महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
लिबिया आणि सुदान या दोन देशांदरम्यान असलेला चॅड हा देश ट्रान्स सहारा या व्यापारी मार्गावर आहे
March 22, 2017
दक्षिण कोरिया हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.
March 7, 2019
राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे.
November 1, 2017
लेबेनॉनचे प्रजासत्ताक हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
March 14, 2019
कोकण विकासाच्या ४० कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या ३२ व्या कलमानुसार दापोली येथे १ नोव्हेंबर १९९६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे.
March 10, 2017
बिदर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला कर्नाटकाचा मुकूट असेही म्हणतात.
बिदर शहराला बहामनी काळापासूनच इतिहास आहे. येथील महमूद गवान अरेबिक विद्यापीठ, बिदरचा ऐतिहासिक किल्ला, पापनाश शिवमंदिर, नानक जिरासाहेब गुरुव्दारा, सिध्दारुढ मठ, रंगीत महाल, हजरत खलिउल्लाहची चौखडी ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.
बिदरच्या जवळून वाहणार्या मंजिरा नदीतून या शहराला पाणीपुरवठा केला जातो. देशातील सर्वात स्वच्छ २२ शहराच्या यादीत बिदरचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ९ आणि २१८ या शहराजवळून जातात.
July 15, 2016
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.
June 23, 2015
कोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले.
March 16, 2017
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा स्थित असून महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे.आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागात असणार्या लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ७,१५७ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी, उत्तर व पूर्वेस नांदेड, पूर्वेस व आग्नेयेस बिदर (कर्नाटक), दक्षिण व पश्र्चिमेला उस्मानाबाद, वायव्येला बीड हे जिल्हे लातूरला जोडून आहेत.
June 26, 2015
पाकिस्तान हा दक्षिण आशियात असलेल्या भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही दहशतवाद, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.
February 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti