(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ताप आणि त्यावर सोपे उपाय

    वेगवेगळ्या प्रकारच्या तापांवर सोपे सोपे उपाय वाचा…

      August 1, 2017


  • हृदयविकाराची प्राचीन कहाणी

    ज्ञात मानवी इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की हृदय-रोग हा जवळपास सर्वत्र आढळून येतो. जवळपास ३५०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मानवी संकृती होती व ती अत्यंत प्रगत होती. तेव्हा देखील हृदय-रोगाने मृत्यू ओढवत होते असा पुरावा संशोधकांना सापडला आहे.

      March 7, 2018


  • प्रगती आणि सरकार

    मध्यमवर्गाला अस्वस्थ करते ती महागाई आणि श्रीमंताना हवी असते ती प्रगती. प्रगती झाल्यावरही जर महागाईची झळ मध्यमवर्गाला पोह्चली तर त्याचा परिणाम आपल्या समोरच आहे. कधी – कधी प्रगतीच्या नावाखाली नेसर्गिक साधन- संपत्तीची हानी केली जाते त्याचे दुरगामी दुषपरिणाम लोकांना भोगावे लागतात.

      May 19, 2014


  • स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

    दाम्पत्याने विवाहानंतर किमान तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ह्याला वंध्यत्व म्हणतात. वंध्यत्वाचे वैद्यकीय कारण पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्येही असू शकते.

      December 25, 2015


  • गोवा मुक्ती दिन

    १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली.

      February 26, 2019


  • देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….

    माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.

      August 24, 2010


  • ३ बौद्ध philosophies

    ‘हंपी’ सिनेमा बघत होते… साधारण अर्ध्या तासानंतर, ललित प्रभाकरच्या तोंडी एक वाक्य आहे… की Buddhist philosophy प्रमाणे जीवनात तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात…

      September 15, 2019


  • एसआयपीचा पुरेपूर लाभ घ्या

    “गितू, इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय ते बघितलं, उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये जानेवारी १९९५ ला १ लाख रुपये गुंतवले असते आणि २ जूलै २०१५ला त्याचे पूर्ण रिडम्प्शन केले असते तर ४७ लाख रुपये मिळाले असते हे बघितलं. इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत याची दखल घेतली. मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते, हा म्युचुअल फंडाचा वैधानिक इशाराही लक्षात घेतला. १९९५ साली फक्त एकदाच केलेल्या १ लाख रुपयाच्या गुंतवणूकीतून हा लाभ झाला खरा, पण विम्याचे हप्ते सहसा दिले जातात वार्षिक पध्दतीने. मग तसंच २५ वर्ष जर इक्विटी म्युचुअल फंडात नियमित गुंतवणूक करत राहिलो असतो तर किती लाभ झाला असता?” विक्रमजीतने विचारले.

    “मागच्यावेळी बघितलं, ३५ वर्षाच्या व्यक्तीला २५ वर्षे मुदतीच्या ४० लाख सम अॅशुअर्डच्या एन्डावमेंट प्लॅनसाठी एका कंपनीचा वार्षिक प्रिमियम होतो १,५१,२४० रुपये आणि त्याच कंपनीच्या त्याच मुदतीच्या, ४० लाखाच्याच टर्म प्लॅनसाठी वार्षिक हप्ता होतो ९,८८४ रुपये. एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर बाकीचे १,४१,३५६ रुपये वार्षिक इतके इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात. विमा हप्ता मासिक, त्रैमासिक, वार्षिक असा दिला जातो. म्युचुअल फंडातही गुंतवणूक या पध्दतीने करता येते. दर महिन्याला नियमितपणे म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी ही फार लोकप्रिय पध्दत आहे. तेव्हा एसआयपी म्हणजे काय ते आधी बघू, एन्डावमेंटपेक्षा जास्त लाभ किती होऊ शकेल ते नंतर बघू,” संयोगिता म्हणाली.

    “शिस्तशीर जाऊ, ” विक्रमजीतची मस्करी.
    “एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ज्या प्रकारे मासिक विमा हप्त्याची रक्कम किंवा बॅंकेतील रिकरींग डिपॉझीटची रक्कम बॅंक खात्यातून परस्पर वळती होते, तसंच एसआयपीद्वारेही बॅंक खात्यातून ठरावीक रक्कम, ठरवलेल्या म्युचुअल फंडात परस्पर गुंतवता येते. याची फ्रिक्वेन्सी दरमहा किंवा त्रैमासिक असते. सहसा दरमहा हा पर्याय निवडला जातो. महिन्यातील १०, १५ इत्यादी एका विशिष्ट तारखेला गुंतवणूकदारांच्या बॅंक अकाऊंटमधून ठरलेली रक्कम डेबीट होते आणि ती ठरवलेल्या म्युचुअल फंडाकडे वळती केली जाते. एसआयपीचा फायदा हा की दरमहा नियमित स्वरुपात म्युचुअल फंडात गुंतवणूक होत राहते. कमीत कमी ५०० रुपयांपासून आपण एसआयपी सुरु करु शकतो. काही फंडात त्याहीपेक्षा कमी रकमेची एसआयपी सुरु करु शकतो. इक्विटी म्युचुअल फंडाबाबत त्याचा एनएव्ही कमी-जास्त होत राहतो. शेअरमार्केट वर गेले तर सहसा एनएव्ही वाढतो, खाली आले तर तो कमी होतो. एनएव्ही कमी झाला असेल तर आपल्याला म्युचुअल फंडाचे जास्त युनिट मिळतात आणि एनएव्ही वर गेला असेल तर कमी युनिट मिळतात, थोडक्यात कधी जास्त भावात खरेदी तर कधी कमी भावात खरेदी यामुळे कॉस्ट ॲव्हरेजिंग होते. ”

    “एकरकमी गुंतवणूक ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ही खूपच चांगली सोय आहे. ह्या एसआयपीची मुदत किती वर्ष असते? ”
    “ती आपण ठरवू तशी, १ वर्ष, २ वर्ष, १० वर्ष इत्यादी किंवा आपण बंद करा सांगेपर्यत कायमची अशी मुदत राहू शकते. म्युचुअल फंडाला आधी सूचना देऊन कधीही ती बंद करता येते, तसेच मधेच पैसे हवे असतील तर युनिट्सचे रिडम्प्शन करुन पैसे घेऊ शकतो. एसआयपी मात्र पुढे सुरु ठेवू शकतो. ”
    “आता एन्डावमेंट प्लॅनच्या तुलनेत किती लाभ मिळेल ते बघू. ”

    “एन्डावमेंट प्लॅनऐवजी टर्म प्लॅन घेतला तर वार्षिक १,४१,३५६ रुपये गुंतवणूकीसाठी उपलब्ध होतात, म्हणजे दरमहा सुमारे ११७५० रुपये. एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये दरमहा ११७५० रुपयांची एसआयपी १० जानेवारी १९९५ला सुरु केली असती आणि जमा झालेल्या सर्व युनिट्सचे ६ जुलै २०१५ला रिडम्प्शन केले असते तर ५ कोटी ८१ लाख रुपये मिळाले असते, म्हणजे एन्डावमेंट प्लॅनपेक्षा सुमारे ५ कोटी जास्ती. एसआयपीद्वारे आपण गुंतवलेल्या एकूण २८ लाख ९० हजार ५०० रुपयांवर हा लाभ झाला असता. फ्रॅन्कलीन इंडिया ब्ल्यूचीप आणि इतरही काही फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमधील एसआयपीमधूनही असा चांगला लाभ मिळाला असता. २० वर्ष ६ माहिने इतक्या दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकीतून हा लाभ मिळाला आहे. समजा एचडिएफसीसी इक्विटी फंडातील हीच एसआयपी १० जानेवारी १९९५ ऐवजी १० जानेवारी १९९९ला सुरु केली असती तर गुंतवलेली रक्कम झाली असती एकूण २३ लाख २६ हजार ५०० आणि रिडम्प्शन घेऊन मिळाले असते २ कोटी १९ लाख ५४ हजार रुपये. लवकरात लवकर गुंतवणूकीला सुरवात करणे किती आवश्यक आहे ते यातून कळतं. बॅंकेतील मुदतठेवीवर चक्रवाढ व्याज मिळतं तेव्हा पॉवर ऑफ कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो, तसाच इथे दिसतो. ”

    “विमा हा विषय जरा बाजूला ठेऊ. पण एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये १९९५ ला फक्त २००० रुपयांची २० वर्ष मुदतीची एसआयपी सुरु केली असती आणि मार्च २०१५ मध्ये रिडम्प्शन घेतले असते तर ४ लाख ८० हजाराच्या गुंतवणूकीतून १ कोटी रुपये मिळाले असते. २००० रुपयांची एसआयपी सुरु करणं तर कोणालाही सहज शक्य आहे. तसंच इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत त्यामुळे आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्याने गुंतवणूक करावी. ”

    वैधानिक इशारा: म्युचुअल फंडाच्या मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची हमी नाही आणि या गुंतवणूकीत जोखीम असते. (सर्व आकडे ढोबळमानाने व केवळ माहितीसाठी)

    टीप: लेख मी मराठी लाईव्ह दैनिकात ११ ऑगस्ट २०१५ ला प्रकाशित झालेला आहे.

    उदय कुलकर्णी

      August 18, 2015


  • अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाची समिती

    महाराष्ट्रात सध्या अनधिकृत बांधकामांनी धुमाकुळ घातला आहे. कॅंपा कोलाचे प्रकरणही बरेच गाजत आहे. राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरिता धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.

      June 20, 2014


  • मनाचे श्लोक – ११ ते २०

    जगीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारी मना तूंचि शोधूनि पाहे |
    मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले | तयासारिखे भोगणे प्राफ्त झाले ||11||

    मना मानसी दुःख आणू नको रे | मना सर्वथा शोक च़िंता नको रे |
    विवेकें देहबुध्दि सोडूनि द्यावी | विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ||12||

    मना सांग पां रावणा काय झाले | आकस्मात ते राज्य सर्वै बुडाले |
    म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं | बळे लागला काळ हा पाठलागी ||13||

    जिवा कर्मयोगें जनी जन्म झाला | परी शेवटीं काळमूखी निमाला |
    महाथोर ते मृत्युपंथेचि गेले | कितीएक ते जन्मले आणि मेले ||14||

    मना पाहता सत्य हे मृत्यभूमी | जितां बोलती सर्वही जीव मी मी |
    चिरंजीव हे सर्वही मानिताती | आकस्मात सांडूनिया सर्व जाती ||15||

    मरे ऐक त्याचा दुजा शोक वाहे | आकस्मात तोही पुढे जात आहे |
    पुरेना जनी लोभ रे क्षोभ होतो | म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतो ||16||

    मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते | आकस्मात होणार होऊन जाते |
    घडे भोगणे सर्वही कर्मयोगे | मतीमंद ते खेद मानी वियोगे ||17||

    मना राघवेवीण आशा नको रे | मना मानवाची नको कीर्ति तू रे |
    जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ||18||

    मना सर्वथा सत्य सोडू नको रे | मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे |
    मना सत्य ते स्ा़त्य वाचे वदावे | मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ||19||

    बहू हिंपुटी होज्ञख्154लृजे मायपोटी | नको रे मना यातना तेचि मोठी |
    निरोधे पचे कोंडिले गर्भवासी | अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ||20||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      December 25, 2015