(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लोकशाहीचे बाजारमूल्य!

    लोकशाही शासन व्यवस्था असलेला सर्वात मोठा देश म्हणून आपण जगाच्या पाठीवर मिरवतो, तसे मिरवणे गैर नाही. परंतु लोकशाही या संकल्पनेची व्यापकता किंवा मूल्य आम्हाला पुरेसे कळाले आहे की नाही हा प्रश्न आज अर्धशतकाच्या प्रवासानंतरही कायम आहे.

      June 30, 2010


  • घटस्फोट टाळणारी प्रश्नपत्रिका…?

    लग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून कित्येक संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. लग्न टिकविण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही के मग घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते.

      October 20, 2017


  • यश – पचवायचं? की त्यात हरवायचं?

    एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी शल्यविशारद, एक यशस्वी राजकारणी, एक यशस्वी खेळाडू , एक यशस्वी लेखक, यशस्वी उद्योजक, यशस्वी अभिनेता, यशस्वी वक्ता अशा अनेकविध क्षेत्रात यशस्वी होऊन काही व्यक्ती नावलौकिकास पात्र होत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या क्षेत्रात यशस्वी होऊन जगासमोर येते तेव्हा तिच्या यशाचा बोलबाला होतो, तिच्या अंगी असलेल्या हुनरला अमाप प्रसिद्धी मिळते.

      January 22, 2022


  • श्री शिव नामावल्यष्टकम् – १

    हे चन्द्रचूड मदनान्तक शूलपाणे
    स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो ।
    भूतेश भीतभयसूदन मामनाथं
    संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥

    भारतीय संस्कृतीमध्ये, उपासनेचा क्षेत्रामध्ये नामा ला प्रचंड महत्त्व आहे. सर्वच देवतांच्या सर्व पंथात, संप्रदायात नामस्मरण ही समान गोष्ट आहे. भगवंताच्या विविध नामांमधून त्याच्या विविध गुणांचे वर्णन केलेले असते. स्वरूपाचे निर्देशन केलेले असते.
    याच कारणाने नामस्मरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी या स्तोत्रात भगवान शंकरांच्या विविध नामांची गुंफण केली आहे. त्यांचे अर्थ पाहणे देखील तेव्हाचा अनुभव असेल. पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
    हे चन्द्रचूड - ज्यांनी आपल्या चुडा म्हणजे केशकलापावर चंद्रकोर धारण केली आहे असे,
    मदनान्तक - ज्यांनी आपल्या तृतीय नेत्रातील अग्नीने मदनाला भस्म केले असे,
    शूलपाणे- शूल म्हणजे टोक. तीन टोके असल्यामुळे भगवंताच्या आयुधाला त्रिशूल म्हणतात. पाणि म्हणजे हात. ज्यांनी हातात त्रिशूळ घेतला आहे असे, तीनही गुणांचे संचालक.
    स्थाणो - परम स्थिर, अविचल,
    गिरीश - गिरी म्हणजे पर्वत. त्या हिमालय पर्वतावर जे शयन करतात ते गिरीश.
    गिरिजेश - त्या गिरी म्हणजे पर्वतापासून जन्माला आली ती गिरीजा. अर्था देवी पार्वती. तिचे स्वामी.
    महेश - सगळ्यात श्रेष्ठ देवता,
    शंभो - सगळ्यांचे कल्याण करणारे,
    भूतेश - सर्व प्राणिमात्रांचे स्वामी, नियंत्रक, संचालक.
    भीतभयसूदन - भीत म्हणजे घाबरलेला . त्याच्या भीती चे कारण ते भय. त्या भयाला जे दूर करतात ते भीतभयसूदन.
    मामनाथं
    संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष - हे जगदीशा ! माझ्यासारख्या अनाथांचे या संसाराच्या गहन दुःखातून रक्षण करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

    श्री शांकर स्तोत्ररसावली

      August 5, 2020


  • जगातील सर्वात लोकप्रिय संगणक निर्माते – डेल कॉंप्युटर्स

    जगातील सर्वात लोकप्रिय संगणक निर्माते – डेल कॉंप्युटर्स

    डेल (Dell) ही संगणक क्षेत्रातील जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून तिची स्थापना १९८४ मध्ये मायकल डेल यांनी केली. डेलचे लॅपटॉप आणि डेस्कटॉप त्यांच्या टिकाऊपणा आणि विविध श्रेणींसाठी ओळखले जातात.

      April 9, 2026


  • श्रावणी

    श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.

      August 13, 2018


  • हाडांची रचना

    प्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच.

      May 2, 2023


  • मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

    अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !

      September 16, 2017


  • पोटाचा घेर कमी करायचाय?

    पोटाचा घेर कमी करायचाय?

    पोटाची चरबी कमी करायची असल्यास तुम्हाला प्रथम तुमच्या जगण्याची पध्दत बदलावी लागेल. कारण याच पध्दतीमुळे तुमचे वजन वाढत आहे, आणि पोटाचा आकारही. याच प्रकारची जीवन पध्दती तुमच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. त्यामुळे जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करून आपल्या शरीराला आकर्षक लुक द्यायचा असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करा. तुम्हाला याचा फायदा होईल.

      August 31, 2019


  • बाळक्रीडा अभंग क्र.२५

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 5, 2018