(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चालणे आणि चालणे…

    अनादी कालापासून आपण चालत आहोत. अगदी रामायण काळ जरी म्हटला तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र थेट चौदा वर्ष चालत होते, वनवास होता ना. वामन अवतारात तीन पावलांत विश्व व्यापले गेल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पांडवही बारा वर्षे वनवासात होते, चालतच असतील ना. थोडक्यात काय तर चालणे आपल्याला सुटलेले नाही. आपण सारेच चालत आहोत… चालतच राहणार आहोत.

      May 13, 2019


  • तुम्ही फकीर झालात, लोकांनी तिराळं व्हायचं की मुखिया ! 

    ‘माझ्याच देशातील काही लोक माझ्यावर आरोप करतात, त्याचे मला आश्‍चर्य वाटते, आजपर्यंत देशाला लुटणार्‍यांना जबाबदारीची जाणीव करून देणं चूक आहे का? भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करून मी गुन्हा केलाय का? मी तुमच्यासाठी लढाई लढतो आहे, भ्रष्टाचारी करून करून काय करतील, मी फकीर आहे, मी झोळी घेईल आणि चालू लागेल
    - इति नरेंद्र मोदी
    नोटबंदीच्या निर्णयाने नक्की काय होणार, काळा पैसा बाहेर येणार काय? याबाबत अद्याप तरी सर्वजण अंधारातच आहेत. आजही जनता रांगेत उभी राहिलेली दिसेल. स्वत:च्या पैशासाठी सर्वसामान्यांना सरणावर जावे लागत आहे. खरचं अच्छे दिनची गुहार लावणार्‍या सरकारने घेतलेल्या या निर्णयाची दिशा भारताला आर्थिक महासत्ताकतेकडे घेऊन जाणारी आहे काय? तशी असेलच तर गेल्या चार आठवड्यांच्या कालखंडात देशातील कुठली परिस्थिती सुधारली? काळ्या पैशाविरुद्ध फास आवळले जात असल्याची आवई उठवली जाते, किती काळ्या पैशावाल्यांना या चार आठवड्यात पकडलं. याचं उत्तर सध्यातरी हो आणि नाही अशा प्रकारचं देण्यापेक्षा नंदी बैलाला पाऊस येणार का? असा प्रश्‍न विचारल्यागत बैल जी मुंडी हलवतो त्याच मुंड्या आता हलताना दिसतायत. आम्हालाही काळ्या पैशाच्या विरुद्ध चिड आहे, नव्हे नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला याची चिड असणारच. परंतु चार आठवड्यांचा कालखंड उलटला तरी सरकारच्या हाती काहीच लागत नाही. उलट ज्या रयतेसाठी हा खटाटोप चालू आहे त्या रयतेला मात्र प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मात्र अशा स्थितीतही केवळ अच्छे दिनचे स्वप्न पाहता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम’च्या मनसुब्याखातर नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत देशवासीय मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. ते केवळ आणि केवळ तिराळ्यापणामुळे.

    एका गावात एक बांगा, तिराळा राहत होता. गावातले लोक त्याला आंधळा, डुचका म्हणून चिडवत. त्याला लोकांचा राग येई. याचा बदला घेण्याचंही तो ठरवी.परंतु त्याला बदला घेता येत नव्हता. एके दिवशी त्याने स्वत:चा एक डोळा फोडला आणि गावभर डोळा फोडल्याने देव दिसतो म्हणून डांगोरा पिटवला. ही माहिती गावच्या मुखियापर्यंत गेली. देव पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या मुखियाने आपले दोन्ही डोळे फोडून घेतले. मुखियाला देव काही दिसला नाही. मुखिया तिराळ्याकडे गेला, देव दिसत नसल्याचे सांगितले. तिराळा म्हणला, मुखियाजी , तुम्ही जर देव दिसत नाही म्हणून सांगितलं तर लोक तुम्हाला मुर्खात काढतील. आपण मुर्खात निघू नये म्हणून मुखियाही गावभर डोळे फोडल्याने देव दिसतो म्हणून डांगोरा पिटू लागला. बघता-बघता अख्ख्या गावाने देव पाहण्यासाठी डोळे फोडून घेतले. पदरी मात्र भविष्याचा अंधार आला. तिराळ्याचा बदला पूर्ण झाला, तशी परिस्थिती आज नोटाबंदीच्या बाबतीत घडती की काय, देशातील सर्वजण म्हणतात, निर्णय चांगला परंतु प्रतिप्रश्‍न निर्णय कसा चांगला याला उत्तर मात्र कोणाला देता येत नाही. अर्थतज्ज्ञांनी एकाच अर्थशास्त्रावर अभ्यास केला, परंतु अर्थतज्ज्ञांचे मत मात्र भिन्न-विभिन्न पहावयास मिळाले. आजची परिस्थिती पाहितली तर धनदांडग्यांचं कुठंही वाकडं झालेलं दिसलं नाही. सर्वसामान्यांच्या लेकीबाळींना बँकेच्या रांगेत उभे राहून बाळांत व्हावं लागलं. म्हातार्‍या बाबाला दोन-पाच हजार रुपये काढण्यासाठी रांगेत उभं राहता-राहता मरण पत्कारावं लागलं. रांगेत उभे राहून राहून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना मरण स्वीकारावं लागलं आहे. दवाखान्यामध्ये हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर तिथं डॉक्टरला जबाबदार धरलं जातं. नोटबंदीच्या निर्णयावर देशभरात पन्नासपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार? सरकारला दोषी ठरवलं जाणार आहे की नाही? की नोटबंदीच्या निर्णयावर मुखियाच्या पाठिशी डोळे फोडून घेणार्‍या देव पाहण्यासाठी आशावादी असणार्‍या लोकांच्या पाठिराख्यावर ‘मी फकीर आहे,’ मी झोळी घेऊन जाईन, एवढ्याशा भावनिक आवाहनावर देशातली विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित राहण्याचे कारण एवढेच, काळ्या पैशावाल्यांचे मुस्काट रंगविण्यासाठी आखलेली ही योजना एखाद्या ‘तिराळ्या’च्या बदल्याच्या मनसुब्यासारखी तर नव्हे ना? कारण आज आपण देशात कुठेही जा सर्वसामान्यांना नोटबंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्याचं दिसून येतं. आमच्या मराठवाड्यामध्ये गेल्या चार वर्षात दुष्काळ होता, आमच्याकडे दोन पैसे पहायला मिळत नव्हते.

    योगायोगाने यावर्षी पाऊस झाला. कापसाला बोंडं फुटली, पांढरं सोनं दारात आलं, परंतु नोटबंदीमुळं ते बाजारात घेऊन जाताना मात्र तोंडाला फेस आला. नव्या नोटा पाहिजे तर 4 हजार क्विंटल आणि जुन्या नोटांवर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल म्हणजे इथेही सर्वसामान्यांची दीड हजाराला चांगली मारली! हे बहुदा फकीर असणार्‍या व्यक्तिांना आणि झोळी उचलण्याची भाषा करणार्‍या 21 व्या शतकातील कौटल्यांना माहित नसावं. देशातला सर्वसामान्य नोटबंदीमुळे जेवढा त्रस्त झाला आहे तेवढ्या प्रमाणावर खरचं काळा पैसा बाळगणारा त्रस्त झाला आहे काय? टॅक्स बुडविणारे इमानदारीने बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले आहेत काय? ज्या हिमतीने आणि ज्या दिमतीने हा निर्णय घेतला आणि काळा पैसा गंगेत वाहिला जाईल, असा आशावाद ठेवला त्या सरकारच्या आशावादाला काळ्या पैशावाल्यांनी हरताळ लावली आणि काळ्याचे पांढरे पैसे करण्याची मोहीम उघडत ती मोहीम जणू काही फत्तेही झाली. मग आमचा प्रश्‍न आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात सर्वच बेईमान आहेत का? अख्ख्या देशवासियांना आम्ही इमानदार ! आहोत. हे फकीराला का सांगावं, झोळीवाल्याला का सांगावं? असा जळजळीत सवाल आम्ही जर विचारला तर नक्कीच आमचा राग येईल. परंतु मोदीजी, तुम्ही जेंव्हा माईकवर येता आणि ‘मेरे भाईयो और बहनो,’ असा सूर आवळता तेव्हा बेईमानापासून सर्व इमानदारांना गळ्याला फास आवळल्यागत वाटतं, ते केवळ दहा-पाच बेईमानांमुळे अवघ्या देशातील नागरिकांना आम्ही इमानदार आहोत आम्ही इमानदार आहोत हे बँकेच्या रांगेत उभे राहून सांगावे लागते, पटवून द्यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांगतो, या देशाचा कायदा सांगतो, शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका बेकसुराला शिक्षा झाली नाही पाहिजे. मग आता तर काळ्या पैशेवाले बिनदिक्कत घरात पडून आहेत. त्यांची तूपरोटी चालू आहे, परंतु जे इमानदार आहेत, ज्यांना रोज रोजीरोटीसाठी कामावर जावं लागतं त्यांना मात्र बँकेच्या रांगेत उभा राहून आम्ही इमानदार असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘वाहघ पडला वाळी आणि केल्डा दाखवतो नाळी,’ म्हणजेच जंगलचा राजा वाघ पिंजर्‍यात अडकल्यानंतर क्षुद्र माकड त्या पिंजर्‍यासमोर येऊन स्वत:च्या जनेंद्रिया हलवत त्या वाघाची अवहेलना करतो.

    तीच परिस्थिती माझ्या देशातल्या इमानदार, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, इमानदार व्यापारी, उद्योगपती यांची आज झाली आहे. आम्ही नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं, आम्ही म्हटलंही काळ्या पैशावाल्यांना झोप येणार नाही, आम्ही मात्र निवांत झोपू, परंतु अर्थव्यवस्थेची घडी जेवढ्या गतीने बसायला हवी होती तेवढ्या गतीने ती बसली नाही किंवा सरकारला ती बसविता आली नाही. याचं कारण शोधणंही गरजेचं आहे. एवढा मोठा निर्णय घेऊन देशाला आर्थिक गोंधळात टाकून, व्यवहार ठप्प ठेवून यातून चांगलं घडलच नाही, तर मग या दोन महिन्याच्या कालखंडात देशातल्या 125 करोडपैकी शंभर करोड सर्वसामान्य लोकांना जो त्रास झाला त्याचं देणं कोण देणार? त्या पापाचे भागिदार कोण होणार? आज जी परिस्थिती आहे, नोटबंदीच्या ऐतिहासिक दृष्टीने सर्वसामान्य सहन करण्याच्या मानसिकतेत आहेत परंतु यातून अघटीत घडलं आणि सहनशीलतेचा बांध फुटला तर त्या परिणामांना सामोरे जाण्यास देशाला परवडेल काय? आज या निर्णयामुळे देशात जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती सावरण्याचं काम जेव्हा मोदी करतील आणि सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना या दोन महिन्याच्या कालखंडात झालेल्या त्रासाचा मोबदला महागाई कमी करून शिक्षण, आरोग्य आणि देशवासियांच्या मुलभूत गरजा पूर्ण करून जेव्हा देतील तेव्हा नोटबंदी ही सर्वसामान्यांसाठी चांदी दिसेल.

    -- गणेश सावंत
    ganesh.sawant4@gmail.com

      December 17, 2016


  • गोष्ट “अशी” संपायला नको होती !

    आयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात.

      April 17, 2022


  • भारतीय स्त्रीशास्त्रज्ञ शिना राणी

    ५७ वर्षीय शीना राणी ह्या  हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या  १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते.

      August 12, 2025


  • जीभेची रचना आणि कार्य

    आपल्याला तपासताना डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. हा अनुभव बहुतेकांना आला असेल. जिभेचा संबंध अन्नाची चव घेण्याशी असतो आणि बोलताना जीभ महत्त्वाचे कार्य करते हेदेखील सर्वांना माहीत असावे. सामान्यपणे आपली जीभ आपल्या मुखाच्या पोकळीच्या आतच असते. मानवी जीभ दहा सेंटिमीटर लांब असते आणि जिभेचे वजन 56 ग्रॅम असते. इतर प्राण्यांमध्ये जीभ दुसरी कामे करताना दिसते. बेडूक आपल्या जिभेने कीटकांना पकडू शकतो. सापाची जीभ अंधारात आजूबाजूच्या वस्तूंना स्पर्श करीत मार्ग काढण्यास मदत करू शकते. माणसाची जीभदेखील चव आणि वाचा याखेरीज इतर महत्त्वाची कार्ये करते. आपण अन्न चावून खातो तेव्हा तोंडातल्या तोंडात एका बाजूने दुसरीकडे अन्न सारखे फिरवले जाते. या फिरवण्यामुळे अन्न सगळ्या बाजूने चांगले चावले जाते. असे चांगले चावून मऊ झालेल्या अन्नात लाळ व्यवस्थित मिसळू शकते. लाळेत महत्त्वाचे विकर असते. टायलिन या नावाने ते ओळखले जाते.

    हे टायलीन विकर (इन्झाईम) कर्बोदकांच्या पचनात महत्त्वाचे कार्य करते. नीट चावून मऊ झालेल्या अन्नात लाळ मिसळण्याने कर्बोदकांच्या पचनाला सुरवात होते. कर्बोदक नीट न पचताच आंतड्यात गेली, तर ती शोषली जात नाहीत. न शोषली गेलेली कर्बोदके मोठ्या आतड्यात जातात. तेथील जिवाणू (बॅक्टेपरिया) या कर्बोदकांचे विघटन करतात. या प्रक्रियेतून अखेर मिथेन हा वायू तयार होतो. या वायूला दुर्गंधी नसते; परंतु "वारा सरताना‘ हा वायू आवाज करतो. त्यामुळे व्यक्तीला ओशाळल्यागत होते. कर्बोदकांच्या चांगल्या पचनाची सुरवात आपल्या मुखात होण्यात जिभेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुखाच्या पोकळीत जिभेचे टोक दात, हिरड्या, मुखाचे छप्पर, ओठ येथे असलेले सर्व पदार्थ गिळते. अशा रीतीने आपल्या मुखाच्या आतील स्वच्छता ठेवण्याचे कार्य जीभ सतत करीत असते.
    जिभेचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्न गिळण्याची सुरवात करणे हे होय. जिभेचा पुढचा भाग (टोक व शेजारचा भाग) मुखाच्या छपरावर घट्ट दाबला जातो. जिभेचा मागचा भाग उचलला जातो. आता चावून मऊ व लाळ मिसळून ओला झालेला घास घशाकडे ढकलला जातो. इथून तो अन्ननलिकेकडे घसाच्या स्नायूंच्या आकुंचनाने नेला जातो. या कार्यात विविध स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या वेळचा ताल अचूकपणे सांभाळला जाणे आवश्यघक असते. गर्भावस्थेतच ही क्रिया करण्याचे प्रशिक्षण अर्भकाला मिळालेले असते. त्यामुळे जन्मल्या जन्मल्याच मूल स्तनपान करू शकते. जिभेच्या बाहेरच्या बाजूने पातळ त्वचा असते. आतून स्नायू, रक्तरवाहिन्या आणि ज्ञानतंतूच्या शिरा असतात. जिभेच्या वरच्या भागावर छोटे छोटे उंचवटे असतात. या उंचवट्यातील काही उंचवटे चव समजण्याच्या क्रियेत महत्त्वाचा भाग घेतात. त्यांना टेस्ट बडस्‌ म्हणतात या टेस्ट बडमधील पेशी रासायनिक क्रियेमार्फत "चवीचे‘ वेगळे वेगळे प्रकार ठरवितात. हे टेस्ट बडस्‌ जिभेप्रमाणे मुखाच्या पोकळीच्या अस्तरात सर्वत्र असतात. अन्नाला वेगळी वेगळी चव समजते, त्यात या टेस्ट बडस्‌च्या जोडीला वासाचेदेखील महत्त्व असते. चवदेखील चार प्रकारची आहे, असे शास्त्र मानते. आंबट चव ही ऍसिड (आम्लता) मुळे समजते. खारट चव विविध क्षारांमुळे जाणवते. गोड चव कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या रासायनिक रेणूमुळे निर्माण होत नाही. काही रासायनिक रेणूंची चव गोड लागते; परंतु साखरेच्या रेणूप्रमाणे हे पदार्थ उष्मांक निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांना आपले वजन कमी करावयाचे आहे, अशा व्यक्तींना हे कृत्रिम गोडी आणणारे (आर्टिफीशियल स्वीटनर्स) घटक वापरता येतात. या रेणूच्या वापरातून पोटात वायू (गॅसेस) मात्र निर्माण होतात. कडू चवदेखील अनेक प्रकारच्या रासायनिक रेणूंमुळे जाणवते. यांपैकी अल्कलॉईडस प्रकारचे रेणू अनेक औषधांत असतात. उदाहरणार्थ क्विनीन, कॅफेन, स्ट्रिकवीन किंवा निकोटिन.

    तिखट ही वेगळी "चव‘ नसून, काही रेणू आपल्या जिभेवरील ज्ञानतंतूंच्या टोकाला झोंबतात, त्यातून तिखट जाणवते. चव समजण्याकरता अन्नाचे हे विशिष्ट रासायनिक रेणू विरघळणे आवश्यतक असते. हे काम लाळ करते. कोणत्याही कारणाने तोंड कोरडे पडले (लाळ सुटणे थांबते) तर अन्नाची चव कळेनाशी होते. त्यातून लाळ न सुटल्यामुळे जिभेवर मृत पेशीचे किटण जमले, तर त्या मृत पेशीतील काही रसायनांचे विघटन होऊन कडू चव असणारे रेणू निर्माण होतात. व तोंडात कडू चव जाणवत राहते. अनेक औषधांचादेखील असा परिणाम असतो. माणसामाणसात त्याच अन्नाला वेगळी वेगळी चव जाणवते. पालक काहींना चवदार वाटतो, तर इतरांना कडू लागतो. अर्थात तोच पदार्थ काहींना आवडतो; इतरांना आवडत नाही. शिवाय आवडीनावडीचे प्रकार मानसिक अनुभवावरही अवलंबून असतात. त्यामुळे आवडीनावडी बदलू शकतात. तरुण वयात गोड न आवडणाऱ्या व्यक्तींवना वार्धक्या जसे जवळ येऊ लागते, तसे गोड पदार्थ आवडू लागतात. हा अनेकांचा अनुभव असतो.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

    संदर्भ :- डॉ. मधुरा भिडे

      September 16, 2016


  • “औद्योगिक-शांतता की,स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की,औद्योगिक-अस्पृश्यता?”

    ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्‍र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं.

      January 2, 2012


  • रेल्वेद्वारे मालवाहतूक आणि रोरो सेवा

    मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात.

      May 11, 2023


  • श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

    “श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २

      May 29, 2022


  • रक्षाबंधन व सामाजिक भान

    *मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी अधिक प्रमाणात आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. नेमके* *रक्षाबंधांच्याच दिवशी बहिणीवर होणारे अत्याचार तर कित्येक चित्रपटात चित्रित केले गेलेत. शिवाय शासनाची निष्क्रियता अश्या वासनांध नराधमांना जास्तच खतपाणी घालत असते. अन्यथा ज्या पवित्र भूमीत खास स्त्रियांसाठी सण,उत्सव साजरे केले जातात त्या भूमीत या गोष्टी घडल्याच नसत्या*..

    असो...

    *आज हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण भर हिंदुस्थानात साजरा होतोय.. आजच्या या पवित्र दिनी आपण सारे भाऊ मिळून शपथ घेऊ या की या देशातील प्रत्येक स्त्रिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असेल. लव्ह जिहाद, धर्मांतरण या सारख्या विळख्यात अडकणाऱ्या प्रत्येक मुलीला,स्त्रीला आपलीच बहीण समजून तिला या विळख्यातून बाहेर काढण्याची शपथ आज घेऊ या.. त्या साठी ती या विळख्यात कशी अडकणार नाही या साठी तिचे प्रबोधन करू या. शाळा कॉलेज, नाते संबंधात, शेजारी-पाजारी, कार्यालयातील स्त्रियांना या विषयी जागृत करू या*..

    *आजची स्त्री खरे तर अबला नाहीच*. *ती खमकी आहे. शूर आहे. समजदार आहे*. *तडफदार आहे. कर्तबगार आहे. अश्या भगिनींना सोबत घेऊन इतर सर्व भगिनींना जागृत करू या*.

    *भाऊ बहिणीच्या या हिंदूंच्याच आणि हिंदुस्तानच्याच असणाऱ्या या पवित्र उत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा*...

    || जय हिंदूराष्ट्र ||

    *इवल्या इवल्या हाताने माझ्या राखी तुला बांधेल* !!
    *दादा दादा म्हणत तुझ्या मागे मी फिरेन* !!
    *गोड गोड खाऊ मी माझ्या हाताने तुला भरवेन* !!
    *आपल्या या नात्याला नव आयुष्य लाभेल* !!
    *या साठी दादा मला येऊ दे* !!
    *आई ला तू सांग ना मला जग पाहू दे*!!
    *केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका* !!
    *तूमच्या मूलांच्या बहिणींना गर्भातच मारू नका*!!
    *कला सूसंगत परंपरांना आमचे नेहमीच वंदन आह*े !!
    *गर्भातल्या लेकी-बहिणी वाचवणे हेच आमूचे खरे रक्षाबंधन आहे* !!

      August 18, 2016


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री भीमाशंकर

    शिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे. 

      August 13, 2013