(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतमातेच्या वीरांगना – 1 : मातंगिनी हाजरा

    १९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली.

  • अस्सल मातीतला अभिनेता : निळू फूले

    कथा, कादंबरी, नाटक,कविता… साहित्य प्रकार कुठलाही असो त्यातील शब्द हेच महत्वाचं हत्यार असतं. या हत्याराला वाक्यांची दमदार मूठ लावली की साहित्यातली शब्दकळा फुलू लागते. प्रतिभावान लेखक कवी मग एक ओघवती भाषशैली निर्माण करतो आणि आपण त्यात गुंतून जातो. मात्र चित्रपटात फक्त अशी भाषा असून चालत नाही कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटात कथा कादंबरी सारखे हवे तितके वा हवे तसे वर्णन पडद्यावर दाखविणे शक्य नसते. अशावेळी अभिनेत्याने म्हटलेले संवाद आणि कॅमेऱ्याने टिपलेल्या हालचाली या चित्रपट कथेला पूढे नेत रहातात. चांगले संवाद हा चिपटाचा प्राण असतो. कारण आपण ते ऐकत असतो, बाकी तर डोळ्यानां दिसतच असतं……..आपल्या चित्रपटसृष्टीत एक मोठी समस्या आहे ती म्हणजे कलावंताना फारच लवकर “टाईपड्” केले जाते. मग या प्रभावातून बाहेर यायचे कसे? हा मोठा प्रश्न असतो. शेवटी चित्रपट व्यवसायाचा अंतीम घटक प्रेक्षकच असतो. यामुळे अनेकदा अनेक कलावंताची अभिनय क्षमता असूनही त्याच त्याच भूमिका कराव्या लागतात.

    “बाई” आणि “मास्तर”…तसे सामान्य वाटणारे हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र हे शब्द जेव्हा या अभिनेत्याच्या मुखातून बाहेर पडत तेव्हा या शब्दांची भयावह सूचकता लक्षात येत असे. ओठांची विशिष्ट हालचाल करून डोळ्यांचा तिरपा कटाक्ष समोर फेकत काहीशा बसक्या पण घोगऱ्या आवाजात जेव्हा निळू भाऊ हे शब्द उच्चारत तेव्हा हा माणूस किती पाताळयंत्री असेल याची कल्पना प्रेक्षकानां येत असे. मला तरी आज पर्यंत त्यांच्या सारखी बेरकी नजर असणारा दुसरा कलावंत डोळ्या समोर येत नाही. खरं तर तमाशा प्रधान मराठी चित्रपटातील खलनायकाची छबी पण टाईपड् झालेली होतीच. तेच ते गुरगरने, भुवया उंचावून बोलणे, मिशीवर ताव देत संवाद म्हणणे यात खलनायक अडकून पडला होता. मात्र अनंत माने यांच्या १९६८ मधील ‘एक गाव बारा भानगडी’ या तमाशापटाने एक नवा खलनायक दिला “झेल्या अण्णा”. किडकिडीत अंगकाठी, हातात धोतराचा सोगा धरून चालण्याची एक खास ढब, अंगात जाकिट अन् डोक्यावरची कपाळवर झुकलेली तिरकस टोपी. मग थेटरात होणारी काहीशी मस्तवाल एंट्री….. चित्रपटाच्या सलामीच्या दृष्यात दिसणारा हा माणूस नेमका कसा असेल याचा थांगपत्ताच लागत नाही. किंबहूना हा माणूस खल नायक असू शकेल याच्या सुतराम शक्यता वाटत नाही. त्यातील दादा साळवी, बर्ची बहाद्दर वा गुलाब मोकाशी यांच्या समोर निळू भाऊ खूपच किडकिडीत दिसले पण शेवटी बाजी मारली झेल्या अण्णाने. लोक नाट्यातुन रंगभूमि गाजवणाऱ्या कलावंताची ही पहिलीच दमदार एंट्री होती. ‘झेले अण्णा’ या नावाला निळू भाऊ व्यतिरिक्त कुणी कलावंत इतका चपखल बसू शकला असता काय?

    निळू भाऊनी मराठी चित्रपटातील जुना खलनायक मोडून एक नवीनच खलनायक जन्माला घतला. त्याचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले होते. गार्डनिंगचा कोर्सही केला होता. तरूणपणी पूण्यातील ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’च्या उद्यानात माळी म्हणून काम केले. याच काळात त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली. राष्ट्रसेवा दलाचे कला पथक हे त्यावेळी चळवळीचे मूख्य शस्त्र होते. या कला पथकात त्यांना त्यांच्या आवडीचा अभिनय करण्यास वाव होता. याच काळात त्यांनी उद्यान नावाचे एक नाटक लिहले.

    नंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हे वगनाट्य लिहले. या वगनाट्यात त्यांनी पहिल्यांदाच अभिनयाची चूणूक दाखविली. नंतर पुलंच्या ‘’पूढारी पाहिजे’’ या नाटकातील रोगें या व्यक्तीरेखेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नतंर ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य आले आणि मग ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. दोन हजाराच्यावर प्रयोग झालेल्या या वगनाट्यातील भूमिकेने त्यांना चित्रपटसृष्टीची दारे खुली करून दिली.

    गावोगाव हे वगनाट्य सादर करतानां निळूभाऊना आलेल्या अनुभवामुळे त्यांचा अभिनय एकीकडे समृद्ध होत गेला तर दुसरीकडे सेवादलातील संस्कारामुळे सामाजिक जाणीवेचा पिंड पोसला जाऊ लागला. उतर आयुष्यातील त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा मूळ स्त्रोत हा असा होता. १९७२ मध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ‘सखाराम बाईडंर’ने त्यांना प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर नाव लौकीक मिळवून दिला. समिक्षकांनी देखील निळूभाऊच्या आशयाचे स्वागत केले. नंतरच्या चित्रपटातील व्यस्ततेमुळे रंगभूमीवरील जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सूर्यास्त त्यांची काहीशी मोजकीच पण दर्जेदार नाटके आली आणि त्यांच्या अभिनयाने गाजली. सत्ताधऱ्यांचा माज आणि रगेल व रंगेलपणा निळूभाऊनी असा काही उभा केला की प्रत्यक्षात ही असेच असतील का? असा सभ्रंम निर्माण व्हावा. अर्थात सत्याची किनार असलेल्या बहुतांश अशा व्यक्तीरेखा काल्पनीकच असतात. त्यांचा खलपणा त्या शिवाय स्पष्टपणे लक्षात येत नाही. हे करतानां त्यानी राजकारणी सत्ताधिशांचे खरे पैलूही नजरे समोर आणून दिले. स्त्री लंपटपणा तर ते असे अभिनीत करायचे की कधी एकदा नायक याला झोडपून काढतो याची प्रेक्षक वाट बघायचे. राम नगरकरांनी एकदा त्यांच्या विषयी आठवण सांगताना म्हटले होते की- त्यांना एकदा त्यांचे मित्र घरी जेवायला घेऊन गेले. जेवण वगैरे पार पडले. त्यांची ओळख करून द्यावी म्हणून ते बायको मुलींना बोलवायला आत गेले तर सगळेच रागात !!!! आई तर म्हणाली- कोणत्या घाणेरड्या माणसाला घरी बोलावले तू…. ‘मेला किती वाईट आहे तो तुला माहित तरी आहे का?’ ही तर त्यांच्रा कामाख्ची पावती होती. असाच प्रसंग प्राणने देखिल एका मुलाखती प्रसंगी सांगितला होता. निळू भाऊ मला मराठी चित्रपटातले प्राणच वाटतात. निळूभाऊनी ग्रामीण जीवन खूप जवळून अनुभवले असल्यामुळे त्यांचे निरीक्षणही सूक्ष्म होते. या निरिक्षणांचा चपखल वापर ते आपल्या व्यक्तीरेखेत करीत असत.

    निळूभाऊनां अशा प्रकारच्या खलनायकानं बऱ्याच अंशी लपेटून घेतेले खरे पण त्यातही त्यांचा वेगळपणे ठसठशीतदिसत असे. अजब तुझे सरकार, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, पटली रे पटली, पिंजरा, पैज, पैजेचा विडा, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, शापित, सर्वसाक्षी, सहकारसम्राट, सामना, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्‍या नार्‍या जिंदाबाद, थापाड्या अशा विविध चित्रपटातुन विविध भूमिका साकारल्या..विनोदी बाजही त्यांनी सुंदर साकारला. “पिंजरा” मध्ये तर डॉ. लागूशी टककर होती…त्यातल्या “मास्तर” एका शब्दाने त्यांनी काय काय सांगितलं होतं. यातील निळू भाऊच्या सोंगाड्याने प्रत्यक्षातल्या लोक कलावंताचे दु:ख अत्यंत प्रभावीपणे अधोरेखीत केले. मास्तच्या हातात दारूची बाटली सोपवतानांचा त्यांचा अभिनय मन हेलावून टाकणारा होता. “सामना” मध्येही दोघांचा सामना असाच रंगला. सत्ता आणि बुद्धीचा यात जबरदस्त सामना होता. यातला हिंदू धोंडेराव पाटील हा मस्तवाल व मुजोर बागायतदार निळूभाऊनी असा विलक्षण उभा केली की पूढे अनेकजण या व्यक्तीरेखेच्या प्रभावाखाली आले. याच भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. १९८२ आलेल्या “शापित” मधली छोटी पण प्रभावी भूमिका लक्ष वेधून घेते. “सिंहासन” मधला पत्रकार त्यांच्या सर्व भूमिकेपेक्षा सर्वस्वी वेगळा होता. कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सासके अशा हिंदीतही केलेल्या मोजक्याच भूमिका लक्षवेधी ठरल्या. कुली मध्ये अमिताभ समोर तितक्याच ताकदीने ते उभे राहिले.

    पडद्यावरचा हा खलपुरूष व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात मात्र आदर्श नायक होता. सेवा दलाच्या संस्कारामुळे ही जाणीव त्यांनी आयुष्याच्या अखेर पर्यंत निष्ठेने जपली. रंगभूमीवरील कलावंताचा उत्तरार्ध अत्यंत क्लेशदायक असतो हे ओळखून त्यांनी व डॉ. लागू यांनी मिळून एक मोठा निधी संकलीत करून या कलावंताना दिलासा दिला.अंधश्रद्धा निर्मल्न समितीच्या कार्यात ते आवर्जून सहभागी होत. अभिनेते म्हणून दिग्दर्शकांच्या सर्व सूचना पाळणाऱ्या निळू भाऊचे स्वत:चे ही असे एक स्वंतत्र मत आणि विचारधारा होती. आणि त्यावर ते आयुष्यभर ठाम पण राहिले. त्यांचा हा गूण आभावानेच अभिनेते वा कलावंतात आढळून येतो. अतुल कुलकर्णी सारखा अभिनेता सोडता सध्या मला तरी अशी स्वत:ची ठाम वैचारिक भूमिका असलेला अभिनेता दिसत नाही. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी १३ जुलै २००९ रोजी पहाटे २ च्या सुमारास आपल्या सलग ४० वर्षांच्या कला प्रवासाला त्यांनी शेवटचा प्रणाम केला. त्यांची कन्या गार्गी आता त्यांचा वसा पूढे नेत आहे.

    दासू भगत (१३ जुलै २०१७)

  • भारतमातेच्या वीरांगना – 8 : उदा देवी (नेमबाज वीरांगना)

    १८५७ चे रणशिंग फुंकले गेले. कमांडर कोलीन कॅम्पबेल च्या नेतृत्वाखाली लखनऊ च्या सिकंदरबाग येथे ब्रिटिशांनी हमला केला. आपल्या तुकडीला योग्य ते मार्गदर्शन करून, ऊदा देवी जवळच्याच एका झाडावर चढल्या आणि तिथून ब्रिटिश सैन्यावर गोळ्या झाडू लागल्या. एकट्या ऊदा देवींनी ३० च्या वर इंग्रजी सैनिकांना मारले.

