वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा.
May 11, 2023
अँडी रॉबर्ट्सचे एका धावेतील चार बळी व विव रिचर्ड्सच्या विस्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजने मिळविलेला अविस्मरणीय कसोटी-विजय.
February 28, 2011
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.
January 22, 2020
बातमी : डच गव्हर्नमेंट पासेस् अ लॉ फॉर असिस्टेड डेथ् फॉर दि हेल्दी
संदर्भ – हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी.व्ही. चॅनलवरील बातमी.
आहे ; जसें की, माझ्या घरासमोर रहाणार्या जैन गृहस्थाचा काका, माझ्या एका मित्राचे सासरे, माझ्या
पत्नीचे ज्येष्ठ चुलतभाऊ.
( मी या लोकांना ‘तथाकथित सामान्य’ असें म्हणालो, कारण स्वहस्तें विचारपूर्वक मरण स्वीकारणारी व्यक्ती ‘साधारण’ असूंच शकत नाहीं ). Kudos to them !
त्यामुळे, कांहीं महिन्यांनंतर जेव्हां तिचा रोग अधिक बळावला, शक्ती कमी कमी होऊं लागली, थोडेंफार परावलंबित्व येऊं लागलें , तेव्हां तिनें शांतपणें डॉक्टरांकडे पृच्छा केली की, सहजपणें क्षणार्धात पेशंटला वेदनारहित मरण येईल असा कांहीं उपाय डॉक्टरांकडे असतो कां ? आणि, हें संभाषण तिनें अतिशय संतुलितपणें आणि विचारपूर्वक केलें. तिचा प्रश्न ऐकून डॉक्टर किंकर्तव्यमूढ झाले, काय बोलावें तें क्षणभर त्यांना सुचेना.
मला जरी भावनिक पातळीवर तिच्या प्रश्नानें बेचैन केलें , तरी बौद्धिक पातळीवर मला आश्चर्य वाटलें नाहीं, कारण तिचें गेल्या अनेक वर्षांपासूनचें याबद्दलचें मत मला माहीत होतें. ( आणि, इच्छामरणाच्या बाबतीत माझेंही मत स्नेहलतासारखेंच आहे, त्यामुळे, तिचे विचार मी समजून घेऊं शकलो).
अर्थातच, डॉक्टर या विषयात कांहींही करूं शकत नव्हते, ते केवळ रोग contain करण्याचा (विफल ) प्रयत्न करूं शकत होते, आणि तो प्रयत्न त्यांनी अखेरपर्यंत केलाही.
स्नेहलताचें भाग्य थोर की तिला खितपत न पडतां, त्रास न होतां, अल्पावधीत मरण आलें. ती bed-ridden झाली नाहीं, धरून-कां-होईना पण चालूं शकत होती, शेवटपर्यंत बोलत होती, आणि अखेरच्या दिवशीही तिची विनोदबुद्धी शाबूत होती.
स्नेहलताला नैसर्गिकरीत्या ‘इच्छामरण’ प्राप्त झाले कां, मला माहीत नाहीं. पण, ज्या रात्रीं ती गेली, त्या दिवशी सकाळीच तिनें मला, ‘मी चालले आहे’ असें सांगितलें होतें .
( त्या वेळी , तिच्या विधानाची सीरियसनेस मला कळली नाहीं, याबद्दल मला आतां कायमच खंत वाटते ; कारण , नाहीतर मी नक्कीच तिच्या अखेरच्या दिवशी अधिक वेळ तिच्या सोबत घालवला असता !)
मात्र, स्नेहलतामुळे मला वारंवार, इच्छामरणाच्या विषयाची आठवण येत असते, हें खरें.
हॉलंडबद्दलची बातमी वाचून मला, या प्रगतीबद्दल आनंद तर वाटलाच ; पण टर्मिनल-डिझीझ नसतांनाही मरणेच्छा करणार्यांना आतां इच्छामरणासाठी नुसती संमतीच नाहीं, तर, मदतही प्राप्त होऊं शकेल, असा कायदा करणार्या सरकारबद्दल ( म्हणजेच, जनतेनें निवडून दिलेल्या रिप्रेझेंटेटिव्हज् बद्दल ) मला अतीव आदर वाटतो आहे. त्या सरकारच्या या कृतीवरून आपल्याला डच जनतेची सांस्कृतिक maturity, विचारांचा पुढारलेपणा आणि बुद्धिवादी वृत्ती दिसून येते.
+ + +
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph- Res- (022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com,
www.snehalatanaik.com.
October 27, 2016
भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस
January 28, 2020
एका जुन्या गाजलेल्या बालगीतातातून सध्याच्या WhatsApp संस्कृतीवर केलेले मजेदार भाष्य
July 9, 2017
ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला.
March 12, 2022
स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.
October 18, 2018
घटस्थापना.. अर्थात घरोघरी देव बसतात. नऊ दिवस घरोघरी देवीची उपासना केली जाते.सप्तशतीचे पाठ पठण केले जातात. देवीची विविध स्तोत्रे, आरत्या म्हंटल्या जातात.याचवेळी नऊ दिवस विविध मंडळाच्या दुर्गादेवी पण बसतात.
November 15, 2023
एतीहाद एयर वेज चे मुंबई अबू धाबी आणि अबू धाबी ते पॅरिस असे फ्लाईट होते. पुढे पॅरिस हून मार्सेली नावाच्या छोट्याशा विमानतळावर एयर फ्रान्स चे अर्ध्या तासाचे फ्लाईट होते. मार्सेली एअरपोर्ट वरून अर्धा पाऊण तास ड्राईव्ह केल्यावर फ्रान्सच्या लवेरा या पोर्ट मध्ये जहाजावर जॉईन केले. जॉईन केल्या केल्या जहाज ब्लॅक सी च्या दिशेने निघाले
November 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti