(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वर्ग आणि नरक!

    पाप – पुण्याच्या, स्वर्ग – नरकाच्या संकल्पना तशा सगळ्याच धर्मात आढळून येतात. स्वरूप थोडेफार वेगळे असले तरी वैचारिक बैठकीत काही फारसे अंतर नसते. समाजात अनाचार माजू नये, ‘बळी तो कान पिळी’ या जंगल न्यायाने सुसंस्कृत माणसाच्या राज्यात धुमाकूळ घालू नये, या उद्देशाने कदाचित या संकल्पनांना धार्मिक आधार देऊन त्या अधिक बळकट करण्यात आल्या असाव्यात.

      June 3, 2007


  • नसती उठाठेव!

    'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

      December 21, 2003


  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ४

    विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं!
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !!
    निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:!
    महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!!

    गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत.
    आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप?
    विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान ब्रह्मदेव. विष्णु,भगवान श्रीहरी. यांनी वंदन केलेले ते विरञ्चिविष्णुवन्दित.
    विरूपलोचनस्तुत- भगवान शंकरांना त्रिनेत्रधारी म्हणतात. हा तिसरा डोळा हे त्यांचे विशेष रूप आहे. त्यामुळे त्यांना विरूपलोचन असे म्हणतात. ते भगवान शंकर ज्यांची स्तुती करतात ते श्री गणेश
    विरूपलोचनस्तुत होत.
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया - भगवान श्रीगणेशांकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून टाकणारी ही ओळ. भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गिरीश अर्थात भगवान शंकर. त्यांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने ज्यांना प्रगट केले आहे असे आहेत श्री गणेश.ते शिवपुत्र नाहीत. केवळ पार्वतीनंदन नाहीत. त्या दोघांनाही वंदनीय आहेत‌. त्यांना दर्शनाची इच्छा होते त्यावेळी प्रार्थना करून ते ज्यांना प्रगट करतात ते मोरया आहेत, "गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया ". निरंतर अर्थात सातत्यपूर्णरीत्या, नेहमी.
    सुरासुर अर्थात देव आणि दैत्य देखील.
    सपुत्रवामलोचनै:- सपुत्र अर्थात मुलाबाळांसह, वामलोचना अर्थात स्त्री.पत्नी.
    महामखेष्टकर्मसु- मख म्हणजे यज्ञ. महामख अर्थात सर्व महत्वाची कार्ये.सर्व कार्ये यज्ञस्वरूप असावीत हा भाव. इष्टकर्म अर्थात अपेक्षित गोष्टींच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म.
    सगळ्यांचा एकत्रित अर्थ करता, देव आणि दैत्य देखील आपल्या अपेक्षित कामाला पूर्ण करण्यासाठी यज्ञ करताना, आरंभी विघ्न विनाशासाठी ज्यांचे स्मरण करतात असे.
    तुंदिल- धष्टपुष्ट, गुबगुबीत. अशी देहयष्टी असणाऱ्या त्या भगवान गणेशांचे मी स्मरण करतो.

      January 10, 2020


  • देवपूजेतील साधन – कलश

    देवपूजेतील साधन – कलश

    भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचे ग्रहण करुन जे भांडे बनवले ते म्हणजे कलश होय अशी कथा पुराणात सांगितली आहे.

    कळशी या भाड्याचा छोटा आकार म्हणजे कलश. कळशाचे भांडे पितळेचे अथवा तांब्याचे असते.

    क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे विविध प्रकार आहेत. यापैकी विजय कलश पीठाचे मध्यभागी स्थापन केला जातो. अन्य कलश आठ दिशांना ठेवले जातात. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी ब्रम्हा, गळ्याच्या ठिकाणी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकामण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाचे पोटात सप्तसागर, सप्तव्दीप, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगा आणि चार वेद सामावले आहेत असे शास्त्रकार म्हणतात.

    तांब्याच्या कलशात रात्री पाणी भरुन ते सकाळी उठल्यावर अनुशापोटी सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्याने इतर अनेक विकारही दूर होतात.

      January 12, 2016


  • श्रीगणेश अवतारलीला १ – श्रीमयुरेश्वर अवतार

    श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एक महिना तिने पार्थिव गणेश पूजन केले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याह्न समयी या पार्थिव गणेशमूर्ती तूनच प्रकटलेला भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्रीमयुरेश्वर. या अवतारात भगवान सहा हातांचे होते. मोरावर बसलेले असल्याने त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात.

      September 2, 2019


  • आत्मपूजा उपनिषद : ४ – ५ : उन्मनी भाव हेच जल आणि मनरहितता हाच अर्घ्य!

    प्रथम मन म्हणजे काय ते पाहू. मेंदूत सतत चालू असलेला; डोळ्यासमोरच्या निराकार पडद्यावर दिसणारा आणि कानात अविरत ऐकू येणारा दृकश्राव्य चलतपट म्हणजे मन. हा चलतपट डोळ्यासमोर असलेल्या सर्व गोष्टींना आच्छादित करून असतो आणि कानांना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू देत नाही. हा चलतपट अहोरात्र चालू असतो आणि सिनेगृहातल्या दाराचे पडदे बंद झाल्यावर जसा चित्रपट स्पष्ट दिसायला लागतो तसा रात्री आपल्याला दृग्गोचर होतो; त्याला आपण स्वप्न म्हणतो.

      January 7, 2020


  • वनवासींचे राम

    आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते.

      April 21, 2024


  • महादेवाच्या पिंडीचे रहस्य

    भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती……..

      November 5, 2016


  • सामाजिक शिष्टाचार – प्रस्तावना

    आपल्या वागण्या बोलण्यातून दुसर्‍याशी संबंध निर्माण होतात. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आपल्याच हातात असते. आपल्या सहकार्‍यांशी असे मैत्रीपूर्ण संबंध असल्याखेरीज कामे नीट पार पाडली जात नाहीत. चांगल्या बोलण्या वागण्यातून चांगल्या कार्यसंस्कृतीचा पायाच घातला जातो. संस्थेच्या हितासाठी कर्मचार्‍यांना चांगल्या बोलण्या-वागण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

      October 10, 2018


  • बारामुल्ला दहशतवाद मुक्त होताना..

    गेल्या जवळपास तीन दशकांपासून अशांतता, हिंसाचार, दहशतवादी हल्ले यांमुळे ग्रस्त असणार्‍या काश्मीर खोर्‍यातून एक अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. काश्मीर खोर्‍यातील महत्त्वाचा जिल्हा असणारा बारामुल्ला हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ‘बारामुल्लापॅटर्न’ चा वापर करून काश्मीर खोर्‍यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यातही असे यश मिळवणे गरजेचे आहे.

      February 8, 2019