(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन देशासमोरची आव्हाने कमी करा

    देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनितीचा वापर करुन ही आव्हाने कमी करु शकतो का? याचा विचार केला पाहिजे.

      March 3, 2018


  • रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन

    हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेमार्गांची कसोशीनं देखभाल करणारे शेकडो कामगार म्हणजे रेल्वे गँगमन.' 'गँग' ह्या शब्दाबरोबर डोळ्यांसमोर गुंडांची गँग उभी राहते, त्यामुळे या शब्दाला या कामगारांनी नापसंती दर्शवली; म्हणून त्यांना आता 'ट्रॅकमन' व 'खलाशी' म्हणतात. हे कामगार रेल्वेमार्गांना जिवापाड जपतात. रेल्वेमार्गांची सुव्यवस्था ठेवणं, डोळ्यांत तेल घालून फिशप्लेट्सवर सतत लक्ष ठेवणं ही ट्रॅकमनची जबाबदारी असते. खरंतर ते रेल्वेचे २४ तासासाठीचे वॉचमन असतात. वेळप्रसंगी मार्गावर कोणताही धोका आढळल्यास जिवावर उदार होऊन भरधाव येणाऱ्या गाडीला दूरवरून इशारा देत हे कर्मचारी ती थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांच्याबरोबर सुमारे ८ ते १० किलो वजनाची विविध हत्यारं असतात. ३५ किलो एवढं वजन १०० मीटर अंतरापर्यंत २ मिनिटांत एका फेरीत, तशीच वेळ पडल्यास अवजारांसकट १५०० मीटर अंतर ७ मिनिटांमध्ये धावून गाठण्याची क्षमता असेल, तरच या कामाकरता त्यांची निवड केली जाते. ट्रॅकमनना त्यांची सर्व कामं दोन समांतर मार्गांच्या मध्यात उभं राहून तळपत्या उन्हात किंवा गारठून टाकणाऱ्या थंडीत वा कोसळणाऱ्या पावसात करावी लागतात.

    रुळांच्या दोन मार्गामध्ये उभं राहण्यास जेमतेमच जागा असल्यानं बाजूनं वेगात जाणाऱ्या गाडीचा धोका सततच असतो. मुंबई शहरात तर दर मिनिटाला लोकल जात असतात. त्यामुळे अनेक वेळा धक्का लागून हे ट्रॅकमन गंभीररीत्या जखमी होतात वा मरणही पावतात. गेल्या तीन वर्षांत मुंबई व आसपासच्या ट्रॅकवर जवळजवळ ३० लाईनमन बळी पडले. त्यातही प्रवासी गाडी वा मालगाडीपासूनचा धोका जास्तच असतो. लष्करातील जवान ज्याप्रमाणे सरहद्दीवर संरक्षण करताना बळी जातात, तसेच हे ट्रॅकमन आपली सर्वांची जीवनरेषा बिनात्रासाची व्हावी म्हणून आपला जीव गमावतात. खरं पाहता,

    हे रेल्वेचे शूर सैनिक असून, त्यांच्या शौर्याची गाणी कधीच गायली जात नाहीत ही शोकांतिका आहे.

    दिल्लीजवळील मांडवली या छोट्या रेल्वेस्टेशनजवळील भोला नावाच्या लाईनमननं त्यांच्या रोजच्या कामाचा दिनक्रम कसा असतो ते लिहिलं आहे. हा दिनक्रम त्याच्याच शब्दांत वाचण्यासारखा आहे. त्यानं जे लिहिलं आहे त्याचं सारं असं आहे: वयाच्या १७ व्या वर्षी उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यातून रेल्वे ट्रॅकमनच्या कामावर त्याची निवड झाली. आज वयाच्या ५२व्या वर्षांपर्यंत, म्हणजे ३५ वर्षे तो हे काम मनापासून करीत आहे. रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत (यामध्ये २ तासांची सुटी) तो कामावर असतो. रोज अंदाजे १० ते १२ किलोमीटर चालावं लागतं. रोजचा हाच मार्ग असल्यानं लाईनची इंचाइंचाची त्याला माहिती आहे व त्यामुळे काम चोख बजावलं जातं. या ट्रॅकमनच्यावरची जागा 'की' मनची आहे, परंतु ते पद मिळविण्याची भोलाची इच्छा नाही; कारण तिथे जबाबदारी जास्त असते. कधी अपघात झाला तर संपूर्णपणे त्या पदावरील व्यक्तीला जबाबदार धरलं जातं. रेल्वेलाईनला लागूनच त्याला राहण्यासाठी दोन खोल्या दिल्या असून, तिथे नातवंडांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. महिना १५ ते १८ हजार रुपये असा पगार असल्यानं भोला त्यावर खूश आहे. 'आमच्याशिवाय रेल्वेगाड्या चालणं कठीण आहे, पण आमच्या जागी दुसरे कोणी केव्हाही मिळू शकतात' याची सतत जाणीव असल्यानं रेल्वेच्या इतर १३ लाख कामगारांप्रमाणे संपाचे विचार डोक्यात आणता येत नाहीत. खरं तर रोजच आम्ही मरणाच्या वाटेवरून चालत असतो, परंतु शेवटी माझं नशीब देवाच्याच हातांत आहे. माझी देवावर अढळ श्रद्धा आहे. घरात वा कामावर सतत २४ तास इंजिनचे कर्कश्श आवाज कानांवर पडत असतात, तेच आमचं जीवन आहे.'

    प्रवाशांचा प्रवास निर्धोक ठेवणारे हे गँगमन नावाचे रेल्वेचे जणू शूर सैनिकच! त्यांच्या तत्परतेला आणि कष्टांना प्रत्येक प्रवासादरम्यान मनोमन सलाम करायला हवा.

    डॉ. अविनाश वैद्य

      July 21, 2022


  • अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

    अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून “चला पुन्हा ‘समते’ च्या पेटवू मशाली!” म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.

      January 5, 2018


  • केंद्रीय अर्थसंकल्प – २०२६ – २७

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मधील महत्त्वाचे मुद्दे.

      March 1, 2026


  • कट्यार काळजात घुसली चित्रपट प्रदर्शित झाला

    चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची ४६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या “इंडियन पॅनोरमा” विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.

      November 12, 2021


  • कारगिल युद्ध – १९९९

    कारगिल युद्ध – १९९९

    २६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते.

      July 28, 2017


  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ

    सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.

      August 17, 2021


  • मुंबईचा जावई’ चित्रपटाची बावन्न वर्षे

    या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते.

      March 25, 2022


  • फ्लाइंग कार

    ट्रॅफिक जॅमचा विचार जरी मनात आला तरी महानगरातील अनेक लोकांच्या छातीत धडकी भरत असते. कारण एकदा का वाहनांची रांग लागली की, पुढचा मार्गच बंद होऊन जातो. अशात तुम्ही तुमच्या मोटारीचे एक बटन दाबलेत अन् ती हवेत उडाली तर ट्रैफिक जॅमची कटकट नाही. हो, आताच्या शतकात अशी सोय झाली आहे.

      October 20, 2023


  • मिथाली राजचा विक्रम आणि ‘कुजबुजणारा’ मृत्यू

    ‘त्या’ बालिकेने वयाच्या विसाव्या वर्षी टॉन्टन काऊन्टी ग्राऊंडवर इंग्लिश महिलांच्या संघाविरुद्ध 407 चेंडूंमध्ये 214 धावा काढल्या. त्यात 19 चौकार होते आणि 10 तासाला केवळ दोन मिनिटे कमी एवढा वेळ तिचे मैदानावर ‘राज’ होते. कॅरेन रॉल्टनचा नाबाद 209 धावांचा विक्रम तिने मोडला.

      August 17, 2010