सी रामचंद्र

    23. अकेली हुं मै पिया आ - ओ पी

    24. जाईये आप कहां जाएंगे - ओ पी

    25. दो लफ्झोनकी है दिलकी कहानी - आर डी

    26. ये है रेशमी जुलफों का - ओ पी

    27. दम मारो दम - आर डी

    28. गा मेरे मन गा – एस डी

    29. बलमा खुली हवा में - ओ पी

    30. आखोंसे इशारा करके हमें - ओ पी

    31. हुस्न के लाखो रंग - कल्याणजी आनंदजी

    32. इन आखों कि मस्ती के – खय्याम

    33. पुछो न हमें हम उनके लिये - ओ पी

    34. बेकसी हद से जब गुजर जाये - ओ पी

    35. इना मिना डिका - सी रामचंद्र

    36. जब चली ठंडी हवा – रवी

    37. यार बादशहा यार दिलरुबा - ओ पी

    38. वो हसीन दर्द दे दो - ओ पी

    39. मन मोरे गा झुमके - ओ पी

    40. आईये मेहरबान - ओ पी

    41. ये क्या कर डाला तूने - ओ पी

    42. जब छाये मेरा जादू – राजेश रोशन

    43. जहां में ऐसा कौन है – जयदेव

    44. बोल परदेसीया - ओ पी

    45. झुमका गिरा रे – मदन मोहन

    46. झुठे नैना बोले – हृदयनाथ

    47. काली घटा छाये - एस डी

    48. करके प्यार प्यार प्यार - ओ पी

    49. पिया पिया न लागे मोरा जिया - ओ पी

    50. कौन आया कि निगाहोमें – रवी

    51. कोई आया धडकन कहती है – एस डी

    52. ले गयी ले गयी – उत्तम सिंग

    53. मेरा कुछ सामान - आर डी

    54. छोटासा बालमा - ओ पी

    55. भूल जा ए दिल - ओ पी

    56. बेईमान बालमा - ओ पी

    57. नजरे मिलाके आपने एहसान कर दिया - ओ पी

    58. नजर लागी राजा तोरे बंगलेपे – एस डी

    59. ओ साथी रे - कल्याणजी आनंदजी

    60. पान खायो सैया हमारो – शंकर जयकिशन

    61. परदे में रहेने दो - शंकर जयकिशन

    62. पिया तू अब तो आजा – आर डी

    63. सखी रे वो क्या मांगे - ओ पी

    64. जादूगर सावरीया - ओ पी

    65. रात रंगीली चमके तारे - ओ पी

    66. प्यार करनेवाले प्यार करते है – आर डी

    67. रात अकेली है – एस डी

    68. रेशमी उजाला है – एस डी

    69. सपना मेरा टूट गया – आर डी

    70. कितना हंसी है ये जहां - ओ पी

    71. शोख नजर की बिजलीया – मदन मोहन

    72. सुन सुन सुन दिदी – आर डी

    73. तन्हा तन्हा यहा पे जीना – रेहमान

    74. यही वो जगह है - ओ पी

    75. मैं शायद तुम्हारे लिये - ओ पी

    76. तोरा मन दर्पण कहलाये – रवी

    77. तोरा मन बडा पापी – नौशाद

    78. तंग आ चुके है जिंदगीसे – चित्रगुप्त

    79. तुम जियो हजारो साल – एस डी

    80. निगाहें मिलानेको जी चाहता – रोशन

    81. जिंदगी एक सफर है सुहाना - शंकर जयकिशन

    82. दिलकी कहानी रंग लायी है - रवी

    83. हर टुकडा मेरे दिलका - ओ पी

    -------------------------------

    आशा भोसलेंनी विविध संगीतकारांकडे गायलेल्या गाण्यांची संख्या खालीलप्रमाणे ...

    १ अनिल विश्वास ३१

    २ नौशाद ३४

    ३ हुस्नलाल भगतराम २६

    ४ वसंत देसाई ३९

    ५ सी रामचंद्र १३२

    ६ ओ पी नय्यर ३२४

    ७ हंसराज बहल ५८

    ८ खय्याम ९०

    ९ एस डी बर्मन १४०

    १० रोशन ९९

    ११ हेमंतकुमार ७८

    १२ सलील चौधरी ३१

    १३ शंकर जयकिशन २१४

    १४ मदनमोहन १९०

    १५ जयदेव ६४

    १६ चित्रगुप्त २०९

    १७ एस एन त्रिपाठी १२९

    १८ अविनाश व्यास ११०

    १९ बुलो सी रानी ५२

    २० ए आर कुरेशी ४८

    २१ शिवराम कृष्णा ३८

    २२ लच्छीराम २६

    २३ निसार बझ्मी ३१

    २४ बाली बी एन ३५

    २५ विनोद ८७

    २६ एस मोहिंदर ८१

    २७ एन दत्ता १६४

    २८ नाशाद ४०

    २९ सरदार मलिक ४७

    ३० राम लक्ष्मण ४५

    ३१ मन्ना डे २८

    ३२ बिपीन बाबुल २७

    ३३ इक्बाल कुरेशी ७०

    ३४ दत्ताराम २९

    ३५ सपनजगमोहन ९८

    ३६ हेमंत भोसले ६२

    ३७ कोहली जी एस ४३

    ३८ सी अर्जून ३८

    ३९ आर डी बर्मन ८४०

    ४० लक्ष्मी प्यारे ४८५

    ४१ भप्पी लहरी ४४२

    ४२ रवी ३८५

    ४३ कल्याणजी आनंदजी २९७

    ४४ सोनिक ओमी २७३

    ४५ उषा खन्ना २२०

    ४६ रविंद्र जैन १२०

    ४७ राजेश रोशन ८३

    ४८ अनू मलीक ७१

    ४९ नदीमश्रवण ४८

    फारच कमी गाणी दिलेल्या संगीतकारांची नावे नमूद केलेली नाहीत.

    फक्त हिंदी गाणी दिलेल्या संगीतकारांचीच नावे दिली आहेत.

    ( त्यामुळे अत्यंत गुणी, मराठी व इतर भाषिक संगीतकारांची नावे समाविष्ट नाहीत .)

  • प्रतिबिंब

    मधे एकदा एका 'so called whatsapp गुरू' कडून एक सुप्रभात संदेश आला होता. त्यात लिहिलं होतं की रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आरशात बघा... आणि त्यात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबाला सांगा... " You are the best. And I love you."
    थोडक्यात काय तर स्वतःवर प्रेम करायला शिका... पण मग त्यासाठी आरशात कशाला बघायला हवं?
    आपण कसे दिसतो हे बघायला? पण आपण कसे दिसतो हे बघून आपण आपल्यावरच प्रेम करतो का? मला तरी नाही वाटत तसं....
    पण झालं असं की आता जेव्हा जेव्हा मी आरशात बघते तेव्हा प्रत्येक वेळी मला तो संदेश आठवतो ; आणि मग मी जरा जास्तच न्याहाळून बघते माझं आरशातलं प्रतिबिंब ... आणि गंमत म्हणजे कितीही वेळा बघितलं तरी कंटाळा नाही येत !
    अशाच एका whatsapp संतांनी अजून एक पोस्ट पाठवली... त्यानुसार आपण जसे असतो त्यापेक्षा पाच पटींनी जास्त सुंदर प्रतिबिंब दिसतं आरशात ! हे वाचल्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिबिंबाबद्दल थोडी शंका ही आली मनात....
    या सगळ्या पार्श्वभूमीवर एका सकाळी आरशासमोर उभी असताना माझी नजर माझ्या चेहेऱ्याचा आजूबाजूला दिसणाऱ्या आरशावर गेली आणि मनात विचार आला.... सकाळी सकाळी माझं आरशात दिसणारं रुपडं बघून मी खुश होते, माझा दिवस चांगला जातो.... पण हा आरसा ? त्याचं काय होत असेल? म्हणजे त्यालाही वाटत असेल का - सकाळी उठून माझा चेहेरा बघावा असं? जर त्याला तेव्हा समोर दिसणारं दृश्य आवडत नसेल तर? मला बघितल्यानंतर जर त्याचा दिवस वाईट जात असेल तर?
    पण त्याला जरी काहीही वाटत असलं तरी त्याच्याकडे काही पर्याय नाहीये.... त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक वस्तूचं प्रतिबिंब दाखवण्या शिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये.…. त्याचं एकच काम आहे... त्याच्या समोर जे काही असेल त्याला पाचपटीनी सुंदर करून त्याचं प्रतिबिंब दाखवायचं... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे - हे करत असताना स्वतः त्यापासून अलिप्त राहायचं ! त्या वाढवून दाखवलेल्या प्रतिबिंबात स्वतःचं काहीच मिसळायचं नाही.... आणि त्याहूनही कमालीची गोष्ट म्हणजे - आपण स्वतः नेहेमी स्वच्छ राहायचं... त्या प्रतिबिंबाचा कोणताही गुण किंवा अवगुण स्वतःला चिकटू न देता !!!
    जेव्हापासून ही जाणीव झालीये ना; तेव्हापासून आरशासमोर उभी राहिले की मला फक्त आरसाच दिसतो.... माझ्या प्रतिबिंबपेक्षा कितीतरी पटींनी सुंदर आणि स्वच्छ !!!
    --प्रिया जोशी
    हैदराबाद
    २८.१२.२०२०
  • विठोबा

    वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही.

  • लोकसाहित्य – लोकरंगभूमी नातेसंबंध

    अनागर आणि नागर समाजाच्या पारंपरिक अविष्कारांना ‘लोकसाहित्य` असे संबोधता येईल. ध्वनी आणि शब्दांच्या सामर्थ्यासह हे लोकाविष्कार व्यक्त होतात. या लोकाविष्कारांमध्ये लोकश्रध्दा, लोकभ्रम, चालीरीती, रूढी, नृत्य, नाटयदी प्रयोगात्म आविष्कार यांचा अंतर्भाव आपण करू शकतो. लोकांच्या संदर्भातील विज्ञान म्हणजे लोकसाहित्य नव्हे तर लोकसाहित्य म्हणजे पारंपरिक लोकविज्ञान आणि लोकगीते, लोककथा आदी होय.

  • बिंग फुटले… (बेवड्याची डायरी – भाग ४१ वा)

    रात्री पाणी प्यायला म्हणून उठलो ..पाण्याच्या कुलरजवळ पाणी पीत असताना ..बाथरूमच्या पॅसेज मध्ये दोन तीन जण उभे दिसले ..मला पाहताच ते जरा चपापल्या सारखे झाले असे मला जाणवले ..इतक्या रात्री यांचे काय सुरु असावे याचा विचार करत होतो ..त्या तिघांपैकी दोन जण मध्यप्रदेशातून उपचारांसाठी आणलेले ब्राऊन शुगरचे व्यसनी होते ..तर तिसरा नागपूर मधलाच दारूचा व्यसनी ..तिघेही साधारण पंचाविशीचे ..मी बिछान्यावर आल्यानंतर देखील बराच वेळ ते तिकडेच होते ..त्यांची काहीतरी खलबते चालली होती असा संशय आला मला ..सकाळी मी चहा घेताना सहज शेरकर काकांजवळ त्याचा उल्लेख केला ..शेरकर काकांचे डोळे चमकलेले दिसले ..म्हणाले ...बहुतेक त्यांचे इथून पळून जाण्याचे प्लान चालले असतील ..हे तिघेही श्रीमंत घरचे आणि खूप लाडावलेले आहेत ..आपण हे माॅनीटरला सांगितले पाहिजे ..मला शेरकर काकांना आपण हे उगाच सांगितले असे झाले ..कारण प्रकरण आता माॅनिटर पर्यंत गेले असते ..मला उगाचच कशात अडकण्याची इच्छा नव्हती ..मी तसे शेरकर काकांना बोलून दाखवले ..' अहो तुम्ही कशाला घाबरता ..तुम्हाला काही होणार नाही ..उलट एक सावध नागरिक म्हणून तुमचे कर्तव्यच आहे वार्डात काही चुकीचे घडत असेल तर माॅनीटरला सांगणे ' ..शेरकर काका डोळे मिचकावत म्हणाले ..

    नाश्ता झाल्यानंतर माॅनीटरने मला ते तिघे कोण कोण होते हे विचारले ..मी नावे सांगितली ..मला ते नक्की काय बोलत होते ते माहित नाही ..त्यांना मी नाव सांगितले हे कळले तर ते उगाचच मला त्रास देतील असे माॅनीटरला म्हणालो ..त्याने तुमचे नाव कोणाला समजणार नाही अशी खात्री दिली मला ..तुम्ही घाबरू नका असा धीर देखील दिला ..दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार सुरु होता ..पुढे काय होणार उत्सुकता देखील होतीच मनात ..तसे येथून पळून जाणे अजिबात सोपे नव्हते ..कारण बाहेर जाण्याचा एकच दरवाजा होता ..तो दरवाजा ऑफिसात उघडत असे ..ऑफिसमध्ये नेहमी एकदोन तगडे कार्यकर्ते बसलेले असत ..बाकी वार्डात सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..म्हणजे पळून जायचे तर आधी ऑफिसमध्ये जायला लागले असते .. जेव्हा केव्हा महिन्याभराचे किराणा समान येई किवा आठवड्याचा भाजीपाला आणला जाई तेव्हा काही लोकांना ते सामान टेम्पो मधून उचलून आणण्यासाठी म्हणून बाहेर नेले जाई ..मात्र त्यावेळी तेथे एकदोन कार्यकर्ते हजर असत..हे लोक कसे काय पळून जातील याचा विचार करून डोके शिणले माझे ..

    संध्याकाळी समूह उपचारांच्या वेळी सरांनी त्या तिघांना उभे केले ..म्हणाले .." घाबरू नका सगळे खरे खरे सांगा ..रात्री काय खलबते सुरु होती तुमची ..तुम्ही तिघे काय करत होतात बाथरूमच्या भागात ? ..तुम्हाला काहीही शिक्षा होणार नाही " यावर नागपूरचा असलेला गौरव म्हणाला " सर मेको हग्गी लगी थी..इसलिये मै वहा गया था " त्याच्या या बोलण्यावर सगळे हसले ..हा गौरव खूप लहान वयात बिघडल्याने तसा चेहऱ्याने खूप भोळाभाबडा वाटे ..तो नेमका काय म्हणत आहे ते सरांना बहुतेक समजले नाही ..' हग्गी लगी थी मधील ' हग्गी ' शब्द मलाही नवा होता ..सरांनी पुन्हा त्याला विचारले ...नीट सांग मराठीत काय झाले होते तुला ? तर म्हणाला मला ' हागरी ' लागली होती ..पुन्हा सगळे हसू लागले ..मग समजले की त्याला ' हगवण ' लागली होती असे तो सांगत होता ..पुढे काय झाले ते सांग मला ..तू ' हग्गी लागली म्हणून तिथे गेला होतास .तर आत संडासात न जाता बाहेर काय बोलत बसला होतास या दोघांसोबत ? काय रे तुम्हाला दोघांना पण ' हग्गी ' लागली होती का ?

    सरांनी थोडे दरडावून विचारले ..गौरव तसा लेचापेचा निघाला ..तो पोपटा सारखा बोलू लागला ..म्हणाला मी तेथे गेलो तेव्हा हे दोघे पळून कसे जायचे याचा प्लान करत होते .मलाही यांनी थांबवले ..म्हणाले जेव्हा केव्हा आता भाजी आणायला बाहेर नेले जाईल तेव्हा आपण तिघेही जाऊ ..आणि बाहेरच्या अंगणात गेलो की संधी साधून पळून जाऊ ..' सरांनी त्यांना खाली बसायला सांगितले अन म्हणाले ' हे बघा इथून पळून जाण्याचे विचार मनात येणे साहजिक आहे ..कारण आपल्याला इथे असणारी शिस्तबद्धता आवडत नाही ..सकाळी लवकर उठण्यापासून सुरु होणारा इथला दिनक्रम पार पाडणे जीवावर येते बहुतेकांच्या कारण घरी आपल्याला स्वताच्या मर्जीने जगण्याची सवय लागलेली असते वाट्टेल तेव्हा उठणे -झोपणे , हवे तसे खाणे पिणे , आळसात पडून राहणे वगैरे ..त्यामुळे तुम्हाला इथली शिस्तबद्धता आवडणे कठीणच आहे ..परंतु मित्रांनो जीवन आपण सगळे समजत होतो तितके सोपे अन आरामदायी नसते ..माणसाला शिस्त असली तरच तो काहीतरी प्रगती करू शकतो ..हे सगळे आपल्याच भल्यासाठी आहे हे विसरता कामा नये ..पळून गेलात तरी तुम्ही शेवटी घरीच जाणार ..घरचे लोक आम्हाला कळवतील तसे ..पुन्हा आमची गाडी येईल तुम्हाला न्यायला ..पूर्वी अनेकांनी असे प्रयत्न केले आहेत ..शिवाय तुमच्या सोबत बाहेर लक्ष द्यायला उभे असणारे कार्यकर्ते इतके लेचेपेचे समजू नका ..ते देखील पूर्वी तुमच्यासारखेच होते ..ते अतिशय सावध असतात ..ते लगेचच पाठलाग करून पकडतील तुम्हाला ..तुम्ही ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्राच्या कैदेत नसून व्यसनाधीनतेच्या कैदेत आहात ..तेव्हा ' मैत्री ' मधून कसे बाहेर पडता येईल याचा विचार न करता व्यसनांच्या गुलामीतून कसे बाहेर पडता येईल याचा विचार कराल तर अधिक फायदा होईल ..

    " व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने आपले काहीच चुकत नाहीय असे प्रत्येक व्यसनीला वाटणे स्वाभाविक आहे ..तो सहजासहजी उपचारांना तयार होत नाही म्हणून अनेकदा त्याला खोटे बोलून किवा जबरदस्तीने उपचारांना आणावे लागते ..पालकांचा तो नाईलाज असतो ..परंतु इथे दाखल झाल्यावर जर तुम्ही मनापासून उपचारात सहभाग घेतलात तर आपले काय चुकले ते नक्की ध्यानात येईल तुमच्या ..तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या पालकांनी तुम्हाला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला ते उगाच नाही ..त्यांना तुमच्या आयुष्याची काळजी आहे म्हणूनच काही पैसे खर्च करून ते तुम्हाला उपचारांना आणतात ..इथेही जर तुम्ही पूर्वीसारखाच नकारात्मक विचार केलात तर ..पुढे खूप नुकसानाला सामोरे जावे लागेल ..आम्ही सगळे या यातना भोगल्या आहेत ..तुम्हाला त्या भोगाव्या लागू नयेत म्हणून आमची तळमळ असते ." .सर अगदी तळमळीने समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटले ..शेवटी त्या तिघांनी सरांची माफी मागितली ..आमचे चुकले अशी कबुली दिली ..प्रकरणावर एकदाचा पडदा पडला ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • निसर्ग सखा

    निसर्गाकडून माणूस खूप काही घेत असतो. हवा, पाणी, प्रकाश याबरोबरच अन्नधान्य, फळं, फुलं, औषधं, वस्त्र, दागिने अशा साऱ्या गोष्टी निसर्गाची देणगी आहेत. मानवी जीवन सुखमय व्हावं, म्हणून भारतीय संस्कृतीतील ऋषि-मुनींनी निसर्गाचा खूप उपयोग केला. हे ऋषी म्हणजे नुसते ‘देव-देव’ करणारे आणि यजमानापुढे वाकणारे भिक्षुक नव्हते.

  • इतर टोळभैरवांचे काय ?

    अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर राज्यातील काही बेकायदेशीर टोलनाक्यांना स्थगिती देण्यात आली. पण, या कारवाईनंतरही काही प्रश्न कायम राहतात. ते कोणी विचारतही नाही आणि विचारलेच तर समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. असा प्रकार केवळ टोलनाक्यांबाबतच नव्हे तर अन्य ठिकाणीही सुरू आहे. अशा चुकीच्या प्रघाताबद्दल सरकार गांभीर्याने पावले उचलू इच्छिते का हा खरा प्रश्न आहे.

  • टीव्हीच्या रिमोट कंट्रोलचा शोध लावणारे अमेरिकन अभियंता युजीन पॉली

    चित्रवाणी संच दुरून किंवा कोचावर बसल्या बसल्या बंद करायचा, तर दहा फुटी वायर जोडावी लागत असे. बिनतारी रिमोट नव्हतेच, ते युजीन यांच्या कल्पनेतून साकारले. तेव्हा रिमोट म्हणजे रेडिओ लहरी सोडणारी आणि आजच्या ‘हेअर ड्रायर’यंत्रासारखी दिसणारी एक बंदूकच होती ती.. या रिमोट कंट्रोलने चार कामे करता येत असत.

  • पार्सल टेप आर्ट

    पार्सल टेप आर्ट

    काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल?

    mark-khaisman-p19r5i5जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला चित्रकार मार्क खैसमन याने एक वेगळीच कला विकसित केली आहे. हा चित्रकार जे माध्यम वापरतो ते ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. आपण पॅकिंगसाठी जी दोन इंच रुंदीची, खाकी रंगाची टेप वापरतो, तीच टेप म्हणजेच या मार्क खैसमनचं कलाकृती सदर करण्याचं मुख्य माध्यम. या टेपचेच लहान-मोठे तुकडे करुन, ते एकावर एक चिकटवून त्याने काही अफलातून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ज्याप्रमाणे स्टेन्ड ग्लासमधून प्रकाश आरपार जातो आणि त्यातून त्रिमितीसारका इफेक्ट मिळतो तसाच इफेक्ट या चित्रांमधूनही मिळतो.

    सोबतच्या चित्रातील ही खुर्ची पहा. ही कलाकृती स्पेनमधल्या एका चित्र संग्राहकाने तब्बल ८६,९८० डॉलर्स मोजून विकत घेतली.

    या कलाप्रकाराला म्हणतात “पार्सल टेप आर्ट” या कलाप्रकाराविषयी अधिक जाणून घ्या http://www.khaismanstudio.com या वेबसाईटवर. इथे तुम्हाला पहायला मिळतील एकापेक्षा एक कलाकृती.

    या मार्क खैसमनच्या कलाकृती दाखवणारा हा एक व्हिडिओसुद्धा बघा.

    https://www.youtube.com/watch?v=LSvZE8gZAyM

    -- निनाद अरविंद प्रधान