वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते. क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात. समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही.
April 10, 2023
आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी बारीक होत चाललीय. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्यायत , इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुढगे टेकून शरण येत चाललो आहोत.
December 23, 2021
एके काळची काश्मिरची राजधानी .
श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !
May 4, 2023
मायक्रोस्कोपचा विषय १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात उद्भवला असे मानले जाते. त्याच वेळी जेव्हा शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी भौतिकशास्त्रातील लेन्सचा शोध लावला. लेन्सच्या शोधामुळे, त्यांच्या मूळ आकारापेक्षा मोठ्या वस्तू पाहणे शक्य झाले. यामुळे पाण्यात आढळणाऱ्या लहान आणि इतर सूक्ष्म प्राण्यांच्या क्रियाकलापांचे व्हिज्युअलायझेशन सुलभ झाले आणि शास्त्रज्ञांना त्यांच्याबद्दल नवीन तथ्ये कळली.
July 27, 2022
तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे हि मराठी मधील एक प्रचलित म्हण आहे.अशीच काहीशी गत आपण आपल्या आरोग्याची करून घेतली आहे ती देखील तुपा बद्दल आपल्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे.तुप खाणे आरोग्यास चांगले नाही,तुपा हृदयाचा आरोग्यास हानीकारक आहे,तुप खाल्ल्याने कोलेस्टेराॅल वाढते इ.त्यामुळे बरेच लोक वनस्पती तुप अर्थात डाल्डाचा सर्रास वापर आपल्या आहारात करतात.पण डाल्डा म्हणजे तेलावर प्रक्रिया करून केलेला पदार्थ तो आपल्या हृदयाच्याच नव्हे तर संपुर्ण शरीराच्याच आरोग्यास किती हानीकारक आहे ह्याची कल्पनाचा केलेली बरी.
आणी हो कोणत्याही वस्तूचा अतिरेकी वापर हा आपल्या शरीराला बाधणारच मग त्याला फक्त तूपच कसे अपवाद असू शकते.
तुप हा प्राणीज द्रव्यातील सर्वोत्तम स्नेह आहे.कारण दुधापासून तूप बनविताना त्यावर अनेक संस्कार झालेले असतात.जसे दुधतापवून त्यापासून काढलेल्या सायीला विरजण लावून त्यापासून दही बनविले जाते,ह्या दह्याचे ताक करतात व ताक घुसळून त्यापासून लोणी काढतात,व लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते.अर्थात सुरूवातीला व शेवटअग्निसंस्कार,किण्व प्रक्रिया,व मंथनसंस्कार असे अनेक संस्कार ह्या तुपावर झालेले असतात.
हे साजुक तुप सामान्य तापमानात देखील मऊ रवाळच रहाते व गरम हवामानात ते पुर्ण वितळते.पण जर तुम्ही डाल्डा पाहिलात तर तो कोणत्याही तापमानात गोठलेला व घट्टच असतो.मग असा हा कायमच गोठलेल्या स्वरूपात असणारा डाल्डा तुमच्या शरीरात गेल्यावर हृदयाच्याही धमन्यांमध्ये जाऊन न गोठल्यास त्यात नवल ते काय?
तुप हे आपल्या आरोग्यास खरोखरच उपकारक आहे.ह्याचा आहारात नियमीत वापर केल्याने शरीर सुदृढ रहाते,बुध्दी तल्लख होते,रोग प्रतिकार शक्ती वाढते,व वार्धक्याकडे होणारी शरीराची वाटचाल मंदावते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 21, 2017
ब) म्हशीचे दुध:
१)भस्मक रोगात किंवा जेव्हा अतिभूक लागते व काही खायला न मिखाल्याच त्रास होतो तेव्हा नियमीत आहार मध्ये म्हशीचे दुध,तुप,लोणी हे पदार्थ असावेत.
२)रात्री शांत झोप लागण्याकरिता म्हशीच्या १ ग्लास दुधात १/४ चमचा जायफळ घालून उकळावे व खडीसाखर घालून हे दुध प्यावे.
३)ज्या पुरूषाचे पुरुष बीज प्रमाण कमी असते त्यांनी आहारात म्हशीचे दुध,तूप व लोणी वापरावे.
म्हशीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्यास अती झोप येते व स्थूलपणा येऊ शकतो.
क) बकरीचे दुध:
१)टिबी,खोकला,छाती व बरगड्या ह्यात वेदना होणे ह्यात बकरीचे दुध पिणे उत्तम.
२)वारंवार होणाऱ्या जुलाबात बकरीचे दुध फायदेशीर ठरते.
३)डोळ्यांचा थकवा,डोळे दुखणे,ह्या तक्रारीमध्ये बकरीच्या दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
बकरीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्याने संडासला घट्ट होऊ शकते.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 9, 2017
खरं तर दगडातून एखाद्या विशिष्ट देवतेची मूर्ति बनवावयाची असेल तर दगडाला छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने भरपूर घाव सोसावे लागतातच. बनवणाऱ्या मुर्तीकाराला,तो कितीही मोठा कलाकार असू देत,पण आपण देवतेची मूर्ती बनवत आहोत हे माहीत असूनही तो त्या दगडावर घाव घालतोच ना?
October 7, 2018
महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !!
November 11, 2018
डेविड गॉवर आणि जॉन मॉरिसला महागात पडली मैदानावरून केलेली हवाई सफर…
January 21, 2016
ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’
July 12, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti