(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खोबरेल तेलाने करावा केसांचा मसाज

    केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.

    तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य

    - खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.

    प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.

    १५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.

    थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.

    मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.

    अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.

    १५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
    मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 8, 2017


  • महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमण्याची मागणी

    गोवंश हत्याबंदी कायदा केल्याविषयी युती शासनाचे अभिनंदन : आता महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमावा ! - वारकरी प्रबोधन महासमिती

    नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केला. या कायद्याची मागणी वारकर्‍यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. काँग्रेस शासनाच्या काळात मुंबई-नागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चे, जेल भरो आंदोलन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची पूजाबंदी अशा विविध तर्‍हेने प्रयत्न केले आहेत. अखेर या लढ्याला १९ वर्षांनी यश आले. त्याविषयी प्रथम युती शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन ! गोवंश हत्याबंदी कायद्यापाठोपाठ आता महाराष्ट्र शासानाने विशेष गोसंवर्धन खाते तयार करून या क्षेत्रातील एका अभ्यासू तज्ञ व्यक्तीला गोवसंर्धन मंत्री म्हणून नेमावे, अशी मागणी श्रीवारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री यांनी समस्त वारकर्‍यांच्या वतीने शासनाकडे केली आहे.

    महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात हजारो कत्तलखाने काढून दरवर्षी कोट्यवधी देशी गायींची कत्तल होत आहे. देशी गोवंश नष्ट केला जात आहे. देश वाचावा, अशी वारकर्‍यांची भूमिका आहे. गाय, बैल वाचविले, तर शेती आणि शेतकरी वाचेल आणि देश वाचेल. अस्सल देशी गायीपासून पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेले गोमूत्र, शेणापासून यार केलेले पंचगव्य, गोवर्‍या, तसेच दुध, दही, तूप मिळते. या सर्व गोष्टी हिंदु धर्मांत पवित्र मानल्या आहेत. यामुळे गीता, गंगा आणि गाय यांचे रक्षण झाले पाहिजे. स्वत: भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायीच्या सेवेसाठी या देशात अवतार घेतला आहे.

    राज्यात गोपालन करणार्‍या अनेक संघटना आणि गोप्रेमी व्यक्ती आहेत. शासनाने त्यांना सर्व सहकार्य करावे. गायी सांभाळणार्‍यांना आर्थिक साहाय्य करावे. गोशाळांसाठी वनखात्याच्या उपलब्ध असलेल्या जमिनी द्याव्यात. गायीचे अनन्यसाधारण महत्त्व शेतकर्‍यांना लक्षात यावे, यासाठी एक शासकीय समिती स्थापन करून राज्यभर शिबिरे घ्यावीत. ज्याप्रमाणे सांस्कृतिक मंत्रालय आहे, कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री आहे, तसेच गोसंवर्धन खाते तयार करावे आणि राजस्थानच्या धर्तीवर गोसंवर्धन मंत्री नेमावा, अशा आमच्या मागण्या आहेत. त्याचा शासनाने विचार करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

    आपला नम्र,
    रामेश्‍वर शास्त्री महाराज, अध्यक्ष,
    श्रीवारकरी प्रबोधन महासमिती
    संपर्क क्र.: ९८२२४४३६९०

      March 5, 2015


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सव्वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग एक !

    बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.

    आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.

    काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
    (दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)

    जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.

    भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
    हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
    आयुर्वेद सांगतो,
    पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
    झालं....
    टीकाकार आता विचारतील,
    "म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
    या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !

    धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?

    तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.

    निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.

    जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.

    निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.

    फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.05.2017

      May 6, 2017


  • राजकारण्यांना सैन्यासाठी काय करता येईल ?

    काही राजकीय पक्ष व नेते दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रात्री १२ वाजता सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठतात. आज अनेक सैनिकांविरुद्ध खोटे-नाटे खटले कोर्टात चालू आहेत. पण देशातील राजकीय पक्षांचे हुशार वकील त्यांना मदत करण्यास का पुढे येत नाहीत?  सैन्यावर होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, सैन्याची बदनामी करणारे व्हिडिओ पसरवणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत?

