वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदानुसार वयाचे तीन गट पडतात. बालवय, तारुण्य आणि वार्धक्य. बाल वयात कफ, तरुण वयात पित्त आणि वार्धक्यात वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे उतार वयात वातरोग होण्याची शक्यता जास्त असते.
July 2, 2022
नशीबावर अवलंबून अनेक जण आयुष्य व्यतीत करतात. माझ्या नशिबात नाही, मी करूच शकत नाही, मी होऊच शकत नाही. पण मनानं ठरवलं आणि अंमलबजावणी केली की यश आपलंच असतं.मनानं ठरवणारे अनेक असतात,उद्या पासून करु म्हणणारे तिथेच राहतात.
June 18, 2026
पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात.
पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र वापरत असत त्यालाच पंचपात्र ही संज्ञा आहे. पंच याचा अर्थ मोठे असून मोठ्या तोंडाचे तांब्याचे वा पितळ्याचे भांडे म्हणजे पंचपात्र होय. हे उभट गोलाकार असून त्याचे कडेला छोटे काठ असतात.
March 18, 2016
आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. आपल्याला अडचणीच्या असणाऱ्या गोष्टींवर बंदीची मागणी करायची आणि आपणच मिटक्या मारत बघत असलेल्या वा करत असलेल्या, परंतू समाजस्वास्थ बिघडवण्याची ताकद असलेल्या गोष्टींवर सोयीनुसार गप्प राहायचं, ही आपली दुटप्पी मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली, इतकंच..!!
December 17, 2017
आयुष्याच्या पूर्वार्धात ज्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, शिस्त बाळगली त्यांच्या जीवनात यश पायघड्या घालतं. दुःखाचे, संघर्षाचे चटके बसलेल्यांनीही यशश्री खेचून आणलेली आहे. दुःख हा या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकालाच दुःखाला, संघर्षाला सामोरं जावंच लागतं. संघर्षाला सामोरे जाणारेच स्वतः स्वतःतून उमलतात. संघर्षाला हार मानणारे नैराश्याला व आत्महत्येला जवळ करतात.
July 12, 2026
मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते.
October 8, 2022
जगामध्ये जसजशी शहरं झपाट्याने वाढत गेली, तसतशी जलद वाहतुकीची गरज वाढू लागली, लोकल-रेल्वेयंत्रणा अपुरी पडू लागली. त्यातच जागेची कमतरताही भासू लागल्याने तीन नवीन यंत्रणा अस्तित्वात आल्या:
१. मेट्रो
२. मोनोरेल
३. लाईट रेल
युरोपमध्ये जमिनीखालून रेल्वे (अंडरग्राऊंड ट्यूब-रेल्वे) फार लवकर उपयोगात आणली गेली होती. लंडन मधील पॅडिंग्टन ते फटिंग्टन अशी ४ मैल लांबीची ट्यूब-रेल इ.स. १८६३ मध्ये बांधली गेली. त्या काळात रोज २६,००० प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असत. ट्यूब-रेल्वेची प्रगती इतकी झपाट्याने होत गेली, की गेल्या १५० वर्षांत लंडन ट्यूब-रेल्वे त्या शहराचा अविभाज्य घटक बनली आहे. जमिनीच्या पोटात शिरण्याकरता उत्तम सरकते जिने, स्टेशनं, हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था, ह्या सर्व गोष्टींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं गेलं. आज लंडन परिसरात २७५ स्टेशन्स व ४०८ कि.मी. लांबीचे विविध मार्ग (जमिनीखाली १ ते ३ मार्ग) असून, रोज जवळजवळ ३० लाख लोक प्रवास करतात. २०१३ साली लंडन ट्यूब-रेल्वेला १५० वर्षं झाली. त्यानिमित्तानं एक शानदार सोहळा आयोजित केला गेला आणि क्वीन एलिझाबेथ यांनी ट्यूब रेल्वेनं प्रवास केला.
इंग्लंडनंतर युरोपियन देशांमध्ये ट्यूब-रेल्वेची बांधणी भराभर होती गेली. रशियामधली 'मॉस्को ट्यूब - रेल्वे' ही जगातील सर्वांत उत्तम व स्वस्त म्हणून प्रसिद्ध आहे. तेथील प्रत्येक स्टेशन हा कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
पुढे अमेरिका, चीन, जपान सर्वांनीच ट्यूब - रेल्वे अमलात आणली. आज जगातील सर्व मोठ्या शहरांत ट्यूब रेल्वे हे दळणवळणाचं महत्त्वाचं साधन आहे.
