(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • P-4203-Kazakhstan

    कझाकस्तान

    कझाकस्तानाची अर्थव्यवस्था मध्य आशियाई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे.

      January 7, 2019


  • अकोल्याजवळील नरनाळा किल्ला

    अकोल्याजवळील नरनाळा किल्ला

    अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

    भौगोलिक माहिती
    गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

    किल्ल्याबद्दल
    गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.

      October 5, 2016


  • ऐतिहासिक शहर नाशिक

    ऐतिहासिक शहर नाशिक

    गोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत.

      June 14, 2016


  • संत गजानन महाराजांचे शेगाव

    संत गजानन महाराजांचे शेगाव

    विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकटस्थान. देश विदेशातील हजारो श्री भक्तांची येथे दररोज हजेरी असते.

      February 26, 2016


  • मनोरुग्णालये

    मनोरुग्णालये

    महाराष्ट्र राज्यात मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर या ४ ठिकाणी मनोरुग्णालये आहेत.

      April 20, 2017


  • झांबिया

    झांबिया

    झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अँगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वे व न्दोला ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत.

      October 7, 2018


  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

    राज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.

      April 19, 2017


  • नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे.

     

      April 12, 2016


  • हरियाणातील पुरातन सूरजकुंड

    हरियाणातील पुरातन सूरजकुंड

    p-2472-Hariyana-surajkund-lake

    हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे.

    येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.

      January 27, 2017


  • फिलीपाईन्समधील उडणारा लेमुर

    फिलीपाईन्समधील उडणारा लेमुर

    फिलीपाईन्समधील हा सस्तन प्राणी ‘फिलीपाईन्स ईगल’ म्हणून याची ओळख असून वजन १ ते १.७ किलो ग्रॅम व लांबी १४ ते १७ इंच आहे. हा शाकाहारी प्राणी आपल्या खाद्यासाठी १०० मीटर उडू शकतो.

      November 9, 2016