आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
“मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे ”
पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा.
पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.
March 25, 2026
युग संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. सगळ्याच गोष्टी कशा संगणकाच्या वेगाने होऊ लागल्या आहेत. तसे पाहिले तर वेगाचे हे अप्रूप मानवासाठी नवे नाही.
January 18, 2009
कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ; पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ हे हलकेंफुलकें, light-weight, ( कांहींसें ‘थिल्लर’ ) नांव मुळीच suitable,योग्य वाटत नाहीं. चार ओळी अशा अर्थाचा शब्द हवा असल्यास ‘चतुष्पदी’ म्हणायला हरकत नाहीं. अनेक ‘चतुष्पदी’ असल्यास, ‘चारोळ्या’ म्हटलें जातें, त्याबद्दल अधिक न बोलणेंच बरें.
या पार्श्वभूमीवर, ‘मराठीसृष्टी’वर निलेश बामणे यांचें एक लघुकाव्य ‘चारोळी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेलें आहे, तें पहाणें योग्य ठरेल. तें काव्य असें आहे -
‘कुत्री – मांजरी
जगतात स्वतःसाठी
जगा एकदातरी
समाजातील उपेक्षितांसाठी…’
किती गंभीर, विचारप्रवर्तक काव्य ! तें आपल्याला अंतर्मुख करतें , जीवनाबद्दल चिंतन करायला भाग पाडते. चार ओळींमध्ये एवढा अर्थ भरलेला आहे, वा: ! श्री. निलेश बामणे यांना kudos !
पण अशा या अर्थपूर्ण, संजीदा ( गंभीर, serious) काव्याचें शीर्षक ‘चारोळी’ असें वाचून आपण ( किमान मीतरी) उंचावरून दण्णकन् खाली आदळतो. हें शीर्षक, मजकुराच्या महत्तेचा पूर्णपणें खात्मा करून टाकते ! या काव्याला ‘मुक्तक’ हें अभिधान द्यायला काय हरकत आहे ?, तें नांव योग्यच आहे. मुक्तक म्हणजे खरें तर ‘Stand-alone verse’. आणि हें लघुकाव्य ( आणि यासारखी इतर लघुकाव्यें ) stand-alone verse, स्वतंत्र काव्य आहेच.
अशी आणखी उदाहरणें देता येतील. जसें की, शिरीष पै यांच्या ‘अज्ञातरेषा’ या नांवाच्या मृत्यूवरील लघुकाव्यांचा संग्रह. सांगायला नकोच की, यातील प्रत्येक stand-lone लघुकाव्य गंभीर आहे. या लघुकाव्यांना कवयित्रीनें ‘चारोळी/चारोळ्या’ म्हटलेलें नाहीं, हें निश्चित. ( आणि, कुणी जर तसें नांव देऊन म्हटलेच, तर तें योग्य ठरणार नाहींच ).
कोणी कदाचित असें म्हणेल की, ‘संस्कृत व हिंदीत मुक्तक म्हणतात हें ठीक ; पण मराठीत आम्ही काय म्हणून असें शीर्षक वापरायचें ?’ याचें उत्तर म्हणून मी महाराष्ट्र सरकारनें स्थापन केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती’च्या २०१३च्या अहवालातील एक उतारा देतो . हा अहवाल, राज्य सरकारनें मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, केंद्राला officially submit केलेला आहे. या समितीत रंगनाथ पठारे, हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, सतीश काळसेकर प्रभृती मान्यवरांचा, तसेंच राज्य सरकारच्या संबंधित Departments चे संचालक / सचिव यांचा समावेश होता. हा उतारा मराठीची पूर्वज भाषा ‘महाराष्ट्री’ हिच्यात जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ‘गाथासप्तशती’ या ग्रंथाबद्दल आहे. तो असा –
उद्.धृत मजकूर सुरूं (Quote ) =
‘गाथासप्तती’ हा महाराष्ट्री भाषेतला इ.स.च्या पहिल्या-दुसर्या शतकातील मुक्तकांचा ( द्विपदी, गाथांचा) संग्रह आहे. ....... ‘गाथा’ लोकप्रिय छंद किंवा वृत्त आहे.
= उद्.धृत मजकूर समाप्त (Unquote )
[ वरील उतार्यात ‘मुक्तक’ या शब्दाला दिलेला Bold Type माझा ] .
अशा मात्तबर समितीनें ‘मुक्तक’ या शब्दाचा उपयोग केलेला आहे. यापेक्षा अधिक athoratative भाष्य कुणी करायची जरूरच नाही. हें स्पष्ट आहे की, मुक्तक’ हें कांहीं ( चन्द, a few) पंक्तीचें stand-alone लघुकाव्य आहे (दोन-तीन-चार वगैरे ) ; आणि, हा शब्द मराठीत रूढ आहे. [ कुठल्याही stand-alone लघुकाव्याला मुक्तक’ असें संबोधण्यात theoritically प्रत्यवाय नाहीं ; मात्र हल्ली साधारणतया चार ओळींच्या लघुकाव्याला, चतुष्पदीला, ‘मुक्तक’ म्हटलें जातें, एवढेंच ] .
आपण ‘Lyric’ ला ‘भावगीत’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला ( हा शब्द फक्त मराठी व कन्नडमध्येच आहे). Free-verse ला ‘मुक्तकाव्य’ असा शब्द आपण योजायला लागलो. तर मग stand-alone गंभीर प्रकृतीच्या लघुकाव्याला आपण आधीपासून प्रचलित असलेला ‘मुक्तक’ हा सुंदर शब्द वापरला, तर काय काय हरकत आहे ?
सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.
-- सुभाष स. नाईक
Subhash s. Naik
August 16, 2017
भाकरी मिळत नाही तर या लोकांनी ब्रेड खावा, केक खावा; रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची काय गरज आह!’ रशियाच्या झारने भाकरीसाठी आंदोलन करणाऱ्यांना सुनावलेल्या या उत्तराची इतिहासाने दखल घेतली आहे. आजही कुणी राज्यकर्ता जनतेच्या प्रश्नांकडे उर्मट दुर्लक्ष करीत असेल तर त्याला या झारची उपमा दिली जाते.
June 10, 2007
जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. एकविसावे शतक विज्ञानयुगाचे, आधुनिक युगाचे ‘ब्रँडनेम’ ठरले आहे. वैज्ञानिक विकासाची शिखरे या युगात मानवी प्रयत्नांसमोर थिटी वाटू लागली आहेत.
July 10, 2005
बाहेरची, ‘मी’ पणाच्या धुळीची पुटं घासून काढली तरच आतली, आपणच जीव ओतून घडवलेली व्यक्तिमत्त्वाची मूर्ती प्रकट होते, झळाळून उठते. काही लोकांना नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेली असते. काही आपल्या कामातून, व्यक्तिमत्त्वातून सौंदर्याला अर्थ प्राप्त करून देतात…….
August 26, 2019
राज्यात सध्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे वारे घोंघावत आहे. जनप्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात असावे, हा मुख्य आधार या पुनर्रचनेमागे आहे. शिवाय अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दाही या पुनर्रचनेचा आधार आहे.
September 25, 2005
हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू परंपराच रूढ होत आहे. मग अमुक तमुक हॉटेल मधे जायचे, काऊंटर वर आपली नाव नोंदणी करायची आणी मग असहाय्यपणे ४५ मिनीटे ते १ तास बाहेर ’वेटींग’ रहायचे. मग तथाकथीत मॅनेजर आपल्यावर उपकार केल्याच्या भावनेतुन आपणास टेबलाजवळ बसण्यास सांगुन अंतर्धान पावतो. बसणाऱ्यांच्या हिशोबाने ते टेबल कसेतरी पुरेसे असते. मग आपण त्यात स्वत:ला सावरून कसे तरी बसुन चेहेऱ्यावर आनंदी भाव ठेवून गप्पा सुरू करतो. १-२ मेनु कार्ड येतात, त्यात, त्याच त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने वाचून ऑर्डर ठरते. तेव्हढयात वेटर येउन सदर मेनुकार्ड भरभर उचलुन ’पाणी साधे का बिसलेरी’ असे विचारतो. दोन्ही पाण्याची क्वालिटी सारखीच असते हे माहीत असून सुध्दा, लाजेखाजे खातर आपण ’बिसलेरी’ म्हणून सांगतो.
मग बराच वेळ ताटकळत ठेऊन, ८ बाय १० सुप, पापड, "स्टार्टर्स", शितपेये ई. गोष्टी येतात. या सर्व गोष्टी आल्यावर, हातच काय पण बोट सुध्दा ठेवायला टेबलावर जागा रहात नाही, पण आपण उगाच "कम्फ़र्टेबल" आहोत असे आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेले सुप आवाज न करता पित असतो. सहाजिकच स्टार्टर्स ची क्वांटीटी कमी असल्याने, जेमेतेमे एक एक तुकडा प्रत्येकी आलेला असतो...पण आम्ही एकदम मस्त मुडमधे !
मग मेनकोर्स काय असे विचारणाऱ्या वेटर कडे आपण आशाळभुतासारखे पाहून थोडासा अवधी मागुन घेतो. कोणी व्हेज, कोणी नॉन व्हेज असे ठरत ठरत आपण शेवटी, वेटर नी ’सजेस्ट’ केलेले पदार्थ ऑर्डर करतो. त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलावरील डिशेश मधे राहीलेले स्टार्टर्स चे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस ई. पदार्थांचे सेवन, सो कॉल्ड गप्पांमधे रमुन सुरू असते. तो पर्यंत आजुबाजुला असलेल्या एखाद्या ग्रुप मधे जोरदार हाश्या खिदळ्यांचा आवाज आपल्या कानांवर आदळत असतो. त्यातच एखादे अगम्य "म्युझीक" ’बॅग्राउंडला’ लावलेले असते. थोड्या वेळाने जाणवू लागते की जरासे उकडतय, पण ए.सी. तर चालू असतो. मग आपण वेटरला ए.सी. ’वाढवायला’ सांगतो, तो ’वाढवल्यासारखे’ करून निघून जातो, थंडाव्यात काडीमात्र फरक पडत नाही. मग खूपच गर्दी आहेना, ते तरी काय करणार असे स्वत:चेच समाधान करून आलेल्या मेनकोर्स च्या वाटणीच्या मागे लागतो.
काही चांगल्या, काही अपेक्षाभंगीत, काही जहाल तिखट तर काही गोड मिटूक भाज्या वाटून घेऊन गप्पांच्या मुड मधे जेवण सुरू करतो. मग सुरूवातीला काही विनोद, मग एस.एम.एस, मग ’नेबर्स’ बद्द्ल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्कींग प्रॉब्लेम... इ इ इ विषय ’डिस्कस’ करत असताना लक्षात येत की भाज्या तर संपल्या आहेत आणी वातट रोटी अजून शिल्लक आहे. मग ती रोटी कशीबशी संपवून न-वाफाळणारा ’स्टीम राईस’ समोर येतो. आता राईस खायला पुन्हा १ प्लेट ’डाल’ सांगीतली जाते जी डाल, राईस संपता संपता येते त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा कींवा दह्या बरोबर ढकलला जातो.
लगेच फिंगर ’बोल’ ची आज्ञा सुटते आणी नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बोल येतात. कसे तरी बुचकळून हात ’साफ’ करतो तोच "डेझर्ट" क्या लोगे म्हणून वेटर उभा असतो. बाहेरील एखाद्या नावाजलेल्या दुकानात मिळणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा कितितरी कमी प्रतीचे सो कॉल्ड ’डेझर्ट’ आपण मागवतो व सरते शेवटी बिल येते.
एका पापडाचे १० -१५ रू; एका रोटीचे १५-२० रू; एका सुपचे ७५-८० रू; एका भाजीचे ८० -१०० रु; नॉन व्हेज डीश चे प्रत्येकि २००-४०० रू: व जर मत्स्याहार केला असेल तर तर एका डीश चे ६००-८०० रू; असे एकुण १८०० ते २२०० रू. चे बिल भरून आपण हसतमुख चेहेऱ्याने हात कोरडे करत असतो. मग त्या बिलाचा राग म्हणा कींवा पैसे वसूल करण्याची आयडीया म्हणा, पण आपण सुगंधीत बडीशोप, चवळ्या मटक्या व टूथपिक, भरभरून घेतो. बिलाचे राहीलेले पैसे परत आल्यावर "टिप" ठेवणे हा एक अविभाज्य भाग असल्या सारखा, आपण १०-२० रू. टिप ठेवतो आणि बाहेर पडतो. मग द्वारपालाला १० रू, गाडी उभी करताना आपल्याला ’मदत’ करणाऱ्या गुरख्याला १० रू. देऊन "जळजळीत" ढेकरा देत देत घरचा मार्ग पकडतो.
जरा विचार करा की आपण खालेल्या पदार्थांचे मुल्यांकन पटण्यासारखे असते ? कितपत स्वादिष्ट व आरामदायक होते ते जेवण ? किती वेळा आपण आपले मन मारून गप्प बसलो ? हे सगळे करून काय मिळाले तर रात्रीची वाढणारी ऍसिडीटी, जेमेतेमे २०-२५ मिनीटांच्या गप्पा, आणी निम्याहुन अधिक खिसा रिकामा.
मला हे अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठीकाणी नसेल सुध्दा पण बहुसंख्य ठीकाणी आहेच. त्या मग्रुर हॉटेल मालकांचे खिसे आपण का भरतो ? का नेहमी स्वत:चीच समजुत घालत बसतो ?
आता प्रत्येकाचे रहाणीमान ऊंचावले आहे पण म्हणून असे पैसे उडवायचे
त्यापेक्षा जे कोणी पार्टी करणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ करून आणून घराच्या हॉल मधे मस्त गोल करून व्यवथित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा ?
तसा विचार केला तर हॉटेल मधील पदार्थांपेक्षा कितितरी पटीने चांगले पदार्थ आपण घरी करतो व खर्चाचा आढावा घ्याल तर जेमतेम निम्मा होतो. बर प्रत्येक कुटुंबाने एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही व खऱ्या अर्थी आनंद भोजन होते....
"रिलॅक्सेशन" हे कारण असते हॉटेलिंग करण्यामागे, पण मलातरी वाटत नाही की प्रत्येक वेळेस ते साध्य होते !
-- वसंत चरमळ
फेसबुक वॉलवरुन
January 26, 2018
पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल.
February 12, 2019
गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. अगदी आदिम अवस्थेत असल्यापासून माणूस त्या अर्थाने ‘गरजवंत’च होता. संरक्षण आणि उपजीविका या दोन गरजांनी माणसाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा अधिक काहीतरी मिळविण्यासाठी प्रेरित केले.
December 31, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti