वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
26-11 चा मुंबई दहशतवादी हल्ला हा समुद्राकडूनच झाला होता. या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण होतील. पुन्हा एकदा भारताला धडा शिकवण्याच्या हेतूने पाकिस्तान हल्ल्याचे नियोजन करीत आहे. 26-11 चा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असतानाही तो थांबवता आला नाही. त्यामुळेच या लेखामध्ये सागरी सुरक्षा अधिक बळकट कशी करता येईल याविषयी चर्चा करूया.
November 12, 2018
आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.
June 28, 2022
इंधनाच्या बाबतीतले परावलंबित्व ही देशाच्या विकासासमोरची एक मोठी समस्या आहे आणि त्यापेक्षा मोठी समस्या दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाची आहे. सुदैवाने आज राजकारणात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. या युवकांनी एकत्र येऊन या देशाला महासत्ता बनविण्याचा निर्धार केला, तर परिस्थिती निश्चितच बदलू शकते. नाविन्यपूर्ण विचार, ते अंमलात आणण्याची धमक, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी या सगळ्या गुणांनी युक्त असलेले नेतृत्व ही आज देशासाठी काळाची गरज बनली आहे.
May 5, 2012
गेले काही दिवस रस्त्यारस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेली मोठमोठी होर्डिंग बघतो आहे. गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे आणि त्याचं आमंत्रण देणार्या या होर्डिंग्सवर राजभाषेची आठवण करुन दिलेली आहे.
लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे. मोठा गाजावाजा करत तो साजरा होईल. दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जागतिक मराठी दिवस पाळला जातो. तोसुद्धा थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम होतात, घोषणा होतात आणि काही दिवसातच विसरल्याही जातात.
एकेकाळी महाराष्ट्र दिनाला काय गडबड असायची. काहीतरी सण आहे याची जाणीव व्हायची. मात्र गेली काही वर्षे लोक कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही.
मराठीसाठी किंवा एकूणच कोणत्याही मातृभाषेसाठी अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. खरंतर महाराष्ट्रात प्रत्येक दिवस मराठीचाच असायला पाहिजे. पण या बाबतचे एकूणच औदासिन्य बघितले तर कांही लोक मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.
सन १९२२ मध्ये कवी माधव ज्यूलियन यांनी "मराठी असे आमुची मायबोली" या सुप्रसिध्द कवितेत "जरी आज ही राजभाषा नसे"अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त केली होती. त्याच कवितेत "नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे" अशी आशा व्यक्त केली होती.
त्या काळच्या मानाने आज मराठीला खूपच चांगले दिवस आले आहेत, तरीही त्याबद्दल असंतुष्ट असलेल्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे गार्हाणे गाणे चालले आहे. एका पत्रलेखकाने माधव ज्यूलियनांची क्षमा मागून "मराठी असो आमुची मायबोली, तरीही खरी राजभाषा नसे। नसे आज ऐश्वर्य या माउलीला, भविष्यात ना शष्प आशा दिसे।।" अशा शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.
आज एकूणच मराठी भाषेच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाबाबत मोठी चर्चा सुरु आहे. नव्या पिढीच्या नव्या संवादमाध्यमांमधली मराठी अशुद्ध आहे अशी ओरड तर नेहमीच ऐकायला मिळते. मोबाईल, व्हॉटसअॅप वगैरेमध्ये मराठी शब्दांचा आणि वाक्यांचही पदोपदी खून होतो असेही म्हटले जाते. काही प्रमानात हे खरे असले तरीही त्याला दुसरी बाजूही आहेच.
आपल्या जीवनशैलीत नियमितपणे होत असलेल्या बदलांमुळे कांही परभाषी शब्द रोजच्या वापरात येतातच. इंग्रजीतही असे अनेक परभाषी शब्द दरवर्षी येत असतात. खरेतर त्यामुळे आपली भाषा अधिक समृध्द होते, ती भ्रष्ट किंवा नष्ट होत नाही. संत ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी बोलीभाषा संत तुकारामाच्या काळात नव्हती आणि संत तुकारामांनी वापरलेली भाषा आजकाल प्रचलित असलेल्या व्याकरणाला धरून नाही. काळाबरोबर असे बदल होत जातातच.
माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ५६ वर्षांनी तरी त्यातील काही अपेक्षा पूर्ण होतील अशी आसा करुया !!
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।
-- निनाद अरविंद प्रधान
April 7, 2016
श्रीमंतीची लालसेची खिल्ली उडविण्यासाठी ‘लक्ष्मीघर’ या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैयधराच्या मनातील भामिनी बद्दलचा राग लक्षात घेवून प्रत्यक्षात ‘भामिनी’च ‘वनमाला’ हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते.
March 12, 2022
शिवसेनेकडून सातत्याने वापरल्या गेलेल्या मराठी माणसाने संधी मिळताच आपली खरी ताकद दाखवून दिली. आज राज ठाकरे सेनेसोबत असते, राणे, भुजबळांना बाळासाहेबांनी बाहेर पडू दिले नसते तर राज्यातील चित्र वेगळे दिसले असते; परंतु दुर्दैवाने केवळ उद्धवचे भले पाहताना बाळासाहेबांनी सेनेच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या भल्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी बाळासाहेबांना आपला मुलगा शिवसेनेपेक्षा, मराठी माणसाच्या हितापेक्षा अधिक प्यारा वाटला, असेच म्हणावे लागेल.
November 1, 2009
आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात.
August 22, 2020
आजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते.
February 6, 2019
अ)दूधापासून तयार केलेले लोणी:
१)वारंवार पातळ भसरट संडास होत असल्यास १० ग्राम लोण्याचा समावेश दोन्ही वेळच्या जेवणात करावा.
२)ज्यांना वारंवार नाकाचा घोळणा फुटण्याची सवय असते त्यांनी जेवणानंतर १ मोठा चमचा लोणी समभाग साखर घालून खावे व त्यावर तासभर पाणी पिऊ नये.
३)डोळ्यांची आग होत असल्यास,वाचताना डोळे दुखत असल्यास,डोळे कोरडे वाटत असल्यास १ चमचा लोणी,१ चमचा मध,व १ चमचा त्रिफळा चुर्ण हे मिश्रण चाटण करून खावे मात्र त्यावर पाणी व इतर खाद्य पदार्थ खाऊ नये.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 19, 2017
ग्रंथ दर्शन
दिवाळी म्हणजे दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव! अंधाराकडून प्रकाशाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची प्रेरणा देणारा दिपोत्सव! हल्लीच्या शिक्षणाने मार्क मिळतात, कधी-कधी नोकरी मिळते त्यातून बऱ्याचदा चांगले पैसेही मिळतात मात्र सन्मानाने व सर्वार्थाने जगण्याचं ज्ञान मिळतंच असं नाही. ते मिळण्याची सोय आणि व्यवस्थाही नाही. म्हणूनच ते ज्ञान आपल्याकडे दुर्मिळही आहे. बऱ्याचदा अज्ञानातच सुखही असतं. किती चांगलं किती वाईट ते माहित नाही, पण असतं, अज्ञानातही सुख असतं. कधी जगाविषयीचं अज्ञान असतं तर खूपदा स्वतःविषयीचंही असतं. मी कोण? मी कशासाठी आलोय? मी कशासाठी काय करतोय? काही थांग-पत्ता नसतो. बस्स, काहीतरी करायचं असतं आणि कसंतरी जगायचं असतं! यातून मार्ग काढण्यासाठी-त्या मार्गावर प्रकाश दाखवण्यासाठीच बहुदा दिपोत्सवाची योजना असावी!
प्रत्येकालाच वाटतं दु:खाकडून आनंदाकडे, गरीबीकडून श्रीमंतीकडे, असमाधानाकडून समाधानाकडे जावं. आनंद आणि दु:ख हे बाहेरील घटकांवर व घटनांवर अवलंबून असतात की, आपल्या मानसिकतेवर की या दोन्हींवर हे जाणून घेतलं तर हा प्रवास सोपा होऊन जातो. याशिवाय आनंदाचेही अनेक प्रकार. स्वतःसाठी घाम गाळून मिळवलेला आनंद, इतरांसोबत वाटून घेतलेला आनंद, काहीही न करता फुकटात मिळालेला आनंद आणि इतरांच्या दु:खावर शेकून घेतलेला आनंद. फटाक्यांच्या आवाजाने इतरांच्या कानठळ्या बसवणारा व धुरामधून प्रचंड प्रमाणात प्रदुषण करून मिळणारा आनंद आणि अंधारातून लुकलुकत्या पणत्यांना बघून मिळणारा निरागस-निखळ आनंद. यातून खरा आनंद शोधण्यासाठी सारासार विवेकबुद्धी व ज्ञानचक्षुच कामी येणार.
श्रीमंतीचा ध्यास असावाच! परंतु कसली श्रीमंती? मनाची, विचारांची, कर्तृत्वाची की नुसतीच कागदी पैशांमध्ये मोजता येणारी? कारण पैसा आला म्हणजे सुख-शांती व समाधान येईलच याची काही शास्वती नाही. त्याने फार-फार तर व्यवहार चालू शकेल तो आवश्यक आहेच, परंतु ज्यासाठी हा खटाटोप चालतो त्या इतर बाबींचं काय? कारण शेवटी आनंद-सुख व समाधानसुद्धा मनाची अवस्थाच आहे आणि ती काही पैशाने किंवा इतर कशाने विकत घेता येत नाही.
लाख घडोत चुका मात्र जाणिव थोडी हवी. कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाकडून चुका होतात. कधी जाणून-बुजून तर कधी अजाणतेपणी व नकळत. चुकांचा साक्षात्कार झाल्यावर त्यात सतत सुधारणा करून वाटचाल केली तर सत्कृत्यांकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल. त्यातूनच चुकांचे प्रमाणही आपोआपच कमी होत जाईल. प्रयत्नांमधून चुका वजा केल्या तर उरतं ते यश व प्रगती.
व्यसनं शारीरिक असतात तशी मानसिकही. हल्ली मानसिक व्यसनंच जास्त. नकारात्मकता, वैफल्य, निष्क्रियता अशी एक ना अनेक. सर्वच व्यसनं दुहेरी नुकसान करतात. एक तर ती तुमची शारीरिक-मानसिक झीज करतात आणि दुसरं म्हणजे प्रगतीच्या मार्गात धोंडा बनून राहतात. म्हणूनच प्रयत्नपूर्वक कोणत्याही व्यसनांपासून दूर राहण्याचा व आळसाकडून उद्योगीपणाकडे जाण्याचा संकल्प या दिव्यांच्या साक्षीने करू या. कारण आजच्या काळात शारीरिक-मानसिक आरोग्य हीच मोठी धन-संपत्ती झालेली आहे.
अज्ञानातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो त्याने मग अवघं जीवनच अंध:कारमय होऊन जातं. तर ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण विश्वच मानवी जीवनाच्या कल्याणाने आणि प्रगतीने न्हाऊन-उजळून निघतं.
म्हणूनच या दिवाळीला आनंद-सुख-शांती-समाधान-ज्ञान-विज्ञान यांचा खरा-खुरा दिपोत्सव म्हणूनच साजरा करू या! मना-मनातील व जना-जनातील या आगळ्या-वेगळ्या दीपोत्सवासाठी खूप-खूप शुभेच्छा!
श्री.नरेंद्र जोशी ठाणे
October 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti