वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कुसुमाग्रजांनी “वीज म्हणाली धरतीला ” (१९७०) मध्ये लखलखणाऱ्या झाशीच्या राणीचे आणि तिच्या विस्तवाला प्राक्तन बांधलेल्या सहेल्यांचे हे घायाळ करणारे वर्णन लिहिलंय. आमचे गुलज़ार महोदय ” नमकीन ” (१९८२) मध्ये असेच तीन निखारे (शर्मिला, शबाना आणि किरण वैराळे) उशाला घेऊन निजणारी वहिदा रंगवितात, पुन्हा चार पक्षिणी !
October 7, 2022
मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
August 2, 2017
तिळाच्या तेलाचे हे फायदे तुम्हाला अचंबित करतील!तिळाच्या तेलाचा उपयोग करून पहा नक्कीच फायदा होईल.तिळाच्या तेलाचा जेवणात वापर केल्याने जेवण स्वादिष्ट होते. मात्र याचा केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. या तेलात व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरससाखी खनिजे तसेच प्रोटीनची चांगली मात्रा असते. यासाठीच हे केस तसेच त्वचेसाठी फायदेशीर असते.
केंसाच्या वाढीसाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल. तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे लांबसडक केस होतात. यासाठी केवळ आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज करा. केस नक्की वाढतील.
केमिकल्स, प्रदूषण आणि उन्हामुळे तुमचे केस खराब झाले असतील तिळाच्या तेलाचा वापर उत्तम. तिळाचे तेल खोलवर जाऊन केसांना पोषण देते.
सूर्यांच्या किरणांमधून निघाणारे यूव्ही रेंज त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवतात. तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करुन हे रोखू शकता. तिळाचे तेल केस आणि त्वचेवर संरक्षक कवच बनवते ज्यामुळे केस अथवा त्वचेचे नुकसान होत नाही.
हल्ली कोंड्याची समस्या सर्वसामान्य झालीये. झोपण्यापूर्वी बोटांच्या सहाय्याने तिळाचे तेल स्काल्पला लावून मसाज करा आणि सकाळी केस धुवा. कोड्यांची समस्या निघून जाईल.
कोरडे तसेच रुक्ष केसांमध्ये नवजीवन आणण्याचे काम तिळाचे तेल करते. आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाचा वापर केल्यास स्पिल्ट एंड्स तसेच कुरळे कोरड्या केसांची समस्या दूर होईल. १. ताण कमी करण्यासाठी तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
१.ताण कमी करण्यासाठी
तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
२.त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी
नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते.
३.हृद्याचे आरोग्यसाठी
तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अॅसिड हे ओमेगा ६ फॅटी अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.
४.हाडांचे आरोग्यासाठी
लहान बाळांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ठिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.
५.गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर
गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनएचे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.
६.स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी
गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.
७.तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी
दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.
८.शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.
९.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.
१०.व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी
योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
forwarded by - गजानन
whats app - 7775871809
चिकित्सक सल्ला जरूर घ्यावा .....
सौजन्य - सम्रुद्धी पापड
May 19, 2017
Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:पुरतं थोडंफार तरी धान्य स्वत:च्या जमिनीवर उगवलं जातं आणि फार्मवरचं दूध किंवा निरुपयोगी जनावरं विकायचं काम देखील स्वत:च केलं जातं. परंतु बीफ, वराहपालन आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात मात्र, जनावरांच्या/पक्षांच्या वाढीच्या/वयाच्या टप्प्यानुसार, वेगवेगळ्या फार्म्सवर केलं जाणारं संगोपन, ही अगदी नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे एखाद्या फॅक्टरीतल्या conveyor belt वरून सरकणार्या मालाप्रमाणे, ही जनावरे एका फार्मवरून दुसर्या फार्मवर पाठवली जातात.
जस जसे फार्म्स मोठे होऊ लागतात आणि त्यांची उत्पादकता वाढू लागते, तसंतसं त्यांचा दर एकका (unit) मागचा उत्पादन खर्च कमी होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या फार्म्सना अधिक मोठं होण्यासाठी उत्तेजनच मिळतं. या उलट, लहान फार्म्स या मोठ्या फार्म्सच्या तुलनेत आपला उत्पादन खर्च तेवढा कमी करू शकत नाहीत. ही आर्थिक विषमता वाढतच जाते आणि मग छोट्या फार्म्सना एक तर या उद्योगातून बाहेर पडावं लागतं किंवा एखाद्या खास वैशिष्ट्य असलेल्या मार्केट (niche market) चा शोध घ्यावा लागतो. असाच एक जाणवण्यासारखा फरक म्हणजे, जरी बहुतांशी फार्म्स कौटुंबिक मालकी हक्काचे असले तरी, वाढत जाणार्या फार्म्सच्या आकारमानामुळे आणि तरूण पिढी शेती/ पशुपालनापासून दुरावत चालल्यामुळे, फार्म्सवर काम करण्यासाठी घरातील माणसांऐवजी पैसे देऊन बाहेरून मदत घेणं वाढत चाललं आहे.
एकंदरीत पशुसंवर्धनाच्या क्षेत्राला एका मोठ्या जाळ्याचं (network) रूप येत चाललं आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हे ब्रीदवाक्य इथे लागू पडल्यासारखं वाटतं. पूर्णपणे स्वावलंबी फार्मची संकल्पना मागे पडून, परस्परांना पूरक असे फार्म्स, एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या वाटणीचा कार्यभाग पार पाडताना दिसतात. जनावरांसाठी धान्य उगवणारे फार्म्स, पशूखाद्य बनवणार्या कंपन्या, जनावरांची ने आण करणार्या ट्रक्सच्या कंपन्या, वेगवेगळ्या वयोगटातील जनावरांचे संगोपन करण्यात विशिष्ट नैपुण्य मिळवलेले फार्म्स, जनावरांची विक्री - लिलाव करणारी केंद्रे, कत्तलखाने, या सार्यांचे पाय एकमेकात गुंतलेले असतात. फार्म्सच्या वाढलेल्या आकारामुळे प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आर्थिक गुंतवणूक देखील खूपच मोठी असते. त्यामुळे एकंदर सारा कारभार परस्परांमधल्या स्नेहसंबंधांपेक्षा, रुक्ष आणि कोरड्या करार मदारांवर (contracts and agreements) आधारलेला असतो.
डॉ. संजीव चौबळ
November 18, 2015
साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता.
April 22, 2023
रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा..
August 8, 2016
लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ”शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!“… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ’अतिरिक्त मूल्याचा‘ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकर्यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा, तसेच इतर पूरक गोष्टींचा (उदा. कापूस) आधार घेऊन जगत असतो.
December 31, 2011
ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते
पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते ।
बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले
मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥
आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते - ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी.
प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात असल्याने त्यांना प्रेत म्हणतात. त्या महाकालाला आसन करून त्यावर बसणारी.
पाशोदङ्कुशचापबाणकलिते- पाश म्हणजे दोरी, उद्ङ्कुश म्हणजे वरच्या बाजूला टोक असलेला अंकुश, चाप म्हणजे धनुष्य आणि बाण अशी आयुष्य हातात धारण करणारी.
बालेन्दुचूडाञ्चिते- बाल इंदू म्हणजे चंद्राची कोर. चुडा अर्थात केसांचा वरचा भाग. च्या मस्तकावर चंद्रकोर धारण केल्याने अतिव सुंदर दिसणारी.
बाले- काय अंभाल स्वरूपात निरागस दिसणारी. बालकुरङ्गलोलनयने- कुरंग म्हणजे हरिण. बालक कुरंग म्हणजे हरणाचे पिल्लू. त्याच्या नेत्राप्रमाणे चंचल नेत्र असणारी. सामान्य हरणाचे नेत्र देखील चंचल असतात. लहान बालक कधी चंचल असल्याने त्याचे नेत्र तर जास्तच चंचल असतात, हा भाव. बालार्ककोट्युज्ज्वले- कोट्यावधी बालार्क अर्थात उगवत्या सूर्याप्रमाणे तेजपुंज असणारी.
मुद्राराधितदैवते- उपासनेमध्ये हाताच्या बोटांच्या ज्या विविध रचना केल्या जातात त्यांना मुद्रा असे म्हणतात. या मुद्रांमध्ये जगदंबेच्या उपासनेत देवी मुद्रा ,योनी मुद्रा इ.चा प्रयोग केला जातो. त्या मुद्रांच्या द्वारे जिची उपासना होते अशी.
मुनिसुते- विविध ऋषी-मुनींनी उपासना केल्यानंतर वरदान स्वरूपात आई जगदंबेने त्यांच्या आश्रमामध्ये अवतार धारण केल्याच्या अनेकानेक कथा देवीभागवत, मार्कंडेयपुराण इत्यादी ग्रंथात आलेल्या आहेत. या अवतारांच्या सापेक्ष रीतीने आई जगदंबेला मुनिसुता असे म्हटले आहे. तिला प्रार्थना आहे की,
मां पाहि मीनाम्बिके- ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 28, 2020
देवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.
September 7, 2020


प्रकाशन दिनांक :- 01/06/2003
गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय?
June 1, 2003
Copyright © 2025 | Marathisrushti