लक्ष्मीपूजन

अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.



आश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात.

‘हे लक्ष्मी देवी, तू सर्व देवांना वर देणारी व विष्णूंना प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्ती होते ती तुझ्या दर्शनाने मला प्रास होवो.’

लक्ष्मीजवळ कुबेराची पूजा केली जाते. त्याची प्रार्थना – निधी व पद्य यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला माझा नमस्कार असो, आपल्या कृपेने धनधान्यादि संपत्ती प्रास होवो.

मध्यरात्रीनंतर अलक्ष्मीला हाकलविण्यासाठी सुपे व दिमडी वाजवितात.

पुराणांत असे सांगितले आहे – या दिवशी रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व निवासासाठी योग्य स्थानाचा
शोध घेते. जेथे स्वच्छता शोभा, रसिकता, चरित्र्यवान माणसे, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, क्षमाशील माणसे असतात तेथे ती वास्तव्य करते.

काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.

— विद्याधर करंदीकर

Author