आज ग्रामीण भारतातील शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शिक्षकांच्या आणि शालेय सोयीच्या नावाने न बोललेले बरे. अपुरी शिक्षण सामुग्री, जीवन जगण्याची धडपड, दोन वेळच्या जेवणाची परवड आणि अश्या वेळी संपूर्ण भारत भर एकच परीक्षा. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ठणकावून विचारले असते……. पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात हा लोकशाहीचा रक्षक असलेला स्तंभ सुद्धा भक्षक झाला आहे.
इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.
आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक वापरणारे त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. कोणाला ते विरंगुळ्याचे साधन वाटते तर कोणाला ते जास्तीत जास्त लोक जोडणारे आणि काळाच्या ओघात विसर पडलेल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा जवळ आणणारे साधन वाटते. मार्क झुकरबर्ग हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. ४ फेब्रुवारी २००४ रोजी आपल्या हार्वर्ड वसतीगृह खोलीत झुकेरबर्ग, फेसबुक सुरू केली आहे. विशेष म्हणजे मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. पण या फेसबुकची ताकद ओळखून मार्क झुकरबर्गने त्यामध्ये वेळोवेळी कल्पक बदल केले आणि त्यामुळे या सोशल नेटवर्किंग साइटची लोकप्रियता वाढतच गेली. इंटरनेटमुळे जग ख-या अर्थाने जवळ आले असले तरी फेसबुकमुळे जग घट्ट जोडले गेले हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुस-या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली असली आणि फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. १८ मे २०१२ ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या स्थापना झाली तेव्हा ४ होती आता ती १२ हजार ६०० च्या वर आहे.
कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. गेल्या दोन वर्षात , फेसबुकने प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त केले आहे. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे. कंपनीत मार्क झुकेरबर्गची भागीदारी २४ टक्के, एसेल पार्टनरची १० टक्के, डिजिटल स्काय टेक्नॉलॉजीची १० टक्के, डस्टिन मोस्कोव्हिट्झची ६ टक्के, इडुअर्डो सॅव्हेरिनची ५ टक्के, सिएन पार्करची 4 टक्के, पीटर थिएलची ३ टक्के, ग्रेलॉक पार्टनर्सची १ ते २ टक्के, मायक्रोसॉफ्टची १.३ टक्के, ली का शिंगची ०.७५ टक्के व इंटरपब्लिक ग्रुपची ०.५ टक्के भागीदारी आहे. २४ ऑक्टोबर २००७ रोजी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने फेसबुकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फेसबुकचे १.६ टक्के समभाग २४ कोटी डॉलरला विकत घेतले. याशिवाय माजी कर्मचारी व सेलेब्रिटिजचीही भागीदारी आहे. फेसबुकला सर्वाधिक महसूल जाहिरातींद्वारे मिळतो. मायक्रोसॉफ्ट फेसबुकची एक्क्लुसिव्ह पार्टनर असून ती कंपनीसाठी बॅनर अॅ डव्हर्टायझिंग करते. २००६ मध्ये कंपनीचा महसूल जवळपास ५२ अब्ज डॉलर होता. पुढील वर्षी १८८ टक्के वाढीसह तो १५० अब्ज डॉलरवर पोहोचला. २०१६ मध्ये महसूल २७६ अब्ज डॉलर आहे. २००८ साली इंग्लंडमधील १०२ वर्षे वयाच्या इव्ही बिन यांनी फेसबुकवर अकाउंट उघडले होते. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी फेसबुकवर अकाउंट उघडले. बिन या ट्विटरच्या सर्वाधिक वयाच्या उपयोगकर्ता होत्या. फेसबुकवर त्यांचे ४ हजार ९६२ मित्र, तर ट्विटरवर ५६ हजारांहून अधिक पाठीराखे होते. जुलै २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. फेसबुकवर त्यांच्या सन्मानार्थ अनेक फॅन पेजेस बनवण्यात आले.
फेसबुकवर एका उपयोगकर्त्याचे सरासरी १३० मित्र असतात आणि तो दर महिन्यास किमान ८ लोकांना मैत्रीचे आवाहन करतो.
१ ऑक्टोबर २०१० रोजी डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट प्रदर्शित झाला. तो मार्क झुकेरबर्ग व फेसबुकवर आधारित आहे.
२२ फेब्रुवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये एका मुलाचे नाव फेसबुक ठेवण्यात आले, कारण इजिप्तच्या क्रांतीत फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ‘ इंदिरा गांधी ‘ यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती ,
बहुतेक सर्व जहाजांवर एकच मेन इंजिन असते. हे मेन इंजिन जहाजाच्या नेव्हीगेशनल ब्रिज, इंजिन कंट्रोल रूम तसेच प्रत्यक्ष इंजिन जवळील कंट्रोल वरून चालू करता येते. पुढे जाण्यासाठी अहेड मुव्हमेन्ट आणि मागे किंवा रिव्हर्स येण्यासाठी अस्टर्न मुव्हमेन्ट असा शब्द प्रयोग केला जातो. जहाज सुरु करून त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इंजिन कंट्रोल कॉन्सोल नावाचा एक लिव्हर असतो ज्याला अहेड आणि अस्टर्न म्हणजेच पुढे आणि मागे नेण्यासाठी डेड स्लो, स्लो, हाफ आणि फुल्ल तसेच मॅक्स फुल्ल अशा दोन्हीही बाजूला इंजिनचा स्पीड सेट केलेला असतो.
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करायचे उपाय
“अभिनय हा गुण, त्याच्यात अगदी जन्मत:च भिनलाय, त्याच्या बोलण्यातून इतकी सहजता जाणवते,जी रुपेरी पडद्यावरील कोणत्याही भूमिकेला साजेशी ठरेल; तर असा अभिनयसंपन्न बालकलाकार ओमकार तोडकर सांगतोय त्याच्या आगामी छावणी चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी, आणि आजवरच्या त्याच्या चित्रपट,नाटकं व इतर “प्रोजेक्ट्स” विषयी फक्त आणि फक्त मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या या खास मुलाखतीतून…”
लक्षात ठेवा ह्या महायुतितिल पराभव हा तुमचा नसून तमाम दलित समाजाचा आहे
पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....
मु लि ब घा ग्रुप ....
तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला....
दा ख वा ना म ग ...
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला
का ना खा लि दे उ का ....
आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.
१४ ऑक्टोबर, २०१४ चा हा माझा लेख. 'आरंभ' च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा पोस्ट करतो आहे.
फेसबुकच्या कृपेने औरंगाबादमधील एका संस्थेचा त्रोटक परिचय झाल्यापासून ती संस्था सतत मला खुणावत होती. तिच्या विविध उपक्रमांची माहिती वाचत असतांना ‘ऑटिस्टिक’ या शब्दाचा आयुष्यात प्रथमच परिचय झाला. दुर्बलमनस्क, मतिमंद हे शब्द अगदी शाळकरी वयापासून कानावर पडले होते. ज्यांच्या घरात अशी मुलं जन्माला आली आहेत अशा काही परिचितांचं व काही मोजक्या मित्राचं आयुष्य व त्यांच्या घरातलं वातावरण खूप जवळून मला अनुभवायला मिळालं होतं. त्यांना भेटायला गेलो की एक प्रचंड खिन्नता व उदासीनता मला घेरून टाकायची व त्यानंतर अनेक दिवस मी अस्वस्थ असायचो. अशाच प्रकारच्या अस्वस्थतेतून एक दिवस मी औरंगाबादच्या ‘आरंभ’ या संस्थेच्या आवारात प्रवेश केला. त्या संस्थेतर्फे स्वमग्न मुला-मुलींसाठी जी शाळा चालवली जाते त्या शाळेच्या परिसरातील भयाण शांतता बघून मी बिचकलो. जिथे मुला-मुलींचे आवाज नाहीत तिला शाळा कसं म्हणायचं? संस्थेचे संस्थापक श्री. बाळासाहेब टाकळकर व सौ. अंबिका टाकळकर त्या शाळेच्या वातावरणाइतक्याच गांभीर्याने माझं स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगत असतानाच त्यांनी माझं सुहास्य वदनाने व अत्यंत उत्साहाने स्वागत केल्यामुळे मी बऱ्यापैकी अवघडलो. एका वेगळ्या अर्थाने अ-सामान्य असलेल्या मुलांना सामान्य बनविण्याचं अत्यंत अवघड काम करत असताना यांना शारीरिक व मानसिक थकवा येत नसेल का? आणि येत असेल तर या दोघांमध्ये हा उत्साह कुठून आला? कोण देत असेल यांना प्रेरणा? माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं. चहा-पाण्याच्या औपचारिकतेनंतर आमच्या चर्चेला प्रारंभ झाला आणि दुर्बलमनस्क, स्वमग्न, ऑटीस्टिक, सेरेब्रल पाल्सी, एपिलेप्सी यासारख्या शब्दांचे अर्थ माझ्यासमोर हळूहळू उलगडू लागले. संस्थेच्या ऑफिसमध्ये बसून चर्चा करण्यापेक्षा त्या आगळ्यावेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.
ज्याला शाळेचं आंगण म्हणता येईल अशा जागेत जेव्हा मला नेण्यात आलं तेव्हा त्या शाळेतील आश्चर्यकारक शांततेचं रहस्य अचानक उलगडलं. एका सतरंजीवर काही विद्यार्थी बसले होते आणि त्यांना दिलेल्या कामात ते पूर्णपणे गढून गेले होते. प्रशिक्षकाच्या सहाय्याने विविध आकाराच्या अत्यंत सुबक पणत्यांना रंग देण्याचं व त्यांना सजवण्याचं काम अत्यंत शिस्तबद्धपणे सुरु होतं. एकाग्रता तर येवढी की एकलव्यानेही लाजून मान खाली घालावी! दिवाळीत त्या विलक्षण आकर्षक पणत्या ज्यांच्या घरात जातील केवळ त्यांचीच घरं यंदाच्या दिवाळीत उजळून निघणार नव्हती तर त्या सुंदर पणत्या त्या मुलांचं भवितव्यही प्रकाशमान करणार होत्या !
एका क्लासरूमचा बऱ्याच वेळापासून बंद असलेला दरवाजा उघडण्यात आला आणि त्या शाळेतील मुला-मुलींचा गलका प्रथमच माझ्या कानावर पडला. त्यांच्याकडे बघून माझ्या बालपणाच्या आठवणी जागृत झाल्या. वयाच्या सहाव्या वर्षी मी ज्या प्रायमरी शाळेत शिकत होतो तिच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ‘दुर्बलमनस्क मुलांची शाळा’ असं नाव असलेली एक शाळा होती. मी व माझ्या वर्गामित्रांपेक्षा त्या शाळेतील मुलांमध्ये काहीतरी वेगळेपणा होता हे नक्की, पण त्याचं आकलन होण्याचं माझं वय नव्हतं. आज अनेक वर्षांनंतर तशा प्रकारच्या मुलांची ओळख करून घेण्यासाठी मी आलो होतो. ‘हा वेद सावजी.’ शाळेच्या संचालकांनी मला एका मुलाची ओळख करून दिली. तो केवळ स्वमग्नच नव्हे तर पूर्णतः दृष्टिहीन होता. या मुलाचं काय भवितव्य? मी विचारात पडलो असतानाच त्याने तोंड उघडलं आणि गीतेचे श्लोक अस्खलितपणे त्याच्या तोंडातून बाहेर पडू लागले. मी थक्क होऊन त्याच्याकडे बघू लागलो आणि संचालकांना विचारलं ‘हा मुलगा स्वमग्न आहे यावर कोणाचा विश्वास बसेल?’ हा स्वमग्नच आहे, पण केवळ एक वर्षात त्याची येवढी प्रगती झाली आहे. ज्या एका पराकोटीच्या अस्वस्थतेपोटी मी या शाळेतील मुलांना भेटायला आलो होतो त्या अस्वस्थतेची जागा आता आशेच्या किरणांनी घेतली !
नऊ महिने रात्रंदिवस एका गोंडस बाळाची स्वप्नं बघितल्यानंतर विलक्षण आनंदाच्या एका क्षणी त्याचा या जगात प्रवेश झाल्यावर तो स्वमग्न म्हणून जन्माला आला आहे हे कळल्यानंतर त्या आईचं काय होत असेल हे स्त्रीचा जन्म घेतल्याशिवाय या जगात कोणालाही कळणं शक्य नाही. ते बाळ सामान्य नाही हे मान्य करायला असामान्य धैर्य लागतं. ते धैर्य गोळा करून स्वमग्नपणाबद्दल वस्तुस्थिती जाणून घेतली तर ज्यांच्या घरात असं बाळ जन्माला येतं ते खचून जात नाहीत व योग्य वेळी योग्य कृती करून ‘आरंभ’सारख्या संस्थांची मदत घेतात. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ देणगीदारांच्या आधारावर वाटचाल करण्याचं धाडस करणाऱ्या ‘आरंभ’ला यंदाच्या दिवाळीत सर्वतोपरी मदत करून या अ-सामान्य मुला-मुलींचं आयुष्य आपण सर्वार्थाने प्रकाशमय करू या !
मदत करण्यासाठी संपर्क : श्री. बाळासाहेब टाकळकर : 95611 12758
सौ. अंबिका टाकळकर : 82752 84178 / 82752 84177
ई.मेल. : ambikanidhu@gmail.com
-- श्रीकांत पोहनकर
Copyright © 2025 | Marathisrushti