(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • या मार्गाने थकवा दूर करा

    सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे.

      May 31, 2019


  • वानखेडे स्टेडियमची गोष्ट

    …… महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाला अपमानजनक उद्गार त्यांनी काढणार्‍या विजय मर्चंट यांचा सगळ्याच आमदारांना राग आला होता. पण काही पर्याय नव्हता. झालेला अपमान गिळून सगळे तिथून निघून आले. काही दिवसात ही झालेली गोष्ट बाकीचे विसरून गेले पण शेषराव वानखेडे हा अपमान विसरले नव्हते. मात्र ते राग मनात ठेवून बसले नाहीत. त्यांनी आता एक स्टेडियम उभा करायचेच अशी खुणगाठ बांधली.

      May 31, 2019


  • लोकशाहीचे पसायदान

    भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे.

      August 27, 2023


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ९

    नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।
    उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥

    भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे त्यांच्या काही विशेषणांचा उल्लेख करीत आहेत. ते म्हणतात,
    नग्नो- ज्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले आहे, ज्यांच्यावर कशाचेच आवरण पडूच शकत नाही, त्यांना शास्त्रात नग्न असे म्हणतात. निःसड्ग- ज्यांना कशाचाही संग अर्थात लेप लागत नाही.
    शुद्ध- ज्यांच्या ठिकाणी मायेच्या मलीनतेचा अंश देखील नसतो त्यांना शुद्ध असे म्हणतात.
    त्रिगुणविरहितो- मायेच्या सत्व, रज आणि तम या तीनही गुणांनी रहीत असलेले, निर्गुण निराकार. ध्वस्तमोहान्धकारो- ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा मोह शिल्लक उरलेला नाही असे.
    नासाग्रे न्यस्तदृष्टि: - ज्यांनी आत्मध्यानासाठी नासिकाग्रावर दृष्टी स्थिर केली आहे असे,
    विदितभवगुणो - अशा विविध गुणांनी युक्त असणाऱ्या,
    नैव दृष्टः कदाचित् - आपल्या स्वरूपाचे मी कधीही दर्शन घेतले नाही.
    उन्मन्यावस्थया - उन्मनी अवस्थेमध्ये,
    त्वां विगतकलिमलं - कली अर्थात दोषांचा मळ नष्ट झालेल्या आपले,
    शड्करं न स्मरामि- हे भगवान शंकरा ! मी कधीच स्मरण केले नाही.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या सगळ्या अपराधां करिता मला क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 28, 2020


  • मृत्यूनंतरचे जीवन !!

    मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे.

    हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते.

    पण या गोष्टी मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.

    सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदूधर्माचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत ! मग हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? १ लक्ष ८४ हजार विविध जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. पुढे संशोधनच झाले नाही म्हणून, नाहीतर १ लक्ष ८४ हजार वेळा recycle म्हणजे इतके विविध जन्म घेतल्यावरच मनुष्य तयार होतो या आकड्याचाही काही संबंध असू शकेल. मनुष्य जन्मानंतरच्या उत्क्रांतीबद्दल मात्र विज्ञानाला काही सांगता आलेले नाही.

    पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy )असल्याने Law of Indestructibility of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचली जाते. शरीराचे material जळून पुन्हा ते अनेक materials मध्य रूपांतरित होते.

    या बद्दलची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. असेच एका पुस्तक म्हणजे - - -मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक ! त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे.यात आत्म्याची छयाचित्रेही दिली असून त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नसला तरी त्यांची सर्व अनुमाने ही हिंदू धर्मांतील या बाबतीमधील सर्वच्या सर्व १०० टक्के खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब करतात.

    ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. पण आपल्याकडे मात्र या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. असो.

    (यात मी फक्त तत्वज्ञानासंदर्भात थोडेसे लिहिले असून कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य-अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही)

    (हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)

    -- मकरंद करंदीकर

      September 19, 2017


  • देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे

      July 21, 2016


  • याला जीवन ऐसे नाव भाग २६

    पाणी शुद्धीकरण भाग सहा

    काल काही प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे म्हणजेच आजची टीप होऊ शकेल.

    शुद्ध पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. आता पाणीच दुर्मिळ होत चालले आहे, असे म्हटले तरी चुकणार नाही.
    यावर्षी पाऊस चांगला झाला पण नियोजनाअभावी निसर्गातून आलेले पाणी तसेच वाया घालवले.

    हेच नभज, आंतरीक्षज, ऐंद्रज म्हणजे ढगातून जन्मलेले, अंतरीक्षातून आलेले किंवा इंद्राने पाठवलेले पाणी, गरज म्हणून शुद्ध स्वरूपातील म्हणून किंवा देवाचे तीर्थ म्हणून त्याचा आदर सन्मान नको का करायला ???? वाराणसीहून गडूमधे भरून आणलेलं गंगाजल आपण आयुष्यभर साठवून ठेवतो. का ? तर अंतिम क्षणी तोंडात शुद्ध गंगाजल पडावे. एवढं याच महत्व, माहिती असून देखील, आमच्या डोळ्यादेखत हे पुण्यप्रदान करणारे तीर्थ, गटारात वाहून चालले आहे.
    हेच शुद्ध पाणी जर योग्य त्या भांड्यात साठवून ठेवले तर ????
    हो मी पावसाचे पाणीच म्हणतोय. सैराट झाल्यानंतर इंग्रजीत सांगितल्याशिवाय कळतच नाही. "रेन वाॅटर हार्वेस्टींग" विषयीच बोलतोय मी
    !

    ग्रंथकर्त्यांनी सुद्धा सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पाणी जर योग्य प्रकारे साठवले तर त्यावर कोणत्याही संस्कारांची गरज नाही. ते पाणी आपण तसेच्या तसे पुढे नऊ महिने देखील स्नानपानासाठी वापरू शकतो. फक्त बाहेरची घाण साठवलेल्या पाण्यात येणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.

    बोअरवेलचे पाणी मात्र सूर्येंदुपवनम् अदृष्टम असल्याने परत अग्निसंस्कार आदि शुद्धीक्रिया करून पिण्यासाठी वापरावे लागेल. मूळ तत्व विसरले नाही तर काय करायला हवे ते "तो" आपोआपच सुचवित जातो.
    विहीर देखील वरून उघडी असावी. कचरा, पालापाचोळा आत जाऊ नये, यासाठी त्यावर फक्त एखादे आच्छादन असावे.

    पाण्यामधे सोन्याचे नाणे, चांदीची लगड किंवा कल्हई केलेला तांब्या पितळीचा तुकडा टाकून ठेवला तरी चालतो. उकळताना ठेवला तरी चालेल, किंवा नुसताच पाण्यात ठेवला तरी चालेल.फक्त सोने, चांदी, तांबे, पितळ पूर्ण शुद्ध असावे. मग अगदी गंगेतला गोटा असला तरी चालेल.

    शुद्ध पाण्याची पण प्लॅस्टिकची बाटली घेऊन किती ठिकाणी फिरणार ? आणि ते शिळे पाणी किती दिवस पुरणार ? आणि ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्षच आहे, त्याठिकाणी कसले शुद्धिकरण आणि कसले काय ?

    शक्यतो प्लॅस्टिकच्या बाटल्या, कळश्या, टब, बादल्या वापरू नयेत. त्यापेक्षा स्टील, तांबे पितळीची भांडी चांगली. माती आणि काचेपेक्षा तरी जास्त सुरक्षित सल्ला देतोय ना ! मग या धातुच्या भांड्यांची आतून थोडी स्वच्छता, थोडी मेहनत रोज करावीच लागेल ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    02.01.2017

      January 2, 2017


  • वारी !

    दोन दिवस तीन गावांमध्ये काळाला स्थगिती देत आणि टाइम मशीनला १९७५ मध्ये सेट करीत आम्ही हिंडून आलो “तिच्या “वारीसाठी !

      June 5, 2022


  • शिंडलर्स लिस्ट (१९९३)

    शेवटचा प्रसंग
    Itzhak Stern:
    “Whoever saves one life, saves the world entire..
    There will be generations because of you..."
    Oskar Schindler :
    "I didn’t do enough..."
    Itzhak Stern :
    "You did so much...
    You saved 1200 lives..."
    शिंडलर्स लिस्टचा हा शेवटचा संवाद अशक्य म्हणजे अशक्य भारी आहे..
    नाझी पार्टीचा सभासद आणि चंगळवादी आॕस्कर शिंडलर..
    युद्धात आपली चांदी करायची म्हणून एक भांड्यांची फॕक्टरी चालवतो..
    कमी पगार द्यावा लागतो म्हणून बहुतांश ज्यूंना कामावर ठेवतो..
    नंतर उपरती होउन आपल्या जास्तीत जास्त कामगारांना नाझींच्या कँपमधल्या मरणापासून वाचवू पहातो..
    युद्ध संपेपर्यंत या १२०० ज्यू कामगारांना सांभाळून ठेवतो..
    त्यांना अॕश्वीज च्या कँपमधून, मरणाच्या दारातून परत आणतो..
    आपली सारी संपत्ती नाझी अधिका-यांना लाच देण्यात संपवतो..
    स्वतः कफल्लक होउन शेवटच्या या सीनमधे ती फॕक्टरी सोडून आपल्या पत्नी एमिली सोबत निघून जातो..
    आणि मागे उरतात... १२०० कृतज्ञ ज्यू लोक..
    आजही जे ज्यू लोक शिंडलरने वाचवले होते त्यांच्या पुढच्या पिढ्या जगभर सुखाने नांदताहेत..
    जग त्यांना 'शिंडलर ज्यूज' नावाने ओळखते..
    वर सांगितलेल्या या शेवटच्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सुरु होते ती चित्रपटाची मेन थीम..
    हृदय पिळवटून टाकणारे संगीत काय असते हे ऐकायचे असेल तर शिंडलर्स लिस्टची ही थीम ऐकावी..
    असे वाटतं की ते तुमचं हृदय जागेवरुन उफाळून, तुमच्या गळ्यातून बाहेर येईल..
    डोळ्यांचे धरण कोणत्याही क्षणी फुटून अश्रूंचा महापूर तुमच्या गालावर येईल..
    स्टीव्हन स्पीलबर्ग हा स्वतः जन्माने ज्यू आहे..
    त्याने निर्मीती दिग्दर्शनाची जबाबदारी अर्थात स्वतःवर घेतली..
    शिंडलर्स आर्क या कादंबरीवर बेतलेला ही कथा..
    ज्यावर स्टीव्ह झिलीयन ने लिहीलेली जबरदस्त पटकथा..
    जानूज कमिन्सकी चे अंगावर येणारे कृष्ण धवल चित्रीकरण..
    आणि पहिल्या चित्रपटापासून आजपावेतो स्पिलबर्गच्या सर्व सिनेमांना संगीत देणारा संगीतकार..जॉन विलीयम्स..
    चित्रपटाची ही थीम इतकी इम्पॕक्टफुल, इतकी प्रभावी आहे की तुम्ही आधी भारावता नी मग हरवता..
    पूर्ण चित्रपटात पाहिलेले असंख्य प्रसंग डोळ्यासमोर नग्न होउन फेर धरतात..
    माणूसकीला काळीमा लावणारे भीषण अत्याचाराचे ते पर्व आपल्या नजरेसमोरुन सरकते..
    एका ढकल गाडीत अनेक मृत ज्यूंचे प्रेत टाकून नेणारी काही माणसे दिसतात..
    'ती' लाल कोट घालून रस्त्याने फिरणारी तीन वर्षाची मुलगी..
    त्या ढकल गाडीत आपल्याला तिचेही प्रेत दिसते...
    व्हाॕयोलीन ची ती निर्दयी सुरावट तुमच्या काळजात घुसते..
    आणि तुमचा बांध शेवटी फुटतोच..
    जॉन विलीयम्स हा हाॕलीवूड संगीताचा बेताज बादशाह आहे..
    साधारण साडेचार दशकांच्या कारकिर्दीत ५२ आॕस्कर नाॕमीनेशन्स आणी पाच वेळा आॕस्कर जिंकणारा हा अवलिया माणूस..
    आपला सुरवातीचे सिनेमे शुगरलँड एक्स्प्रेस आणि जॉज (Jaws) पासून स्पिलबर्ग ने फक्त आणि फक्त जॉन विलीयम्स बरोबरच काम केलय.
    त्यांना जेंव्हा स्पिलबर्गने या चित्रपटाची पटकथा ऐकवली तेंव्हाचा प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता..तो असा..
    "When he showed me Schindler's List," says Williams, "I was so moved I could barely speak. I remember saying to him, 'Steven, you need a better composer than I am to do this film. '
    And he said, 'I know, but they're all dead. ' "
    That's a joke...
    म्हणजे पहा..जॉन विलीयम्स सारख्या दिग्गज संगीतकाराला देखील आपण या विषयाला न्याय देउ शकू का अशी शंका यावी असाच तो प्रोजेक्ट होता. पण जॉन विलीयम्स यांनी आपलं सर्व ज्ञान, आपलं सर्व सांगितीक कौशल्य पणाला लावून या चित्रपटाचे संगीत अजरामर केलं. यातली लिड व्हायोलीन वाजवणारा इत्झाक पर्लमन हा देखील ज्यूइश आहे. त्याने वाजवताना त्या थिममधे जी करुणा ओतली आहे ती निव्वळ अवर्णनीय आहे
    आजही जगभरातील जवळजवळ प्रत्येक सिंफनी वा फिलहार्मोनीक आॕर्केस्ट्रा मधे शिंडलर्स लिस्टची ही थिम वाजवणे हे बहुमानाचे समजले जाते. Its a priviledge to play the theme of Shindler's list.
    जोपर्यंत या जगात माणूस माणसासारखे वागेल तोपर्यंत
    शिंडलर्स लिस्ट सारखा चित्रपट त्याला आठवण करुन देत राहील की माणसाचा हैवान झाल्यास माणूसकीला काळीमा लागणा-या गोष्टी घडू शकतात..(साठ लाख ज्यू लोक या 'नाझी होलोकाॕस्ट' मधे मारले गेले होते.) पण दुस-या बाजूला एखादा आधीचा स्वार्थी आप्पलपोटा उद्योगपती असणारा आॕस्कर शिंडलर सारखा माणूस स्वतःचे सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यू लोकांना मरणाच्या दारातूनही वाचवतो. अशा चित्रपटाची थिम व संगीत त्या चित्रपटाच्या विषयाला पूरक व प्रभावीपणाने पोहोचवणारे हवे होते.
    जॉन विल्यमस्नी हे शिवधनुष्य लिलया पेललंय यात शंका नाही...

    टीप:

    खाली या थीमच्या तीन लिंक देत आहे

    १. स्वतः जॉन विल्यम्स कंडक्ट करताना इत्झाक पर्लमनने लीड व्हायोलीनीस्ट म्हणून वाजवलेली ही थीम नक्की पहा.

    २. स्पिलबर्ग आणि जॉन विलीयम्स यांच्या समोर शिंडलर्स लिस्टचे पंचवीस वर्षे झाली तेंव्हा ही थीम सादर केली गेली तेंव्हा दोघांचे पाणावालेले डोळे नक्की पहा.

    ३. थीम वाजवताना एका वादक महिलेला भारावून रडू कोसळले त्याचा हा अप्रतिम व्हिडिओ जरुर पहा..

      August 24, 2022


  • नटसम्राट

    आज ४६ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला.
    २३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, मा.वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर मा.सतीश दुभाषी, मा.उपेंद्र दाते, मा.यशवंत दत्त, मा.चंद्रकांत गोखले, मा.दत्ता भट, मा.मधुसूदन कोल्हटकर, मा.राजा गोसावी, मा.गिरीश देशपांडे मा.नाना पाटेकर यांनी नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत.
    नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
    या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडके फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती. मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर आला आहे. नाना पाटेकर निर्मित आणि अभिनीत ‘नटसम्राट’ हा चित्रपट. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ ला प्रदर्शित झाला आहे. आपल्या अभिनयाने अनभिषक्त सम्राटाची पदवी मिळवलेला अभिनेता नाना पाटेकर या सिनेमात प्रसिद्ध आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत दिसले आहेत. या नाटकातील एका वाक्याने अवघ्या मराठी जनमानसावर आपला ठसा उमटवला आहे. ते वाक्य म्हणजे 'कुणी घर देता का घर...’

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 23, 2016