— मराठीसृष्टी व्यवस्थापन
इथे आख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरं पाण्यावाचून तडफडतायत. मुंबई-ठाण्यासारख्या पाण्याची ददात न भासणार्या भागातही दिवस-दिवस पाणी गायब होतेय. दुष्काळग्रस्त भागातील जनता एकेक थेंब पाण्यासाठी तहानलेली आहे. गावंच्या गावं स्थलांतर करतायत. आपण ही परिस्थिती रोजच विविध वाहिन्यावर पहातच आहोत.
या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेजारच्या राज्यातून एक “बापू” येतो आणि आपल्या करणीने त्याच राज्यात जन्म घेतलेल्या दुसर्या महात्मा बनलेल्या“बापूं”चं नाव धुळीला मिळवतो. स्वयंघोषित “संत आसाराम बापू” यांचे हे कर्तृत्व. दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आसाराम बापू यांनी अध्यात्माची गोळी दाढेखाली ठेवून होळीच्या नावाखाली लाखो लिटर्स पाण्याची नासाडी केली. केवळ एकदाच नाही तर दोनदा.
Copyright © 2025 | Marathisrushti