वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पोटदुखीची आणखी काही कारणे आहेत. स्टमक फ्लू किंवा विषाणूद्वारे होणारे पोटातील संक्रमण, अन्नातून विषबाधा होणे, कृमी होणे, अॅ सिडिटी, टायफॉईड, कावीळ या आजारांमध्ये पोटदुखी होते. ही कारणे केवळ उदाहरणासाठी आहेत. यामध्ये पोटदुखीची सर्वच कारणे समाविष्ट नाहीत. पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन, रक्त वाहिन्यामधील अडथळा निर्माण होणे, गाठ होणे किंवा अन्य कारणांमुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते.
लक्षणे
पोटात मुरडा येऊन वेदना होणे, पोट फुगणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे, उलटी होणे, मळाद्वारे आव किंवा रक्त पडणे अशा स्थितीत पोट दुखत असल्यास, वारंवार उलट्या होत असल्यास, पोटाला स्पर्श करताच तीव्र वेदना होत असल्यास किंवा श्वारस घेण्यास त्रास होत असल्यास तसेच पोट साफ होण्यास अडचण येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.
उपचार
पोटदुखीवर उपचार हा त्यामागची कारणे आणि लक्षणांच्या आधारावर केला जातो. साधारणपणे अपचनासाठी अॅचन्टासिड किंवा गॅस दूर होण्याची औषधे दिली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने कृमी नष्ट करण्याचे औषध घेता येऊ शकते. हलका आहार ठेवावा, पुरेशा प्रमाणात पातळ पदार्थ घ्यावेत, परिस्थिती नियंत्रणात नसल्यास रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि उपचार करावा.
पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सामान्य नियम पाळता येऊ शकतात. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ आहार याकडे लक्ष द्यावे. फळांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खावेत. नियमित अंतराने आणि कमी प्रमाणात आहार घ्यावा. खाण्यापूर्वी आणि शौचालयातून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. याचे कारण म्हणजे पोटातील संक्रमणाची बरीचशी कारणे असू शकतात. अस्वच्छ अन्न खाणे किंवा पाणी पिणे, अस्वच्छ हातांद्वारे शरीरात जंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वारंवार जुलाब होणे, अशक्तपणा वाटणे, उलटी होणे, काही वेळेला ताप येणे अशी लक्षणे दिसतात.
पोट खराब असेल तर तात्पुरते घरगुती उपाय काही प्रमाणात नक्कीच आराम देऊ शकतात.
सफरचंदाचे व्हिनेगर : पोटदुखीसाठी सफरचंदाचे व्हिनेगर खूप लाभदायक ठरते. यामध्ये पेक्टीनचे प्रमाणे मुबलक प्रमाणात असते. यामुळे पोटदुखी आणि मुरडा येणे यापासून आराम मिळतो. तसेच यातील आम्लीय गुण खराब पोटातील संक्रमण बरे करण्यास उपयोगाचे ठरते. एक चमचा व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून ते प्यावे.
आले : पोट बिघडल्यास आल्याचा वापर खूप फायद्याचा ठरतो. यामध्ये अॅेन्टीफंगल आणि अॅ न्टीबॅक्टेरीयल घटक असतात. ते पोटदुखीपासून आराम देतात. एक चमचा आले पावडर दुधात मिसळून दिल्यास आराम मिळतो.
दही पोटदुखीत दही फायद्याचे ठरते. यातील जीवाणू संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे पोट लवकर बरे होते आणि ते थंडही राहते.
केळे वारंवार जुलाब होत असल्यास केळ खाणे फायद्याचे ठरते. कारण केळामध्ये पेक्टीन असते ते बांधण्याचे काम करते. तसेच त्यात पोटॅशियम भरपूर असल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो.
पुदिना पुदिन्याची पाने प्राचीन काळापासून अनेक समस्यांवर उपचार म्हणून वापरली जातात. यातील अॅ्न्टीऑक्सिडन्ट पचन क्रिया सुधारण्यासाठी सहाय्यक ठरतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ संतोष काळे
March 2, 2017
चित् म्हणजे चैतन्य, ज्ञान आणि आनंद यांची जणू लतिका म्हणजे वेल. भक्तांना या गोष्टी पुरविणारी. अशी माझी आई जगदंबा आहे.
February 10, 2020
हा फोटो नीट पहा. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात.
August 5, 2023
त्रिपुरासुर वधाची लीला करताना भगवान शंकरांनी जे विश्वव्यापक रूप धारण केले त्याचा संदर्भ चिंतनात घेऊन आचार्य श्री प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत.
August 27, 2020
भारतातील पहिले व्यावसायिक हवाई उड्डाण १८ फेब्रुवारी १९११ रोजी अलाहाबाद ते नैनी असे १० किलोमीटरचे होते. फ्रेंच नागरिक-मॉल्सियर पिकेट विमान चालक होता. पण मुलकी प्रवास सेवा १९१२ सालच्या डिसेंबर महिन्यात सुरू झाली. ती कराची ते दिल्ली अशी होती.
June 25, 2023
आघात जीवघेणे किती सहावे..
सारे सारे , मूक गिळूनी पहावे..
जीवा न काहीच संवेदना उरावी..
श्वासही सारेच , विकलांग व्हावे..
हवीत कशाला नाती ऋणानुबंधी..
ज्यांच्या विरहात शोकाकुल व्हावे..
जर जन्माचाच शेवट मृत्यू आहे..
तर उगा कुणात कां गुंतुनी रहावे..
प्रेम , वात्सल्य ,लळा , जिव्हाळा..
जर हे अळवावरचे पाणी असावे..
तर नकोच भावप्रीतीचा ओलावा..
पाषाणासम जीवन निर्जीव व्हावे..
आज नाही , कुणाचाही भरवसा..
क्षणक्षण जीवाने कासावीस व्हावे..
सभोवार , गुदमरलेले श्वास हतबल..
सांगा , आज जीवाने कसे सावरावे..
कलियुगाचे हे , वास्तव भयानक..
ब्रह्मांड देखील सारे अस्वस्थ व्हावे..
नकोनकोसे ,होते निःशब्द जीवन..
सत्य ! आज दुसरे कोणते असावे..
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
( 9766544908)
रचना क्र. ५७ / २४ /४/२०२१
May 27, 2021
एप्रिल व मे महिन्यात गुलमोहोर फुलतो. त्याच्या पाकळ्यांचा सडा जमिनीवर पडतो. ह्या 10--15 पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून, सकाळ दुपार व संध्याकाळ हे पाणी पिण्याने उन्हाळ्याच्या उष्णतेचा त्रास व पित्ताचा त्रास कमी होतो.
माझी आई व सासुबाई दोघीना पित्ताचा खूप त्रास होता. त्या दोघीना गुलमोहोराचे पाणी रोज दिले. आणि त्याना पित्ताचा त्रास पुढे सहा सात महिने झाला नाही.
माझे संशोधनात कंपवातावर गुलमोहोर उपयोगी पडेल असे आले. डोंबिवलीच्या एका गृहस्थानी मी सांगितल्या प्रमाणे गुलमोहोराचे पाण्याने कंपवात कमी झाल्याचे फोन करून सांगितले. तसेच माझ्या एका 73 वर्षे वयाच्या मित्राना हे पाणी 3-4 महिने दिले. त्यांना चहा पिताना कप किंवा बशी इतकी हालायची की चहा पिणे नको व्हायचे ते आता व्यवस्थित एका हाताने चहा पितात.
गुलमोहोराच्या फुलांचे सरबतही करता येते. बर्याच पाकळ्या मिक्सरमधून फिरवून चांगल्या क्रश कराव्यात व पाण्याबरोबर मिसळून चवी प्रमाणे साखर मीठ घालून प्यावे. ह्यामुळे उन्हाळ्यातील गर्मीचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे.
-- अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,
आनंदनगर, पुणे
April 17, 2017
हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात.
July 1, 2023
‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले.
January 29, 2023
परवा वपुं ची “पेन सलामत तो ..” ऐकत होते. हाताला असलेल्या चाळ्यांनी काय काय गडबड आणि गोंधळ होऊ शकतो याची फारच रंगतदार गोष्ट आहे.
December 19, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti