(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक मधमाशी दिवस

    मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात २० मे १७३४ रोजी एका मधमाशीपालकाच्या कुटूंबात ‘एन्टोन जान्सा’ या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाच्या जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्य मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला.

      July 27, 2023


  • आतल्या वर्तुळातून

    “साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला.” दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.

    इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले,

      December 29, 2010


  • मर्यादा पुरुषोत्तम

    राम हा पूर्णपुरुष आहे. तो एका वचनाधीन राज्यकर्त्यांचा अज्ञाधारक पुत्र आहे. ज्या कैकयीमुळे त्याला थोडंथोडकं नव्हे तर चौदा वर्ष वनात जावं लागलं अशा आईविषयी कणभरही मनात किंतू, राग न धरणारा मुलगा आहे. तो एकपत्नीव्रत घेतलेला निष्ठावंत पती आहे.

      June 23, 2022


  • इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”

    इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”

    इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती. एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी भगवती देवीचे भव्य मंदिर बांधले. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो.

      September 20, 2017


  • जागतिक छायाचित्रण दिवस

    आज दिनांक १९ ऑगस्ट. जगभरातल्या छायाचित्रं काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस. आज ‘ जागतिक छायाचित्रण दिवस ‘ आहे. आजच्या दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार , घराबाहेर पडून आपली हौस भागवून घेतात. छायाचित्रणाचा इतिहास काय आहे व छायाचित्रणाचा किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊ.

      August 19, 2020


  • “महापौर” शब्दाची जन्मकहाणी

      June 19, 2013


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शिरा ताणून बोलू नये
    "अरे मला ऐकायला येतंय, उगाच शिरा ताणून बोलू नये. डोके दुखायला लागेल. गळ्याच्या शिरा किती फुगतायत बघ." ही आईची नेहेमीचीच शिरा ताणून ओरड सुरू असते.

    शिरा ताणून बोलायची सवय वाईटच. आपण मोठ्या आवाजात बोललो म्हणजे आपण खरं बोलतोय, किंवा दुसऱ्याला ते पटतंय, असं वाटणं, हा निव्वळ भ्रम आहे.

    बोलताना मनावरचा संयम वाणीमधे दिसला पाहिजे. मनातील रागादि रिपु वाणीतून प्रकट होता नये. तावातावाने बोलल्यामुळे डोक्यातील सर्व सूक्ष्म इंद्रिये ताणाखाली येतात. अनावश्यक दाब तयार होतो. जो दाब बोलून गेल्यानंतरदेखील काम करीत राहातो. असं वारंवार झालं तर नुकसान होणारच !

    उगाच वाद ओढवू नये
    म्हणजे आ बैल मुझे मार. समोरचा स्वभावाने कसा आहे, हे आपल्याला जर नीट कळलेले असेल तर, त्याच्याशी कसे बोलावे, त्याच्याशी कसे वागावे, याचा विवेक करता यायला हवा. जेवढे शब्द जपून वापरता येतील, तेवढे जपून वापरावेत, नाहीतर अर्थाचे अनर्थ होतात. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या नावाखाली एक काव्य वाॅटसपवर प्रसारीत होत आहे, शब्द तासून बोलावा.वगैरे... खरं आहे ते !
    बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मग शांतपणे बोलावे.

    पण गरज असेल तेव्हा न बोलणे हा अवगुण देखील आहे. काहीवेळा आपल्या बोलण्यातील धार दाखवून पण द्यायला लागते. समर्थ म्हणतात,
    ठकासी पाहिजे ठक
    खटनटासी खटनट
    हुंब्यासी हुंबा
    लावूनी द्यावा.
    आपण कोणाशी वाद करायला जाऊ नये, पण वाद करायला कोणी आलाच तर शिंगावर घेण्याची तयारी पण हवी.
    आई नेहेमी सांगते. शाळेत "उगाच" भांडू नकोस. त्या वाक्याचा अर्थ आता कळतोय. जर भांडायची वेळ येईल, तेव्हा उगाच गप्प पण बसू नकोस. असंही तिला सांगायचं असतं.

    वाद घालण्याची पण एक कला असते. आयुर्वेद महाविद्यालयात पदार्थविज्ञान या विषयात, "तंत्रयुक्ती" नावाचा एक प्रकार शिकायला मिळतो. याचा नीट अभ्यास केला तर, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तींना समजावून सांगता येते. आयुर्वेद महाविद्यालयात शिकत असताना पदार्थविज्ञान हा खरंतर "ऑप्शनला" टाकलेला विषय. हे असले विषय कशाला घेतले सिलॅबसमधे य्यार ! असं म्हणून या विषयाची जागा त्याला दाखवून दिलेली असते, पण पुढे व्यवहारात रुग्णाला आपले म्हणणे समजून सांगायला, पदार्थविज्ञान हाच विषय काम करतो, हे आता लक्षात येतेय.

    काही गोष्टींचे महत्त्व कळण्यासाठी, काही काळ जाणं आवश्यक असतं. असंही आई म्हणायची, तेही खरंच आहे म्हणा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १३.०८.२०१७

      August 13, 2017


  • बंदोबस्तातलं स्वातंत्र्य..

    या देशाचा प्रत्येक माणुस, प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. सैनिक जसा देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन उभा असतो, तसे नागरिकांनी देखील डोळ्यात तेल घालुन जागे असले पाहिजे. तेव्हा कुठे बंदोबस्तातले हे स्वातंत्र्य मोकळा श्वास घेऊ शकेल… नाही का…

      September 14, 2018


  • बीडच्या सीताफळाला GI मानांकन

    मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बीडच्या सीताफळाला GI मानांकन

    बीड जिल्ह्यातला किल्लेधारुर परिसर सीताफळाचं आगार म्हणून ओळखला जातो. इथल्या बालेघाटात उगवणारी सीताफळंही अतिशय गोड आणि मधूर. म्हणूनच इथल्या बालानगर जातीच्या सीताफळाला केंद्रातर्फे भौगोलिक निर्देशन म्हणजेच जीआय मानांकन मिळालं आहे. यामुळे या सीताफळांचं भविष्य आता बदलण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

    कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत येणारं फळपीक..बालेघाटाच्या डोंगररांगा या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. यामुळे इथल्या मातीत खनिजांची भरमार आहे. याचाच परिणाम इथल्या सीताफळावरही झाला आहे. या सीताफळांना वेगळी चव आणि गोडवा आहे आणि याच गोष्टीमुळं इथल्या बालानगरी जातीच्या सीताफळांना जीआय मानांकन मिळालं आहे.

    अत्यंत कमी उत्पादन खर्चात सिताफळाची लागवड..सीताफळ अतिशय कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीतही चांगलं येणारं फळपीक आहे. यावर कोणती कीड वा रोग येत नाही. तसंच याला खतही द्यावं लागत नाही. यामुळं उत्पादन खर्च अतिशय कमी असतं. मात्र, असं जरी असलं तरी याला बाजारात चांगला भाव मिळत नाही. डोंगराळ भागातून पायपीट करत शेतकरी ही सीताफळ बाजारात घेऊन येतो आणि याला व्यापारी दर देतात किलोमागं अवघे 3 ते 4 रुपये. तसंच ही फळ तीन चार दिवसांत विकली गेली नाही तर खराब होतात. यामुळं शेतकरी या फळाची लागवड करण्यास उत्सुक नसतो. मात्र, जीळाला बाजारपेठेत चांगला दर मिळेल आणि शेतकरी पुन्हा या फळाच्या लागवडीकडं वळेल, अशी तज्ज्ञांना आशा आहे.

    जीआय नामांकन मिळाल्यानंतर परदेशातील निर्यात वाढणार..कोणत्याही शेतमालास जेव्हा जीआय मानांकन मिळतं, सीताफळाला परदेशात मोठी मागणी..सीताफळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. आईस्क्रीमपासून ते जामपर्यंत अनेक गोष्टीत सीताफळाचा वापर होतो. मात्र, हे फळ लवकर खराब होत असल्यानं याला दर मिळत नाही. म्हणूनच बीडसाऱख्या जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं राहणं गरजेचं आहे. तरच इथल्या शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल.

    सीताफळ हे बालाघाटच्या डोंगररांगाना मिळालेलं एक वरदान आहे. कोणत्याही कीड नाशक आणि रासायनिक खतांचा वापर न केल्यानं हे फळ विषमुक्त आणि अतिशय मधूर आहे. यामुळं आता शासनानं याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं करणं गरजेचं आहे. ज्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या सीताफळाला किंमत तर मिळेलच. शिवाय यातून या दुष्काळी भागातील लोकांना रोजगारही मिळेल.

      December 7, 2016


  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 18

    दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची... सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?
    ..... त्यांचा रात्रीस खेळ चाले...

    काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता "अणु" कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा परमाणुवाद त्यावर सिद्ध झालाय. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यावर संशोधन सुरू आहे. गाॅडस पार्टीकल ही त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना होती. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे रात्रीस खेळ चाले.

    अदृश्य शक्तींचे प्राबल्य सूर्यास्तानंतर वाढते. सूर्यास्त झाल्यावरच वनस्पती आपले श्वसन बदलवतात.
    सूर्यास्तानंतरच पक्षी आपले खानपान थांबवतात.
    सर्व प्रकारची शुभकार्ये सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेली आहेत. ही अंधश्रद्धा नाही. ही धारणा आहे. म्हणून लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत, होम, या सारख्या कर्मकांडापासून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या अग्नियानाच्या प्रक्षेपणाची वेळ देखील सूर्यावर अवलंबून आहे. याला मुहुर्त असा शब्द आहे. पण या शब्दाची सुद्धा काहीजणांना अॅलर्जी आहे. भारतीय परंपरांना छेद देणारी विधान करणं म्हणजे बुद्धीवाद असे काहीजणांना वाटते, म्हणून फक्त सांगितले. असो.

    तर रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर, तापमानात घट झाल्यावर, दमट वातावरणात, जंतुंचे प्राबल्य जास्ती असते. जे आपल्या स्थूल डोळ्यांना दिसू शकत नाहीत, असे अतिसूक्ष्म जंतु सूर्यास्तानंतर वाढतात. आपण प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शी यंत्र घेऊन जंतुंना शोधू शकत तर नाही ना. पण त्यांच्या उत्पत्तीच्या विशिष्ट जागा असतात. जंतुंची वाढ होण्यासाठी विशिष्ट तापमान लागते, विशिष्ट जंतुंना विशिष्ट जागा आणि विशिष्ट हवामानच लागते. हे सर्व वैज्ञानिक सिद्धांत भारतीय संस्कृतीला मान्यच आहेत, किंबहुना भारत हीच या विचारांची जन्मभूमी आहे. म्हणून तर आपल्याकडे शौच अशौच सिद्धांत सांगितला गेलाय.

    घरामधल्या कोणत्याही खोलीपेक्षा संडासमधे अनेक प्रकारचे जंतु असतात, वाढतात, हे ओळखूनच मलविसर्जन घरापासून लांब, बाहेर करावे. मल विसर्जन करताना उकीडवे बसावे म्हणजे जंतुसंसर्ग कमी होतो. मलविसर्जन झाल्यानंतर केवळ मलद्वार आणि डावा हातच नाहीत तर दोन्ही पाय, चेहेरा, डोळे सुद्धा पाण्याने धुवावेत, त्यासाठीचे पाणी अगोदरच काढून तयार ठेवावे, ही शुद्धीकरणाची, अंगावरील जंतुसंसर्ग घालवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती काय ? पण आज छोट्या मोठ्या शहरात अॅडजेस्ट म्हणून संडास घरातच बांधले जातात, ( पूर्वी घरात खायचे आणि मागे परसाकडे जायचे, आता बाहेर खायचे आणि घरामध्ये येऊन मलविसर्जन करायचे. सुधारणा आणि विकास.)
    मलविसर्जन करायला पुनः त्या भांड्यावरच फतकल मारून बसतात, कमोडवर सर्वात जास्त जंतु असतात, हे विज्ञानाने वारंवार सांगून देखील काटकोनात बसून मलविसर्जन. नंतर पाणी सुद्धा वापरत नाहीत. (काही ठिकाणी तर हात धुवायला सुद्धा !!) काहीजणांनी त्यातूनही पळवाट शोधत, आम्ही स्वच्छता करायला डावा हात सुद्धा घाण करत नाही, म्हणून भांड्यालाच जेट स्प्रे बसवलेले असतात.
    संडासमधेच ब्रश देखील करतात, तिथेच वर्तमानपत्र, पुस्तक देखील वाचतात.... तिथला सगळा जंतुसंसर्ग परत सर्व घरात आणतोय ? याकडे या बुद्धीवादी वैज्ञानिक लोकांचे लक्ष जात नाही काय ?

    पण कसं आहे, ते जे जे करतात, त्यावर काहीही विचार न करता, अनुकरण केले तरी चालते. असं लिहिलं तरी आम्ही (संस्कृतीरक्षक) पुराणमतवादी ठरतो. आहोतच. त्याचा राग न येता, उलट ते भूषणच वाटते.

    या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
    असो.

    कोणतीही शुभकार्ये करताना पंचांगानुसार अग्निचे स्थान बघून केली जातात. तिथी, नक्षत्र, दिन, रास हे सर्व सूर्याच्या उदयानुसार बदलते. एवढे अनन्य साधारण महत्त्व सूर्याला असताना, केवळ वेळ होत नाही, सवडच नाही असल्या फुसक्या कारणांसाठी.....
    ...........जाणिजे यज्ञकर्म....... एवढे महत्त्वाचे कर्मकांड सूर्यास्त झाल्यावर करायचे ?
    आता याला काय म्हणावे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.03.2017

      March 15, 2017