वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
तेल गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. अशी एक म्हण आपल्याकडे होती. केसांना तेल लावायचं नाही, अंगाला अभ्यंग करायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचे नाही, नाकात तेल सोडायचे नाही, कानात तेल ओतायचे नाही, आणि पोटासाठी तेल प्यायचे नाही. नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण करणारी मुख्य भारतीय यंत्रणा ताब्यात घेऊन, आरोग्यामधे घुसखोरी सुरू झाली.
February 27, 2018
पर्यावरण पूरक घर बांधणी आणि बांधकाम ही संकल्पना सद्य:स्थितीत नगर रचनेचा अविभाज्य घटक बनत आहे. ईको-फ्रेंडली या नावाने सर्वश्रूत असणाऱ्या या संकल्पनेला प्राधान्य देण्यामागे अनेक महत्वाच्या बाबी आहेत. नगररचना आणि बांधकामासाठी लागणारे घटक अथवा लागणारा माल निवडताना पर्यावरणाचा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं.
February 11, 2022
“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?”
June 16, 2020
ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षो उल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी या पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर हा दिवस दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच. बेल्जियम, जर्मनी, फिनलंड या देशांत नाताळसाठी खास बिअर बनवली जाते, तर नॉर्डिक देशात "ग्लोग' हे पारंपरिक ख्रिसमस ड्रिंक बनवले जाते. रेड वाईनमध्ये थोडा संत्र्याचा रस व लवंग, दालचिनी, सुंठ आणि वेलदोडा असे मसाले घालून ग्लोग बनवले जाते. इस्टर्न युरोपमध्ये नाताळच्या जेवणासाठी बारा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. याचे कारण म्हणजे बारा हा आकडा श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो तसेच तो आकडा वर्षाच्या सगळ्या महिन्याचे प्रतिनिधित्व करतो. हे जेवण संपूर्ण शाकाहारी असून त्यात पारंपरिक पद्धतीनुसार व त्या सीझनमध्ये मिळणारी फळे व भाज्या वापरून बनवलेले पदार्थ असतात. त्यामध्ये बीटचे सूप, भाज्या भरलेले डंपलिंग्ज, खसखस घातलेली केक, जिंजर ब्रेड, कोबीचे रोल्स, हे पदार्थ प्रामुख्याने असतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
ख्रिसमससाठी काही खास पदार्थ
ख्रिसमस केक
ब्लॅक फॉरेस्ट केक
ख्रिसमस जिंजर कुकी
खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्
हनी बनाना ब्रेड
सोया नानकटाई
कॉर्न नानकटाई
रम केक
पोटॅटो ब्रेड
पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)
December 26, 2016
आंतरराष्ट्रीय योग दिनापाठोपाठच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने उचललेले कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पाऊल म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणून घोषित करणे हे होय. आपल्या मातीतल्या या वैद्यकशास्त्राला स्वतंत्र असा दिन जाहीर होण्यास सुमारे सत्तर वर्षे वाट पाहावी लागणे ही अतिशय दुःखद घटना म्हणावी लागेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक या दोघांचेही मनःपूर्वक आभार. माझे मत फुकट गेले नाही याचा आधी एक देशभक्त म्हणून अभिमान होताच; आता एक वैद्य म्हणूनदेखील तो दुणावला हे निश्चित!!
पहिला वहिला 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' साजरा झाला खरा; मात्र त्या अनुषंगाने काही आत्मपरीक्षण करावे अशी स्थिती असल्याने काही मुद्दे मांडत आहे. एकंदरीतच आयुष मंत्रालय, आयुर्वेदीय संघटना आणि व्यक्तिश: प्रत्येक वैद्य यांनी याचा गांभीर्याने आणि जबाबदारीने विचार करायला हरकत नाही असे वाटते.
१. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर इतक्या यशस्वीपणे साजरा केल्यावर खरे तर आयुर्वेदाशी संबंधित दिवसदेखील केवळ राष्ट्रीय पातळीवर साजरा न करता; आंतरराष्ट्रीय पातळीवरच साजरा होण्याची आवश्यकता होती. आज जगभरात आयुर्वेदाबद्दल आदर आणि उत्सुकता आहे. या निमित्ताने आपण विविध दालने उघडू शकलो असतो. दुर्दैवाने तसे झाले नाही. पुढील वर्षीपासून तसे करण्याचा मनोरथ असेल का?!
२. ज्या प्रमाणात या दिनाचा प्रचार- प्रसार सर्वसामान्य जनतेपर्यंत व्हायला हवा होता; त्या प्रमाणात तो झालाच नाही. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया या माध्यमांतून याविषयीचे वातावरण तयार करण्यास आम्ही कमी पडलो. (योग दिनाला केली जाणारी वातावरण निर्मिती आठवा. त्या तुलनेत या दिवसाची माहिती किती सामान्य भारतीय नागरिकांना होती याचाही अंदाज घ्या.)
३. या दिनाच्या निमित्ताने 'आयुष' मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात; आयुर्वेदातील महाविद्यालये, विविध शैक्षणिक संघटना इत्यादींनी 'Ayurveda for prevention and control of diabetes' या विषयावर आधारित कार्यक्रम करावे असे सुचवण्यात आले होते. आयुर्वेदाची स्वतंत्र परिभाषा आहे. आम्ही वैद्यगण ती परिभाषा लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत 'डायबेटिस' ऐवजी 'प्रमेह' वा 'मधुमेह' ही आयुर्वेदीय परिभाषा या निमित्ताने देशासमोर आणता आली असती. मात्र त्याला या पत्रकाने पद्धतशीर सुरुंग लावला.
४. काही संघटनांनी या निमित्ताने जागृतीपर कार्यक्रम हाती घेतले. त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. मात्र इथेही दुही, कंपूशाही, श्रेयवाद या आयुर्वेदाला लाभलेल्या जुन्याच शापांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट दिसून आले. आपल्या परिघाच्या बाहेरील गुणवान वैद्यांना सामील करून न घेण्याची प्रवृत्ती किती काळ चालणार याचे उत्तर परमेश्वरच देऊ जाणे!!
५. बऱ्याच मोठ्या संख्येने आम्ही वैद्यगणदेखील या निमित्ताने काही शिबिरे वा तत्सम कार्यक्रम आयोजित करून आपले रुग्ण वा समाजातील अन्य व्यक्तींपर्यंत पोहचण्यात कमी पडलो. आपण या दिवसासाठी काय योगदान दिले याचे उत्तर प्रत्येक वैद्याने स्वतःला विचारावे; किमान १० जणांपर्यंत जरी या दिनाची जागरूकता आपण नेऊ शकलो असू तरी ते महत्वाचे योगदान आहे असे मी मानतो. यावर्षी उदासीन राहिलेल्यांनी मात्र पुढील वर्षीपासून तसे न होण्याची खात्री करावी लागेल. आपण आपला वाढदिवस जसा उत्साहात साजरा करतो; त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक जोशात हा दिवस साजरा व्हायला हवा.
६. बहुतांशी आयुर्वेद महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी असल्याने या दिवशी महाविद्यालयांतून म्हणावे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सामील करून काही भरीव कार्यक्रम हातात घेता आले नाहीत. यावरही आपल्याला काहीतरी उत्तर शोधणे क्रमप्राप्त आहे.
७. स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करून खरं तर मा. पंतप्रधानांनी अतिशय महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रालय स्थापन झाले; पुढे काय? धनत्रयोदशीच्याच दिवशी संदीप आचार्य यांनी लोकसत्तेत याविषयी एकल छोटा लेख लिहिला होता. या मंत्रालयाचे कारभार कागदी घोड्यांचेच असल्याचे लेखातून (आणि प्रत्यक्षातदेखील) दिसत आहे. जिथे अंग झाकायला कपडे नाहीत तिथे नेक टाय लावून फिरण्यात काय हशील? आज आयुष चिकित्सापद्धतींची नेमकी हीच गत आहे. यापूर्वीही मी नेहमीच वारंवार सांगितल्याप्रमाणे मोदी सरकार हे आयुष पदवीधरांची शेवटची आशा आहे. किमान त्यांनी तरी अपेक्षाभंग हा सुरुवातीलाच नमुद केल्याप्रमाणे; राष्ट्रीय आयुर्वेद दिन जाहीर केला गेला याचा प्रत्येक वैद्याप्रमाणेच मलाही अतोनात आनंद आहे. मात्र; अल्पसंतुष्ट असण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्कर. इथे कोणावर टीका करण्याचा यत्किंचितही हेतू नाही. मात्र; ९५% गुण मिळवण्याची क्षमता असलेला विद्यार्थी सतत ३५-४०% गुणच मिळवत असेल तर 'पास तर होतोय ना' असं म्हणून त्याचे कोडकौतूक करून गालगुच्चे घ्यायचे की त्याने अजून प्रयत्न करायला हवेत म्हणून जरा कान पिळायचे? माझा उद्देश तितकाच आहे. आयुष मंत्रालयाकडून या गोष्टींचा विचार केला जाईल अशी आशा. बहुतांश वैद्य- वैद्येतर वाचकवर्ग या मतांबद्दल कोणतेही गैरसमज करून न घेता आपुलकीने त्यांचा विचार करेल अशी खात्री वाटते. त्यातही काहींची बुद्धी पटावरच्या उंटाप्रमाणे चाललीच तर मात्र नाईलाज आहे.
आयुर्वेद हे आपल्या मातीतले शास्त्र आहे. त्याला सर्वार्थाने सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्प्रस्थापित करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. चला; आपली जबाबदारी पार पाडुया!!
जय आयुर्वेद।
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
November 2, 2016
बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे.
March 13, 2013
संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान :
शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत असल्याचें स्पष्ट आहे. मी या बाबतीत मोरे यांच्याशी सहमत आहे.
‘….लोकांच्या.आचारात किंवा विचारात जें कांहीं साम्य आहे तें महाभारत किंवा रामायण या आर्ष महाकव्यांमुळेच उत्पन्न झालें आहे ; व आजमितीस जागृत आहे. बंगाल्यात जा, काश्मिरात जा, किंवा मद्रासेत जा, रामायण-महाभारतातील कथा, उपकथा किंवा आख्यानें ही लोकांस सारखीच आवडतात, व त्यांच्या श्रवणानें एकसारखेच विचार त्यांच्या मनांत उत्पन्न होऊन भरतभूमीच्या राष्ट्रीय ऐक्याची साक्ष देतात… ’ .
लोकमान्य टिळक हे थोर राजकीय नेते तर होतेच, पण ते संस्कृतचे आणि संस्कृती या विषयांचे मोठे विद्वान होते. ‘गीता रहस्य’, यासारखे तत्वज्ञानाधिष्ठित व ‘Orion’, ‘Artic Home In the Vedas’ यासारखे संशोधनाधारित ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. तेव्हां त्याचे एकात्मकेबद्दलचें मत ग्राह्य धरायलाच हवें.
‘... मराठी अभ्यासविश्वात सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती ’ ( इति राजोपाध्ये ) :
हा मुद्दा महत्वाचा आहे जरूर, पण तो मूळ विषयाशी डायरेक्टली संबंधित नाहीं, म्हणून, त्याचा परामर्श, मुद्दाम शेवटी, ‘ परिशिष्ट – (२) ’ मध्ये घेतला आहे.
मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद बर्यापैकी-व्यवस्थित मिळाला आहे , असें मला वाटतें.
(पुढे चालू )
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
October 12, 2016
अॅमस्टरडॅम ते लंडन हा पहिला प्रवास रेल्वे-बोट-रेल्वे' असा होता व त्यातही साध्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. अॅमस्टरडॅम रेल्वे स्टेशन अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं आहे. तेथील स्वच्छता, टापटीप व तुरळक गर्दी या गोष्टीही मनात आणि नजरेत भरतात. १५ ते २० प्लॅटफॉर्म्सवर अनेक गाड्या निघण्याच्या प्रतीक्षेत होत्या. आमच्या डब्यात मात्र प्रवाशांची बरीच गर्दी होती.
जेमतेम बसण्याची सोय झाली होती. बाजूचे प्रवासी आपापसात गप्पागोष्टी करत आपापले डबे उघडून काहीतरी खात होते. गाडी चांगली ताशी १२० मैल वेगानं पळत होती. बाजूनं सर्वत्र हिरवीगार वनश्री. कालवे, टुमदार कौलारू घरं... नजर तृप्त न होती तर नवल! ३ तासांत आमची गाडी एका बंदराला लागून असलेल्या प्लॅटफॉर्मवर रात्रीच्या अंधारात उभी राहिली. परिसरात काळोख, दूरवर एक अजस्त्र बोट. त्यावरती मिणमिणते दिवे, हवेत प्रचंड गारवा. कुडकुडत, बॅगा. खेचून नेत अखेरीस त्या बोटीवर जाऊन आम्ही स्थानापन्न झालो. बोटीचा तळमजल्याचा प्रचंड मोठा दरवाजा 'आ वासून' पसरलेल्या जबड्यासारखा. त्यामधून मोटारी, ट्रक्स चढविले जात होते. पूर्वी तर रेल्वेचे काही डबेही बोटीतून नेले जात. मधल्या केबिनच्या तिकिटाची किंमत जास्त असल्याने आम्ही मोकळ्या डेकवर उभं राहणंच पसंत केलं. केबिनमधील प्रवासी ढारादूर झोपलेले. रात्री ११ ची वेळ. डेकवर उभे राहून समोर अथांग सागर पाहताना मन उचंबळून आलं होतं. ब्रिटिश भूमीवर पाय ठेवण्यासाठी उत्सुक झालो होतो. दूर समुद्रात अनेक बोटींचे दिवे लुकलुकत होते. थोड्याच वेळात तळाचा अवाढव्य दरवाजा बंद झाला. बोटीचे साखळदंड सुटले आणि ब्रिटिश खाडीतील प्रवासास सुरुवात झाली. काही प्रवासी आपल्या स्लीपिंग बॅगमध्ये निद्रिस्त झाले होते. रात्री १ वाजेपर्यंत कुडकुडत, झोंबऱ्या वाऱ्याला तोंड देत, झोप घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि जरा डोळा लागतो तर पहाटे ३ वाजता इंग्लंडचं बंदर आलं. खाली उतरलो मात्र आणि चेक पॉईंटवर प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागलं, कारण इंग्लंडमधील व्हिसा मिळवताना भारतीय प्रवाशांना फार अपमानाची व तिरस्काराची वागणूक दिली जात असे. परंतु अखेरीस गंगेत घोडे न्हाले. पासपोर्टवर व्हिसाचा स्टँप लागला. व्हिसा मिळतो का नाही असा अटीतटीचा प्रसंग ओढविण्याची चिन्हे होती.
बाहेर पडल्यावर लंडनला जाणारी ट्रेन उभीच होती. डब्यात बेताची गर्दी, धीरगंभीर चेहेऱ्याचे ब्रिटिश प्रवासी, सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी. अखेरीस डुलक्या घेत साहेबाच्या लंडन शहरातील व्हिक्टोरिया स्टेशनला पाय लागले. पहिल्या युरोप प्रवासाची सुरुवात सुखाची झाली होती.
लंडन शहर पाहण्याचा ५ दिवसांचा एकूण कार्यक्रम ठरला होता. लंडन ट्यूबरेल्वे-कम-बस असा एकत्रित पास काढून हा कार्यक्रम पार पाडला. जमिनीखाली तीन तीन थरांवर स्टेशनं; सरकते जिने; पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या लाईनचे विविध मार्गांचे डबे, आपोआप उघडझाप करणारे गाड्यांचे दरवाजे, त्यांचा वेग, वेळेचा नियमितपणा... प्रथम भांबावूनच गेलो, पण लक्षात आलं, की चुकायचं ठरवलं तरी चुकणं अशक्य. दुसऱ्या महायुद्धात रात्री बाँब हल्ल्यापासून बचावाकरता याच भुयारी रेल्वे फ्लॅटफॉर्मवर हजारो लंडनवासी आश्रयास येत. त्यावरील अनेक सिनेमे पाहिले होते. आज प्रत्यक्ष त्या जागी गाड्या बदलत होतो. ४ दिवसांत संपूर्ण लंडन पाहून घेतलं. लंडनच्या ट्यूबरेल्वे प्रवासात मनसोक्त भटकल्याने तृप्ती झाली होती.
लंडन-डोव्हर-कॅले-पॅरिस हा प्रवास परत रेल्वे-बोट-रेल्वे हाही तितकाच अविस्मरणीय! प्रसिद्ध इंग्लिश खाडी ओलांडून पुन्हा युरोपमध्ये प्रवेश केला. राहून राहून 'द लाँगेस्ट डे' या प्रसिद्ध युद्धपटाची आठवण येत होती, कारण याच कॅले बंदराजवळ दोस्तराष्ट्रांचे लक्षावधी सैनिक छोट्या बोटींतून उतरले होते.
पॅरिस नॉर्ड स्टेशनपासून आमच्या मौल्यवान युरेल पासची सुरुवात करण्याकरता एका खिडकीपाशी गेलो. पासपोर्ट तपासणी पूर्ण केल्यावर आमच्या तिघांच्या पासवर तो चालू झाल्याची तारीख व २१ दिवस ज्या तारखेला पुरे होणार ती तारीख नोंदविली गेली. नेमका माझ्या पासवर ऑफिसने गडबडीत चुकीचा महिना छापला. माझं नशीब बलवत्तर म्हणून चूक तिथल्या तिथे लक्षात आली. खाडाखोड न होता पुन्हा महिन्याचा क्रमांक व्यवस्थित लिहिला गेला. तरीही मनाला प्रवासभर मधूनच धाकधूक वाटे. कोणी त्यावरून अडविणार तर नाही ना? तसं झालंच, तर तिघांचा एकच गोंधळ व पास मुंबईत मिळाल्याने तो पुन्हा पॅरिसमध्ये मिळणारच नाही. असो. तशी वेळ मात्र आली नाही. आता पुढचे २१ दिवस लाल रंगाचा पास व पासपोर्ट यांचं आमच्या जीवनात अविभाज्य स्थान झालं होतं. त्यांची तपासणी पुढील प्रवासात असंख्य वेळा झाली.
पॅरिस नॉर्ड ते व्हर्सायिल्स असा पहिला प्रवास फर्स्टक्लासमधून सुरू केला. डबा उत्तम सुखसोयींनी परिपूर्ण होता. पुढेही प्रत्येक नवं स्टेशन येण्यापूर्वी डब्यात घोषणा ऐकून व इतरही अनेक सोयी-सुविधा पाहून आम्ही थक्क झालो होतो. पुढचे २१ दिवस अशाच आलिशान डब्यांमधून आमचा प्रवास सुखद होणार होता. पॅरिसमधील वास्तव्यात पॅरिस नॉर्ड स्टेशन तर आम्हाला सरावानं अगदी घरासारखं वाटलं. राहण्याची जागा स्टेशनजवळ व आमच्या मोठ्या बॅगा स्टेशनवरील लॉकर्समध्ये सुरक्षित, अशी सर्व चोख व्यवस्था झाल्याने शहर फिरताना एक छोटी बॅग गळ्यात अडकवून संपूर्ण शहर पॅरिस ट्यूब-रेलने आरामात फिरून पाहता आलं. लंडन ट्यूबपेक्षा पॅरिस-ट्यूबरेल्वे निश्चित वरच्या दर्जाची होती. डब्यातील व प्लॅटफॉर्मवरील दिव्यांचा झगमगाट डोळ्यांत भरणारा आणि प्रवासीही रंगेल, मजा करत फिरणारे दिसत होते. पॅरिस शहराचा विस्तार बराच मोठा आहे, परंतु ट्यूब-रेल शहराच्या कानाकोपऱ्यांतून पोहोचलेली असल्यामुळे शहर सहजपणे पालथं घालता येतं.
-- डॉ. अविनाश वैद्य
October 5, 2022
बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे.
March 20, 2022
१६६१ सालात मुंबईत आलेल्या ब्रिटिशाना सार्वजनिक जीवनात करमणुकीची सोय नव्हती. त्यांना अशा सोयी करण्याची फुरसतही मिळाली नव्हती. इस्ट इंडिया कंपनी व्यापारी कंपनी असल्याने त्यांची व्यापाराची घडी बसवण्याची प्राथमिकता होती आणि करमणूक ही दुय्यम स्थानी होती.
October 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti