वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो.
September 11, 2019
२० व्या शतकातील प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ व संगीताचे गाढे अभ्यासक, जगदीशचंद्र बोस यांनी सजीवांचा संगीताला मिळणारा प्रतिसाद सप्रमाण सिद्ध केला व त्यापूर्वीच्या वैदिक काळातील अभिजात संगीताच्या मन व शरीर यांच्यावरील संगीतोपचाराचे महत्त्वच अधोरेखित केले. यातूनच संगीतोपचार ही, मूळ औषध व उपचार पद्धतीला पूरक अशी उपचार पद्धती म्हणून विकसित झाली आहे.
March 24, 2019
सोशल माध्यमातील जग खोटं असतं असं म्हणतात. पण मला वाटतं सोशल मिडीयावर आपण कसं वागतो, त्याप्रमाणे आपल्याला तेथील जग भेटतं. आज भेटलेलो आम्ही सोशल मिडीयावर भेटलो. एकमेकांच्या कामाची, तळमळीची खुण आम्हाला सोशल मिडीयावरच पटली. नाहीतरी प्रत्यऱ्क्षात भेटणारी माणसं का कमी खोटं वागतात..? पण हेतू आणि नियत शुद्ध असेल तर मग या जगात खोटं, आभासी असं काहीच नसतं असं मी समजतो. हेतू-नियत साफ असेल तर जे खोटं आहे, ते ही शुद्ध-पवित्र होऊनच समोर येतं..मनाच्या शुद्ध असण्यात प्रचंड ताकद असते, हे मी आज अनुभवलं..
February 18, 2018
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
August 8, 2016
लेखिका ह्या काव्यलेखन व ललितलेखनाबरोबरच डिझायनिंगबाबत सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्यांचा इंटिरिअर डिझाईनिंगचा ‘वास्तुआर्ट’ नामक व्यवसाय आहे.
July 30, 2022
या वर्षीच्या ‘उद्याचा मराठवाडा’ या प्रतिष्ठीत दिवाळी अंकात कणकवलीचे विद्यमान आमदार श्री. नितेश राणे यांच्यावर सप्टेंबर २०१७ महिन्याच्या मध्यावर लिहिलेला माझा हा लेख. मी श्री नितेश राणेचा किंवा काॅंग्रेसचा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाही. मी राजकारणावर लिहायचंही टाळतो. सिंधुदुर्गातील माझ्या परिचयाच्या आणि तौलनिक विचार करणाऱ्या काही जाणकारांशी चर्चा करुन मी श्री नितेश राणेवरील हा लेख लिहिलेला आहे.
December 5, 2017
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.
बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले.प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधित महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून “दर्पण” पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू ,या उपक्रमांमागे होता.
सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले.
विलक्षण जीवन कहाणी -
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली.
मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४ मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक ( “प्रोफेसर”) होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५ मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
अष्टपैलू व्यक्तिमत्व -
आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.
त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे.डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विदवत्तेचा गौरव केला होता.
भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विव्दान होते. “मुंबईना समाचार” या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. १७ मे १८४६ रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
समाजसुधारक चळवळीचा आदर्श -
प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली !
राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम !
January 6, 2017
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून “चला पुन्हा ‘समते’ च्या पेटवू मशाली!” म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.
January 5, 2018
रेल्वेनं गेल्या २० वर्षांत अनेक नवीन प्रवासी गाड्या सुरू केल्या. त्यांपैकी गेल्या ४ वर्षांत प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या गाड्या म्हणजे 'दुरान्तो एक्सप्रेस'. 'दुरान्तो' हा बंगाली शब्द असून, त्याचा अर्थ दूर पल्ल्याची शेवटच्या स्थानकापर्यंत सतत धावणारी गाडी. या गाड्यांची सुरुवात ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना झाली होती. त्यामुळे पहिली दुरान्तो मुंबई-कलकत्ता सुरू झाली व हळूहळू भारतभरात अनेक मार्गांवर दुरान्तो गाड्या धावू लागल्या.
कुर्ला ते एर्नाकुलम (केरळ) ही १२९३ कि.मी. अंतर धावणारी दुरान्तो ही यांपैकी एक महत्त्वाची गाडी. या गाडीचा महाराष्ट्र (कोकण), गोवा, कर्नाटक व उत्तर केरळ असा २२ तासांचा प्रवास म्हणजे रेल्वेप्रेमींसाठी सुखद अनुभव आहे. या गाडीला तांत्रिक गोष्टींकरता रत्नागिरी, मडगाव, मंगलोर, कोझीकोड (कालिकत) येथे थांबे आहेत; परंतु सर्व प्रवासी शेवटच्या स्टेशनपर्यंत जाणारे, त्यामुळे उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांची गडबड-गोंधळ अजिबात नसतो.
संपूर्ण गाडीला डिझाईन केलेल्या हिरवट-पिवळ्या रंगाच्या पातळ आवरणाने वेगळी रंगविल्याने ती इतर गाड्यांपेक्षा स्वतंत्रपणे अशी उठून दिसते. गाडी पूर्णपणे वातानुकूलित, पैंट्रीचा डबा एकदम चकाचक, सीटखालील काळपट, परंतु गालिच्यासारखे फ्लोअरिंग, या गालिच्याची सफाई करणारे सतत स्प्रे मारणारे कर्मचारी - त्यामुळे या गाडीमध्ये अगदी हॉटेलचं वातावरण अनुभवण्यास मिळतं. सकाळी उठता उठताच चहा, कॉफी, बिस्किटं हजर. मग खाण्याचा माराच असतो. ऑम्लेट, कटलेट, केशरी दूध, चिकन, पनीर ते थेट मोतीचूर लाडू, गुलाबजामपर्यंत विविध प्रकार. खाणं आणून देणारी सर्व नेपाळी मुलं रुबाबदार कपड्यांत येतात. उशाशी ताजं वर्तमानपत्र, प्रशस्त बाकं, उत्तम खिडक्या, जागोजागी चार्जरसाठी प्लग्ज अशा सुखसोयींनी युक्त असलेल्या या गाडीत अनेक प्रवासी लॅपटॉप लावून कामात गर्क असतात.
संपूर्ण प्रवासात १७१ स्टेशनं लागतात आणि प्रत्येक प्रदेशाचा निसर्ग परस्परांहून अगदी वेगळा आहे. या प्रवासात कर्नाटकाची हिरवळ, वाटेत येणाऱ्या अनेक नद्या, खाड्या, त्यांवरील उत्तम पूल पाहता येतात; तर केरळात गाडी समुद्राच्या कडेकडेने जात असते. दर ५-१० कि.मी.वर छोटी सुबक स्टेशनं व तिथले रिकामे प्लॅटफॉर्मे, दोन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळ-पोफळीच्या वाड्यांतील आकर्षक बंगले; त्यांच्या सुंदर लाल रंगाच्या भिंती, घरातील, अंगणातील पांढऱ्या संगमरवरातील काम; सारंच वेधक दिसतं. या भागात अरब देशांतील पैसा जागोजागी बोलतो. सर्व स्टेशनांवरील स्वच्छता हे या मार्गावरचं वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात कोकणातील रेल्वेमार्ग बेभरवशाचा असल्याने या गाडीला ८-८ तास उशीर होतो वा गाडी दुसऱ्या मार्गाने न्यावी लागते. त्यावेळी प्रवासी कमी असतात, परंतु एकंदरीत दुरान्तो गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे हे या गाडीला असणाऱ्या भरपूर गर्दीतून नेहमीच लक्षात येतं.
वातानुकूलित (एसी) दुसऱ्या वर्गाचं तिकीट ज्येष्ठ नागरिकांसाठी १७५५ आहे आणि त्यांतील २५० रु. खाण्याच्या सुविधेचे आहेत.
कोकणचे छाती दडपून टाकणारे बोगदे, गोव्यातील मांडवी नदीवरील अजस्र पूल, कर्नाटकची हिरवीगार बनं, शरावती नदीचं पात्र, मागे टाकत केरळच्या समुद्राला सलाम करीत पुढे धावणारी दुरान्तो एक्सप्रेस २२ तासांनी एर्नाकुलम या शेवटच्या स्टेशनात शिरते आणि एका अविस्मरणीय प्रवासाची सांगता होते.
कोकण किनारपट्टीवरील दिघी बंदर ते कोकण रेल्वेवरील महत्त्वाचं असलेलं स्टेशन रोहा'. ह्या दोन्ही जागा एकपदरी ब्रॉडगेजने जोडणारा ३३ कि.मी. लांब रेल्वेमार्ग बांधण्याच्या कामास जोरात सुरवात झाली असून त्यावर ८४ छोटे-मोठे पूल व ४ बोगदे आहेत. प्रकल्पासाठी लागणारा निधी ८०० कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे. या मार्गामुळे परदेशातून होणारी मालाची आयात, तसेच परदेशांना केली जाणारी निर्यात-आयात संपूर्ण देशातून मुंबईपर्यंत न येता होणार आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
June 23, 2022
मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.
July 11, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti