(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भ्रष्टाचार मुळां पासून काढायचा ?……खरें तर “गुप्त स्वहित” प्रथम ओळखलें पाहिजे.

    भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.

      November 15, 2010


  • कोसळलेला साक्षीदार

    कोसळलेला साक्षीदार

    अखेर आज मी कोसळलो. खरं तर जगाचा निरोप घेण्याचं माझं वय नक्कीच नाही. माझ्या आसपास असलेले माझे सोबती अनेक वर्षांपासून ताठ मानेने उभे आहेत. मला मात्र अकाली मृत्यू आला यात शंकाच नाही. या न्यायालयाच्या आवारात गेल्या वीस वर्षांत घडलेल्या असंख्य घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. मला ऐकू येतं, मी बघू शकतो, पण निसर्गाने बोलण्याची देणगी मात्र मला दिली नाही. एका मोठ्या वादळात जेव्हा प्रचंड वेगाने वारे वाहू लागले तेव्हा माझा मृत्यू समीप आल्याचं मला जाणवलं आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून वेगाने सरकू लागला.

    एक दिवस समोरच्या कडुलिंबाच्या वृक्षाखाली एक तरुण स्त्री भर दुपारी ओक्साबोक्शी रडत बसली होती. मी मुका असल्यामुळे तिच्या रडण्याच्या कारणाची चौकशी करू शकत नव्हतो. पण बोलता येणारे दोन तरुण तिला बघून थबकले आणि त्यांनी तिच्या रडण्याचे कारण विचारले. काही महिन्यांचं कोवळं मूल कडेवर घेऊन घरी जात असताना दोन नरपशूंनी ते मूल हिसकावून व त्याला रस्त्याच्या कडेला भिरकावून तिच्यावर बलात्कार केला होता. न्यायालयाने त्या नराधमांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. तिची हृदयद्रावक कहाणी ऐकून ते कॉलेजवीर फिदीफिदी हसू लागले व तिला म्हणाले, ‘अगं वेडे, बलात्कारी माणसं काय समोर पुरावा उभा करून बलात्कार करत असतात की काय? ते निर्दोष सुटणारच!’ मला संतापाने भोवळ आली आणि त्याच क्षणी माझ्या फांद्या आणि पानांसकट त्या दोघांवर कोसळून त्यांचा चेंदामेंदा केला असता तर आयुष्य नक्कीच सार्थकी लागलं असतं असं मला वाटून गेलं, पण संतापाने धुमसण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही.

    *****
    गेल्या पंधरा वर्षांपासून जवळपास रोज त्याला मी इथे बघतो आहे. सुरुवातीचे काही दिवस मी त्याला न्यायालयाचा कर्मचारी समजत होतो, पण काही लोकांच्या बोलण्यावरून मला कळलं की, त्याने त्याच्या सख्ख्या भावावर इस्टेटीशी संबंधित केस टाकली आहे. त्याने या कोर्टात चकरा टाकण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचं डोकं काळ्या कुळकुळीत कुरळ्या केसांनी सजलं होतं, पण आता त्याला चांगलं गरगरीत टक्कल पडलं आहे. खरं तर त्याचं वय खूप जास्त नाही, पण कोर्ट केसच्या काळजीने त्याला अकाली म्हातारं करून टाकलं आहे. घरी अनेक पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असूनही जमिनीचा एक लहानसा तुकडा भावाला मिळू नये म्हणून हा पठ्ठा पंधरा वर्षांपासून कोर्टात झगडतो आहे. साडेचारशे कोटी वर्षे वय असलेल्या या पृथ्वीवर अवघ्या साठ ते पासष्ट वर्षांचा एक छोटासा प्रवास करायला आलेली माणसं आयुष्य सत्कारणी लावण्याऐवजी पराकोटीच्या स्वार्थापोटी काय काय उद्योग करतात नाही?

    *****
    एका खुन्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने काढलेली सरकारी वकीलाची जंगी मिरवणूक बघून मी माझ्या आनंदाश्रूंना आवर घालू शकलो नव्हतो. जनसामान्य कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करत असतात. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असली तरी ती अगदीच आंधळी नाही हे बघून आपल्या न्यायपालिकेबद्दल अभिमानाने माझा ऊर भरून आला.

    *****
    एक दिवस एका व्हॅनमधून वरकरणी सुशिक्षित वाटणारे काही स्त्री-पुरुष हसत खिदळत उतरले. एखाद्या हिल स्टेशनवर मौजमस्ती करायला आल्यासारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. न्यायालयाच्या आवारात सुहास्य वदनाने फिरणाऱ्या माणसांचं दर्शन क्वचितच होत असल्यामुळे मला जरा बरं वाटलं आणि माझी उत्सुकता ताणली गेली. त्यांच्या येण्याचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी मी कान टवकारले. स्वत:च्या वैवाहिक जीवनात पूर्णत: अयशस्वी ठरलेल्या त्या जोडप्यांनी एका सुखी, समाधानी आणि प्रगतिपथावर असलेल्या कुटुंबाला असूयेपोटी इमारतीतून हुसकावून लावण्यासाठी खोटी केस केली होती व त्या केसचा निकाल त्यांच्याच बाजूने लागेल याबद्दल सर्वांना पूर्ण खात्री होती; पण तसे न घडल्यामुळे आता त्या सुखी कुटुंबावर आणखी कोणत्या प्रकारे सूड उगवता येईल याची रसभरीत चर्चा कोर्टाच्या आवारातच सुरू झाली.

    गेल्या अनेक वर्षांपासून न्यायमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फांद्या पसरवून मनुष्यस्वभावाच्या अगणित नमुन्यांचं दर्शन घेताना अनेकदा मोठ्याने ओरडून सर्वांना विचारण्याची इच्छा झाली - ‘का वागता तुम्ही असे?’

    -- श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      December 28, 2016


  • चोर कृष्णाची दही हंडी

    मराठी भाषा किती प्रगल्भ आहे पहा. पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला जातो,
    ” गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर”
    देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरत असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या महिलांनी वर बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे.

      March 8, 2026


  • प्रेरणेच्या पायवाटा

    छंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते.

      July 7, 2025


  • कल्याण-डोंबिवलीचं “कल्याण ” झालं !, तुमच्या शहराचंही होणार!!

    काही वर्षांपूर्वी कोकणचं California करण्याची घोषणा झाली होती. पण त्या नादात California चं कोकण होण्याची भीती असल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. मग मुंबईचं सिंगापूर, bankbook वैगरे करायला निघाले. मुंबईत लघुशंकेला जागा मिळत नाही Bangkok करायला कुठे जागा मिळणार? तोही बेत फसला.
    अनेक शहराचं बरंच काय काय करायचा प्रयत्न झाला. फक्त कल्याण-डोंबिवली शहराने कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. इथे सत्ता कोणाचीही असो, प्रत्येकाने कल्याण डोंबिवलीकरांचं “कल्याण” करून टाकलं.
    ह्या शहराची मजेदार सफर घडवत आहेत निरेन आपटे.

      March 28, 2026


  • मांगल्यातील अमंगल!

    प्रकाशन दिनांक :- 26/09/2004

    सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आणि गणेशोत्स्वाची धूम सुरु आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण एकप्रकारच्या धुंदीने भारावून गेले आहे. एक उत्सव सामाजिक आणि भक्तिभावाने प्रेरित असलेला तर दुसरा म्हणजे पंचवार्षिक तमाशाचा फड असलेला.

      September 26, 2004


  • जीवनाचा उद्देश्य शोधा

    जीवनातील उद्दिष्टय पूर्तींसाठी काय करावयाला हवे ते सांगणारा हा लेख असून थोडक्यात याचे विवेचन केलेले आहे.

      November 17, 2010


  • तिसवाडी

    ४५१ वर्षांत तिसवाडी म्हणजेच इल्हास म्हणजेच १५४३ पर्यंतचे गोवा यामधे काय घडले याबद्दल आपल्याला माहितीच नाही. माहिती नाही म्हणून आपण विचारही करीत नाही. जे सांगितले गेले शिकविले गेले ते समजले, आता आपल चाललय ना व्यवस्थित मग सोडून देऊ अस आपण जगलो. पण आपल्या आक्रमक कर्त्यानी नोंदी लिहून ठेवल्या म्हणून काही गोष्टी आता आपल्याला जाणून घेता येतात. असल्या बऱ्याच नोंदी-गोष्टी नष्ट केल्या गेल्या हे ही जाणून घ्या.

      May 16, 2021


  • सरकार मार्केटिंग एजंटांच्या ताब्यात

    06 रविवार,जानेवारी 2008

    इंठाजी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सर्वदूर नुकताच धूमधडाक्यात पार पडला. सगळ्याच वयोगटातील लोकांनी आपापल्या परिने नवीन वर्षाचे स्वागत केले. तरूणांच्या उत्साहाला तर नुसते उधाण आले होते.

      January 6, 2008


  • “नोटबंदि…एक हजाराची नोट’ – एक अनुभवकथन

    लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात.

      October 17, 2017