वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे झालेल्या प्रदूषणाने भारतातील तमाम जनता त्रस्त झाली असतांना, काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने प्लास्टिकच्या वापरासंबधी काही नियम घालून दिलेत. परंतु या नियमातील त्रुटींचा आधार घेऊन गुटखा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरणालाच धोका निर्माण केला.
September 30, 2011
मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो.
March 22, 2022
पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या.
August 19, 2024
अनुभवांना स्वतःचे रूप देऊन कोपऱ्यात उभी राहिलेली माझी शब्दकळा मला नेहेमीच कोसळण्यापासून वाचवत आलीय. कितीतरी प्रसंगांतून, रूपांनी, माणसांच्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेले माझे शब्द !
October 16, 2022
बर्याच व्यक्ती उराशी काही धैय्य बाळगून असतात व त पुर्ण होण्यासाठी संकल्प करीत असतात. असे बरेच संकल्प आपल्या देशात केंद्र राज्य जिल्हा तालूका व ग्रामपंचायत स्थरावर प्रत्यक्षात येण्यासाठी सोडले जातात.
January 12, 2011
बडोद्याच्या इतिहासात डभोईच्या युद्धाला एक खास महत्व आहे. हें युद्ध इ.स. १ एप्रिल १७३१ ला, म्हणजे २८० वर्षांपूर्वी लढलें गेलें. बडोद्याच्या ५०० वर्षांच्या कालखंडाच्या साधारण मध्यावरील हें युद्ध आहे.
January 15, 2022
सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
June 5, 2022
रंगीत चित्र किंवा छायाचित्र हे मूळ चार रंगात छापले जाते. प्रथम छायाचित्र स्कॅनर उपकरणावर लावून ते संगणकावर घेतले जाते. पूर्ण पानातल्या चारपैकी प्रत्येक रंगाचा भाग निरनिराळा केला जातो. उदाहरणार्थ पान क्र. एकवरील लाल शीर्षक, जाहिरातीमधील लाल रंगाचा भाग, एखादे केशरी रंगाचे फूल असेल तर त्यातला पिवळ्या रंगाचा हिस्सा न घेता लाल रंग वगैरीची प्रतिमा, काळया रंगातली प्रामुख्याने मजकुरातली अक्षरे, छायाचित्रातल्या काळ्या रंगाचा हिस्सा घेऊन या प्रमाणे चार रंगाच्या चार प्रतिमा तयार करण्याला रंग विभागणी करणे म्हणतात.
May 27, 2023
मोदी सरकारने परराष्ट्र धोरणावर भर देऊन जागतिक संबंध सलोख्याचे व्हावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदींच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्यामुळे जे वातावरण बांगलादेशमध्ये पाहावयास मिळाले, ते दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणारेच आहे.
June 13, 2015
गणित शिकण्या-समजण्यामधे “वर्ड प्रॉब्लेमस्” किंवा वर्णनात्मक कथन / वृत्तांत पद्धतीने मांडलेले गणिती प्रश्न हे एक महत्त्वाचा प्रकार आहे. दैनंदिन जीवन आणि शिक्षणाची सांगड घालण्यास मदत करतो. जीवनातल्या बऱ्याच प्रश्नांकडे बघण्याचा आणि ते सोडवण्याचा तर्कशुद्ध मार्ग शिकवतो. (माझ्या पाहण्यात आलेल्या परीक्षां प्रश्नपत्रिका मधे असे प्रश्न अभावानेच दिसले.)
May 16, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti