(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मायफळ / मायाफल

    ह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.

      March 23, 2018


  • नवरात्रीचा पाचवा दिवस

    आज नवरात्रीचा रंग पिवळा
    आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद
    आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये " हरिद्रा " म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली जात असे. नंतर तिचा उपयोग रंगकामासाठी होऊ लागला आणि यानंतर मात्र हळदीने मसाल्याच्या डब्यात हळद पावडरच्या रुपाने उडी घेतली. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. आणि त्यातील १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. आपल्या देशात हळदीच्या उत्पादनाचा विचार केला तर आंध्र प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. महाराष्ट्रात सातारा, सांगलीमध्ये हळदीचे पीक घेतले जाते. त्यानंतर आता कोकणातील शेतकऱ्यांनीही कोकणात हळदीचे उत्पादन घेऊन दाखविले आहे. हळद म्हटली की राजापुरी हळद या नावाने बाजारात खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही हळद राजापूरची आहे, असा समज आजही अनेक लोकांचा आहे, मात्र राजापूरचा आणि या हळदीचा काहीच संबंध नाही. महत्त्वाचे म्हणजे राजापूरमध्ये हळदीचे उत्पादनच घेतले जात नाही. दक्षिण भारतातील हळद ही सेलम म्हणून ओळखली जाते तर महाराष्ट्रातील हळद ही राजापुरी हळद म्हणून ओळखली जाते. सेलम गडद पिवळ्या रंगाची असते तर महाराष्ट्रातील हळद काहीशी फिकी असते, मात्र चवीला राजापुरी अधिक गडद असते. त्यामुळे तिला जास्त मागणी आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. आयुर्वेदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रुक्ष, ब्रव्य, कृमीहर,असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तिवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे. मूत्रांशाच्या तक्रारीवर व मूतखडयासाठी हळदीचा उपयोग होतो. हळदीचे तेल अँटीसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. ओल्या हळदीचा वास अन् चटकदार चव आजारी माणसालाही ताजंतवानं बनवते. हळदीपासून कुंकू तयार करतात. हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे आहेत. लोकरी, रेशमी, सुती कपडयाला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीच्या रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होता. हळद पासून सुंगधी तेल काढता येते. हे तेल नारंगी पिवळया रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.

    हळदीचे दुष्परिणाम
    अनेकदा संधिवाताचे रुग्ण हळदीचे सेवन, ती विना शिजविता करीत असतात. अशा वेळी मात्र ही कच्ची हळद अतिप्रमाणात सेवन केली गेल्याने कालांतराने पचनासंबंधी तक्रारी उद्भवू लागतात. त्याचबरोबर क्वचित पित्त, पोटदुखी अशा समस्या ही उद्भवू शकतात. त्यामुळे हळदीचे सेवन दररोज तीन ग्रामपेक्षा अधिक केले जाऊ नये. हळदीमध्ये ऑक्झेलेट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याच्या अतिसेवनाने गॉल स्टोन्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ज्यांना गॉल ब्लॅडर संबंधी विकार असतील त्यांनी हळदीचे सेवन योग्य प्रमाणामध्ये करणे अगत्याचे आहे. हळदीच्या अति सेवनाने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाबाच्या विकारासाठी ज्या व्यक्ती औषधोपचार घेत असतील त्यांनी हळदीचे सेवन करताना ते योग्य प्रमाणात केले जाईल याची खात्री करावी. हळदीच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन्सचा धोकाही उद्भवू शकतो. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन्स किंवा तत्सम समस्या सतावत आहेत, त्यांनी हळदीचे अतिसेवन टाळावे. गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनीही हळदीचे अतिसेवन टाळावे. कच्ची हळद खाण्याऐवजी हळद स्वयंपाकातील पदार्थांमध्ये इतर मसाल्यांप्रमाणे शिजवून खाल्ली जावी. त्याचबरोबर कधी पित्त झालेले असताना किंवा मळमळत असताना हळद सेवन केली जाऊ नये.
    आपण जी स्वयंपाकघरात जी हळद बघतो ती विविध प्रक्रिया करून आलेली असते.
    हळद कंद काढल्यानंतर त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये हळद कंद शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे आणि त्याला पिवळा धमक रंग आणणे, प्रतवारी करणे या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये हळद वाफेवर शिजविली जाते. त्यामुळे हळदीची प्रत चांगली मिळते.

    हळदीचे काही पदार्थ

    ओल्या हळदीचं रायतं
    साहित्य : ओली हळद, लाल तिखट, लिंबाचा रस, गूळ, मोहरी डाळ, मीठ, जिरे, हिंग आणि तेल
    कृती : ओल्या हळदीचे ५-६ कंद धुऊन घ्यावेत. त्यांना गाठे असं म्हणतात. कोरडे पुसून किसणीवर किसून घ्यावेत. त्यात मीठ व लिंबू रस घालावा. फोडणीसाठी थोडं तेल गरम करून त्यात लाल तिखट, मोहरी डाळ व जिरे आणि हिंग घालावा. फोडणी थंड झाल्यावर मिश्रणावर पसरवून घ्यावी. गूळ घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं (आवडत असल्यास त्यात तयार आंबा-लोणचे मसालाही घालता येतो.) तयार मिश्रण चांगलं हलवून काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरावं.

    ओल्या हळदीचं आयतं
    साहित्य : ओल्या हळदीचे ५ कंद, प्रत्येकी तीन चमचे गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, चार हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून तीळ, दोन ते तीन कोथिंबीर काडय़ा, लसूण-अद्रकाची पेस्ट, किसलेलं खोबरं, आठ-दहा कढीपत्ताची पानं, तेल, मोहरी, जिरे पूड आणि हिंग.
    कृती : प्रथम कढईत एक चमचा तेल घालून त्यावर मोहरी, जिरेपूड आणि लसूण-अद्रकाची पेस्ट घालावी. त्यावर धुऊन-किसून घेतलेली ओली हळद आणि कुटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या. एक वाफ आली की मिश्रण गॅसवरून उतरवून थंड होऊ द्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ घालावं. नंतर त्यात तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालावी. कढीपत्त्याची पानं फोडणीत सुद्धा घालू शकतो. चवीपुरतं मीठ, किसलेलं खोबरं घालून मिश्रणाचा गोळा बनवावा. पोळपाटाला तेल लावून छोटे-छोटे गोळे करून लाटावे व तव्यावर तेल टाकून त्यावर आयते खमंग भाजावे. खमंग आयतं पाहूनच तोंडाला पाणी सोडतं.

    ओल्या हळदीची भाजी
    साहित्य : एक वाटी ओल्या हळदीचा कीस, अर्धी वाटी कोवळे मटारचे दाणे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन टेबलस्पून तेल, एक तमालपत्र, २-३ लवंगा, २-३ काळी मिरी दाणे, एक चमचा लाल मिरचीचे तिखट, एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी दही, एक चमचा प्रत्येकी जिरे व धने पूड, चवीनुसार मीठ, अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर.
    कृती : गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा.तेल चांगले गरम झाली की त्यात २-३ लवंग,२-३ काळे मिरे,१ तमालपत्र घाला.चांगले परतून घेऊन त्यात आले-लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून पुन्हा एकदा पांच मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात एक वाटीभर ओली हळद किसून लगेच तो कीस घाला. (आगोदर कीस करून ठेवला तर काळा पडतो) , मटारचे कोवळे दाणे ,दाणे-जिरे पूड व चवीनुसार मीठ दहयात कालवून घाला आणि दोन मिनिटे परतून घेऊन मग अर्धी वाटी पाणी घालून भाजी वाफेवर शिजू द्या.

    ओल्या हळदीचं लोणचे
    साहित्य : पाव किलो ओली हळद, १५ ग्रॅम आलं, ३ लिंबे, तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, फोडणीसाठी मोहरी आणि तेल.
    कृती : हळद व आलं किसून घ्या. हळद पिळून पाणी काढून टाका. हळद व आल्याचा किस एकत्र करून त्यात तिखट, मीठ, लिंबाचा रस घाला.वरून हिंग, मोहरीची फोडणी थंड करून घाला.

    ओल्या हळदीचे दूध
    साहित्य : दूध अर्धा लिटर, ओली हळद २ इंच, वेलची पावङर १/२ टीस्पून, लवंगा २, दालचिनी पावडर १/२ टीस्पून, मध २ टेस्पून, खडीसाखर १ टेस्पून (ऐच्छीक)
    कृती : प्रथम दूध गरम होण्यास ठेवावे. दूध गरम झाले की, त्यामधे हळदीचे खोड चेचून अथवा किसून घालावे. पाठोपाठ लवंगा टाकाव्यात. तसेच वेलची पावडर, थोडी दालचिनी पावडर घालावी व दूध पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. गोड हवे असेल तर आताच खडीसाखर घालावी. आता चांगले उकळलेले दूध ग्लासमघे गाळणीने गाळून ओतावे. वरून मध घालावा व थोडी दालचिनी पावडर भुरभुरावी. गरम-गरम दूध प्यावे.
    टिप:- ओली हळद नसेल तर १/२ टीस्पून हळद पावडर वापरावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 3, 2019


  • जंतासाठी घरगुती उपचार

    मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच इलाज केला पाहिजे. मुळात अस्वच्छता व अशुद्धी यापासून दूर राहायला हवे. जंत झाल्यानंतर त्यांचा नाश करण्यावरच थांबता नये, तर त्यानंतर जंतनाशक औषधे घेऊन त्याचे मुळापासून निर्दालन करायला हवे. तसेच जंत का होतात याच्या कारणांचा शोध घेऊन तीही दूर केली पाहिजेत.

    घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार

    रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात.

    जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.

    कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे, यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.

    टाकळ्याचे बी चावून खाऊन वरून एरंडेल घेतल्यास जंत पडतात.

    ताकामध्ये पळसपापडीचे पाव ते अर्धा चमचा चूर्ण घेतल्यासही जंत कमी होतात.

    कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.

    डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्या् प्रमाणात घेतले तर जंतांची प्रवृत्ती कमी होते.

    शेवग्याच्या शेंगा उत्तम कृमिनाशक असतात. शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरेपूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ.मधुरा भिडे

      January 8, 2017


  • सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

    पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल

      August 4, 2019


  • अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

    अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

    केवळ यहुदी असल्यामुळे तिला बरेच काही भोगावे लागले. याचेच अनुभव तिने आपल्या कवितेत मांडले आणि तिच्या उत्कृष्ट कवितांना १९६६ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. सॅम्युअल जोसेफ अग्नान हे आणखी एक लेखक तिच्याबरोबर नोबेल पुरस्काराचे सहविजेते होते. या कवयित्रीचे नाव होते नेली जाक्स.

      August 13, 2023


  • ठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती

    ठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क  यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो.

      November 13, 2019


  • मंदिरप्रवेश-लढा आणि स्त्री-पुरुष-समानता

    एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें.

    आठलेकरांच्या कांहीं वाक्यांना (statements) दुजोरा द्यायलाच हवा. उदा. ‘स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली’ ; ‘लिंगभेदावर आधारित असलेल्या व्यवस्थेला निग्रहानें नकार दिलाच पाहिजे’. अशा स्टेटमेंट्स बद्दल त्यांच्याशी मतभेद असण्याचें कारणच नाहीं. प्रश्न आहे तो, त्यांनी मंदिरप्रवेशाच्या बाबीचा जो अर्थ लावला आहे, त्याबद्दल. मात्र, कांहीं मतभेद असले तरी, मी त्यांना ‘पुरुषधार्जिणी’ असें अभिधान देणार नाहीं.

    पुढे जाण्यापूर्वी मी हें स्पष्ट करूं इच्छितो की, मी कर्मकांड मानीत नाहीं, तसेच मी निधर्मी व बेसिकली निरीश्वरवादी आहे, आणि मी स्त्री-पुरुष समानता मानतो. हें स्पष्ट करायचें कारण म्हणजे, मला देव-धर्म-पुजारी वगैरेंची बाजू मांडायची नाहीं , किंवा पुरोगामी-प्रतिगामी या वादातही शिरायचें नाहीं. थोडक्यात म्हणजे, ‘आय् हॅव नो पर्सनल ऍक्स टु ग्राइंड’ . तसेच, हेंही स्पष्ट करायला हवें की, आठलेकर यांनी उल्लेखलेल्या तृप्ती देसाई व केवडकर यांच्याविषयी, त्यांच्या विविध विषयांवरील मतांविषयी, आणि त्यांच्या आपसातील-संबंधांविषयी मला कांहींही माहिती नाहीं. त्याचप्रमाणें, इलेक्ट्रॉनिक मीडियांसंबंधी कांहींही मतप्रदर्शन मला करायचें नाहीं. अशा गोष्टींमध्ये शिरल्यास, मूळ मुद्दा बाजूलाच पडेल. त्यामुळे त्या सगळ्यात न शिरतां, मी सरळ, आणि केवळ, मूलभूत मुद्यालाच स्पर्श करत आहे.

    आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, शनि-शिंगणायुर हें फक्त, एक ‘पूजास्थळ’ आहे ; पण तिथें आहे तशीच स्थिती त्र्यंबकेश्वर, साबरीमाला , हाजी अली वगैरे अनेक ठिकाणीही होती व आहे. अहो, हिंदूधर्मात, एखादी पूजा जर जोडप्यानें करायची असेल, व पत्नी तिथें नसेल, तर पती तिच्या स्थानीं ‘सुपारी’ किंवा अन्य कांहींतरी ठेवून पूजा करूं शकतो (जसें, उत्तररामचरित्रात, रामानें , सीतेची मूर्ती ठेवून केलेलें आहे) . पण हा,अधिकार स्त्रीला नाहीं. मुस्लिमांमध्ये, पुरुष तीनदा ‘तलाक’ असें म्हणून ( हल्ली तर ई-मेल पाठवूनही) पत्नीला डायव्होर्स देऊं शकतो, पण अर्थातच, हा हक्क पत्नीला उपलब्ध नाहीं. खरें तर, स्त्रियांना मंदिर-प्रवेशाचा अधिकार मिळण्याचा मूळ प्रश्न, धर्माशी संबंधित नसून स्री-पुरुष-समानतेशी निगडित आहे. मंदिरात किंवा त्याच्या गर्भागारात प्रवेश मिळण्यासाठी लढणें, किंवा हाजी-अली दर्ग्यात प्रवेशासाठी झगडणें, म्हणजे स्त्री-पुरुष-समानतेसाठी झगडणें . मान्य आहे, अशा अनेक बाबी आहेत, जिथें समानतेसाठी लढा द्यायला हवा . तसा, अनेक-अंगीं, अनेक-पदरी लढा चालूच आहे, असें मला वाटतें. एके काळी, ‘तथाकथित- प्रगत’, अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येसुद्धां महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी महिलांना लढा द्यावाच लागला. १९३० च्या सुमारास त्यांना तो हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्रात, स्त्री-शिक्षणासाठी महात्मा फुले, महर्षि कर्वे यांना लढा द्यावा लागला. हल्लीहल्लीच, टेनिसच्या क्षेत्रात, ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये स्त्रियांना मिळणारी बक्षिसाची रक्कन ही पुरुषांएवढी असायला हवी, या समानतेसाठी, मार्टिना नव्हरातिलोव्हानें लावून धरलें. हाही स्त्री-पुरुष-समानतेच्या लढ्याचाच एक भाग आहे. तसेंच, मंदिरप्रवेश हाही या समानतेच्या लढ्याचा एक भागच आहे. आणि, आपण तसेंच त्याच्याकडे पहायला हवें.

    मंदिरप्रवेशासाठी लढणें या गोष्टीचा, ‘देव मानणें’ किंवा ‘धर्म मानणे’ आवश्यक आहे , असें नाहीं. साने गुरुजी हे समाजवादी होते. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी, निधर्मी असतात. तरीही, साने गुरुजींनी १९४८-१९४९ च्या सुमारास, पंढरपुरच्या विठ्ठल-मंदिरात हरिजनांना (दलितांना) प्रवेश मिळावा म्हणुन लडा दिला, प्राणांतिक उपोषणही केलें. स्पष्ट आहे की, त्यांचा हा लढा सामाजिक-असमानतेशी निगडित होता. आठलेकर यांच्या, ‘हा हक्क नव्हता म्हणून स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठ्या संधीपासून वंचित राहिल्या आहेत?’ ; ‘गाभार्‍यात प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे?’ , या स्टेटमेंटस् ‘मिसप्लेस्ड’ आहेत, हें साने गुरुजींच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे. त्यावर अधिक टिप्पणी करायची आवश्यकता नाहीं.

    वैदिक काळात स्त्रियांना यज्ञ करण्याचाही अधिकार होता. त्या काळानंतर, शतकानुशतकें स्त्री पुरुषांमध्ये असमानताच होती, व तें अयोग्यच आहे. मध्य-युगात तर ती दरी भयानकच होती. पण १९ व्या – २०व्या शतकात स्त्री-पुरुष-समानतेच्या हक्कासाठी लढाईची ठिणगी पडली, आणि ती आतां, भिन्नभिन्न ठिकाणीं, विविध प्रश्नांच्या माध्यमांमधून, अनेक अंगांनी, प्रस्फुटित होत आहे ; मग तो लढा मंदिरप्रवेशाचा असो, लोकसभेत किती टक्के जागा स्त्रियांसाठी रिझर्व असाव्यात हा असो, मुलींच्या शिक्षणाचा असो, स्त्री-भ्रूणहत्येचा असो, सुनांवर अत्याचाराचा व सुनांना जाळण्याचा असो, ‘खटना’ ( female circumcision) चा असो, ‘Right to Pee’ चा असो, विनयभंगाचा असो, ‘मॅरिटल रेऽप’ चा असो, तलाकचा असो, पोटगीचा असो, हँडिकॅप्ड व चॅलेंज्ड स्त्रियांच्या संरक्षणाचा असो, किंवा अन्य कांहीं असो. प्रत्येक मुद्दयावर लढा हा व्हायलाच हवा, आणि सुजाण नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. समाजात दुसरे अनेक प्रॉबलेम्स आहेत, म्हणून एखाद्या मुद्दयवर लढा द्यायचा नाहीं, असें शक्य आहे काय ? साने गुरूजींना नक्कीच माहीत होते की विठ्ठल-मंदिरात प्रवेशासाठी लढा देऊन दलितांचे आर्थिक प्रश्न कांहीं संपणार नव्हते. पण, जिथे-जिथें असमानता आहे, तिथें-तिथें लढा द्यायला हवा, या भावनेनेंच त्यांनी विठ्ठलमंदिराचा लढा दिला. ते तो लढा जिंकले ; स्त्रियाही पूजास्थळांचे कांहीं लढे जिंकत आहेत, कांहीं नाही. पण, असेंच असतें. कांहीं कांहीं लढे जिंकले जातात, कांहीं हरले जातात ( उदा. १८५७ चें स्वतंत्र्ययुद्ध). पण ठिणगी पडली की, तिच्या शॉर्ट-टर्म परिणामांबरोबरच, दूरगामी परिणामही असतात, आणि त्यांचाही विचार व्हायला हवा. तरच अशा लढ्यांचें महत्व अधोरेखित होईल. साथ देतां आली तर उत्तमच ; पण तें जमत नसल्यास, किमान, ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ इतपत तरी सपोर्ट करायला हरकत नसावी.

    - सुभाष स. नाईक
    सांताक्रूझ, मुंबई
    M- 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in

      May 8, 2016


  • श्री गणेश अवतारलीला २ – श्री विनायक अवतार

    भाद्रपद चतुर्थी चा अवतार शिवपार्वती यांच्या घरी झाला असल्याने त्या चतुर्थीला स्वर्गाची चतुर्थी तर विनायक अवतार महर्षी कश्यपने आणि अदितीच्या घरी झाला असल्याने या चतुर्थीला पृथ्वीवरची चतुर्थी म्हणतात. अशा या विनायक अवताराची जन्मतिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी.

      September 3, 2019


  • राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे

    १९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सार्‍या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते.

      September 27, 2013


  • कॅपॅसिटर कृषिपंपाचा तारक, तर ऑटोस्विच मारक

    वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे.

      December 3, 2019