लोकल







आली नशिबी रेलगाडी

रेल कसली जेल गाडी – झुक झुक …

दादर हारबर सी.टी. लोकल

हिशेब येथे असतो पळपळ

कुणी गुदमरे कुणी लटकते

कुणी मारते उडी । – झुक झुक …

कमला, विमला, अमला आली

कुणी नवोढा कुणी अवघडली

वृद्ध कोणी, षोडश वर्षा

कुणी चंचल गुड्डी । – झुक झुक …

गर्दी येथे गचडी तेते

चोर शिपाई साव भामटे

किती दुकाने किति वाहने

जणू मुंग्यांच्या झुंडी । – झुक झुक …

कचेरीतही तर्‍हा वेगळी

कुणी नेकींच्या कुणी फेकीची

नियमित विराळा बहुतेकांची दांडी । – झुक झुक …

— सौ. सुधा मोकाशी

Author