(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सर कोनार्ड हंट

    कोनार्ड हंट यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो १७ जानेवारी १९५८ रोजी पाकिस्तानविरुद्ध किंगस्टन ओव्हल येथे त्यांच्या होम ग्राउंडवर . त्यांनी पहिले दोन चेंडू फजल मेहमूदला मारले आणि चार धावा काढल्या त्या इनिंगमध्ये त्यांनी १४२ धावा पहिल्या काढल्या. त्याच सिरींजमधील तिसऱ्या सामन्यात त्यांनी २६० धावा काढल्या आणि गारफिल्ड सोबर्सबरोबर ४४६ धावांची भागीदारी केली.

      August 12, 2021


  • शांत झोपेसाठी…

    - जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.

    - पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.

    - ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.

    - रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.

    - नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात.

    - शांत करण्यासाठी संगीताचाही चांगला उपयोग होतो. विशेषतः ‘योगनिद्रा’सारखे शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट राग व स्वरांचा वापर करून तयार केलेले संगीत व संपूर्ण शरीराला शांत करणाऱ्या सूचना यांचा समन्वय असलेले तंत्रही झोप येण्यास मदत करते. याच्या नियमित अभ्यासाने झोपेची गोळी घ्यायची लागलेली सवयही सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील खमाज, दरबारी, तोडी, भैरवी अशा रागांवर आधारित संगीतरचना ऐकल्याने शांत झोप येण्यास मदत मिळते.

    - शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्‍स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.

      May 17, 2017


  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – २

    गणितावर आधारित शैक्षणिक-ललित साहित्य फार कमी बघायला मिळते. अशा साहित्यात आधुनिक संकल्पना आल्या तर बरे होईल असं वाटते. मुलांना आकर्षित करता येईल, हे अवघड नाही – इंट्रेस्टिंग आहे, उपयोगी आहे असे सांगता येईल. एक मार्ग दिसला तो मांडून पाहतो आहे. आपला प्रतिसाद प्रार्थनीय.

      March 25, 2021


  • शिवराय हे निधर्मी राज्यकर्ते होते !

    अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी स्वतः शिवरायांनी घेतली आणि राजगडावर व प्रतापगडावर अफजलखानाची कबर स्वराज्याच्या खर्चाने बांधली. शिवरायांचा लढा हा धार्मिक नव्हता. मानवतावादी होता.

      December 12, 2017


  • फोटोग्राफी मदतीची

    असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही.

      May 9, 2020


  • गुलज़ार समजून घेताना…

    जानेवारी २०२१ मध्ये माझे हे पुस्तक प्रकाशित झाले. गुलज़ारच्या १६ चित्रपटांवर मी २०१८ साली चेहेरे-पुस्तिकेवर लिहिलेल्या पोस्ट्स चा हा संग्रह आहे.

      June 21, 2021


  • किचन क्लिनीक – लवंग

    किचन क्लिनीक – लवंग

    आपण जेवणात वापरत असलेला हा सुगंधी मसाल्याचा पदार्थ.साखरभात,शीरा,पुलाव हे खाद्यपदार्थ असो अथवा गरम मसाला असो सर्वांमध्ये ह्याचा वापर केला जातो.तसेच मुख शुद्धी करीता विडया मध्ये ही लवंग वापरण्याची पद्धत आहे.

    लवंग ह्या फुलांच्या सुकवलेल्या कळया असतात.खरे पाहता लवंगाच्या कळयांमध्ये एक सुगंधी तेल असते पण बाजारात मिळणा-या लवंग हे तेल काढलेली असतात.तेल युक्त लवंग रंगाने काळे दिसतात आणी त्याला नख लावल्यास त्यामधून तेल निघते.

    असे हे लवंग चविला तिखट कडू आणी थंड असते.हे शरीरातील कफ आणी पित्त दोष कमी करते.तर आता आपण लवंगाचे काही औषधी उपयोग पाहुया.

    १)मुखदुर्गंधी अर्थात तोंडाला घाण वास येत असल्यास लवंग तोंडात धरून अथवा विडयात घालून चघळावा.

    २)अजीर्ण झाले असल्यास २ग्राम भाजलेल्या लवंगाची पूड मधा मध्ये मिसळून चाटावी.

    ३)पोटदुखीमध्ये ४ चिमूट लवंग पूड+१ चिमूट हिंग+१ चमचा साजूक तूप हे मिश्रण खावे व त्यांवर कोमट पाणी प्यावे.

    ४)ताप आल्यावर फार तहान लागते तेव्हा १ लिटर पाण्यात ६ लवंग घालून ठेवावे व हे पाणी थोडे थोडे पित रहावे ह्याने तहान तर कमी होतेच पण ताप उतरायला देखील मदत होते.

    ५)उचकी येत असल्यास १ चमचा लवंगाची राख + १ चमचा मध हे मिश्रण चाटायला दयावे फायदा होतो.

    दात किडून दुखत असल्यास लवंग अथवा लवंगाच्या तेलात बुडविलेला कापूस दाताखाली ठेवावा.डोके दुखत असेल तर लवंगाची लेप कपाळावर लावणे हे उपाय आपणा सर्वांना माहीत असतीलच ह्यात शंकाच नाही.

    अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडात उष्णतेचे येतात तसे फोड येऊ शकतात तसेच शरीरातील धातू क्षीण होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 23, 2016


  • जनगणना जातगणना होऊ नये!

    भारत सरकारतर्फे दर दहा वर्षाने केल्या जाणार्‍या जनगणनेला गेल्या 1 मे पासून सुरुवात झाली आहे. ही जनगणना संपूर्ण भारतात एकाचवेळी होत असून त्यासाठी लाखो प्रगणक उन्हातान्हांत फिरून माहिती गोळा करीत आहेत. यावेळी जनगणनेसोबतच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर तयार करण्याचे काम केले जात असल्याने जनगणना प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मोठीच कसरत करावी लागत आहे;

      June 9, 2010


  • उत्साह हरवला!

    खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
    लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत.

      March 29, 2009


  • दादरचा महागणपती

    दादर पश्चिमेस “प्रारंभ” या इमारतीत, १९६७ रोजी सुरेश चाळकर या गृहस्थाने परिसरातील होतकरु तरुणांसह, सामाजिक बांधिलकी आणि एकोपाच्या भावनेनं “बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश मंडळाची” स्थापना केली;

      September 17, 2013