वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 15, 2018
.
May 4, 2026
समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.
आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
June 10, 2017
यदा दारुणाभाषणा भीषणा मे
भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖
जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,
यदा - ज्यावेळी
दारुणाभाषणा - अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
भीषणा - अत्यंत भयानक असणारे,
कृतांतस्य दूताः - यमराजांचे दूत,
मे- माझ्या,
भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
तदा- यावेळी
मन्मनस्- माझे मानस,
त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
नमस्तेऽस्तु शंभो - हे शंकरा! आपणास वंदन असो.
असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 30, 2020
इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा…
January 7, 2021
शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करण्याबद्दल नाहीये .. खरं पाहता ते माणसाची जाणीव आणि आकलनशक्ती विकसित करण्याबद्दल आहे ..!!
August 20, 2019
शिवाजी मंदिर, मुंबई येथे पं. राम मराठे आणि डॉ. वसंतराव देशपांडे या दोन बुजुर्ग आणि घरंदाज गायक नटांच्या अदाकारीने गाजलेल्या आणि धीर धरी धीर धरी, धनसंपदा न लागे मला, गुलजार नार ही… अशा नाट्यपदांनी नटलेल्या ‘मेघमल्हार’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
August 13, 2021
जेव्हा नाकातोंडात पाणी जाऊ लागते तेव्हा माकडीण आपल्याच पिलाला पायाखाली घेते. डॉ. सिंग वेगळे काय करीत आहेत? त्यांचे सरकार आता अधिक काळ टिकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी देशाच्या हिताचाच बळी देण्याचा निर्णय घेतला आहे. या देशात सरकार कोणत्या पक्षाचे असावे, पंतप्रधान कोणत्या पक्षाचा असावा हे जरी या देशातील लोक मतदानाच्या माध्यमातून ठरवित असले तरी या देशाची आर्थिक नीती काय असावी, हे मात्र अमेरिका ठरवित असते. हे दुर्दैवी सत्य अजून एकदा अधोरेखित होत आहे.
September 26, 2012
दरवर्षी प्रमाणे आज म. द. वारे सरांना भेटायला मी त्यांच्या सहकार नगरमधील ‘स्नेहल’ बंगल्यावर गेलो. पहातो तो काय बंगल्याच्या फाटकाला कुलूप. शेजारची बेल वाजविल्यावर एकाने फाटक उघडले. वरती सरांच्या खोलीत जाऊन बसलो. दहा मिनिटांनी सर आले.
वर्षातून या दिवशीच मी सरांना भेटत असल्यामुळे, मधल्या कालावधीत न भेटल्याची मला खंत वाटत होती.
December 27, 2022
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.
September 7, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti