महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत.
June 23, 2015
येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या झोपड्यांच्या भिंती कुडाच्या, शेणा-मातीने लिंपलेल्या असतात. यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शेतमजुरी, पशुपालन, लाकूडतोड या व्यवसायांवर होतो.
June 26, 2015
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये स्थापना करण्यात आलेली संस्था आहे.
March 22, 2017
लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.
December 26, 2018
बहारीनवर १६व्या शतकापर्यंत अरबांचे राज्य होते. १५२१ ते १६०२ या काळात बहारीन पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १७८३ पासून खलिफा घराण्याने बहारीन राज्य केले. मात्र, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली होती.
March 27, 2017
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते.
June 23, 2015
गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. औरंगाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योजनापूर्वक रीतीने १९३२ मध्ये सुरू झाली.
June 22, 2015
जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
June 23, 2015
झारखंडची राजधानी रांची शहरापासून जवळच मैकलुस्की गंज वसवण्यात आली आहे. भारतातील अॅग्लो इंडियन लोकांसाठी हे प्रसिध्द रहिवासी स्थळ आहे.
June 3, 2016
स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.
March 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti