महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
निसर्गाने महाराष्ट्राला मुक्त हस्ताने भरभरुन दिलं आहे. पण सर्वाधिक खुणवणारी बाब जर इथली कोणती असेल तर ती म्हणजे अथांग समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा. गेल्या काही वर्षांपासून “सह्याद्री” चं नाव, जगातल्या अॅडवेंचर्सच्या तोंडावर रुंजी घालतय, विशेष म्हणजे त्याच्या भेटीसाठी ट्रेकर्सचा ओघ वाढतोय.
July 29, 2013
या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले.
February 4, 2026
करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे मंदिर राऊराजे निबाळकर यांनी १७२७ ला बांधले.
November 28, 2024
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ -शुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, या लोहमार्गामुळे येथील कापड उद्योग भरभराटीस आला.
वनस्पती तुपाचा कारखाना आणि कापड गिरणी प्रसिध्द आहे.
येथील संत सखाराम बुवा यांनी सन १९१६ मध्ये विठ्ठल मंदिर बांधले.
March 9, 2017
चिकमंगळूर हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे शहर असून मलयगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर इथल्या कॉफीमळ्यासाठी प्रसिध्द आहे. चिकमंगळूर हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. मंगलोर विमानतळ आहे. रेल्वे व रस्ते मार्गाने हे शहर देशाशी जोडलेले आहे.
पर्यटकांचे आवडते शहर
चिकमगला उरु या कन्नड शब्दापासून चिकमंगळूर हे नाव पडलेले आहे. याचा अर्थ मोठ्या मुलीचे शहर असा होतो. उन्हाळ्यातही इथले हवामान आल्हाददायक असल्याने पर्यटकही इथे मोठ्या संख्येने येतात. सुप्रसिध्द हेबे धबधबा इथून जवळ आहे.
February 7, 2017
आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.
April 19, 2017
बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले.
March 24, 2017
पोर्तुगाल हा पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला एक देश आहे. पोर्तूगाल युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. लिस्बन ही पोर्तुगाल ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 25, 2019
पूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा.
November 28, 2024
बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti