(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अतिदक्षता विभागाचे जनक डॉ. जॉन कर्कलीन

    अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्‍णांच्‍या अतिमहत्त्वाच्‍या चाचण्‍यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्‍या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्‍याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्‍या वापरामुळे रुग्‍णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्‍याचप्रमाणे शस्‍त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्‍येकांना जीवदान मिळाले आहे.

      March 31, 2019


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

    पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः
    कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव |
    द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा
    त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖

    कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत.
    ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या ज्या कारणांनी मी योग्य नाही असे वाटते त्या गोष्टींनाही आपण पावन करीत असता. जसे,
    पशुं वेत्सि चेन्मां- आपण मला पशु समजत असाल, अर्थात कोणत्याही प्रकारची साधना, उपासना न करणारा जड जीव समजत असाल, तर
    तमेवाधिरूढः- आपण त्यावर बसता. आपला नंदी असाच पशू नाही का?
    त्या पशूच्या उद्धार केला तसाच माझाही उद्धार करा.
    अन्य अवगुणांचेही असेच साधर्म्य दाखवतांना आचार्य श्री म्हणतात,
    कलंकीति वा - माझ्या पाप कृतींमुळे मी कलंकित आहे असे वाटत असेल तर,
    मूर्ध्नि धत्से तमेव - तसा डाग असणाऱ्या चंद्राला आपणच डोक्यावर धारण करता.
    द्विजिह्वः पुनः- माझ्या बोलण्यात आणि वागण्यात वेगळेपणा आहे म्हणून मी दुतोंड्या आहे असे आपल्याला वाटत असेल तर,
    सोऽपि ते कंठभूषा- तशा दोन जिभा असणारा नागराज आपल्या कंठाचे भूषण आहे.
    त्वदंगीकृताः
    शर्व सर्वेऽपि धन्याः - हे शर्व अर्थात शरणागतांच्या दुःखाची हिंसा करणाऱ्या हे भगवंता, तू अंगीकार केलेली प्रत्येक गोष्ट धन्य होते. अन्य समयी क्षुद्र असणाऱ्या अशा सर्व गोष्टींनाही विश्ववंद्यत्व प्राप्त होते.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 21, 2020


  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ७

    अमेरिकेतला कायोटी हा एक रानटी कुत्र्याच्या जातकुळीतला प्राणी आहे. त्याला प्रेअरी वुल्फ असे देखील नांव आहे. अफ्रिकेतले वाईल्ड डॉग्ज (जंगली कुत्रे) किंवा पूर्वी आपल्या महाराष्ट्रात आढळणारे कोळ्सुंदे, हे अशाच रानटी कुत्र्याच्या जातकुळीतले प्राणी. कायोटी हा उत्तर आणि मध्य अमेरिकेत सर्वत्र आढळतो. ग्रे वुल्फ हा युरोपीयन – रशियन वंशाचा आहे; तर कायोटी हा पूर्णपणे अमेरिकेतच उगम पावलेला आहे. यांच्या बर्‍याच जाती – उपजाती आहेत. डोंगराळ भागातले कायोटी अंगाने थोडे मोठे आणि करडॆ असतात तर रुक्ष माळरानावरचे कायोटी अधिक मातकट, पिवळसर रंगाचे असतात.

    कायोटी सहसा जोड्यांनी फिरताना आढळतात. परंतु त्यांचे छोटे कळप मात्र पाच-सहा जणांचे मिळून झालेले असतात. त्यांना बीळं करून त्यात रहायला आवडत. यांचा शक्यतो रात्री संचार असतो, पण क्वचित दिवसादेखील दर्शन देतात. आम्ही पेनसिल्व्हेनियाला असताना आमच्या यू.एस रूट ६ चा मार्ग म्हणजे सारा झाडी झुडपांनी भरलेला टेकड्यांचा प्रदेश. एकदा संध्याकाळी ७-७॥ वाजता लॅबमधून घरी परत येत असताना त्या सामसूम रस्त्यावर अचानक रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीतून कायोटीची एक जोडी बाहेर आली आणि झपझप चालत रस्ता ओलांडून दुसर्‍या बाजूला नाहीशी झाली. मी गाडी थांबवून आसपास बघायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा काही पत्ता लागला नाही.

    कायोटीचे मोठे प्रतिस्पर्धी म्हणजे लांडगे. जिथे लांडग्यांचं प्रमाण कमी होतं तिथे कायोटींची संख्या वाढते. अर्थात लांडग्यांपेक्षा कायोटी हे मनुष्यवस्तीच्या अधिक जवळ राहू शकतात. जानेवारी ते मार्च हा त्यांच्या मीलनाचा काळ असतो, आणि दोन महिन्या नंतर साधारणपणे पाच-सहा पिल्लं जन्मतात. कायोटींचं मुख्य खाद्य म्हणजे उंदीर, खारी, ससे, प्रेअरी डॉग्स (बीळात रहाणारे घुशीसारखे छोटे प्राणी) वगैरे. कधी कधी ते साप, सरडे, पक्षी किंवा हरणाची देखील शिकार करतात. थंडीच्या दिवसांत जेंव्हा भक्ष मिळणं कठीण असतं तेंव्हा कायोटींना फळं, पालेभाज्या, कंदमुळांवर देखील गुजराण करावी लागते. पश्चिमेकडच्या राज्यांमधे शेळ्या मेंढ्या, लहान वासरे यांच्यावर देखील त्यांचा डोळा असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना, रॅंचर्सना डोळयात तेल घालून आपल्या जनावरांचं रक्षण करावं लागतं.

    पूर्वी कायोटी फक्त पश्चिमेकडच्या राज्यांमधे आढळायचे. परंतु हळू हळू त्यांनी स्वत:ला मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलं आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपासून त्यांचे क्षेत्र वाढतच चाललं आहे. पूर्वी लांडग्यांचं क्षेत्र सर्वदूर पसरलेलं होतं, परंतु जसजशी मनुष्यवस्ती वाढू लागली तसतसं लांडगे खोल जंगलात, डोंगरांत जाऊन दडू लागले आणि मनुष्यवस्तीच्या दबावापुढे त्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. याचा फायदा घेऊन कायोटींनी आपलं क्षेत्र वाढवत नेऊन सर्वत्र आपला कबजा करून टाकला. आता तर ते मनुष्यवस्तीच्या अधिकाधिक जवळ सरकू लागले आहेत. कधी कधी गावांतल्या कचर्‍याच्या पेट्यांजवळ त्यांचं दर्शन होऊ लागलं आहे. त्यांचं धारिष्ट्य एवढं वाढलं आहे की दूरच्या उपनगरांमधेच नव्हे तर मोठ मोठ्या शहरांमधे देखील ते आढळू लागले आहेत. एका अहवालानुसार शिकागो शहर आणि त्याच्या उपनगरांमधे मिळून सुमारे २००० कायोटी आहेत. वॉशिंग्टन डी.सी. आणि न्यूयॉर्क सारख्या प्रचंड शहरांमधे देखील कायोटींचे वास्तव्य आहे. दिवसा ते शहरांमधल्या मोठमोठ्या बागांमधे किंवा दाट झाडींच्या ठिकाणी लपून रहातात आणि रात्री भक्षाच्या शोधार्थ बाहेर पडतात. अशा मोठ्या शहरांमधे शक्यतो ते उंदरांसारख्या प्राण्यांवर, पाळीव कुत्र्या मांजरांवर तसेच रस्त्यावर मरून पडलेल्या प्राण्यांवर गुजराण करतात.

    क्रमशः ....

    -- डॉ. संजीव चौबळ

      December 23, 2016


  • केसरी वृत्तपत्राचा वर्धापनदिन

    टिळकांनी पत्रकारिता त्यांचा राजकीय नेतृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचाच एक अविभाज्य भाग होती. हिंदु-मुस्लिम दंगली, दुष्क़ाळ, प्लेगची साथ, वंगभंगाची चळवळ अशा महत्वाच्या घटनाप्रसंगी टिळकांनी केलेले लेखन मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अजरामर ठरले आहे.

      January 4, 2022


  • अनंत चतुर्दशी

    हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही.

      September 28, 2023


  • लाचार, मुर्दाड की दिशाहीन ?

    जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्‍यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्‍यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्‍यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!

      November 24, 2012


  • ठाण्यातील कामगार भीमराव भंडारेंची ’आत्महत्या‘…की, ’सरकारी हत्या‘(?)

    लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ”शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!“… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ’अतिरिक्त मूल्याचा‘ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकर्‍यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा, तसेच इतर पूरक गोष्टींचा (उदा. कापूस) आधार घेऊन जगत असतो.

      December 31, 2011


  • सौभाग्यलेणं – हळदीकुंकू

    सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व “हळदी कुंकू” यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

      March 1, 2024


  • वदनी कवल भाग ३

    तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे.
    या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात)

    वदनी कवळ घेता
    नाम घ्या मातृभूचे l
    सहज स्मरण होते
    आपुल्या बांधवांचे l
    कृषिवल कृषिकर्मी
    राबती दिनरात l
    श्रमिक श्रम करोनी
    वस्तु त्या निर्मितात l
    करुनी स्मरण तयांचे
    अन्न सेवा खुशाल l
    उदरभरण आहे
    चित्त होण्या विशाल ll

    किती अर्थपूर्ण आणि व्यावहारीक आहे ना.
    आपण अनेक वेळा अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्र नुसते पोपट होऊन म्हणत असतो. त्यात नेमकं काय सांगितलंय, कोणासाठी सांगितलंय, काऽऽही लक्षातच घेत नाही.

    भोजन करताना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांबरोबर सामाजिक विचारही तेवढाच महत्वाचा आहे. जी स्पंदने ईश्वरापर्यंत पोचतात, तीच स्पंदने शेतकरीवर्गापर्यंत पण पोचतात.

    आपण आहारातून घेत असलेल्या प्रत्येक कणामागे, ती जमिन नांगरणारा, तो कण पेरणारा, जमिनीला पाणी पुरवठा करणारा, उन्हात घाम गाळून त्याचे रक्षण करणारा, त्यांच्या वाढीमधे अडथळा निर्माण करणार्‍या तणाला दूर करणारा, त्याची योग्य वेळी कापणी करणारा, कचरा पाखड दूर करणारा, ते धान्य पोत्यात भरणारा, ते ओझे पाठीवरून वाहून नेणारा, चारचाकीने एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहाणारा, दुकानामधे साठवून ठेवणारा, विक्री करणारा, आपल्या घरापर्यंत आणणारा, इ.इ. असंख्य लोकांचा सहभाग असतो. या सगळ्यांचे श्रम यामागे कारणीभूत असतात, तेव्हा तो दाणा आपल्या ताटात नंतर पोटात जात असतो. याचे भान प्रत्येक कणाला स्पर्श करताना व्हायला हवे.

    एवढेच नव्हे तर ते अन्न आपणाला ज्या माऊलीने शिजवून, सुपाच्य होईल, असे बनवून सुग्रास वाढले आहे, तिच्याबद्दल आदर कधी व्यक्त करतो का ? ( मीठ कमी पडले असेल, किंवा जरा तिखट कमी जास्त झाले की फक्त तिच्या नावाचा अगदी गजर सुरू होतो.)

    या सर्व लोकांचे ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यासमोर आणले की मग अन्नाची नासाडी केली जाणार नाही, ताटात वाया दवडले जाणार नाही. त्याची किंमत कळेल.
    विशेषतः पुढील पिढीला अन्नाची किंमत कळायला हवी. ज्या पिढीसमोर पाश्चात्यांचाच आदर आहे, त्यांना अन्न निर्मितीची साखळी प्रत्येक घासाला आठवली पाहिजे. तिचे विस्मरण कदापि होता नये.

    अन्नाची नासाडी करणे, केक, पिझ्झा एकमेकांवर फेकणे, हा फेकाफेकीचा संस्कार भारतीय नाही.

    ओषधिभ्यो अन्नम्
    अन्नात् पुरूषः
    अन्नात् भूतानि जायन्ते
    जातानि अन्नेन वर्धते
    अन्नं भूतानां श्रेष्ठं
    अन्नम् न निंद्यात
    अन्नं ब्रह्म इति व्यजानात्
    तैत्तिरीय उपनिषदामधे अन्नाचे आलेले हे वर्णन अन्नाचे सर्व महात्म्य सांगून जाते.

    आहार हेच औषधस्वरूप आहे.
    मनुष्यजन्मासाठी अन्नाच्या आधारेच आत्मा शरीरात प्रवेश करतो,
    अन्य जीवांची उत्पत्तीदेखील अन्नामुळे होते.
    समस्त जीवांचे पोषण अन्नानेच होत असते.
    म्हणून सर्व सजीवात अन्न श्रेष्ठ आहे.
    केवळ श्रेष्ठ नाही तर ते उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण आहे.अन्नच ब्रह्म आहे. त्याची कधीही निंदा करू नका.

    अन्नाचा आदर ठेवा, अन्नाचा कणही वाया घालवू नका. म्हणूनच
    गोपाळकाला झाल्यानंतर, काला खाल्ल्यावर हाताला लागलेले आपले उष्टे अन्नकण ( आणि त्यातून मिळणारे पुण्य, चोरून सुद्धा इंद्रादि देवांना मिळू नये म्हणून ) हात धुताना ते कण सुद्धा पाण्यात जाऊ नये. इतके हात चाटून पुसून स्वच्छ करा. असे सांगण्याचा प्रघात आहे.

    किमान अन्नाची निंदा करू नका. पुढच्या वर्षी पर्यंत एवढी बुद्धी तरी दे, एवढे मागणे त्या बुद्धीदात्याकडे करायला हरकत नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    06.09.2016

      September 6, 2016


  • माओवाद्यांच्या तावडीतुन सर्वसामान्य स्त्रियांना सोडवण्याची गरज

    लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे देशभक्त सामान्य नागरिकांचे पण काम आहे. माओवादी हिंसाचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये माओवाद्यांविरुद्ध एक अक्षर लिहीले गेले नव्हते. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माओवाद्यांना विरोध हा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विषय बनला पाहिजे.

      June 29, 2019