वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो.
October 28, 2023
लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं
तॆजः परं बहुलकुङ्कुमपङ्कशॊणम् ।
भास्वत्किरीटममृतांशुकलावतंसं
मध्यॆ त्रिकॊणनिलयं परमामृतार्द्रम् ॥ १४ ॥
विश्व प्रलयाच्या वेळी भगवान श्री महाकालांना सोबत करीत असणाऱ्या चैतन्यशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केल्यावर आचार्य श्री येथे या साहचर्याच्या सातत्याची कामना करीत आहेत.
आई जगदंबेचे साह्य आहे म्हणूनच भगवान शंकर काही कार्य करू शकतात. ती शक्ती दूर झाली तर शिव हे शव आहेत. अमंगल शवाला परममंगल शिव करणारी ही शक्ती. तिचे स्वरूप वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं- आई अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील तुझे हे अर्धे शरीर, भगवान शंकरांशी सदैव लग्न म्हणजे जुळलेले असो. या एकत्रीकरणाचा कधीही वियोग न होवो.
कसे आहे आईचे हे स्वरूप? तर ते म्हणतात,
तॆजः परं- परम तेजस्वी. बहुलकुङ्कुमपङ्कश- प्रचुर प्रमाणात अर्पण केलेल्या कुंकवाने,
शॊणम्-
लालबुंद दिसणारे. शोण म्हणजे रक्त. पण त्याचा प्राधान्याने विचार आहे गर्भाशयातील रक्ताशी. गर्भाशयाचा संबंध आहे नवनिर्मितीशी. भगवान महाकाल विनाशाची दैवता आहेत. त्यांच्या सोबत असणारी जगदंबा नवनिर्मितीची शक्ती. यातून ते अर्धनारी नटेश्वर स्वरूप परिपूर्ण आहे. केवळ भकास विनाश नव्हे तर नवनिर्मितीसाठी केलेला साफ-सफाई स्वरूप विनाश.
भास्वत्किरीट- तेजस्वी मुकुट धारण केलेले.
अमृतांशुकलावतंसं- अमृत अर्थात शांतता दायक. अंशू म्हणजे किरण. कला म्हणजे भिन्नभिन्न अवस्था. अर्थात चंद्र. त्याला अवतंस म्हणजे मस्तकावर धारण केलेले.
मध्यॆ त्रिकॊणनिलयं- श्री यंत्राच्या त्रिकोणात निवास करणारी. परमामृतार्द्रम्- श्रेष्ठ अशा अमृतमय करूणेने आर्द्र असणारे, हे तुझे अर्धे अंग कायम भगवंताशी जुळलेले असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 25, 2020
‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सध्या नित्यनेमाने ठिकठिकाणी आगी लागत आहेत. त्यांमध्ये निवासी इमारतींपासून कारखान्यांपर्यंत सर्व प्रकारच्या इमारतींचा समावेश आहे. आगीमुळे प्रचंड वित्तहानी तर होतेच आहे; पण जीवितहानीही सुरू आहे. आगीनंतर बरीच चर्चा होते. सर्व प्रकारची माध्यमे विषय उचलून धरतात; पण हे सर्व तात्पुरते असते. चौकशी समिती नेमली जाते, शिफारशी केल्या जातात.
February 4, 2024
अगदीच लहान मुलांना पुस्तकांच्यापलीकडचं जग प्रत्यक्ष दाखवायला हवं पुस्तकांच्या पानांपेक्षा झाडावरच्या पानांचे निरीक्षण, फुलांचे निरीक्षण फुलांचा सुगंध याच्या जाणिवेत त्यांना रमू द्या. भवताल ओळखीचे झालं की शिकणं सुलभ होतं. पुस्तकांतल्या रूक्ष शब्दांचा अर्थ निसर्गात शोधता यायला हवा.
June 24, 2026
सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
January 15, 2024
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले.
August 18, 2024
माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.
August 24, 2010
या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. उत्तर भारतात या महिन्यांत झुलन यात्रा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव वगैरे प्रमुख उत्सव मानतात. तेथे पौर्णिमेचे दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात - हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात.
श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. हा महिना निसर्गदृष्ट्या सुद्धा आल्हाददायक असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. अनेक फुलांना बहर आलेला असतो व सुवासाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेले असते. श्रावणमासी हर्ष मानसी... ही कविता सर्वांना ' माहीतच आहे. हे सर्व पाहायला, अनुभवायला घेण्यास शहरात न राहता खेडेगावांत, रानात जाणे आवश्यक आहे. हल्ली हे शहरातील लोकांना पहाण्यास मिळत नसल्याने वर्षा सहलींचे आयोजन केले जाते.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
मोदींनी हजार व पाचशे च्या नोटा बंद करून काळा पैसा संपवण्याचा जो विडा उचलला आहे, त्याला काही बँकेतील अवलादी अधिकारीच हरताळ फासत आहेत हे आता उघड झाले आहे. येणाऱ्या काही दिवसात बरेच बँक कर्मचारी तुरुंगात जाऊन, कोर्टाच्या वाऱ्या करताना दिसतील, तसेच आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्यावर ही पाणी सोडावे लागून, अब्रू मात्र वेशीवर टांगलेली दिसेल.
सरकार कोणतीही चांगली योजना आणते, त्यात भ्रष्ट अधिकारीच योजनेचा बट्टयाबोळ वाजवण्यास पुढाकार घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, पण या वेळेस मात्र, घर फिरले कि घराचे वसे हि फिरतात, अशीच काहीशी गत या अधिकाऱ्यांची झाली आहे. चोरांना मदत करताना, आपले उखळ कसे पांढरे करून घेता येईल, हे पाहताना, आयुष्याची राखरांगोळी होऊ शकते याचा थोडाही विचार या नतद्रष्ट लोकांच्या मनाला शिवला नाही, आता भोगा कृत्याची फळे.
या आधी सुद्धा, असे बरेच बँक अधिकारी भ्रष्टाचाराच्या गंगेत अंघोळ करून बाहेर आले आहेत. NP अर्थात नॉन परफॉर्मिंग संपत्तीला कुवत नसताना भरमसाठ कर्ज देणे, आणि हे सिक युनिट बंद पडते, किव्वा पाडले जाते, नंतर हप्ते थांबतात, आणि दिलेल्या कर्जाची वसुली होणे अशक्य होते, अश्या अनेक घटना गेल्या काही वर्षात उदयास आल्या आहेत. विजय मल्ल्या हा कानफाट्या झाला, परंतू असे अनेक प्रतिमल्ल्या आजही समाजात ताठ मानेने फिरत आहेत, फक्त आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही.
आज अशातल्याच काही महाभागानी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला, परंतू तो अंगलट आला आहे.
-- विजय लिमये
December 28, 2016
जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती |
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71||
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही |
महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72||
देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न राहे |
सदाशीव चिंतीतसे देवदेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||73||
बहूतांपरी संकटे साधनांची | व्रते दान उद्यापने ती धनाची |
दिनाचा दयाळू मनी आठवावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||74||
समस्तामध्ये सार साचार आहे | कळेना तरी सर्व शोधूनि पाहे |
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||75||
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही | नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही |
म्हणे दास विश्वास नामीं धरावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||76||
करी काम निष्काम या राघवाचे | करी रुप स्वरुप सर्वा जिवाचे |
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता | हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ||77||
अहो ज्या नरा रामविश्वास नाही | ताया पामरा बाधिजे सर्व कांही |
महाराज तो स्वामि कैवल्यदाता | वृथा वाहणे देहसंसारचिंता ||78||
मना पावना भावना राघवाची | धरी अंतरी सोडि चिंता भवाची |
भवाची जिवा मानवा भूलि ठेली | नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ||79||
धरा श्रीवरा त्या हरा अम्तराते | तरा दुस्तरा त्या परा सागराते |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते | करा नीकरा त्या खरा मत्सराते ||80||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 4, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti