(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बार्सिलोनातले beggars…

    बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)!

      February 17, 2024


  • तंत्रविश्व – भाग २ : मोबाईल बँकिंग सुरक्षितता

    बँकींग व्यवहार मोबाईलद्वारे करण्याचे म्हणजेच ‘मोबाईल बँकिंग’चे प्रमाण नोटबंदी झाल्यापासून झपाट्याने वाढले आहे. बँकांनी देखील वेगवेगळ्या अँड्रॉईड अँपद्वारे मोबाईल बँकींग सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरकारने देखील यूपीआय सारखी सुरक्षित आणि जलदरीत्या फंड ट्रान्स्फर करणारी सुविधा उपलब्ध करून दिली. असे असले तरी एखाद्या अँपमधील आणि सुविधेमधील त्रुटींचा (loopholes) शोध घेऊन त्याचा आणि इतर मार्गांनी मिळविलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यासाठी मोबाईल बँकिंग करताना ते सुरक्षितरित्या करणे आवश्यक असते.

      March 22, 2020


  • लहान वयातील कोपराजवळील अस्थिभंग

    कोवळ्या वयात लहान मुले पडल्यावर कोपराजवळ अस्थिभंग होणे हे अगदी नेहमीचे आहे. कोपराजवळ सांध्याच्या एक इंचावर हे हाड खूप पातळ असल्यामुळे ते सहजच तुटते.

      May 11, 2023


  • वरण कथा

    खरंतर वरण म्हणजे अनेकांच्या लेखी अगदी मामुली पदार्थ. किंबहुना वरणाला वाखाणणाऱ्यांपेक्षा नाक मुरडणारेच अधिक असतील, तरीही छातीठोकपणे सांगता येईल की, गरमागरम भातावर तूप टाकून तो हिंग-जिरं-हळद घालून केलेल्या वरणाशी कालवून खाल्ला की त्याक्षणी जिभेवर जी चव रेंगाळते; तिचं वर्णन करायला शब्द नाहीत.

      September 20, 2018


  • श्री रेणुका जगदंबा जन्मकथा

    ( माहूर – मातापुर वासिनी )

    श्री रेणुका देवि जगदंबे
    पार्वती आदिशक्ती तूं प्रारंभे
    शरण आलो तुज अंबे
    कृपा करी मजवरी ।।१।।

    कोल्हापुरी लक्ष्मी तुळजापुरी भवानी
    रेणीका देवी माहूर वासिनी
    सप्तशृंगी राहते गडवणी
    कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या ।।२।।

    श्री रेणुकेची महती थोर
    करण्यास दुष्टांचा संहार
    अवतार घेती परमेश्वर
    तिच्या उदरी ।।३।।

    संकटकाळीं धावून येसी
    दुरितांचे दुःख दूर करिसी
    भक्ताना पावन होसी
    थोर तुझा महिमा ।।४।।

    मनोंभावे तिला पुजिती
    सुख समाधान पावती
    दुःखे तयांना न येती
    श्री रेणुकेचे कृपे ।।५।।

    श्री रेणुकेच्या उदरी
    परशुराम अवतरी
    त्याची कथा श्रवण करी
    पुण्य लाभतसे ।।६।।

    दुष्ट मातले फार
    ब्रह्मा विनविले सत्वर
    पाप हलके करण्या
    त्यावेळी ।।७।।

    सर्व देवासंगे सागरीं
    ब्रह्मा विनविती श्री हरी
    पापभार कमी करी
    पृथ्वी मातेचा ।।८।।

    रेणुकेचे उदरी येईन
    परशुराम म्हणून अवतरीन
    दुष्टांचा संहार करीन
    सांत्वन केले प्रभूनीं ।।९।।

    रेणुराजा असे थोर
    अपत्याविना दुःखी फार
    प्रेम करी प्रजेवर
    मनोभावे ।।१०।।

    तपश्चर्या केली कठोर
    पावला शिव सत्वर
    मागतां दिधला वर
    कन्या प्राप्तीचा ।।११।।

    यज्ञ केला महान
    थोर ऋषिगण
    जमुनी करती हवन
    यज्ञामध्यें ।।१२।।

    यज्ञ देवता प्रसन्न झाली
    यज्ञातून कन्या अवतरली
    रेणुराजाचे हाती दिली
    यज्ञ देवतेने ।।१३।।

    रेणुराजा आनंदला
    जवळ घेऊनी कन्येला
    रेणुका दिले नांव तिला
    प्रेमभरें ।।१४।।

    त्रिभुवन फिरुनी नारद आले
    रेणुराजाशी सांगू लागले
    भाग्य तुझे उजळले
    रेणुकेमुळें ।।१५।।

    विश्वचालक ईश्वर
    रेणुकेच्या पोटी अवतार
    घेईन तो सत्वर
    ह्या जगतीं ।।१६।।

    रेणुकेसी सांगे नारद
    तप करुन व्हावे सिद्ध
    मागुनी घ्यावा आशिर्वाद
    शिवपार्वती कडून ।।१७।।

    पिता आज्ञा मिळूनी
    रेणुका गेली तपोवनी
    कठोर तपश्चर्या करुनी
    शिवपार्वती प्रसन्न केले ।।१८।।

    शिव झाले प्रसन्न
    रेणुकेस आशिर्वाद देऊन
    वर घ्यावा मागुन
    शिव बोले ।।१९।।

    माझें उदरी ईश्वरी येती
    मजला द्यावी पार्वती शक्ति
    पतीचे रुपी तुम्ही असती
    ही माझी इच्छा ।।२०।।

    बघून निर्मळ भक्ति
    सदाशिवे 'तथास्तू ' म्हणती
    अवतार पेलण्या मिळेल शक्ति
    रेणुकेस ।।२१।।

    आदिशक्ति पार्वती
    रेणुकेमध्यें विलीन होती
    जगदंबेचे रुप मिळती
    श्री रेणुकेस ।।२२।।

    जमदग्नीरुपे शिव अवतरला
    रेणुका वरिसी तयाला
    पती म्हणूनी संसार केला
    त्याच्यासंगे ।।२३।।

    वैशाख शुद्ध तृतीयेला
    परशुरामाचा जन्म झाला
    पृथ्वी पावन करण्याला
    ईश्वर अवतरती ।।२४।।

    जगन्माता पार्वती
    विश्वाची आदिशक्ति
    रेणुकेच्या रुपें अवतरती
    महाराष्ट्रामध्ये ।।२५।।

    महाराष्ट्रातील जिल्हा नांदेड
    जवळ आहे माहूर गड
    शिखरावर झाली आरुढ
    श्री जगदंबा रेणुका ।।२६।।

    आश्विन शुद्ध प्रतिपदेला
    नवरात्रीचा उत्सव झाला
    लाखो भाविक दर्शनाला
    जाती गडावरी ।।२७।।

    नवरात्रीचे होई पूजन
    अष्टमिला होम हवन
    भावभक्तीचे वातावरण
    जगदंबेच्या चरणीं ।।२८।।

    जाऊन एकदा माहूर क्षेत्री
    श्री रेणूकेचे दर्शन करी
    सुखसमाधान त्याचे घरीं
    नांदत असे ।।२९।।

    भक्तासाठी येई धाऊनी
    दुःख तयाचे दूर करुनी
    श्रद्धा नवसास पावोनी
    जगन्माता रेणुका ।।३०।।

    नित्य स्मरावे जगदंबेला
    रेणुका माहूरवासिनीला
    मनोभावे पुजावे तिजला
    हेच जीवनाचे सार ।।३१।।

    " शुभं भवतु "

    डॉ. भगवान नागापूरकर
    ३- १००९८३

      January 2, 2018


  • देशी हुन्नर आणि स्वदेशीपणा

    स्त्यावरून चालताना आपले पाय अचानक थबकतात… कळत नाही पण आपण आपोआप थांबतो.. कारण कुठेतरी बारीक आवाजात लतादीदींचे सूर कानावर पडतायत. जहांगीर आर्ट गॅलरी पाहून मन थक्क होतं… रेषा, वर्तुळ, चौकोन, मानवी भावमुद्रा, विविध रंगांची उधळण. मन प्रसन्न होतं.

      November 3, 2023


  • अंगाला भस्म का लावायचे

    माझे 'हे आम्ही का करायचे ?' हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.

    अंगाला भस्म का लावायचे?

    गुरुचरित्रात भस्म या विषयी एक अध्याय आहे. म्हणून मी स्वतः अंघोळ झाल्यावर भस्म लावून पाहिले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, भस्म लावले की थंडीच्या दिवसात थंडी वाजत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात घाम कमी येतो व घामोळे होत नाही.

    भस्म म्हणजे गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावरील भस्म नव्हे. उदबत्तीची राख , गाईच्या गोवऱ्या जाळून होणारी राख हे भस्म. भस्म हे उरलेली राख असते त्यामुळे ते निर्जंतुक नक्की असते. शिवाय गाईच्या शेणापासून केलेले भस्म रेडिएशन वेव्ह्ज पासून संरक्षण करते.

    कपाळाला -आज्ञाचक्राला हे भस्म लावण्याची प्रथा दक्षिण भारतात आहे . हल्ली उन्हाळ्यात पावडरच्या जाहिराती येतात. त्या पावडरी पांढऱ्या दगडाची पावडर असते. त्यापेक्षा भस्म केव्हाही स्वस्त व उत्तम.

    थोडे भस्म (चिमूटभर) हातावर घ्यावे, त्यात थोडे पाणी कालवावे व सर्व अंगाला लावावे. त्यात मांड्या , पोटऱ्या, दंड, छाती, मान, खांदे, कपाळ, कान या महत्वाच्या अवयवांना लावल्यास थंडी वाजत नाही.

    -- अरविंद जोशी
    B.Sc.

    ९४२१९४८८९४

      April 6, 2017


  • अतिरेक झालाच आहे, आता अंत पाहू नका!

    राजकारण तुम्हाला आश्चर्यचकित करतं. राजकारण तुम्हाला धक्काही देतं आणि राजकारणात काहीही घडू शकतं..’ असं राजकारणाचं वर्णन नेहमी केल्या जातं. त्यातील सत्यता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतेय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप राज्यातील सत्ताकोंडी फुटलेली नाही.

      November 11, 2019


  • चित्रकार “पॅबल पिकासो”

    बहुतेक कलाकार लहरी व आपल्याच विश्वात मग्न असतात त्याला चित्रकार अपवाद कसे असू शकतील. नावजलेल्या चित्रकारांची विविध वैशिष्ठये व पद्धती आकृत्या व रंगातून दिसतात. काहीना रंग आवडतात तर काहींना आकृत्या. काही चित्रकार रंग व आकृत्या अशा प्रकारे काढतात की त्यातून त्यांना एक स्टोरी किंवा घटनाक्रम सांगावासा वाटतो. काही चित्रकारांचे मन हळवे आध्यात्मिक तर काहींचे तर्हेव्हाईक असते.

      July 12, 2011


  • पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज

    “पर्यावरणाचा र्‍हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्‍हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
    पर्यावरण र्‍हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो .

      June 27, 2024