      February 27, 2019


  • झेंडावंदन

    मी आज सकाळी झेंडावंदन झाल्या नंतर बऱ्याच मित्राना व ओळखीच्या लोकांना फोन केले

    विचारले झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला का
    बऱ्याच लोकानंचा व मित्रांचा रिप्लाय आला नाही यार आज आम्ही झेंडावंदनाच्या कार्यक्रमास गेलो नाही आज सुट्टी उपभोगतोय कोन मित्राबरोबर, कोन गावी ,कोन फँमीलीबरोबर

    प्रश्न मलाच पडला

    ह्या देशाला स्वतंत्र्य मिळवुन देण्यासाठी किती लोकांनी बलीदान दिले
    आज त्यांच्या मुळे हे स्वतंत्र्य आपण उपभोगतोय..
    निदान त्यान श्रध्दांजली साठी तरी हजर राहिल पाहिजे
    कमी आधिक सर्वच सरकारी व खासगी आँफिस आँफिस मधील कर्मचाऱ्यांची झेंडावंदनास हजेरी खुप कमी आसते
    सरकारी कर्मचाऱ्यास कुठ तरी झेंडावंदनास हजर होता म्हनून पुरावा द्यावा लागतो तोही तो नेहमीच्या सरकारी पद्धतीनी मिळवून सादर करतो
    व खासगी आँफिस मध्ये आसा पुरावा लागत नसले मुळे इथ तर कार्यक्रमास उपस्थिती खुपच विरळ आसते

    काय म्हनाव याला

    ज्या स्वतंत्र्या मुळे हे लोक आज हे आसे मोकाट वागतात..

    निदान..।

    त्याची कृतज्ञता म्हनून तरी झेंडावंदन कार्यक्रमास हजर राहिल पाहिजे

    विचार करा

      August 16, 2016


  • सुभाषित रत्नांनी – भाग ६

    १. चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
    सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

    अर्थ :
    चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता (काळजी) जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर (मृताला) जाळते. हे संस्कृत सुभाषित फारच प्रसिद्ध आहे.


    २. नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्, नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता |
    नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतैव ||

    अर्थ :
    (खूप) कष्ट करून गेलेली संपत्ति मिळवता येते. (विसरल्यामुळे) गेलेली विद्या अभ्यास करून (पुन्हा) मिळवता येते. तब्बेत खराब झाली तर चांगले उपचार करून ति सुधारता येते. पण वेळ (वाया) घालवला तर तो गेला तो गेलाच. (वेळ वाया घालवण टाळावं). वेळेचे महत्व वर्णन केले आहे. गेलेली वेळ किती मौल्यवान असते कारण ती परत येत नाही.


    ३. श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |
    न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||

    अर्थ :
    उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.
    कबीराचा दोहा पण हेच सांगतो. कल करे सो आज कर, आज करे सो अब, क्षणमे प्रलय होगा, बहुरी करेगा कब?


    ४. त्वयि मेऽनन्यविषया मतिर्मधुतेऽसकृत् |
    रतिमुद्वहताद्धा गङ्गेवोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

    अर्थ :
    हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे (न थांबता, सतत) समुद्राकडे झेप घेतो त्याप्रमाणे तुझ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक (दुसरा कुठलाही विचार न येता फक्त तुझेच चिंतन एवढा एकच) विचार येवो. देवाची भक्ती करतांना खूप तल्लीन व एकरूप होऊन करावी लागते तरच देव तुम्हाला पावतो. म्हणूनच मीरादेवीस श्रीकृष्ण भेटला.


    ५. भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः |
    दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ||

    अर्थ :
    महाभारत हे पाचवा वेद (वेदा इतका पवित्र) आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे. (अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो). उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. (मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.)
    हा पण एक प्रसिद्ध श्लोक आहे.


    ६. मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः |
    उत्स्रृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ||

    अर्थ : (फार) मऊपणाने वागलं तर नेहमी अपमान होतो. खूप तापटपणा केला तर (सगळ्यांशी) भांडणं होतात. म्हणून या दोन्ही गोष्टी सोडून (माणसाने) मध्यममार्ग स्वीकारावा हे उत्तम.


    ७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |
    अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

    अर्थ:
    सज्जन (नुसत) पाहिल्यावर नारळासारखे (खडबडीत; कडक; कठोर असावेत असे दिसते); पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे (दुर्जन) बाहेरूनच फक्त बोराप्रमाणे आकर्षक असतात. (पण अनुभव चांगला येत नाही.) पण आतून दुष्टच असतात.


    ८. नभो भूषा पूषा कमलवनभूषा
    मधुकरो वचोभूषा सत्यं वरविभवभूषा वितरणम् |
    मनोभूषा मैत्री मधुसमयभूषा मनसिजः
    सदोभूषा सूक्तिः सकलगुणभूषा च विनयः ||

    अर्थ:
    सूर्य हा आकाशाचा अलंकार आहे. कमळांच्या बागेला भुंगा शोभा आणतो. खरं बोलण्याने वाणी शोभून दिसते. अधिक संपत्ती दान करण्याने सुंदर दिसते. मैत्री हा मनाचा अलंकार आहे. वसंतऋतु मध्ये मदनाचा अस्तित्व शोभून दिसते. सभेमध्ये चांगल वक्तृत्व शोभून दिसते. (तर) नम्रता सर्व गुणांना खुलवते.


    ९. खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
    आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

    अर्थ:
    दुष्ट माणसाला दुसऱ्याच वैगुण्य मोहोरी एवढ असलं तरी डोळ्यावर येत, पण स्वतः मधे मात्र बेलफळाएवढा (मोठा) दोष दिसत असून सुद्धा तो न दिसल्याप्रमाणे वागतो. अशाच अर्थाची मराठीत म्हण आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.


    १०. रिपुशेषं व्याधिशेषं चाग्निशेषं तथैव च |
    पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्माच्छेषं न कारयेत् ।।

    अर्थ:
    शत्रू, रोग आणि अग्नि या तिघांचा अल्पसा भाग जरी शिल्लक राहिला तरी ते पुनः वाढतात . म्हणून शत्रुचा नाश करताना, रोगावर उपाय करताना आणि अग्नि विझवताना तो किंचितही शिल्लक राहणार नाही असे बघावे. महाराणा प्रताप याने महंमद घोरीला युद्धामद्ध्ये हरवून बारा वेळा जीवदान दिले पण घोरीनेच त्याला शेवटी ठार केले.


    ११. अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम।
    उदार चरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम ।।

    अर्थ:
    हे माझे, हे दुसऱ्याचे असे असा विचार छोट्या मनाचे लोक करतात. विशाल मनाचे लोक हि पृथ्वी आपले कुटुंब आहे असा विचार करतात.


    १२. उद्यमं सक्षमं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।
    षडेते यत वर्तन्ते तत्र देवः सहायकृत। ।

    अर्थ:
    प्रयास, साहस, धैर्य, बुद्धि , शक्ति तथा पराक्रम देखील साहाय्य करतात. ज्याच्याकडे हे सहा गुण आहेत त्याला देव देखील साहाय्य करतात.


    १३. धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
    तस्माद् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
    मनुस्मृति ८. १५

    धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।
    तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ॥
    महाभारत ३.११४.१३१

    एकाच अर्थ असणारे हि सुभाषिते वेगवेगळ्या ठिकाणी उद्धृत झाली आहेत.

    अर्थ:
    (ज्याचा) धर्म नष्ट झाला (तोही) संपून जाईल, जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करतो. म्हणून मी धर्माचा त्याग करणार नाही किंवा धर्माला नष्ट करणार नाही, कुणीही नष्ट करू नये. तसे केले तर मीच नष्ट होईन, तोच नष्ट होईल.


    १४. उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे।
    असाधुजनसंपर्के यः पलायेत् स जीवति ॥
    चाणक्यनीतिदर्पण अ. ३.१९

    अर्थ: जो माणूस नैसर्गिक आपत्ती, परक्याचा हल्ला, भयानक दुष्काळ, दुष्टांची संगति अशापासून दूर पळून जातो तो जीवंत राहतो. अशा वेळी स्वतःचा जीव वाचवणेच सर्वात जास्त महत्वाचे असते. हिंदी मधल्या म्हणी प्रमाणे सिर सलामत तो पगडी पचास।


    १५. विद्याभ्यासो विचारश्च समयोरेव शोभते।
    विवाहश्च विवादश्च समयोरेव शोभते ॥
    सुभाषितरत्नभण्डागार -सुधर्मादिनपत्रिका

    अर्थ: समान (पातळीवरील) लोकांनी एकत्र विद्या शिकणे आणि विचारविनिमय करणे बरे दिसते, त्याप्रमाणेच समान लोकांमध्येच विवाह आणि वादविवाद होणे चांगले असते.


    १६. गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो
    बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल:।
    पिको वसन्तस्य गुणं न वायस:
    करी च सिंहस्य बलं न मूषक: ॥

    अर्थ: गुणी पुरुषच दुसऱ्याचे गुण ओळखू शकतो. गुणहीन पुरुष ते ओळखू शकत नाहीत. बलवान पुरुषच दुसऱ्याचे बळ (शक्ती) ओळखतो. बलहीन पुरुष हे करू शकत नाही. वसन्त ऋतु आला हे कोकिळा ओळखते, कावळा नाही. वाघाची शक्ती हत्तीचं जाणतो, उंदीर नाही.


    १७. कन्या वरयते रुपं
    माता वित्तं पिता श्रुतम्
    बान्धवा: कुलमिच्छन्ति
    मिष्टान्नमितरेजना:

    अर्थ: विवाहाच्या वेळी कन्येला (वधूला) सुंदर पती पाहिजे असतो. तिच्या आईला सधन जावई पाहिजे असतो. तिच्या वडिलांना विद्वान जावई पाहिजे असतो, तसेच तिच्या नातेवाईकांना चांगले खानदान पाहिजे असते. परंतु बाकी लोक लग्नात केलेल्या फक्त मिष्टान्ना करता येतात.


    १८. अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद गजभूषणम्।
    चातुर्यं भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम्॥

    अर्थ: घोड्याचा वेग हि त्याची ओळख आहे, मस्त चाल हे हत्तीचे आभूषण आहे, चातुर्य हा स्त्रीचा अलंकार आहे व सदा उद्द्योगी राहणे हे विद्वान पुरुषाचे लक्षण आहे.


    १९. वॄत्तं यत्नेन संरक्ष्येद् वित्तमेति च याति च।
    अक्षीणो वित्तत: क्षीणो वॄत्ततस्तु हतो हत:॥

    अर्थ:
    आपल्या चारित्र्याचे रक्षण सदैव केले पाहिजे. कारण सदाचारी माणसाच्या साठी चरित्र हेच सर्वस्व असते. पैसा( धन) येते व जाते. गेलेला पैसे परत मिळवता येतो, नष्ट झालेले चारित्र्य पुन्हा मिळवता येत नाही. ती व्यक्ती समाजात तोंड दाखवायच्या लायकीची राहत नाही. मेलेल्या माणसा सारखी त्याची स्थिती असते.


    २०. दिवसेनैव तत् कुर्याद् येन रात्रौ सुखं वसेत्।
    यावज्जीवं च तत्कुर्याद् येन प्रेत्य सुखं वसेत्॥

    अर्थ: मनुष्याला दिवसभर असे (चांगले) काम केले पाहिजे कि तो रात्रभर सुखाने झोपू शकेल. आणि जिवात जीव असे पर्यंत सत्कृत्य केले पाहिजे कि मेल्या नंतर सुद्धा तो सुद्धा सुखी राहील.


    २१. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
    सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥

    अर्थ: जसे आकाशातून पडलेले पाणी कसेही (ओढा, नदी, इत्यादी ) मार्गे शेवटी समुद्राला जाऊन मिळते, तसे कोठल्याही देवतेला केलेला नमस्कार एकाच परमेश्वरास मिळतो.


    २२. मूर्खस्य पञ्च चिह्नानि गर्वो दुर्वचनं मुखे।
    हठी चैव विषादी च परोक्तं नैव मन्यते॥

    अर्थ: मूर्ख लोकांचे पाच गुणधर्म असतात. ते अहंकारी असतात, त्यांच्या तोंडात कायम वाईट शब्द असतात, ते जिद्दी असतात , दुसऱ्या लोकांचे अजिबात ऐकत नाहीत व नेहमी वाईट चेहरा करून बसतात.


    २३. अष्टौ गुणा पुरुषं दीपयंति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
    पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥

    अर्थ: आठ गुण पुरुषांना शोभतात – बुद्धि, सुन्दर चरित्र, आत्म-नियंत्रण, शास्त्र-अध्ययन, साहस, मितभाषिता, यथाशक्ति दान आणी कृतज्ञता.


    २४. क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा।
    क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥

    अर्थ: क्षमा निर्बल लोकांची शक्ती आहे, क्षमा बलवान लोकांचे आभूषण आहे. ह्या जगास क्षमेनेच वश केले आहे. क्षमेमुळे कोणती गोष्ट्य प्राप्त होत नाही? (सर्व गोष्टी प्राप्त होतात).


    २५. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रम नैव च नैव च।
    अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ।।

    अर्थ: (यज्ञा मद्धे) अश्व नाही, हत्तीही नाही, व्याघ्र तर नाहीच नाही पण गरीब बोकडाचा (अजापुत्र) मात्र बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बलांना घातक असतात.


    आजकालच्या काळात मोठे मोठे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. पण त्यात बळी कोण जातो?
    त्याच्या वरचा हा नवीन श्लोक :

    सेक्रेटरी नैव,चेअरमन नैव, मिनिस्टर नैवे च नैवे च ।
    कनिष्ठ लिपिकः बली दद्ध्यात, सी आर दुर्बल घातकः ।।

    अर्थ: (घोटाळ्यात) सेक्रेटरी नाही, चेअरमन, मिनिस्टर तर नाहीच नाही,
    बिचारा कनिष्ठ बाबू चा बळी जातो कारण त्याचा गुप्त अहवाल (सी आर) खराब केला जातो.


    -- डॉ. दिलीप कुलकर्णी
    मोबा: ९८८१२०४९०४
    दिनांक: २३.०४. २०२३

      June 5, 2023


  • मुलगी शिकली

    स्वयंपाकघरापासून शेजघरापर्यंत,
    तिचं आयुष्य जडलं होतं.
    जन्म देणं अन् रांधून वाढणं,
    इतकंच तिचं कर्म होतं.

      June 15, 2022


  • सर्दी खोकल्यावर घरगुती इलाज

    कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकले तर ?

    लसूण:

    लसणात एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म असून सर्दी खोकल्यावर ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील ‘आलाय्झीन ‘ हा घटक जंतूंचा नाश करतो .

    टीप १ -जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे,ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ शकतो . अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.

    टीप २ -लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .

    हळद :

    स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.

    टीप १ -घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.

    टीप २ -हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.

    टीप ३-चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

    आयुर्वेदिक काढा:

    हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.

    टीप १ -चार वेलची , काळामिरीचे दाणे, लवंगा , ताजं आलं व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे उकळा . उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा . त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.

    टीप २ -१५-२० तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा . दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा . यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते .

    टीप ३-कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.

    कंठसुधारक वडी

    आज काल घशातील खवखव , सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे

    कशी कराल कंठसुधारक वडी ?

    आलं बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .

    कफजन्य खोकला

    कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.

    टीप १-चार पाच मिरीचे दाणे , थोडे जिरे व गुळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण उकळा . हे मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड करून प्या . यामुळे तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल .

    टीप २-सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या. या २ चमचे रसात एक चमचा मध घालून रोज दोनदा जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या . यामुळे कफाच्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होइल

      April 6, 2017


  • नवरात्र – उत्सव सृजनाचा

    आपले सर्वच महत्याचे सण ज्येष्ठ ते भाद्रपद या महिन्यांत येतात. हे चार महिने पावसाचे. आपला देश पुर्वापार कृषी प्रधान. आजही आपल्या देशातील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पावसाच्या या चार महिन्यांतच आपले सण का असावेत याचं उत्तर शेती आणि पाऊस यांच्या संबंधातच आहे.

      September 21, 2017


  • श्री मोहीनीराज आरती

    जय देवा जय देवा जय मोहिनी देवा

    शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा ।।

    समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली

    सर्व देवांना ती तु अर्पण केली ।

    अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला

    वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।।

    रुप बदलून राहू देवासह आला

    नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला

    नजरेतुन तुझ्या तो नाही सुटला

    सुदर्शन चक्रे त्याचा निप्पात केला ।।

    शरण येऊनी तुजला भक्ती जे करती

    सुखी ठेऊनी त्यांना मुक्ती तु देशी ।

    भक्त रक्षिणीया तू धावुनीया आला

    नेवासे नगरी तू ऊभा ठाकला ।।

    सुरेश काळे

    सातारा.

      July 26, 2018