  • राजीव गांधी, अफ़जल गूरू, ओमर अब्दुला आणि बॉम्बस्फोट

    ७ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी १०.१४ वा. दिल्ली हायकोर्ट, गेट क्रं. ५ येथे भीषण बॉम्बस्फोट झाला. हा बाँम्ब एका ‘ब्रिफकेस’मध्ये ठेवण्यात आला होता. स्फोट इतका बलशाली होता की, स्फोटाच्या ठीकाणी चार फुटाहून मोठा खड्डा पडला आहे, या परिसरातील अनेक गाड्यांचेही तुकडे झाले आहे. बांगलादेशातील हरकत-उल-जिहादी “हुजी” (नावातंच जिहाद आहे) या आतंकवादी संघटनेने स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारताना “हुजी”ने असे म्हटले आहे की महम्मद अफ़जल गूरू याला देहदंडाची शिक्षा झाली आहे, त्याचा विरोध म्हणून हा भयानक स्फोट घडवून आणला आहे. अफजलची फाशी रहित करावी, अन्यथा देशातील आणखी काही उच्च न्यायालयावर अशीच आक्रमणे करू, अशी धमकी “हुजी”ने भारताच्या मुस्कटात मारली आहे. काँग्रेसचे युवराज घायाळांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते तेव्हा त्यांना जन-उद्रेकाला सामोरे जावं लागलं, त्यांच्या विरोधात भोषणाबाजी झाली. गांधी-नेहरु परिवाराला जन-उद्रेक काय असतो हे वेगळे सांगायला नको.

  • या ‘नावा’चं करायचं काय?

    त्या दुकानातील नौकर दुकानाची सायकल ढकलत आणत होता. मालकाने विचारलं तर म्हणाला, सायकल पपंचर (puncture) आहे. मालकाने गल्ल्यातून 10 रुपये काढून दिले, 1 तासाने तोच नौकर, तीच सायकल, तशीच ढकलत आणत होता. पुन्हा मालकाने विचारलं, तर उत्तर मिळालं, दोन पपंचर होते, 10 रुपयांत 1 पपंचर काढतात, माझ्या कडे 10च होते म्हणून एकाच काढून आणलं..
    नौकाराचे नाव होतं- ज्ञानेश्वर !!!

    "आखें" चित्रपटात अमिताभ बच्चन 4जणांना 'नेमबाजी' शिकवत असतो, त्यात नेमका अर्जुन रामपाल चा नेम चुकतो आणि परेश रावल पटकन बोलून जातो, "ए, तेरा नाम अर्जुन किसने रखा?"

    तर मूळ मुद्दा हा की, आपल्या आजूबाजूला 70-80 % लोकं अशी असतात की जी त्यांच्या नावाच्या अगदी विरुद्ध वागत असतात. "लेकराचे पाय पाळण्यात दिसतात" म्हणतात मग नावं ठेवताना ती का दिसत नाहित ?
    * अनुजा तुझी कोण? तर उत्तर येतं 'मोठी बहीण'.
    * त्याने त्या 6 फूट उंच असलेल्या मित्राची ओळख करून दिली, हा 'वामन'.
    * मोठ्या भिंगाचा चष्मा असलेल्या व्यक्तीच नाव होतं, 'संजय'
    एका मित्राच्या वडिलांचे नाव 'हनुमंत' सुद्धा आहे.
    'कृष्णा' नावाचा खूप सज्जन मित्र आहे माझा तर 'राम' नावाचा खूप वाह्यात मित्र सुद्धा आहे मला.
    'लक्ष्मी' नावाची मोलकरीण कित्येक जणांच्या घरी असेल, तर 'राजा' नावाचा नौकर किती तरी दुकानात असतो.
    एकाच मुली नंतर अपत्य न होऊ देण्याचा निर्णय, "कुंता" नावाच्या मैत्रिणीने घेतलाय.
    'मीना' नावाच्या मुलीला पाण्याला घाबरलेलं पाहिलंय 'अबोली'ला बडबड करताना पाहिलंय.
    बरं नुसते नावं च नाही तर 'आडनावात' विसंगती असलेली कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात...
    5 वर्षापूर्वी लग्न झालेला, "अष्टपुत्रे" 1 वर्षांपासून 'वंध्यत्व निवारण केंद्रात' जातो आहे.
    "कुबेर" नावाचा माणूस पोटापाण्यासाठी छोटेखानी हॉटेल चालवतो आहे.
    कधीच दारू न पिणारा "झिंगरे" नावाचा मित्र मला आहे.
    Adv वैद्य नावाचे मोठे वकील आहेत.
    "लोखंडे" आडनावाचे कोमल ह्रदयाची माणसं जशी आहेत, तशीच अतिशय शांत स्वभावाची 'जमदग्नी' आडनावाची माणसं सुद्धा आहेत......
    लिहिता येईल अशी खूप खूप उदाहरणे सापडतील, पोस्ट चा आकार भला मोठा होईल म्हणून थांबतो.
    जाताजाता- ज्यांच्या नावात काहीच आकार उकार नसतात ते माणसं साधी सरळ असतात, असं म्हणतात. पण ही देखील माझी अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणारा "उदय"नावाचा मित्र मला आहे तर तुमची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ""श र द""हे एकच नावं पुरेसे आहे, असं मला वाटतं !!!

    तळ टीप :- आमच्या परिसरात "डावरे" आडनावाचा खूप मोठा गोतावळा आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या या "डावरे" परिवाराची माझी देखील ओळख नाही. मग कुणीतरी नवीन ओळख झालेला मला विचारतो, आमका - तमका "डावरे" तुमचे कोण? मी ही बेधडक, "हो आमचे नातेवाईक आहेत." असं ठोकून देत असे.
    एकदा एकाने विचारलं, "विनय डावरे" तुमचा कोण? एका क्षणाच्या अवधीच्या आत बायको म्हणाली, 'नाही, तो आमचा कुणी नाही' घरी आल्याबरोबर मी विचारलं, तुला ग काय माहित त्याच्या बद्दल ???
    ती म्हणाली, आहो तो कुणा "विनय डावरे" बद्दल विचारत होता. मला ठाम विश्वास आहे, "डावरे" मधे "विनय" असूच शकत नाही...!!!

    विनोद डावरे, परभणी.

    ##सहजच सुचलं - 80

  • नॅशनल टेक्निकल इन्स्टिट्युट

    National-Technical-Institute

  • सामाजिक बांधिलकी जपणारी – “फ्रीमेसनरी”

    “जगात अनेक सामाजिक संस्था अशाही आहेत ज्या कित्येक वर्षापासून कोणताही अपेक्षेशिवाय व कार्याचा बोलबाला न करता केवळ मानवतेच्या हितासाठी तसंच तळागाळातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द आहेत. “फ्रीमेसनरी” ही ५०० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थापन झालेली आणि भारतात २५० वर्षापासून कार्यरत असलेली सर्वधर्मसमभाव मानणारी आणि समाजहितासाठी तत्पर असणारी संस्था. या संस्थेच्या कामाचं स्वरुप, उद्दिष्टांविषयी माहिती करुन देण्यासाठी नुकतंच मुंबईतल्या फोर्ट येथील “फ्रीमेसन हॉल” येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने भारतात ”फ्रीमेसनरी” चं समाजकार्य कशाप्रकारे सुरु आहे त्याचा हा वेध.”

  • गाण्याच्या कहाण्या – एक चतुर नार – पडोसन -१

    जुनी हिंदी गाणे मला आवडतात . 'एक चतुर नार ,करके सिंगार -- ' पडोसन (१९६८)मधील गाणे , माझ्या आवडत्या गाण्या पैकी एक . हे गाणे माझ्यासाठी 'मूड सेटर 'आहे . कधी उदास वाटू लागलं कि मी हे गाणं ऐकतो . एनर्जी मिळते . एकदम फ्रेश होतो . झोपेतून उठल्यावर ,गार पाण्याचा तोंडावर हबका मारल्या सारखा .

    या गाण्यामागे एक छानशी आठवण पण आहे . परभणीस मी प्रमोशन वर बदलून आलो होतो . दोन -तीन समान म्हणजे जुन्या गाण्यांची आवड असणारे सहकारी भेटले . मंगेश ,सुभाष ,मुकुंदा ,आणि मी असा बघता बघता एक कंपू जमला . कधी मधी विलास ,दिलीप जॉईन व्हायचे ,पण आम्ही चौघे मात्र नियमित मेम्बर . मग काय ?(यांच्या संगतीतला हा माझा 'सुवर्ण काळ 'होता याची जाणीव आत्ता होतीयय ,आम्ही सारेजण विखुरल्यावर !)एखाद्या रविवारी आम्ही सुभ्या कडे (सुभाष तेव्हा सुभ्या ,सुब्बाराव संबोधण्या इतका जवळचा होता , हल्ली सम्पर्कात नाही -रुसलाय !) जमायचो . सुभाष , मंगेश सूर तालाला पक्के . मुकुंदा ठेक्याला ! आमच्या मुकुंदाला ठेका धरायला , पत्र्याचं डबडं , पिठाचा डब्बा , लाकडी टेबल काय पण चालायचं .! मग मंगेश गाण्यात सूर मारायचा 'एक चतुर नार ---' सुब्बाराव तयारीतच असायचा ,पुढच्या ओळी अलगत उचलायचा . मुकुंदाच्या हात टेबल बडवण्यात गुंतलेला ! मी सगळ्यात भाग्यवान ,डोळे मिटून हे सर्व कालवून कानाने 'खायचो ',अधाशा सारखा !हे संपलं कि ' रामय्या वस्तावया ---' (हे सुभ्याचे पेट्ट गाणं ),खूप गाणी व्हायची . पेटी नव्हती ,तबला नव्हता ,पण खरे सांगू त्याची कधी आठवण पण व्हायची नाही (--मित्रानो , हम ऊन दिनो अमीर थे ,जब तुम करीब थे !)असो .

    विनोदी गाण्यात, या गाण्याला मी माझ्या अखत्यारीत 'अढळ पदी ,अंबरात ' बसवलंय . क्लासिकल संगीतात विनोदी जुगलबंदी ! विरळच !एक कलाकृती म्हणून हे गाणे खूप ' कठीण ' काम . या गाण्याचे लिरिक्स अफलातून आहे . अहो चक्क अ ,आ, इ, ई ----ची बाराखडी यात फिट केलीयय ! वर --अयो घोडे --नमा नामा --अन काय काय ! शिवाय सिनेमाच्या सिचुएशनला परफेक्ट मॅच आणि कलावंताच्या कॅरेकटरला एकजीव होणारे ! या लिखाणा बद्दल राजेंद्रजीना (राजेंद्र कृष्ण ) सॅल्यूट !

    तर अश्या या शब्दाना आपल्या सुरावटीवर पेलणारे , ---पेलण कसलं ?अक्षरशः नाचवलंय हो , निस्ता हैबतधुला घातलाय या महाभागांनी , किशोर कुमार ,मन्नाडे आणि मेहमूद ! किशोरकुमार म्हणजे गाणं , विनोद ,अभिनय , सगळा सिनेमाचं अंगी मुरलेला माणूस !, मेहमूद विनोदाचा 'राक्षस ' म्हणण्यास वावगे ठरू नये , आणि मन्नाडे, गाण्याची जाण आणि शास्त्रीय संगीताची बैठक असलेला , दादा ! त्या काळी मन्ना -दा ची तशी दहशतच होती !

    विद्यापती -म्हणजे किशोर कुमार, एका लोकल थेटरचा संगीतकार , भोलाला (सुनीलदत्त )पोरगी -'बिंदू ' -(सायराबानू )-पटवायला मदत करायला आलेला भोलाचा मित्र . गाण्याच्या नादापायी पोरीचा ओढा मद्रासी संगीत शिक्षक पिल्लई -मेहमूद -कडे ! भोला आणि पिल्लै यांच्या गाण्याची जुगलबंदी ठरते . भोला अन गाणं म्हणजे बोंबच ! मग भोलाचे गुरु विद्यापती,अशी तोड काढतो कि -भोलाने खिडकीत उभे राहून फक्त ओठ हलवायचे आणि मागे बसून भोलाचे गुरु -किशोर कुमार -पिल्लेच्या -मेहमूदच्या - गाण्याला उत्तर देणार ! हि या गाण्याची सिच्युएशन !या गाण्या नंतर सुनीलदत्त नि आपल्या खाजगी आयुष्यात सुद्धा, किशोर कुमारला 'गुरु ' म्हणूच संबोधिले !अगदी शेवट पर्यंत !

    सुनीलदत्त साठी किशोर कुमार आणि मेहमूदसाठी मन्नाडे गातात ,मधेच मेहमूदची वाक्ये आहेत . मेहमूदच्या पिल्लै या पत्राचा मद्रासी हेल मन्नाडेंनी लीलया सांभाळलाय . मन्नाडे तसे 'हिंदुस्थानी ' म्हणजे उत्तर भारतीय संगीतातले ,पण दक्षणात्य लय हि साध्य असल्याचे त्यांनी या गाण्यात सिद्ध केलाय . किशोर कुमार आणि मेहमूद ,जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेंस 'असणारे , तेव्हा यांच्या अभिनयाची 'जुगलबंदी ' --'सिर्फ देखनेसे तालूख रखती है !'

    या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणलंतर उस्फुर्तता !किशोर कुमार आणि मन्नाडेंनी हे गाणे इतक्या उस्फुर्ततेने गायलंय कि ऐकताना असे वाटते कि आधी हे मंडळ गाऊन गेलंय अन मगच ते लिहून घेतलय ! मन्नाडे सारख्या कसलेल्या गायकाला किशोर कुमार तोडीस तोड गायला आहे . आर .डी .बर्मन (संगीतकार ) यांनी हे गाणे केवळ बारा तासाच्या सरावावर ध्वनिमुद्रित केले आहे ! फायनल रेकॉर्डिंग चालू होती . मन्नडे 'नाच ना जाने आंगन तेढा 'हे वाक्य संपवून ,'तेहहSSS डा ' ची आवर्तने करत होते . किशोर कुमार अवलिया , गीतरचनेत नसलेले ' ओय SS तेढे सीधे हो जा 'म्हणून मधेच तोंड घातले ! मन्नाडे सगट सगळे सटपटले . आर .डी नि मन्नाडेला कंटिन्यू करण्याची खूण केली आणि सावरून घेतले . गाणं झकास झालं . या गाण्याच्या वेळेस किशोर कुमारचा वारू उधळा होता हे बारीक खरं !

    गाण्याच्या शेवटच्या कडव्यांच्या आसपास 'ताल पे नाचे लंगडी घोडी ' या किशोरकुमारच्या वाक्यानंतर , मेहमूदचे 'चतुर नार ' आणि किशोर कुमारचे ' आयो SSS घोडे ' यांची रस्सीखेच सुरु होते . किशोर कुमार ज्या बेरकी पणे आपले ' आयो SSS घोडे ' मेहमूदच्या गळ्यात मारतो ते क्षणभर ऐकणाऱ्यालाही चकित करून जाते . मला येथे Tom &Jery च्या एका क्लिप ची आठवण झाली . वात पेटवलेला बॉम्ब टॉम मांजर जेरी उंदराच्या हाती देत ,उंदीर पुन्हा बॉम्ब मांजराला देते , असे हे चालू असताना मधेच डाम्बिस उंदीर तो बॉम्ब मांजराच्या हातून हिसकावून घेते , सवयीने मांजर तो बॉम्ब उंदराकडून हिसकावते चार दोन आवर्तने झाली कि उंदीर मागे हात बांधून उभारते . मांजराला काय झाले कळायच्या आत तो बॉम्ब मांजराच्या हातात फुटतो ! तसेच काहीतरी या गाण्यात घडते ! आपण गंडवले गेल्याचे मेहमूदच्या लक्षात आल्यावर तो वैतागतो . ' अरे ,ये घोडा ,चतुर ,घोडा ,चतुर क्या ?एक पे रहेना ! ग्गा ! ' मेहमूदच्या आवाजाची लय मन्नाडेंनी मस्त सांभाळी आहे . मेहमूदचे वाक्य आणि मन्नाडेचा आवाज याचा जोड कानाला जाणवत पण नाही .

    या गाण्याची प्रेरणा पण इंटरेस्टिंग आहे . याची प्रेरणा आहेत तीन गाणी ! पैकी एक -संत तुलसीदास (१९३९)साठी विष्णुपंत पागनीसांनी गायिलेले --बन चले राम रघु राई . दुसरे आहे -- १९४१ साली अशोक कुमारांनी 'झुला 'मध्ये चार ओळी गुणगुणल्या होत्या --एक चतुर नार कर कर सिंघार --- .'तेव्हा मेहमूद आणि आर .डी .बर्मन खूप तरुण होते . त्यांच्या मनात या ओळींनी घर केले . साधारण वीस वर्षांनी जेव्हा मेहमूदने 'पडोसन 'करायला घेतला तेव्हा आर .डी . ला या ओळी घेण्यास सुचवले . आर .डी नि त्या ओळी या गाण्याच्या मुखड्यासाठी उचलल्या आणि बाकी गाणे आपल्या स्टाईलने राजेंद्रजी कडून लिहून घेतले . तिसरे गाणे आहे --जिद्दी (१९४८)मधील -- चंदा रे जा रे जा रे . या तिन्ही गाण्यांची झलक 'चतुर नार --'मध्ये डोकावते .

    जेव्हा मन्नाडेंनी या गाण्याची सिच्युएशन ऐकली तेव्हा त्यांनी गाण्यास नकार दिला होता . कारण एक प्रशिक्षित गायक जुगलबंदीत एका सामान्य अ -प्रशिक्षित गायका कडून मात खातो हे काही हे काही त्यांना पटेना . मागे म्हणजे 'बसंत बहार ' (१९५६ )च्या वेळेस मन्नाडे आणि प. भीमसेन जोशींनी अशीच एक जुगलबंदी गायली होती . मन्नाडे' बैजू बावरा' साठी आणि प. भीमसेन जोशी' तानसेन ' या पात्रांसाठी गायले होते . 'केतकी ,गुलाब ,जुही ,चंपक बन --' त्यात तानसेन म्हणजे प. भीमसेन जोशी ,हरतात . स्क्रीन वरील पात्रांच्या हार -जीत मध्ये गायकांनी अडकायचे नसते . याची आठवण मेहमूद आणि आर .डी नि मन्नादांना करून देऊन गाण्यास राजी केले . या गाण्याचे संगीतकार जरी आर .डी . बर्मन असले तरी हे गाणे किशोर कुमारनीच कम्पोज केल्याची कबुली एकदा आर .डी नी दिली होती .

    या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य सांगण्याजोगे आहे . या गाण्यात चार राग वापरले आहेत ! खाजम ,बिहाग , देस आणि छाया नट हे ते राग , हे गाणे म्हणजे एक राग मालिकाच आहे !

    Indiatimes Movies यांनी पाहण्याजोग्या पंचेवीस हिंदी सिनेमाची यादी प्रसिद्ध केली होती , त्यात 'पडोसन ' होता . या सिनेमाची कथा अरुण चौधरी यांच्या पाशेर बारी (Pasher Bari )कथेवर आधारित आहे . या घट्ट बांधणीच्या विनोदी सिनेमाचा शेवट मात्र चटका लावून जातो . सुनीलदत्त आणि सायरा बानूच्या लग्नाचा सोहळा असतो . मांडवाबाहेर लांबलचक पिपाणी वाजवत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करताना मेहमूद दाखवला आहे . ज्या पंगतीत हाता -तोंडाशी आलेला घास हिरावला जातो ,या दुर्दैवी जीवाला तीच पंगत वाढावी लागतेय ! क्षणभर मेहमूदच्या डोळ्यातील पाणी चमकून जाते . हा क्षण पाहणाऱ्यांचे काळीज फाडून जातो ! जुगलबंदी हरलेला मेहमूद येथे 'जिंकतो ' !

    -- सु र कुलकर्णी

    आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय , पुन्हा भेटूच , Bye

  • अहिल्या महिला मंडळ, पेण

    आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीचा व स्त्री संघटनेचा अविष्कार दिसू लागलाय. अतिशय भावनाप्रधान मन, संवेदनशील स्वभाव, समाजातील तळागाळामधील लोकांसाठी काम करण्याची प्रखर इच्छा, समाजसेवेसाठी लागणारी तळमळ, जिद्द आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत मनात जपलेल्या नीतीमुल्यांशी तडजोड न करण्याची महत्वाकांक्षा या सर्वच गोष्टींचा अनोखा संगम स्त्री समाजामध्ये झालाय.

  • पेवरचा ताप……!!! मयुरटीका

    “फेवर ब्लोक”चे पेवच फुटले,
    सगळीकडे हे लावत सुटले,
    म्हणून सगळ्या मुंबईभर,
    पेवर आणि फेवर ब्लोकच दिसले………