(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आयुष्याची प्रश्नपत्रिका…

    आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही प्रश्नांसाठी आपल्यापुढे कुणाची बौद्धिक मदत ..तर कुणाची शारिरीक मदत ..आर्थिक..भावनिक घ्यावी लागते..असे पर्याय निवडण्याला प्रत्येकाला संधी मिळत असते.आपले पर्याय आपणच निवडायचे असतात आणि ते निवडताना आपण ही जी मदत घेत असतो तिचे योगदान हे केवळ आपल्याला उत्तरांच्या उद्दिष्ठाप्रत न्यावयासाठी आहे हे विसरायचे नाही..हे पर्याय आपली उत्तरे करण्याचा कधीच यत्न नसावा..कारण एकतर तशी मुभा आपल्याला नसते..आणि कुणी अट्टाहासाने जर तसा दांडगावा केला तर ती उत्तरपत्रिका त्याच्या नावाची समजली जात नाही.आणि आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ठ ठामपणे प्रत्येकाने स्वत:ला बजावायची ती ही कि आपली प्रश्नपत्रिका आपली आपण प्रामाणिकपणे सोडवायची..आपल्यावर कुणाची देखरेख आहे किंवा नाही याचा कानोसा घेण्यात अनमोल वेळ वाया न घालविता प्रश्न सोडवीत रहायचे..आपली उत्तरे कुणा दुसऱ्याच्या हाती कधीही परीक्षणासाठी ..मूल्यांकनासाठी अजिबात सोपवायची नाहीत..आपला गृहपाठ इतका जोमदार असायला हवा की आपणच आपल्या उत्तरांचे परीक्षण..मुल्यांकन करावयास सिद्ध असायला हवे..आणि कुठे काही चुकीचे वा अपुरे उत्तर आढळल्यास आपणच पुन्हा नव्याने ते लिहायला शिकले पाहिजे...आपण रोज झोपताना आपल्या उत्तरांबद्दल समाधानी नि संतुष्ठ असणं आणि आपल्या नजरेनं आपल्याला जोखताना ताठ मानेने वावरणं ही आपली जगण्याकडे पहाण्याची दृष्ठी असली पाहिजे.
    आणखी एक गोष्ठ ठाम ध्यानात ठेवायची ती ही कि या प्रश्नपत्रिकेत येणारे सारेच्या सारे प्रश्न सोडविणे अनिर्वार्य असते..वेळकाढूपणा करून प्रश्नांना बगल देता येत नाही..टाळता तर अजिबात येत नाही.आणि आपापली प्रश्नपत्रिका आटोपल्यानंतर आपल्याला उगाचच कुणासाठी रेंगाळता येत नाही..प्रत्येक प्रश्नाला असणारे गुण आपणाला कधीच दिसत नाहीत..आणि त्याही पुढे एकच प्रश्न जरी आजूबाजूच्या सहकाऱ्याच्या प्रश्नपत्रिकेत दिसला तरी प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेत त्याला असणारे गुण कधीच समान नसतात..तेव्हा आपली उत्तरे लिहताना शेजारी_पाजारी बघणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय ठरतो.

    या प्रश्नपत्रिकेत बरोबर लिहलेल्या उत्तरांना भरघोस गुण असतात..आणि त्या गुणांची सावली आयुष्यभर आपल्याला आणि आपल्या सोबतीला येणाऱ्या तथाकथित अपयशी म्हणून उल्लेख होणाऱ्या सगळ्या सोबत्यांना लाभत असते..आणि आपल्या चुकलेल्या उत्तरांना पुन्हा पुन्हा नव्याने लिहायची संधी प्रत्येकाला मिळत असते..आपण एकच करायचे असते कि कुठलाही मानपान ..आढेवेढे न घेता..यतकिंचितही अपराधीपणा न मानता..न्यूनगंड न जोपासता प्रसन्न मनाने चुकलेली उत्तरे लिहित जावे..आणि ही अशी उत्तरे सवयीने लिहिण्याचा नियम नसावा..तर ती सहजतेने लिहिली जावीत..एकदा आपल्याला आपल्या चुकलेल्या उत्तरांना समजावून ..सांभाळून घ्यायला जमू लागले की मग आपल्यामध्ये दुसऱ्याच्या चुकलेल्या उत्तरांची खिल्ली उडविण्याची वृत्ती मूळ धरणार नाही..
    आता इथला प्रत्येकजण ज्याची त्याची प्रश्नपत्रिका पूर्ण लिहूनच बाहेर पडत असला तरी बहुतांशी लोक ही परीक्षा देताना परीक्षेचा उद्देश..प्रयोजन..आपल्याला परीक्षेस बसण्याची मिळालेली संधी..आपल्याला परीक्षा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासासाठी जन्मजात मिळालेली विचार..भावना हि आयुधे ..आपली काबिलीयत..हुनर..ईश्वरी अनुग्रह..अभिषेक या सगळ्याकडे पाठ फिरवून बसत उत्तरे लिहित असतात..आयुष्याचे जगणे सार्थकी होणे म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका लिहून झाल्यावर मिळणारा कौल नसतो...आणि सत्य हे की असा कौल स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे भाग्य कुणालाही लाभलेले नाही..वा लाभत नसते..तर जगण्याचे सार्थक ..कुणी त्यास मोक्ष म्हणतात .. तो हा कि उत्तरे लिहताना प्रत्येक प्रश्नाशी आपला जुडलेला भाव..त्याच्याशी झालेला समागम आणि शेवटी उत्तर लिहून झाल्यावर अलवार..अवचित ..अनावधानाने ओठातून निसटणारी शीळ..बस्स याशिवाय आयुष्यात काहीही मिळवायचे नसते..हा प्रत्येक टप्प्यावर आपले नाव घेत ..शोधत शोधत आलेला आनंद जेव्हा आपण भेटल्यावर गळ्यात गळा घालून बिलगतो नि आपल्या खांद्यावर त्याचे आनंदाश्रू ओघळतात ..हा क्षण म्हणजे स्वर्गसुख नव्हे तर साक्षात इन्द्रपदच होय...आपल्यावर होत असलेल्या आसवांच्या अभिषेकात भिजून चिंब होताना आसवांच्या लहान_मोठ्या वर्गवारीकडे अजिबात ध्यान देऊ नये..कुणी आपल्याला तसे करण्यास भरीस पडत असला तरी त्याकडे कानाडोळा करावा..आनंदाचे मूल्य झोपडीपासून राजवाड्यापर्यंत वस्तुमानासारखे एकच असते..आपण आपल्या परीने ज्या गुरुत्वाकर्षणाचा चष्मा लावून त्या आनंदाकडे बघत असतो त्यानुसार आनंदाचे वजन बदलत असते..वस्तुमान नाही..हे जगण्याचे प्रमेय ही आपली आयुष्याची स्टेटस लाईन असावी.

    आता हे कागदावरचं प्रश्नपत्रिका सोडविण्याचे मार्गदर्शन कितीही सोप्पं..नि सहजशक्य वाटत असलं तरी प्रत्यक्ष प्रश्न समोर उभे ठाकल्यावर उत्तरे डोळ्याच्या आवाक्यात दिसत असली तरी कागदावर उतरवताना हात कापू लागतात...या अनुभवातून आपल बेडा यशस्वी बाहेर पाडावयाचा असेल तर आपणच आपल्या पाठीशी ठामपणे उभे रहायचा सराव अभ्यासाने अंगी बाळगून असावे. आपल्या प्रश्नपत्रिकेतील अवघड ..कठीण..प्रश्नांना सहजतेने स्वीकारावे .आपल्या बुद्धीवर ..चातुर्यावर ..क्षमतेवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा.किंबहुना त्याकडे बघूनच आपल्या प्रश्नपत्रिकेत अवघड ..कठीण प्रश्न आलेत या बद्दल खुशाल रहावे. आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न ज्या ईश्वरी संकेतानुसार आलेले आहेत तोच ईश्वरी अंश आपल्यात आहे हे का जर जाणलं तर आपल्याला कृतार्थ जीवन जगणे सुलभ होऊन जाते..आणि शेवटी ज्यांचा ईश्वरावर..नियतीवर विश्वास..श्रद्धा नाही त्यांच्यासाठी..त्यानाही प्रश्नपत्रिका लागू आहे ..सर्व प्रश्न अनिर्वार्य आहेत..भले त्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्ना _मागील ईश्वरी संकेत कबूल नसेल तरी निसर्गाचे नियम साऱ्या सृष्टीला बंधनकारक आहेत ..सहजीवनाचे जगणे मान्य केल्यावर एकमेकाच्या उन्हा_सावलीत इच्छा असो वा नसो विसावा घ्यावाच लागणार हे ही त्यांना नाकारता येणार नाही..आता या साऱ्या नियमबद्ध नैसर्गिक सृष्टीतील श्वास_उ:श्वास यालाच कुणी ईश्वर म्हणू लागतो..आता याला मानणे आणि न मानणे याचा काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या स्वरूपावर परिणाम होत नसतो..मात्र उत्तरे लिहताना असणारी अदब मात्र जरूर बेमिसाल असते तिचा रंग आणि नूर काहीसा आगळा असतो..

    रजनीकान्त

      March 19, 2018


  • श्री विठ्ठल अवतार

    (श्री भक्त पुंडलीक कथा)

    श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी
    दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १

    पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण
    सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २

    सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी
    ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३

    तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे
    हे कुणास न कळे प्रभूविना ४

    असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा
    कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५

    कुणी करती मुर्तीपुजा कुणी पाही निसर्गांत मजा
    प्रभूसी नको भाव दुजा मनोभावाविना ६

    सत्य आणि तपशक्ती प्रभूस वाकवती
    पाहून पुंडलीक भक्ती धाऊन आले पांडूरंग ७

    माता पित्याची सेवा हाच भक्तीचा ठेवा
    ती भक्ती खेचती देवा दर्शन देण्या भक्ताना ८

    मातापिता सेवेचे प्रतीक मिळोनी धन्य होई पुंडलीक
    विश्वाचे उदाहरण एक प्राप्त करण्या प्रभुसी ९

    भक्तपुंडलीक कथा त्याची रंजक
    होई जीवन सार्थक करुनी अचरणांत १०

    पुंडलीक होता विलासी लक्ष्य त्याचे बायकोपाशीं
    सर्वस्व समजे धनासी सुख मिळण्या देहाला ११

    एके दिनी नारदमुनी गेले उपदेश करुनी
    महती आईबापाची पटवूनी पुंडलीकास १२

    झाली पुंडलीका उपरती केल्या कर्माचे दुःख होती
    पश्चाताप मनी येती भाव भरले प्रेमाचे १३

    अंधःकार भयाण जाई दुर होऊन
    मिळता एक किरण प्रकाशाचा १४

    गुरुकडून मार्ग मिळे ज्ञान झाले आगळे
    भक्तीसेवा ही शक्ती कळे पुंडलीकासी १५

    मातापित्याची सेवा हाची पुंडलीकाचा मेवा
    सारे जीवन खर्ची पडावा ही त्याची इच्छा १६

    स्वतःसी गेला विसरुनी आईबापाची काळजी करुनी
    सर्वस्व अर्पिले रात्रंदिनीं मातापित्यासाठीं १७

    सेवा हेची तप न लागे नामाचा जप
    श्रद्धाभाव आपोआप यावेमनामध्यें १८

    प्रभू भक्तिचा भुकेला जातां तप फळाला
    दर्शन देई पुंडलीकाला विठ्ठल रुप घेऊनी १९

    तल्लीन होऊनी सेवा करी आईबाप झोपतां मांडीवरी
    त्याक्षणी पांडूरंग आले दारी पुंडलीकांच्या २०

    पांडूरंगाचे रुप बघूनी अश्रुधारा आल्या नयनीं
    भावनावश होऊनी नमन केले प्रभूला २१

    हलविली नाही मांडी आईवडीलांची निद्रा न मोडी
    मनी प्रभुच्या स्वागताची गोडी पुंडलीकांस पडली २२

    समोर उभे परमात्मारुप मांडीवरी आईवडीलांची झोप
    निद्रामोडता होईल ताप खंत याची पुंडलीकास २३

    विट घेतली हातीं विठ्ठलासमोर टाकती
    उभे राहण्यास विनविती विनंम्र होऊनी २४

    क्षमा मागती प्रभूसी कसे उठवूं आईबांबासी
    दुःख त्याचे मनासी झोप मोडता येई २५

    आई वडील इच्छा करी जाण्या चंद्रभागेतीरीं
    विठ्ठला उभाकरुनी विटेवरी नदीकाठी गेला पुंडलीक २६

    माता पिताना घेऊन गेला चंद्रभागेकाठी रमला
    विसरुनी जाई विठ्ठला पुंडलीक २७

    पुंडलीक विनंती करी उभे रहावे विटेवरीं
    परतोनी येई तो चंद्रभागेवरुनी २८

    कर कटेवरी उभें विटेवरी
    लक्ष्य वाटेवरी पुंडलीकाच्या २९

    आईवडील भक्ती पोटीं रमला त्यांच्या पाठी
    विसरला जगत् जेठीं पुंडलीक ३०

    आजही जाता पंढरपूरीं विठोबाचे दर्शन करी
    दिसेल तो उभा विटेवरी रुख्मिणीसंगे वाट बघत ३१

    सुर्यचंद्र आकाशी अथांग तारे नभाशी
    येऊन जाती रात्रंदिवशी हेच चक्र निसर्गाचे ३२

    ऋतु नियमीत येती मार्ग ते ना बदलती
    हीच असे निसर्ग महती प्रभूशक्तीमुळे ३३

    निसर्गाची नियमितता हीच त्याची श्रेष्ठता
    प्रभूचे अस्तित्व जाणतां त्या ठिकाणी ३४

    जेव्हां अघटीत घटणा होई प्रभू त्यांत भाग घेई
    तें चक्रची सुरु होई नियमित रुपे ३५

    भक्तासी पावन झाला पंढरपूरी प्रभू अवतरला
    आषाढी एकादशीला दर्शन देई पुंडलीका ३६

    ही झाली अपूर्व घटना परी विचार येई मनां
    सुरु होईल नवीन निसर्ग रचना प्रभूचे अगमन होण्याची ३७

    होता प्रभूचे अवतरण शक्यता त्याची पुनरागमन
    होईल निसर्ग नियमन हीच महती तिर्थाची ३८

    त्याच स्थळी प्रतिवर्षी प्रभू अवतरेल त्याच दिवशी
    भावना बाळगुनी उराशीं लाखो जमती वारकरी ३९

    ही निसर्ग किमया प्रभू अवतरेल जाणूनिया
    प्राप्त होईल त्याची दया ही भावना उराशीं ४०

    चंद्रभागातीरीं पंढरपूर जैसे काशी गंगातीर
    वारकऱ्यांचे माहेर भक्तांचा जमे मेळा ४१

    विठ्ठल रुखमाई मंदीरीं दर्शन घेई वारकरी
    तैसैचि पूजा पुंडलीकापरी भक्त प्रभूसी भजती ४२

    ।। शुभं भवतु ।।

    डॉ.भगवान नागापूरकर
    ११- १३११८३

      January 11, 2018


  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करावी लागणे हे भारतीयांचे दुर्दैव

    स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत.

    दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला.. अगदी महाराष्ट्रात १०५ हुतात्म्यांचा संहार करणार्‍या मोरारजी देसाईसारख्या माणसाला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही.

    राहूल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांची पलटण यांनी कधीतरी सावरकर काय होते त्याचा अभ्यास केला आहे का? सावरकरांनी ज्या नरकयातना भोगल्या त्या भोगायची कल्पना तरी राहूल गांधी करु शकतात का?

    अगदी परवाचेच साधे उदाहरण. राहुल गांधींनी मोठा गाजावाजा करुन मुंबईच्या डम्पींग ग्राऊंडचा दौरा आखला. डम्पींग ग्राऊंडवरच्या दुर्गंधीने त्रासून त्यांनी अक्षरश: पाच मिनिटात त्या ठिकाणाहून पळ काढला. असे हे आमच्या देशाचे “युवराज”. सावरकरांनी अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये उमेदीची वर्षे काढली तिथे आमचे आजचे नेते दोन दिवस तरी राहून दाखवतील का?

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी अनेकदा सरकारकडे केली गेली. मात्र राजकीय कारणांसाठी कॉंग्रेस सरकारने त्याचा कधीच विचार केला नाही. भाजप सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली खरेतर पंतप्रधानांच्या शिफारसीनंतर भारतरत्न किताब देण्यात कोणतीही इतर औपचारिक शिफारस आवश्यक नसते. त्यामुळे यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न मिळतोय का ते बघायचे.

    -- मराठीसृष्टी टिम

      July 4, 2016


  • निरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा

    गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु…

      July 5, 2020


  • दात पिवळे होणे किंवा त्यांवर डाग पडणे (रंग ख़राब होणे)

    दात स्वच्छ न घासणे.

    खाण्याच्या सवयी.

    धुम्रपान.

    पान मसाला चघळणे.

    हिरड्यांचे संक्रमण (इन्फेक्शन).

    दात किंवा जबड्याचे हाड मोडणे.

    जीवनसत्त्व क आणि ड ची कमतरता.

    कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे.

    पाण्यात फ्ल्युओरीनचे प्रमाण जास्त असणे.

    किडलेले दात.

    काळजी.

    दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा - सकाळी (उठल्यावर) आणि रात्री (झोपण्यापुर्वी).

    खाऊन झाल्यावर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.

    योग्य दंतमंजन वापरा.

    पौष्टिक अन्नाचे सेवन करा.

    धुम्रपान टाळा, तंबाखू खाणे टाळा.

      April 10, 2017


  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ७

    भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..

      October 8, 2020


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सेहेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1

    हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.

    या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
    कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
    त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.

    आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.

    जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.

    केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.

    देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.

    या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.

    यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.

    जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
    ............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    26.05.2017

      May 26, 2017


  • ऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान

    ऑनलाइन प्रवेश : शंका-समाधान

      August 8, 2009


  • दशमान कालमापन आणि घड्याळे

    कालमापन हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे.

      July 15, 2023


  • जय महाराष्ट्र

    महाराष्ट्राविषयी थोरांचे विचार…

      May 11, 2021