वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काल वसंत पंचमी होती, सकाळी गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले. एक प्रवासी बहुधा शेतकरी असावा, दृश्य पाहून म्हणाला, भाऊ, यालाच म्हणतात स्वर्ग, अशी जमीन कसायला मिळाली पाहिजे...घरी आल्यावर कळले, त्या दिवशी वसंत पंचमी होती. आज रविवार, बर्याच दिवसांनी प्रात:स्मरणीय श्लोक गुणगुणला:
श्वेत कमळावर विराजमान शुभ्रवेशधारी ज्ञान देवता, सरस्वतीची कृपा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी,शेतांत ही सोन पिकवितो, लक्ष्मी हातात येते.
सरस्वतीच्या कृपेने माया-मोहाचे पाश तुटतात आणि ज्ञानाचा आनंद ही प्राप्त होतो.
खुसरोने ही विचार केला, त्यांचे गुरु उदास आहे, त्यांना ही प्रसन्न केले पहिजे. त्यांनी सरसोंची फुले आपल्या पगडीत लावली, हिदू पुरुषांप्रमाणे पीत वस्त्र धारण केले, फुलांचा शृंगार केला. आपल्या काही सुफी मित्रांना आणि कव्वालाना सोबत घेतले, औलीयाला देण्या साठी, सरसो आणि टेसूच्या गुलदस्ता तैयार केला. वासंतिक गीत गात, नाचत गाजत ते हजरत निजामुद्दीन औलिया समोर आले. त्यांची विचित्र वेशभूषा आणि नाचगाणे पाहून औलीयाला हसू आले, त्यांची उदासी दूर झाली. आपले गुरु आनंदित झाले, हे पाहून देवीचे आभार मानण्यासाठी अमीर खुसरो यांनी आपल्या मित्रांसमवेत देवीच्या चरणी सरसोची फुले अर्पण केली. त्या दिवसापासून निजामुद्दीन औलीयाच्या दर्गाहावर वसंत पंचमीचा उत्सव सुरु झाला. आज ही मुस्लीम बांधव पीतवस्त्र धारण करून, नाचत गाजत अमीर खुसरो यांनी लिहलेली वासंतिक गीत गात निजामुद्दीन औलीयाच्या दरगाह वर जाऊन श्रद्धेने पिवळी फुले त्यांच्या चरणी अर्पण करतात. खरंच ज्ञानाच्या उजेडात मोह-पाश नष्ट होतात आणि भक्ताला आनंदाची प्राप्ति होते.
सगन बिन फूल रही सरसों।
सगन बिन फूल रही सरसों।
अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,
और गोरी करत सिंगार,
मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों,
सगन बिन फूल रही सरसों।
तरह तरह के फूल खिलाए,
ले गेंदवा हाथन में आए।
निजामुदीन के दरवज़्ज़े पर,
आवन कह गए आशिक रंग,
और बीत गए बरसों।
सगन बिन फूल रही सरसों।
January 29, 2015
सीमाभागातील मराठी माणूस मात्र महाराष्ट्राकडे नि दिल्लीतील मराठी नेत्यांकडे आशाळभूतपणे पहात राहीला नि अजूनही पहातोच आहे. सीमाप्रश्नाचे गांभिर्य केंद्राला कधी वाटलेच नाही. त्याचा नेमका फायदा कर्नाटकाने उचलला. बेळगावची एक इंच भूमीही कर्नाटकाला देणार नसल्याची दुर्योधनी दर्पोक्ती ते करू लागले.
November 25, 2021
पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.
July 12, 2021
आंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते. आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते.
September 15, 2017
वेदांतील प्राण्यांची किॅवा अवयवांची नावे ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची नावे आहेत.
वेदांमध्ये(संहिताभागात) पशुहत्या किॅवा मांसभक्षण आहे असा मिथ्या आरोप करणारे तथाकथित विद्वान नेहमी वेदांतील पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नावे पुढे करतात.
वेदांत ऋषभ, गौ, श्वान, हस्ति, अज असा शब्द आढळला की लगेचच त्याचा बैल,गाय, कुत्रा, हत्ती किॅवा बोकड असा बालिश अर्थ काढून त्याची किॅवा त्याच्या अवयवांची हत्या असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतात हे लोक. पण ही नावे त्या पशुंची किॅवा त्यांच्या अवयवांची नसून तीच नावे असणार्या आयुर्वैदिक औषधी वनस्पतींची आहेत हे खालील यादीत मी सविस्तर दिलं आहे. ही नावे आले की सर्वसामान्य मनुष्य लगेचच तसा अर्थ घेऊन मोकळा होतो. पण वास्तविक आयुर्वेदाचा अभ्यास केला व त्याचे शब्दकोश अभ्यासले, की जे भावप्रकाश निघण्टु वगैरे नावाने प्रसिद्ध आहेत, त्यात ही नावे औषधी वनस्पतींचीच आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे पशुंच्या नावाची किॅवा अवयवांची सारखीच नावे असणारी आयुर्वैदक वनस्पती आढळतात व तोच वनस्पती अर्थ त्या वैदिक ऋचेचा घ्यायचा हे उघड आहे. ह्याचे कारण सरळ आहे की
"मा हिॅस्यात सर्वभूतानि"
कोणत्याही प्राण्याची हत्या करु नका
ही वेदांचीच आज्ञा ! तत्पूर्वी
वेदांत मांस शब्दाचा अर्थ
मांस शब्दाचा अर्थ आपण जसा आज घेतो तसा तो नसून मांस म्हणजे फळाच्या आतला जो गर असतो त्यालाच मांस हा शब्द आहे. शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा मांस शब्दाचा अर्थ "परमान्नं तु पायसम्" असा दुध व तांदळाची खीर किॅवा दुधाचे पदार्थ असा सांगितलाय. पण स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढणे ही आजकाल एक फॅशन आहे. असो.
जो वेद साक्षात् परमेश्वराची वाणी तो वेदभगवान यज्ञांमध्ये कोणत्याही प्राणीमात्राच्या हत्येची आज्ञा का बरे देईल???
कारण यज्ञाचं वर्णन ऋग्वेदाच्या पहिल्याच सुक्तांत चोथ्याच ऋचेत खालील प्रकारे आलंय.
अग्ने यं यज्ञमध्वरं विश्वत: परिभूरसि ! स इद्देवेषु गच्छति !
ऋग्वेद - १.१.४
"यज्ञं अध्वरं" ह्या शब्दाचा अर्थ निरुक्तकारांनी दिला आहे
अध्वर इति यज्ञानाम – ध्वरतिहिंसा कर्मा तत्प्रतिषेध: - निरुक्त २।७
ध्वर म्हणजे हिॅसा व त्याचा जिथे निषेध तो अध्वर ! म्हणजे यज्ञ हा "अध्वर" म्हणजे अहिंसक असतो. वेदांमध्ये हा "अध्वर" शब्द अनेकवेळा आलेला आहे. शतपथ ब्राह्नणामध्ये तर तिसरे कांड "अध्वर" नावानेच आहे.
वेदांत "आलंभन" शब्दाचा अर्थ
आलंभन ह्या शब्दाचा विकृत अर्थ वध असा काढणारे लोक त्याच्या वास्तविक अर्थाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात. एक साधं प्रमाण घेऊयात
पारस्कर गृह्यसुत्रांत सांगितलं आहे की
अथास्य (ब्रह्नचारिण:) दक्षिणासं अधिह्रदयं आलभते ! (२.२.१६)
अर्थ - गुरु त्याच्या शिष्याच्या ह्रदयांस हात लावतो.
उपनयनाच्या वेळी "ह्रदयालम्भन" अशी एक क्रिया असते ज्यात गुरु स्वत:च्या शिष्याच्या म्हणजे त्या बटुच्या ह्रदयांस हात लावतो. इथे "आलंभन" चा अर्थ "स्पर्श" असाच अभिप्रेत आहे व वेदांतही तोच अर्थ आहे. पण पाश्चिमात्यांची टुकार व भिकार वेदानुवाद व विशेषत: मेकडाॅनेल व कीथ ह्यांच्या विकृत अशा "वैदिक इण्डेक्स" ह्या द्विखंडात्मक ग्रंथात , जो आम्ही स्वत: पूर्ण मुळ आंग्लभाषेत व हिंदीतही वाचला आहे व ज्यामध्ये "आलंभन" शब्दाचा "वध" असा विकृत अर्थ केला गेल्याने त्यालाच आपले लोक अंधपणाने प्रमाण मानतात. आता ह्यापेक्षा दुर्दैव कोणते??? हा आंग्लभाषेत व हिंदी भाषेतही पीडीएफ स्वरुपात डिजीटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.
"आलम्भन" हा शब्दांमध्ये "लभ" ह्या संस्कृत धातुचा पाणिनीनुसार अर्थ "प्राप्त करणे" असा आहे. "लभ्" ह्या धातुचा आणखी अर्थ "प्रेरणा" असाही होतो. हाच अर्थ इतर अनेक व्याकरणकारांनीही घेतला असल्याने म्हणूनच आलंभनचा अर्थ "आ" शब्द अधिक आल्याने "अत्यंत प्राप्ती" असा योग्य आहे. संस्कृतच्या अध्ययनासाठी जी वाराणशीतील संस्कृत पाठशाळा सर्वभारतात व जगातही प्रमाण मानली जाते, त्याच पाठशाळेने "धातुपाठ समीक्षा" नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, त्यातही "लभ्" शब्दाचा अर्थ प्राप्ती असाच घेतला असून त्यात हिॅसा किॅवा वध असा कुठेही घेतला नाही.
तरीही उदाहरणार्थ यजुर्वेदांतली एक ऋचा पाहु
ब्रह्मणे ब्राह्नणमालभते, क्षत्राय राजन्यम् !
नृत्याय सूतं, धर्माय सभाचरम् !
यजुर्वेद - ३०.६
ब्रह्मणे ब्राह्मणं आलभते - ज्ञानासाठी ज्ञानीला प्राप्त करतो.
क्षत्राय राजन्यं आलभते - शौर्यासाठी शूरपुरुषांस प्राप्त करतो.
नृत्ताय सूतं आलभते - नाचण्यासाठी सूतांस प्राप्त करतो किॅवा बोलवितो
धर्माय सभाचरं आलभते - धर्माज्ञानासाठी किॅवा धर्मासाठी धर्मसभेस किॅवा सदस्यास प्राप्त करतो.
त्यामुळे "आलंभन" शब्दाचा अर्थ वध किॅवा हत्या असा घेणं विकृतीचा कळस आहे. ह्याप्रमाणेच "गवालंभ" ह्या शब्दाचा अर्थही गाईस प्राप्त करणे असा असून तिची "हत्या" असा कुठेही होत नाही.
आता वर सांगितलेली ही यादी किती मोठी आहे ते आपण पाहु. मी हिॅदी आयुर्वेदिक कोषातली नावे दिली आहेत, ती खालीलप्रमाणे.
खालील आधी वेदांतील पशुंची नावे व नंतर त्याची तेच नाव असलेली आयुर्वैदिक औषधी दिलेली आहे.
पशुनाम - वनस्पती नाम
१. वृषभ - ऋषभस्कन्द
२. मेष - जीवशाक
३. श्वान - कुत्ताघास, ग्रन्थिपर्ण
४. कुक्कुट - शाल्मलीवृक्ष
५. मार्जार - बिल्लीघास, चित्ता
६. नर - सौगन्धिक तृण
७. मयूर - मयुरशिखा
८. मातुल - घमरा
९. बीछु - बीछुबूटी
१०. मृग - सहदेवी, इन्द्रायण, जटामासी, कपूर(कापूर)
११. सर्प - सर्पिणीबूटी
१२. पशु - अम्बाडा, मोथा
१३. अश्व - अश्वगन्धा, अजमोदा
१४. कुमारी - घीकुमार
१५. हस्ति - हस्तिकन्द
१६. नकुल - नाकुलीबुटी
१७. वपा - झिल्ली अर्थात बक्कल के भीतर का जाला
१८. हंस - हंसपदी
१९. अस्थि - गुठली
२०. मत्स्य - मत्स्याक्षी (मराठीत मत्स्याण्डी) हिचा उल्लेख रामायणात आहे ज्यावरून काही दीडशहाणे रामाला मांसाहारी म्हणतात) ?
२१. मांस - फल का गुदा, जटामासी (थोडक्यांत फळाचा किंवा वनस्पतीतला आतला गर)
२२. मूषक - मूषाकर्णी
२३. चर्म - बक्कल
२४. गो - गौलोमी
२५. स्नायु - रेशा
२६. महाज - बडी अजवायन
२७. नख - नखबूटी
२८. सिॅही - कटेली, वासा
२९. मेद - मेदा
३०. खर - खरपर्णिनी
३१. लोम - जटामासी
३२. काक - काकमाची
३३. ह्रद - दारचीनी
३४. वाराह - वाराहीकन्द
३५. पेशी - जटामासी
३६. महिष - महिषाक्ष, गुग्गुळ
३७. रुधिर - केशर
३८. श्येन - श्येनघंटी(दन्ती)
३९. आलम्भन - स्पर्श
जिज्ञासूंनी आयुर्वैदिक कोष मुंबई, किॅवा भावप्रकाश निघण्टु किॅवा इतर आयुर्वैदिक कोष पहावेत. प्रमाण मिळेल.
हे आहेत वनस्पती ! जर हा अर्थ घेतला नाही तर किती गोंधळ व अनर्थ होतो व झाला आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकताच नाही.
शेवटी
नोsलुकोsप्यवलोकते दिवा किॅ सूर्यस्य दूषणम् !
तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
April 7, 2017
1975-1976 मध्ये बँकेत सहजासहजी नोकरी मिळत असे त्या काळातील गोष्ट. नोव्हेंबर 1976 मध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला लागलो. त्यावेळेस माझे वय अवघे 19 वर्षे पूर्ण. पहिलीच नोकरी. आधी कुठे नोकरीचा अनुभव नाही. मी ज्या दिवशी बँकेत नोकरीला रूजू झाले.
April 24, 2023
सम्पत्कराणि सकलेन्द्रिय नन्दनानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि।त्वद्वंदनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये।।1१३।।
मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.
सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.
येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.
त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.
सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.
शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.
साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.
दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.
अशी ही आईची वंदना,
मामेव- माझ्यावरच, मलाच.
मातरनिशं - हे माते अनिश अर्थात सतत.
कलयन्तु- प्राप्त होत राहो.
अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 22, 2020
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील प्रवरा नदीच्या काठावर महामयी मातेचं देवस्थान वसलेलं आहे; या देवीच्या स्थापनेचा इतिहासात डोकावल्यास असं आढळलं की मोगलांच्या काळात या परिसरात अनेक वेळा आक्रमण होत
October 5, 2013
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥
मना संग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बाले लागला काल हा पाठीलागी ॥
जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
परी सेवटी काळमूखी निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
September 20, 2017
स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते…..
September 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti