महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले.
March 24, 2017
आसाम राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले करीमगंज हे शहर बांगलादेशच्या सरहद्दीवर वसलेले आहे. कुशीयारा नावाची नदी या शहराजवळून वाहते. ही नदीच भारत आणि बांगलादेश यांच्यामधली सीमा मानली जाते. या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नोटी खल नावाचा एक मोठा कालवा या शहरातून वाहतो.
करीमगंज जिल्ह्याची स्थापना १९८३ मध्ये झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आले. त्यापूर्वी हे शहर सील्हेट जिल्ह्याचा एक भाग होते. रस्ते व रेल्वे मार्गाने हे शहर देशाच्या विविध भागांशी जोडलेले आहे. गुवाहाटीपासून करीमगंज ३५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
April 19, 2017
अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
March 14, 2017
डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.
November 16, 2018
सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून २३२० फूट उंचीवर सातारा शहर वसले आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे.
June 26, 2015
तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.
January 7, 2019
सार्वजनिक ग्रंथालय पध्दतीची शिखर संस्था म्हणून राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा १९४७ मध्ये देण्यात आला.
March 10, 2017
इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण, दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 20, 2019
ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले.
July 9, 2016
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते.
January 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti