(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नवरात्र स्पेशल

    आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल तर या नऊ गोष्टी लक्षात ठेवा...

    नवरात्रात व्रतातील आहार कसा असावा?

    - हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावे - मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा - त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारातील द्रव पदार्थ वाढवा - सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या.

    नवरात्रौत्सवात व्रतादरम्यान किती कॅलरीची असते गरज?

    नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये १८००-२२०० कॅलरीची व्रतासाठी गरज नवरात्रीच्या व्रतात काय करू नये? - फक्त लिंबू-पाणी पिऊन उपवास ठेवू नये. - खाहीही न खाता नुसतं दूध पिऊन उपवास करू नका, असं केल्यानं अशक्तपणा येतो. - यामुळं थकवा, ब्लड प्रेशर लो आणि चिडचिडपणा वाढू शकतो. - गॅस्ट्राइटिस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. - व्रतात आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये. - व्रतादरम्यान लंच आणि डिनरमध्ये आहाराचं संतुलन राखावं. - कुटू किंवा शिंगाड्याच्या पिठाची चपाती खावी. - साबुदान्याची खीर किंवा खिचडी खाऊ शकता. - सीताफळ, बटाट्याची रस्सेदार भाजी खाणं चांगलं राहील. - दिवसातून तीन वेळी फळं किंवा फ्रूट सॅलेड खावं. - ४-६ वेळा सुख्यामेव्यासह ज्यूस, दूध, मिल्कशेक पिणं चांगलं राहील. - नारळ पाणी आपल्या डाएटमध्ये अवश्य असू द्या - नवरात्रीच्या व्रतात कमीतकमी ८ लीटर पाणी प्यावं. - एकाच प्रकारच्या फळांपेक्षा मिक्स्ड फळं खावीत. - ताजी फळं खा, कडवट चवीचे फळं खाऊ नका.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 7, 2017


  • “ध्यान धारणा” एक साघना

    ध्यान ? कुणाचे ? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे यालाच ‘ध्यान’ म्हणतात. (objectless awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीना पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतु जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत चेतनामय असते, कार्य करीत असते त्यांचे कार्य थांबवणे हे फार कठीण. त्यांचे कार्य हे नैसर्गिक जिवंतपणाचेच लक्षण असते.

    ‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे असते, तसेच त्या मार्गाने एक शोध घेतला जातो. ज्यांना खऱ्या अर्थाने ध्यान लागते, त्यालाच त्या शोधाचे आकलन होते. येथे अनुभव निराळे, प्रचिती निराळी, फलश्रुती देखील भिन्न असू शकते. फक्त एक मात्र सत्य सर्व साधकांना सारखेच जाणवते आणि तो म्हणजे ‘नितांत आनंद, ब्रम्हानंद (Ecstasy of joy) संपूर्ण शांतता’ आणि हाच सत्याचा तो शोध असतो.

    ‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे हे जरी असले, तरी आम्हाला आमच्याच शरीर – मनाच्या प्रक्रिया कराव्याच लागतील. साधनाला साध्याकडे नेण्यासाठी ज्यामुळे आम्हीच आमच्या अंतरंगात अर्थात् देहाच्या आत प्रवेश करून अवयवांशी संवाद साधून आणि त्या सूक्ष्म मूळ घटक ज्या भागात सेल्स आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येऊन प्रत्येक विश्लेशनाची एक सूक्ष्म पायरी असते. ज्यावर भव्यदिव्यतेचा डोलरा उभा रहात असतो, त्या मूळ घटकांपर्यत आम्ही जाणीवेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न ‘ध्यानातून’ करणार आहोत. डोळे मिटून (वा उघडे – हे सवयीनंतर शक्य असते.) ध्यान धारणेसाठी आसनस्थ झाल्यावर जाणीव होऊ लागते की तुम्ही शरीराने स्थिर, अचल होत आहात. शरिराच्या अस्तित्वाची जाणीव कमी कमी होत जाते. फार प्रयत्नानंतर देहहीनतेचा भास होऊ लागतो. परंतु हे सारे असत्य आहे. कारण देहहीन झाल्याचा भास ही तुमची कल्पना असते. विचार असतो आणि विचाराचे अस्तित्त्व मन चंचल असल्याचे दाखवितो.

    बैठक – माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी. मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धूत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले जाई. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपेपूर्वी. ध्यान बैठक लावण्यापूर्वी शक्य तेवढे शुचिर्भूत अर्थात शरीराने स्वच्छ होवून बसत असे. २० मिनीटांच्या बैठकीसाठी अलार्म लावून घड्याळ ठेवण्याचा सराव प्रथम केला गेला. नंतर सवय होत गेली व शेवटी वेळेचे बंधन गळून पडले. साधी मांडी घालून सहज अशा आसनांत बसत असे. पाठीचा कणा शक्यतो सरळ, त्याला उशीचा आधार होताच. दोन्ही हात समोर व मांडीवर घडी घातलेले असे. मान, दात (जबडे) थोडेसे अलग,जीभ कसलाही स्पर्श रहीत. न दाताला, न ओठाला, न गालाला स्पर्श केलेली अर्थात मला जी सुलभ, सहज व सरळ वाटली तीच बैठक मी अंगीकारत गेलो. प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या देहाच्या ठेवणी प्रमाणे, सवयीनुसार तो योग्य अशा बैठकीचा आसन म्हणून उपयोग करू शकतो. नियम हे मार्गदर्शक असले तरी स्वानुभव हेच अंतिम असावे.

    संकल्प: हे ईश्वरी अनुष्ठान आहे. तो कृपा करेल का हे माहित नाही. परंतु त्याची कृपा व्हावी, दया व्हावी ही अपेक्षा करणे म्हणजेच एक विश्वास, श्रध्दा, भक्ती वा प्रेम व्यक्त केल्याप्रमाणे असेल. करू घातलेल्या कार्याच्या यशाबद्दल मनाची ती निश्चितता असेल. It shall be uplift of mind. मिळणाऱ्या आनंदाचे, समाधानाचे व शांततेचे स्वागत करण्याची ती मनाची तयारी असेल. तर करू या तसा संकल्प.

    “ हे परमेश्वरा, आई, श्री जगदंबे, परमपूज्य श्री. गुरूदेव सर्वाना प्रणाम “

    प्रार्थना – १) ओम् गं गणपतये नमः ......

    २) सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते

    ३)गुरूः ब्रह्मा गुरुः विष्णू गुरूः देवो महेश्वरा, गुरूः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

    तुम्हा सर्वाच्या कृपेची, दयेची व आशिर्वादाची मी अपेक्षा करतो. माझं मन शांत होण्यास मदत करा. माझ ध्यान लागू द्या. चित्त एकाग्र होऊ द्या. मला ईश्वरी सहवासाचा आनंद मिळू द्या. मनाची शांती प्रदान करा.

    ओम् । ओम् । ओम् ।

    नेहमीच्या सवयीप्रमाणे मन हे शरीराच्या बाह्यांगामध्ये रममाण असते. सभोवताल आणि देहाचा बाह्य स्पर्शेद्रिंय ह्याच्यामध्ये गुंतून असते. त्यामुळे सभोवतालच्या होणाऱ्या हालचाली, त्यांचे आवाज ह्याची जाणीव होत राहते. शरीराला काही भागात, पाठीला, पायाजवळ, मानेजवळ वा इतर ठिकाणी कळ लागते. अवघडल्याप्रमाणे वाटते, बधीरपणा वा मुंग्या आल्याचा भास होतो. काही भागात खाज येते, तेथील हालचाली जाणवू लागतात. ह्या सर्वाचे कारण चंचल मन त्या त्या अंगाजवळ संपर्क करते व सौम्य वेदनांची (uncomfortable feeling) जाणीव होते. मनाच्या शांत करण्याच्या प्रयत्नामधली ही बाधा असते. आपल्या सहनशीलतेमध्ये मनाच्या निग्रहाने वाढ करणे गरजेचे असते. रोजच्या संवयीने हे हलके साध्य होते. बाहेरच्या मिळत जाणाऱ्या चेतना तुम्ही प्रयत्नाने घालवू शकतात. तुमची बैठक यशस्वी होते. २० मिनीटे वा अर्धातास तुम्ही केलेल्या बैठकीचा संकल्प यशस्वी होवू लागतो. ह्या सर्व वेळेमध्ये तुम्ही स्थिर बसू शकता व तुमची बाह्यांगाची जाणीव कमी होवून जाते. ही तुमची स्थिर बैठकच ध्यानाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल असते. मनाला तुम्ही एकप्रकारे बाह्यांगातून अंतरंगात घेवून जाण्याचा यशस्वी प्रयोग असतो. मनाचा एक चांगला गुणधर्म म्हणजे मन जरी चंचल असले तरी ते तुमच्या इच्छेला साथ देते, विरोध करीत नसते. तुमच्या ‘मन शांत’ करण्याच्या प्रयत्नाना बाधा करीत नाही.

    प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादात्म पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनाने एकदम परिपूर्ण. त्याच्या सांघिक कार्यप्रणालीची माहिती कळताच कुणीही आश्चर्यचकीत व्हावे इतके यात भव्य आणि दिव्य आहे. देहामधले अनेक अवयव (इंद्रिये) ही कोट्यावधी सेल्सनी बनलेली असतात. सेल्स अतिशय सूक्ष्म व देहाचा सर्वात लहान घटक भाग आहे आणि आश्चर्य म्हणजे जे कार्य संपूर्ण देहाकडून होत असते. तेच आणि तसेच कार्य त्या प्रत्येक सेल्सकडून केले जाते. जसे जगणे, वाढणे,मरणे,नष्ट होणे, उर्जा निर्माण करणे, तिचा उपयोग करणे इत्यादी. देह हा जशा ह्या बाबी पूर्ण करीत जीवन चक्र चालू ठेवतो, त्याच पध्दतीने ती एक स्वतंत्र सेल (Cell) देखील अशीच चक्रमय जीवन जगते. उर्जा निर्माण करणे व जीवन चक्रासाठी देणे हाच प्रमुख जीवन उद्देश.

    आता मनला स्थिर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना, द्रव्य, समाधान, हालचाली,भावनिक आविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गिक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मतः मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होऊन शरिरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.

    आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहित स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोखावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येऊ देऊ नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तित्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तिचे कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतु इतर विचारांना सारून चित्त एका दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे, केव्हां जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेऊन जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता. मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.

    आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाश पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येऊ देऊ नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वाहत जाऊन एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल.

    कॅलिडोस्कोपमधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा होते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी. हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वतःचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त डुबण्याचा असतो. येथपर्यत सीमित. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.

    हवा नाकांमधून छातीत फुफ्फुसात जाते. निरनिराळ्या नलिकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो. एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करता. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होऊ लागते. मग ते फुफ्फुस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असो वा इतर कोणते इंद्रिय असो. सर्वांशी तुमची जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.

    हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेषणात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतु जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हां हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलिकेतून रक्तपेशीपर्यत व पुढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चित नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहात आणि चेतनारूपी जिवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजिना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.

    मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो.

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    bknagapurkar@gmail.com

    ९००४०७९८५०

      September 10, 2018


  • वांशिक संघर्षात होरपळणारा मणिपूर

    मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, २३/१२/२०१६ ला कामजोंग जिल्ह्यातील  तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

      January 11, 2017


  • मालेगाव : हिदु आतंकवादाची भाकडकथा !

    ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला हा लेख जनजागरणासाठी शेअर करत आहे.

      June 7, 2017


  • ठिणगी ते वडवानल!

    प्रकाशन दिनांक :- 10/10/2004

    कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.

      October 10, 2004


  • १८ एप्रिल – जागतिक वारसा दिन

    १८ एप्रिल हा `जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

      April 19, 2017


  • द ग्रेट डायमंड रॉबरी !

    गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली.

      September 8, 2010


  • किचन क्लिनीक – पीच

    किचन क्लिनीक – पीच

    हे चीनी फळ आपल्या देशात देखील थंड हवेच्या ठिकाणी पिकविले जाते.हे फळ जेवढे दिसायला सुंदर तितकेच चवीला देखील सुरेख लागते.

    ह्याची चव आंबट गोड आता फिकट पांढऱ्या रंगांचा मऊ गर असतो.बाहेरून पिवळसर लाल रंगांचे असते.त्याला एक प्रकारचा मादक सुवास येतोय.हे थंड गुणाचे असून ते शरीरातील वातपित्त दोष कमी करते व कफ वाढविते.

    पीच कलर हे नाव ह्या रंगाला ह्याच फळाच्या रंगावरून पडले आहे जो बऱ्याच जणांच्या आवडीचा रंग असतो.

    चला आता आपण ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:

    १)मुत्राशयातील खडे विरघळायला १ कप पिचचा रस+१ चमचा धणे पुड हे मिश्रण रोज जेवणा आधी प्यावे.

    २)खुप ताप येऊन लघ्वी कडक होणे,जळजळ होणे,लघ्वीला कमी होणे ह्यात १ कप पिचचा रस+२ चमचे साखर हे मिश्रण २-३ वेळा प्यावे.

    ३)साल काढलेल्या पिचचा गर १ वाटी रोज रात्री खाल्ल्यास मळाचे खडे होणे,मलबध्दता कमी होते.

    ४)लहान मुले झोपेत लघ्वी करतात त्यांना रोज १ चमचा वावडींगाचे चुर्ण पाण्यासह प्यायली द्यावे व पीच खायला द्यावा.

    ५)ब्लड प्रेशर वाढून लघ्वी कमी होत असल्यास पिचचा रस १ कप+१/४ चमचा वेलची पूड+१ चमचा धणे पुड हे मिश्रण प्यावे.

    पीच खायचा अतिरेक केल्यास सर्दी,जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • प. पू. आईंचे भजन-चिंतन

    प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत आहेत. भजनात त्यांच्या स्वतःच्या काही रचना आहेत. प. पू. आईंच्या एका रचनेचे चिंतन करू या.

    उठा उठा हो भाविकजन। गंगेमाजी करा स्नान।
    विश्वनाथाचे घ्या दर्शन। त्रिविधताप निवतील।।१।।

    स्मरता सदाशिव मायबाप । जाय चित्ताचा संताप।
    आनंद होय अनुप । विघ्नसंकटे हरतील ।।२।।

    कृष्णा वेणा तुंगा नर्मदा। भीमा तापी शरयु गोदा।
    येती शिवदर्शना सदा। त्या पावन करतील।।३।।

    गंगा यमुना सरस्वती। घटप्रभा नेत्रावती।
    सांब दर्शनासी येती। तुम्हा सहज भेटतील।।४।।

    पाहोनी माध्याह्न समय। स्नाना ये गुरुदत्तात्रय।
    हर्षे डोले गंगामाय। कलिमल दूर होय म्हणूनी ।।५।।

    श्री सद्गुरु हेच भक्तांचे खरे दैवत सत्चिदानंदघन श्रीगुरु हेच ज्ञानदाते-मोक्षदाते हा पूर्ण विश्वास प. पू. आईंचा होता. म्हणूनच प. पू. महाराजांचे वाक्य हे त्यांच्यासाठी प्रमाण वाक्य होते. त्याच महाराजांचे चरणी त्या अनन्य भावे विनंती करतात आणि म्हणतात.

    "गुरुदेवा! आपण करुणा सागर आहात. आपल्याच कृपाकटाक्षाने माझा उद्धार होणार आहे. तेव्हा माझ्या उद्धाराचा सत्संकल्प आपल्या चित्ती उमटू द्या. मला आपल्या शिवाय कोण आहे? शिष्यांसाठी व्यवहारातील सर्वच नाती श्रीगुरुचरणी विरुन जाताच तो त्याच आश्रयाने आधाराने राहतो.

    ।। ॐ नमः शिवाय ।। हा मंत्र आहे प. पू. आईंचा. या मंत्राचे दैवत शिव शंकर आहे. शंकरोतिस: शंकर:। सर्वांचे हीत करणारा-पावन करणारा तोच शंकर याचेच एक नाव विश्वनाथ हा नावाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाथ म्हणजे पिता-आश्रयदाताआहे. गंगातटी याचे वास्तव्य असते. यासाठी आपल्या भक्तांना प. पू. आई म्हणतात, “भक्तजनहो ! जागे व्हा " आत्महितासाठी जागृत व्हा गंगा जी पापहारक आहे. तिच्यात स्नान करा मग
    विश्वनाथाचे दर्शन घ्या. यांनी तुमचे अध्यात्मिक (शारीरिक), आधिभौतिक (जगतातून येणारे) व अधिदैविक (जे ताप आपल्या हाती नाहीत) हे सारेच नष्ट होतील.

    गंगा ही प्रवाहरूपाने भक्तीचे प्रतिक आहे. शिवतत्त्व जोवर जीवाच्या अंतरी असते तोवर सारेच पवित्र असते, पण शिवाने देहाचा आश्रय त्यागला की त्याचेच "शव" होते असा हा शिव विश्वाचा अंतबार्ह्य व्याप्त आहे.

    हे शिव तत्व नित्य पवित्र पावन आहे. म्हणूनच तो सदासर्वकाळ सदाशिव आहे. याचे मस्तकी गंगा वाहते. प्रत्येक जीवाचा मस्तकी ज्ञानगंगा असतेच. तिच प्रवाहित झाली पाहिजे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होताच जीवाचे क्रोधादि विकार चित्तातून निघुन जातात. जीव भक्तीरसात डुंबला की अंतरी विकार राहणार कसे? अंतरातून विकार गेले की अंतरंग भगवंत प्रेमाने परिपूर्ण भरते. परमात्मा कसा आहे? तर “आत्मा अरे रसो वै सः।" हा प्रेमरसाने भरला आहे. अंतरी प्रेमाचा झरा वाहू लागला की भक्ताला अमाप आनंद होतो. तो निष्काम होतो. लौकिकात त्याचेवर संकटे विघ्ने आली तरी त्यातले संकटत्व हरलेले असते. भक्तांसाठी ती केवळ एक घटना असते.

    पुढील ठिकाणी अनेक पवित्र नद्यांची नावे आहेत. या नद्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे आहेत या नद्यांत सुस्नात होण्यासाठी संतमहंत येतात. देवदेवता सुद्धा येतात. त्यांच्याच चरण स्पर्शाने नद्या पावन होतात. अशा या तीर्थक्षेत्री तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा पावन व्हाल, असा दिलासा प. पू. आई देतात.

    पण भक्तासाठी सर्व नद्यांचे तीर्थे म्हणजे श्रीगुरुदेवांचे चरणच असतात. गोरक्षनाथ आपल्या एका रचनेत म्हणतात.

    "गंगा ना न्हाऊ जी मै जमूना ना न्हाऊ जो मै ।
    ना कोई तीरथ न्हाऊ जी । अडसठ तीरथ है घर भीतर ।
    ताही में मल मल न्हाऊ जी..."

    याच देहाच्या उपाधित अडसठ तीर्थ आहेत. तीच विचाराने, साधनाने मी स्वच्छ-पवित्र करीन परिणामी सदाशीवाचे दर्शन नित्य याच देहमंदिरात घेता येईल.

    पुढे गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे. गंगा भक्तीचे, यमुना कर्माचे तर सरस्वती ज्ञानाचे प्रतिक आहे. कर्म भक्ती ज्ञान याच क्रमाने भक्त हळूहळू विकसीत होत जातो. आणि अद्वैत तत्वात प्रवेश कर्ता होतो. तेव्हा देहाच्या घरात चैतन्याची प्रभा असतेच याची जाणीव त्याला होते. परिणामी नेत्रातून तो जे काही पाहतो, तेव्हा त्याला तत्वदर्शन सहज घडते. "अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी" या म्हणी प्रमाणे आत ओतप्रेत भरलेला शिव-सांब बाहेर सर्वत्र आहे, याचे तत्वदर्शन घडते या दर्शनाला सहजता आली की भक्त भक्तिच्या प्रांगणात स्थिरावतो. व जीवनमुक्तीच्या प्रवासाकडे सरकतो.

    याच पवित्र नद्यांमध्ये माध्यांन्ह समयी जगताचे आद्य गुरु श्री दत्तात्रेय दररोज स्नानासाठी येतात. श्रीगुरुदत्तात्रेयांचा अवतार हा नित्य-शाश्वत अवतार आहे. युगानयुगे ते आहेतच. ज्ञानप्रचार-प्रसार हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यांच्याच चरण स्पर्शाने गंगा माता सुखाने-आनंदाने डोलू लागते. कारण दत्तात्रेयांच्या संस्पर्शाने तिच्यातील कली (कलह) मळ (निषिद्ध कर्माची इच्छा) हे दोन दोष निघून जातात.

    भक्तीच्या गंगेत राहणाऱ्या-डोलण्याऱ्या भक्ताला, जे तत्त्व परमात्याने दिले ते “दत्त" शाश्वत याची जाण येते, हे तत्त्व ज्ञानस्वरूप-आनंदस्वरूप-निरंजन असल्याने, भक्त सुद्धा भगवंतासारखाच होतो. त्याचे अंतरीची पापवासना क्षय पावते, द्वैतभाव विरू लागतो त्यामुळे कलह भांडण-वाद कलीचा प्रवाह कमी होत जातो. अंतकरणाच्या तळाशी रुतलेला “मल" दोष जो निषिद्ध-नको तो कर्म करणे हा सुद्धा नाहिसा होतो - दुर जातो. भक्ताला खऱ्या अर्थाने भगवंत दर्शनाची तळमळ लागते. याच तळमळीने जेव्हा भक्त भजन करतो तेव्हा तो भगवंत तत्त्वापासून भिन्न रहातच नाही “शिव भत्वा शिवं भजेत्” यानुसार तो रजन रतो होतो. श्री सद्गुरु कृपेने भजनाच्या माध्यमातून “मजन रती" या अवस्थे पर्यंतचा अंतरीचा प्रवास आई येथे प्रगट करतात.

    क्षेत्र म्हाणजे शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. तीर्थ हे पावित्र्य दर्शवते शुद्ध भक्तीने, भावाने भजन केले नामानसंधान ठेवले तर देहाचेच तीर्थ होणे संतांना अपेक्षीत आहे. जीवापासून तार्थक्षेत्राचा प्रवास भजनाच्या माध्यमातून प. पू. आई घडवतात भजनम्हणजे केवळ गाणे म्हणणे नव्हे भजू हा धातू आहे. यात परमात्म्यतत्त्व स्वीकारणे हे आहे. प्रथम बुद्धीने स्वीकारणे नंतर भजनाच्या साधनाने साध्याची प्राप्ती करून घेणे.

    भजनातून अंतरी उतरणे अन् शिव-दत्त दर्शनाने कृतार्थता प्राप्त करुन घ्यावी हेच प. पू. आईंना या भजनातून सांगायचे आहे.

    हे चिंतनरुपी पुष्प प. पू. माता कलावतींचे चरणी समर्पीत करून शब्दांना विराम देते.

    --सौ. अलका मुतालिक, डोंबिवली.

    सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा.

      August 1, 2022


  • कोकणभूमीतील औषध निर्मिती आणि आयुर्वेद विकास

    येवा कोकण आपलाच आसा ही टॅगलाईन सांगणारी आमची सिंधुसंस्कृती ! शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांची अनुभूती देत मन आत्मा आणि इंद्रियाना सुखावून टाकणारी इथली लाल माती…. इथेच दिसेल,कोणत्याही संकटांचा सहजपणे सामना करण्यासाठी  आवश्यक असलेली निधडी छाती… आणि मना मनाने जोडून ठेवलेली कोकणची नाती…

      February 17, 2023