शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्यावर मराठीसृष्टीच्या लेखकांनी लिहिलेल्या काही लेखांचे हे संकलन….
येथे हवी शिवबांची कठोरता,
येथे हवी सुभाष चंद्रांची निस्सीमता,
येथे हवी सावरकरांची दैदीपत्यमानता,
येथे हवी भगतसिंघांची चपलता,
तरच आपला निभाव लागणार हाय,
तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!
एकदा, बस स्थानकावर भर पावसात ओले चिंब भिजलेल्या तरुणीला पाहिल्यावर सुचलेली हि कविता!!!!
आज बारा जुलै : पानशेत धरण फुटीच्या आधीचे अर्थात बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ पूर्वीचे पुणे !
पुणे येथील पानशेत धरण फुटलेल्या घटनेला आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली ! बुधवार दिनांक बारा जुलै एकोणीसशे एकसष्ठ, त्यादिवशी दिव्याची आवस होती ! एवढा काळ लोटला, तरीही माझ्यासारख्या जुन्या पुणेकरांच्या मनात पानशेत धरणफुटीच्या त्या भयानक आठवणी अजुनीही विस्मुतीमध्ये गेल्या नाहीत.
मी तर तेव्हां डेक्कन जिमखान्यावरील डे जि भावेस्कूलमध्ये [आत्ताचे सौ विमलाबाई गरवारे प्रशाला] शिकत होतो. त्यावेळी पुण्याला शांत पुणे, पेन्शनरांचे पुणे, सायकलींचे पुणे, अश्या विविध चांगल्या विशेषणांनी संबोधले जायचे. पर्वती, पद्मावती, विठ्ठलवाडी, कोथरूड, ही ठिकाणे पुणे शहरापासून खूप दूर मानली जायची. सुट्टीच्या दिवशी, आलेल्या पाहुण्यांना पेशवे पार्क, तळ्यातला गणपती (आत्ताची सारसबाग) दाखवायला न्यायचे म्हणजे, आपण किती लांब आलो, असे वाटायचे. पौषाच्या महिन्यात पद्मावती येथे आवळीभोजनाला जायचो. कार्तिकी एकादशीला विठ्ठलवाडीला शाळेची सहल जायची. तेव्हा ह्या ठिकाणी बसची सोय नव्हती.
आप्पा बळवंत चौक ते डेक्कन जिमखाना बसचं तिकीट फक्त पाच पैसे होतं, आम्हां शाळकरी मुलांचा महिन्याचा तेव्हां बस पास काढला जायचा फक्त दीड रुपयात ! पुण्यात एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये रिक्षा आली, तथापि रस्त्यावर मोठी वर्दळ होती ती सायकलींची, हं, प्रवाशांकरिता वाहन म्हणजे घोड्याचा टांगा ! शनिवार पेठेतून, शिवाजीनगर एसटी बस स्टँडला जाण्यासाठी टांगेवाल्याला फक्त चार-सहा आणे द्यावे लागायचे, अर्थात तेव्हां ते सुद्धा जास्त वाटायचे.
संध्याकाळी शनिवारवाड्यापुढील पटांगणात नामवंतांची व्याख्याने ऐकायला मिळायची. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, ह्यांची ऐकलीली श्राव्य अशी व्याख्याने आजही आमच्या कानामनात घुमत आहेत. गणेशोस्तव साजरे व्हायचे, मेळे भरायचे, त्यामध्ये पं भीमसेनजी जोशी, गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, सरस्वती काळे, बी सायन्ना पार्टी, ह्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. गणपतीमध्ये मंडळांतर्फे रस्त्यावर चित्रपट पाहायला मिळायचे.
उन्हाळ्यामध्ये कुठल्याही रसवंतीगृहात जा, पाच पैशात अर्धा ग्लास, तर दहा पैशात फुल ग्लास रस निवांतपणे पिउन आनद लुटत होतो. फक्त चार आण्यात म्हणजेच पंचवीस पैशात आईसप्रोट - कुल्फी मिळायची. शनिवारवाड्यावर चार आण्यात मस्त भेळ मिळायची !
मंडई मध्ये गेल्यावर एक-दोन रुपये देऊन पाच-सहा पिशव्या भरून भाजी आणली जायची. गोडेतेलाचा भाव दहा आणे शेर झाला म्हणल कि, अरे बापरे, असे वाटायचं ! दिवाळीमध्ये फक्त दहा रुपयात, दहा पिशव्याभरुन फटाके आणले जायचे. घरातील सर्व भावंडांमध्ये ते वाटूनसुद्धा, थोडे बाजूला ठेवले जायचे, ते तुळशीच्या लग्नाला शिल्लक ठेवले जायचे.
अगदी मनापासून, प्रांजळपणे सांगू कां ? तेव्हां आमच्या पिढीने अनुभवली ती मनाची श्रीमंती, आता दिसतीय ती पैशाची !
-- उपेंद्र चिंचोरे
एके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.
मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.
ट्रान्स सैबेरियन टूरचा प्रवास करणे म्हणजे बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास – मॉस्को पासून ते रशियाच्या पूर्वेच्या व्लादिवोस्तोक पर्यंत किंवा दुसरा मॉस्कोपासून ते मंगोलिया मार्गे बीजिंगपर्यंत. (ट्रान्स मंगोलिन) १५ दिवसांचा प्रवास करण्यासाठी चांगले नियोजन आणि थोडासा अभ्यास करावा लागतो.
आसाममधील ४२ विधानसभा क्षेत्रांतील बांग्लादेशी मुस्लीम घुसखोरांचे बाहुल्य, ब्रम्हपुत्रेच्या पुत्रांना अभिशाप ठरत आहे. बोडो बांधवांची हत्या, लुट, बोडो तरुणींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतरण तसेच बोडो मूळ निवासी जनजातीय लोकांच्या जमिनीवरील अतिक्रमण हे प्रकार दररोजचेच झालेले आहेत. क्रुरतेने अत्याचार करणे आणि पुन्हा बोडो बांधवांवर खोटे आरोप करून त्यांनाच वेठीस धरणे ही बाब सर्वश्रुतच आहे. भारतीय संस्कृतीवर अगाढ निष्ठा असलेल्या या बांधवांना आम्ही सुरक्षिततेचे वातावरण कधी देणार ?
विजयदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारख्या पर्यायाच्या शोधात नाही ना की आम आदमी पार्टी हाच माझ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल ?
Copyright © 2025 | Marathisrushti