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वतःचा फायदा लक्षात घेऊन भारतात फार लवकर रेल्वे सुरू केली, परंतु ट्यूब - रेल्वे बांधण्यात त्यांना कोणताही फायदा नव्हता, त्यामुळे भारतातील ट्यूब-रेल्वे बांधणीला फार उशीर लागला.
१९४९ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बिधनचंद्र रॉय यांनी कलकत्ता शहराकरिता ट्यूब - रेल्वे बांधणीच्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचा अहवाल तयार करण्याची सूचना केली, परंतु ते सर्व कागदावरच राहिलं. इ.स. १९७२ साली इंदिरा गांधींनी मेट्रो कामकाजाचा मुहूर्त केला. १९८४ साली भारतातील पहिली मेट्रो कलकत्ता येथे सुरू झाली. एकंदर, काम धीम्या गतीने चालत हळूहळू कलकत्त्यातील सार्वजनिक वाहतुकीचा ती एक मुख्य घटक बनली आहे. २०१३ सालापर्यंत या मेट्रो रेलचा मार्ग १२० कि.मी. लांबीचा होता. या मेट्रोच्या डब्यांची रचना आधुनिक आहे आणि या मेट्रो रेलवर ५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत तिकिटाचे दर लावलेले आहेत.
ज्या शहरांची लोकसंख्या २० लाखांहून जास्त असेल तेथे वरील तीन पद्धतीचे रेल्वेमार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेबोर्डाने इ.स. १९९० मध्ये घेतला. दिल्ली विस्तारित प्रदेशात ३ टप्प्यांतून रेल्वेबांधणी सुरू झाली. १९९८ सालापर्यंत १४४ अब्ज कोटी रुपये खर्च झाले. २०१२ पासून हा खर्च १ मीटर बांधणीसाठी २ अब्ज कोटी रुपये इतका पडत आहे. आतापर्यंत १९२ कि.मीटर रेल्वेमार्गावर २०० गाड्या धावतात. त्यांच्या २५०० फेऱ्या एका दिवसात होत असून, दर २ ते १० मिनिटांच्या अंतराने गाड्या धावत असतात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी दिल्ली रेल्वे स्टेशन धावणारी 'दिल्ली एअरपोर्ट एक्सप्रेस' ही गाडी २० मिनिटांच्या अंतराने जा-ये करत असते. ही गाडी सर्व प्रकारे अत्याधुनिक असून, विमान तळावर प्रवाशांचं सामान चेक-इन करण्याची स्टेशनवरच सोय असल्याने विमान प्रवाशांचा बराच वेळ वाचतो. गाडीचा वेगही सुसाट असून पस्तीस मिनिटांत हा प्रवास पूर्ण होतो. मोटारीच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅम टाळणाऱ्यांसाठी ही उत्तम सोय आहे. पहिल्या दिवसापासून 'दिल्ली ट्यूब --रेल्वे' अतिशय फायद्यात असून, १९ ऑगस्ट २०१३ रोजी २६ लाख लोकांनी एकाच दिवशी या ट्यूब-रेल्वेने प्रवास केला होता. मुंबईत मेट्रोचा मार्ग वर्सोवा ते घाटकोपर असा नुकताच सुरू झाला आहे.
भारतातील मेट्रो पूर्णपणे जमिनीखालून जात नसून, त्या बऱ्याच ठिकाणी शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवरून जातात. त्यांना वळणे अतिशय तीव्र असल्याने वेगमर्यादा ताशी ३० ते ४० कि.मी. इतकीच ठेवता आली आहे. याउलट, जगातील बहुतेक मेट्रो अतिशय वेगात ताशी २०० ते ३०० कि.मी. अंतर कापतात. दिल्ली ते गुरगाव ही ५ कि.मी. अंतराची मेट्रो खाजगी मालकीची असून, असा हक्क असलेली ही भारतातील पहिलीच मेट्रो-रेल्वे आहे.
बंगलोर शहरामध्ये NAMA Metro ही २०११ सालापासून सुरू झाली आहे. चेन्नईकरता मास रॅपीड ट्रांझिट सिस्टीम २००२ पासून चालू झाली आहे.
दिल्ली मेट्रो ऑथॉरिटी अॅक्ट २००२ प्रमाणे भारतातील २० शहरांकरता १० वर्षांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी २००० अब्ज कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पैशांचं हे महाधनुष्य कसं पेललं जाणार आहे हे काळच ठरवेल.
-डॉ. अविनाश वैद्य
November 16, 2022
एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….
September 3, 2016

छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.
छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.
सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.
माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.
शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती "जपा" आणि "टिकवा". महाराष्ट्र धर्म घडवा...
-- श्री. राहुल अविनाश कळंके
वैजापूर, जि. संभाजीनगर
November 7, 2022
केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही.
February 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti