वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्धतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्धीची, कल्पकतेची जोड असतेच.
August 3, 2008
मुळात 'नगरसेवक' व त्यांच्या ' निवडणुका ' हा एक ह्या काळातील भ्रष्टचाराचा एक मूळ उगम आहे व त्या आता रद्दबदल करूनच हा भ्रष्ट राजमार्ग कायमचा बंद करणे हीच ह्या काळाची गरज आहे. एक सांगा ह्या ऑनलाईन च्या काळात आपल्या नगरीत हा नगरसेवक हवाच कशाला ? जर सगळ्या महापालिका वॉर्ड कार्यालयांनी आपल सगळा कारभार पारदर्शक ठेवून आपली सगळी टेंडर्स, प्रोजेक्ट्स माहिती व जनसंपर्क अधिकाराखाली जनतेला खुली करून आपल्या सर्व कामाचा तपशील वेळोवेळी प्रसिद्ध केला तर ह्या नगरसेवकांची अजिबातच गरजच नाही.
प्रत्येक नागरिक हा नगरसेवकाच्या भूमिकेतून आपल्या वॉर्ड मधील चालू असलेल्या, होऊ घातलेल्या कामांचा तपशील अभ्यासून त्यावर उपयुक्त सूचना केल्या तर ह्या भ्रष्ट नगरसेवकांची गरजच काय ! प्रत्यके पालिका शसनाने ऑनलाईन कॉल सेंटर प्रस्थापित करून त्याद्वारे नागरिकांच्या समस्यां,सूचना दाखल करून त्यावरील पुढील कार्यवाहीची जबाबदारी घेतली व तसेच प्रत्येक रहिवासी कार्यकारी मंडळे पालिकेतील कारभारात अधिकृतपणे सहभाग घेवुन आपआपल्या समस्यां/सूचना मांडुन त्यान्चा पाठ्पुरावा केला तर नागरिकान्च्या मताची पोळी खाऊन वर त्यावर मिळालेल्या सत्तेचे तूप ओरपणारे नगरसेवक हवेतच कशाला ?
महापालिका अधिकाऱ्यांची कार्यपातळी तपासणी वेळोवेळी स्वतंत्र संस्थेकडून करवुन त्यात वेळोवेळी पारदर्शक सुधारणा होत राहिली तर आतापर्यंत त्यांच्या सहकार्याने होत असलेल्या भ्रष्ट कारभारावर आपले कोटिकोटिचे इमले उभारून माजलेल्या ह्या नगरसेवकांची गरजच काय?
तेव्हा आता खरंच पाळी आली आहे कि हे किडलेले भ्रष्ट नगरसेवक पद कायमचे गाडून टाकले पाहिजे, मग त्याच्या निवडणुकांचा किळसवाणा खेळखन्डोबा तर थांबेलच वर त्यावरील होणारा अनावश्यक खर्च हा नगर सुधारण्यासाठी कामी येईल. त्याबरोबरच इतिहासातच रमणारे काही राजकीय पक्ष, नेते हे पण अस्त पावतील व ती ह्या काळाची गरजच होती म्हणून आपल्या इतिहासातच नोंद केली जाईल !
-- राजेन्द्र नन्दा
March 3, 2017
ठाणे जिल्हयात यापैकी ६ शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.
कोकणातील आवाज,लेखणी महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ..
March 24, 2022
आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय..
August 16, 2019
आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे.
May 11, 2024
गणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा.
December 28, 2017
एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.
June 4, 2006
सारांश , आणि निष्कर्ष :
आपण शेषराव मोरे यांच्या लेखातील मुद्यांवर, तसेच त्यावरील प्रतिक्रियांबद्दलही चर्चा केली, खंडनमंडन केलें, कांहीं माहिती दिली, कांहीं नवीन मुद्दे मांडले . त्या सर्वाचा सारांश, आणि कांहीं निष्कर्ष, आतां थोडक्यात पाहूं या.
- - -
( पुढे चालू ) --- (परिशिष्टें )
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
October 13, 2016
आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे.
May 28, 2021
केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता.
December 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti