वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मी गेली २५ वर्षे जेवताना बरेचवेळा मन अन्नाबरोबर एक करून (म्हणजे जेवताना इतर विचार न करणे, फक्त घास चावण्यावर लक्ष केंद्रित करणे) जेवतो मला याचा खूप फायदा झाला व होत आहे.
March 12, 2017
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.
September 12, 2019

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत.
May 31, 2023
असा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांनी “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” हे भरतवाक्य कायम ध्यानी ठेवावे.
December 31, 2017
सध्या सोनी चॅनलवर हिंदी इंडियन आयडाॅल सुरु आहे.याचा उच्चार उच्चभ्रू (स्वत:ला समजणारे !) लोक आयडल ( म्हणजे निष्क्रिय! ) असा का करतात हे एक न सुटणारे कोडे ! असो…..
February 27, 2024
वॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे.
March 30, 2022
आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार.
मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.
कलिंगड बियाइसोबत खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.
हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅटस् घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.
किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो.
April 1, 2016
जगभर कृत्रिम बुद्धिमतेची चर्चा सुरू असताना चक्क रोबोटला तेल व्यापारात प्रगत मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले आहे. या रोबोटचे नाव सोफीया असे असून सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.
May 6, 2018
मी रांगेत उभा राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. लोकांच्या carts नुसत्या भरभरून ओसंडून वहात होत्या. माझ्या cart मधे जेमतेम तीन चार वस्तू असल्यामुळे, इतरांच्या तुलनेत माझी cart म्हणजे, गुटगुटीत पोरांमधे एखादंच किरकिरं पोर असावं, तशी दिसत होती. लोकांच्या चेहर्यावरून कृतार्थतेचा आनंद नुसता ओसंडून वहात होता. लोकांनी खरोखरच वर्षभराचं शॉपिंग या काही मिनिटांतच केलं असावं हे समजत होतं. वर्षभरातले येणारे सारे वाढदिवस, लग्न, anniversaries, कुणाकुणाला प्रसंगानुरूप द्यायच्या भेटी, यांच्या मोठया याद्या घेऊनच सगळे जण आलेले असतात. त्यामुळे यादीत असलेल्या सगळ्या वस्तू मिळवता आल्या, की इतक्या दिवसांचे प्लॅनिंग, धडपड, धावपळ, सारं काही कारणी लागल्यासारखं वाटणं हे साहजिकच असतं.
आता साडेसहा वाजले होते. माधवरावांचा अजूनही पत्ता नव्हता. माझी रांग हळू हळू सरकत होती. रांगेतले लोक अस्वस्थपणे, दुसर्या गावी चाललेल्या race च्या घोडयावर पैसे लावल्यासारखे, कासावीस होऊन सेलफोन्सवरून एकमेकांना काय चाललंय, ते विचारत होते. आमच्याकडे संपर्काचे काहीच साधन नसल्यामुळे, इतर आघाडयांवर काय परिस्थिती आहे हे समजायला काहीच मार्ग नव्हता. माझ्या तुकडीतला माझा सहकारी कुठे घायाळ होऊन पडला होता हे देखील मला ठाऊक नव्हते. एवढयात, “अहो हे काय? एवढया वेळात फक्त तीनच वस्तू मिळाल्या तुम्हाला ?” असा नलिनीबाईंचा खणखणीत आवाज त्या गोंधळातही मला स्पष्टपणे ऐकू आला. मी वळून बघितलं, माधवराव जत्रेत फिरणार्या लहान मुलासारखे भिरभिर्या नजरेने इकडे तिकडे बघत होते. नलिनीबाईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकून माधवरावांच्या हातातून cart खसकन हिसकावून घेऊन खरेदीची सूत्रे आपल्या हाती घेतली.
मी मनातल्या मनात अनुपमाच्या प्लॅनिंगचे कौतुक केले. आदल्या दिवशी वेगवेगळ्या स्टोअर्समधे जाऊन, कोणत्या वस्तू कोठे ठेवल्या आहेत याचा ती अभ्यास करून आली होती. तिच्याबरोबर गेल्यामुळे, परीक्षेच्या आधीच पेपर मिळाल्यासारखा, या बायकांना दुकानातल्या वस्तूंच्या मांडणीचा नकाशा, बाहेर रांगेत असतानाच समजला होता. त्यामुळे वीस मिनिटांत शॉपिंग संपवून, check out करून, दुसर्या दुकानात पुढचं शॉपिंग करायला त्या तयार होत्या. नलिनीबाई आपल्या यजमानांना चांगलं ओळखून असल्यामुळे, त्यांनी अनुपमाला आम्ही असलेल्या दुकानापाशी गाडी घेण्यास सांगितली. तिथे त्यांना उतरवून बाकीची मंडळी पुढच्या दुकानापाशी निघून गेली. नलिनीबाईंच्या अधिपत्याखाली देशमुख कुटुंब देखील खरेदी आटोपून माझ्या मागोमाग दहा मिनिटांतच बाहेर पडले.
दोन्ही गाडयांमधे विविध दुकानांच्या जागा ठळकपणे दाखवलेला, सू फॉल्स शहराचा road map होता. त्या नकाशाच्या व अनुपमाने देऊन ठेवलेल्या सूचनांच्या आधारे आम्ही पुढच्या दुकानात जाऊन आमच्या बाकीच्या ग्रूपला गाठले. पहाटेच्या खरेदीचा पहिला आवेग आता थोडा कमी झाला होता. पण अजूनही गर्दी कमी होण्याची काही चिन्हं नव्हती. लगबगीने चाललेली खरेदीची धावपळ, हवी असलेली वस्तू मिळते की नाही याच्या बद्दलची आतुरता, हवी असलेली वस्तू मिळाल्यावर होणारा विजयोन्माद आणि आपण पोहोचेपर्यंत आपल्याला हवी असलेली वस्तू संपली असली की निघणारे निराशेचे उसासे, अजूनही चालूच होते.
माधवरावांना काही कंप्युटरशी निगडीत अशा वस्तू घ्यायच्या होत्या. ते आपले वरच्या शेल्फवरच्या वस्तू न्याहाळीत उभे होते. एवढ्यात एका बाईने पुढे घुसून ते बघत असलेली वस्तू नेमकी उचलली आणि आपल्या cart मधे टाकली. “अहो ती बया घुसली ना तुमच्या पुढे ! असे नुसतेच बघत बसाल तर सगळ्या गोष्टी संपून जातील”, नलिनीबाई खेकसल्या. “अग जाउंदे; बाई आहे ती!” माधवरावांनी बचावाचा दुबळा प्रयत्न केला. “अहाहा ! काही स्त्रीदाक्षिण्य उफाळून यायला नकोय तुमचं नको त्यावेळी. हे एवढे सगळे एरंडासारखे वाढलेले गोरे लोक धावतायत इकडे तिकडे, ते काय मला जाऊन देतायत का पुढे? जे दिसतंय ते उचला आणि चला पुढे” नलिनीबाईंनी सोक्षमोक्ष लावला.
पुढच्या दोन तीन तासांत आम्ही सगळ्यांनी मिळून आणखी चार पाच मोठी स्टोअर्स पालथी घातली. ज्यांची एखाद्या दुकानातली खरेदी संपायची त्यांना इतरांची खरेदी होईपर्यंत थांबणं भाग असायचं. कुणाचा पाय कुठल्या दुकानातून निघत नसायचा तर कुणाचा जीव खरेदीच्या पुढच्या टप्प्यातल्या, न पाहिलेल्या दुकानात अडकलेला असायचा. कुणाच्या चेहर्यावर हवी असलेली वस्तू मिळाल्यामुळे, कुंभमेळ्याला अलाहाबादला जाऊन त्रिवेणी संगमात स्नान केल्यासारखा कृतार्थ भाव असायचा. तर कुणी, आपण घेतलेल्या वस्तूपेक्षा, दुकानातील न घेतलेली वस्तू तर अधिक चांगली नव्हती ना, या कल्पनेने व्याकूळ झालेला असायचा.
– डॉ. संजीव चौबळ
April 1, 2016
गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली.
June 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti