१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.
बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही अजरामर रचना….
२१ व्या शतकात जागतिक महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात, शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोगाची गरज नाही काय ? वाढत्या लोकसंख्येबरोबर शासनासामोरील समस्यांचे डोंगर वाढत आहे. गाव तिथे शाळा, हे धोरण असल्याने बऱ्याच शाळांत विध्यार्थी संख्या नाममात्र दिसते. १० ते ५० पटसंख्या असलेल्या शाळांचे प्रमाण भरपूर आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार ६० पटसंख्ये पर्यंत दोन शिक्षक, हे धोरण असले तरी इयत्ता ४ आणि शिक्षक २ ह्याचा कोठेही मेळ बसत नाही.
घराच्या अंगणात चार डिळ्या (खांब)रोवले जायचे त्याच्यावर उभे आडवे लाकडं बांधून त्यावर पळसाच्या पानांचं दाट आवरण असायचं.. या मांडवाखाली एवढं गार वाटायचं की आमचं सगळं कुटुंब पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत तिथेच असायचं.या मांडवावर टाकण्यासाठी पळसाची पानं असायची त्याला आमच्याकडे एक विशिष्ट शब्द होता,त्याला ‘व्हरका’ असं म्हणायचे…
लेखांक सातवा
वास्तुशास्त्र पेंटिंग या विषयांतर्गत लेखात आपण पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग आणि कोणत्या दिशेला तोंड करून भिंतीला लावावे याबद्दल माहिती घेऊया.
मी बऱ्याचदा सांगत असतो की, तज्ञाशिवाय किंवा सल्ल्याशिवाय रंग विषयांवरील माहिती स्वतःच्या मनाने न घ्यावी अमलात आणावी. कारण रंगांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे ॲलोपॅथीच्या औषधां सारखे लगेच जरी दिसले नसले किंवा दिसत नसले तरीही आयुर्वेदाप्रमाणे परंतु मन-इच्छा-भाव-भावना-षड्रिपू- ज्ञानेन्द्रिय आणि विचार यांवरच अपेक्षित, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवून आणतात.
वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये असेच घटक आणि रंग यांना आकारबद्ध केलेलं असतं की, ज्यांनी त्या पेंटिंगचे मागणी केलीय अन्ज्या वास्तूमध्ये ते लावायचे आहे त्याची जागा इत्यादी सर्व जाणून घेऊन, जन्म नक्षत्राचा अभ्यास करून फक्त चांगले परिणाम देणारे रंगच आणि आकारच विशिष्ठ रचनांमध्ये, नक्षत्र स्वामी चा, नक्षत्राचा जप करून ती कलाकृती साकारली जाते.
या नक्षत्राचा आराध्यवृक्ष राजा आम्रवृक्ष म्हणजे आंबा आहे. भारतातील सर्वच वातावरणात हा वृक्ष आढळतो, का? तरी या वृक्षाला सर्व वातावरणाशी मिळतंजुळतं घेता येतं. किती महत्वाची बाब आहे. आता वाचकांना आश्चर्य वाटू शकेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना देखील कुठल्याही वातावरणात, भारतामध्ये जिथे-जिथे आंबा उगवतो त्या सर्व भूभागावरील नैसर्गिक वातावरणात शारीरिक, प्रकृती मिळतेजुळते घेणारी असते. इतरांच्या तुलनेने या लोकांना बाह्य प्रांतात, भौगोलिक प्रदेशात फारच कमी किंबहुना नाहीच त्रास होत.
म्हणून यांच्यासाठी खास बनवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये, आंबा या वृक्षाचा पंचांगे, कुंभ किंवा मीन यांच्यापैकी चित्रकार, शीतरंग आणि त्यांच्यासोबत थोडासा तपकिरी, पांढरा, किंचित काळा अशा रंगांच्या योजना आणि वरील घटकांचे आकार यांची त्या व्यक्तीला पारखून एक सुयोग्य मांडणी करून वास्तुशास्त्र पेंटिंग बनविले जाते. यातील नक्षत्राचा आणि नक्षत्र स्वामींचा जप तेवढ्या पटीत करून ओम अजैकपादाय नमःही जपाक्षरे देखील त्या पेंटिंगचा चित्रविषय म्हणून आकारबद्ध केली जातात.
व्यक्ती, वास्तुस्थल या तीन बाबींचा विचार, तोही सकारात्मक, यशाची फळे देणारा असा विचार रंग चित्रकार आणि जपाक्षरेयांच्या रंग साजातून सजविला जातो. तोच त्या वास्तूचा जणू आत्माच बनतो. वास्तुशास्त्र पेंटिंगचा रूपाने. मग नकारात्मक ऊर्जा त्या वास्तूतून काढता पाय घेते. तिची जी जागा रिकामी होत जाते ति या पेंटिंग मधील सकारात्मक रंग किरणांचा लहरींमुळे, सकारात्मक उर्जेला खेचून त्या रिकाम्या जागी स्थिर करते. हे सगळे अगदी नकळत परंतु सहजपणे घडत जाते. आणि व्यक्ती अन तिचे कुटुंब आनंदात डुंबायला लागते.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
काल असाच कामानिमित्त घराबाहेर पडलो.कामासाठी वेळ लागणार होता. बराच वेळ घालवूनही वेळ होताच. तेव्हाच रस्त्याच्या बाजूला एक टपरी दिसली.मस्त पातेल्याबाहेर चहाच्या वाफा येताना दिसल्या.चला म्हटलं एक चहा घेऊ या. एकटाच होतो आणि केवळ वेळ घालवायचा होता तशी चहाची वेळ झाली होती.
पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना --
भारतात - महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.
नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात
लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात.
कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहीरात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.
कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.
मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.
विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.
चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते.
जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरीम्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात.
इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.
जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.
रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.
मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.
हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात
मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात – दिआ द ला मुरतोस – हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.
अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवारमनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी.
ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील. बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या त्या कृती त्या त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील. जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल – पाप – लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत. रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते. -
अधिक माहितीसाठी पहा.
http://epaper.eprabhat.net/337780/Rupgandh/Rupagandh#page/9/1. श्राद्ध वगैरे कल्पना ब्राह्मणांनी समाजाला लुटायला निर्माण केल्या असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांनी वरील माहिती लक्षात घ्यावी.
जीवनाच्या रगाड्यातून
अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
चित्रवाणी संच दुरून किंवा कोचावर बसल्या बसल्या बंद करायचा, तर दहा फुटी वायर जोडावी लागत असे. बिनतारी रिमोट नव्हतेच, ते युजीन यांच्या कल्पनेतून साकारले. तेव्हा रिमोट म्हणजे रेडिओ लहरी सोडणारी आणि आजच्या ‘हेअर ड्रायर’यंत्रासारखी दिसणारी एक बंदूकच होती ती.. या रिमोट कंट्रोलने चार कामे करता येत असत.
Copyright © 2025 | Marathisrushti