(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अग्रलेखांचा दबदबा

    अग्रलेखांचा दबदबा

    २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.

    आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.

      July 3, 2025


  • नोटबंदीची पाच वर्ष

    २०१५-१६ ला जे काही कागदी चलन भारतात होते, त्यातील ९५ टक्के चलन हे उच्च मूल्याच्या नोटांच्या रुपात होते. (१००० च्या नोटा- ३८ टक्के, ५०० च्या नोटा- ४५ टक्के आणि १०० च्या नोटा- १० टक्के) याचा अर्थ ३० टक्के नागरिक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असताना एकूण चलनाचे ९५ टक्के मूल्य अशा तीन मोठ्या नोटांत होते. त्यामुळे पैसा फिरत नव्हता आणि त्याचे एक दुष्टचक्र तयार झाले होते.

      November 8, 2021


  • समतेचे आद्य प्रवर्तक संत रविदास महाराज

    संत रविदास यांचा जन्म सन 1398 मध्ये काशी येथे झाला. चर्मकार समाजाच्या रविदासांचा वडिलोपार्जित धंदाही चामड्यापासून पादत्राणे व अन्य वस्तू बनविणे हा होता. परंतु, रविदास लहानपणापासून ईश्वरभक्तीकडेही वळले होते. वाईट कर्म त्यागून परमेश्वर भक्तीकडे जा तोच खरा मार्ग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या जीवनातील अनेक घटना याची साक्ष देणार्‍या आहेत.

    रविदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.

    पराधिनता पाप है जान लेहु रे मीत
    रविदास दास पराधीन तो कौन करे है प्रीत
    सामान्याने पराधिनतेला दूर करण्यासाठी निर्भय बनले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. गुलाम होणे हे पाप आहे. अशी त्यांची शिकवण होती.

    रविदासांनी त्या काळी समाजवादाची तुतारी फुंकली होती. स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना असा सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या दोह्यातूनही त्यांनी ती मांडली. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणार्‍यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही असा इशाराही ते देतात. सामाजिक एकोप्याचे उदाहरण त्यांनी त्यांच्या एका दोह्यातून फार छानपणे मांडले आहे.

    एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा
    रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा

    सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.

    समाजवादी विचारसरणी मांडणारे ते संत होते. त्यांचा समाजवाद खालील ओळीतूनही दिसून येतो.

    ऐसा चाहो राज्य में, जहां मिले सबन को अन्न
    छोट बडो सब सम बसे रविदास रसे प्रसन्न

    रविदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. इथे महाराष्ट्रातल्या गोरा कुंभाराशी ते नाते जोडतात. गोरा कुंभाराने काम करता करता विठ्ठल नाम घेतले आणि त्या नादात स्वतःच्या मुलालाही त्यांनी मातीत कालवून टाकले होते. रविदासही काम करता करताच ईश्वरभक्तीत लीन होत होते. एकदा त्यांना गंगेवर चलण्यासाठी काही लोकांनी सांगितले. परंतु, आज एका व्यक्तीला पादत्राणे बनवून देण्याचे वचन दिले असल्याने मी येऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून काम हीच आपली ईश्वरभक्ती असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. 'मन चंगा तो कठोती में गंगा' मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे.

    जनार्दन गव्हाळे, खामगाव, जिल्हा बुलढाणा, विदर्भ.

      September 7, 2016


  • हिरा आणि काच!

    चकाकणाऱ्या वस्तूला सोने समजण्याचा मोह सगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी या फसवणुकीला तोंड द्यावेच लागते. आपल्या वैयत्ति*क आयुष्याचे आणि समाजाचेही सर्वाधिक नुकसान अशा नकली काचेच्या तुकड्यांमुळेच होत असते.

      May 10, 2009


  • ब्लॅक सी

    भूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे.

      October 10, 2019


  • परब्रह्मप्रातःस्मरणस्तोत्रम् सार्थम् – मराठी अर्थासह

    श्री आदिशंकराचार्यांनी रचलेल्या या स्तोत्रात केवळ तीनच श्लोक आहेत. पाठकाचे कायावाचामने अत्युच्च तत्त्वाचे चरणी समर्पण करण्याचा त्याचा उद्देश आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या मनात येणा-या विचारांचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत असतो. जर आपण ते विचार पवित्र व स्वर्गीय करू शकलो तर आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने आपली नक्कीच वाटचाल होईल. या दृष्टीने ही पहाटेस करावयाची प्रार्थना निश्चितच महत्त्वाची आहे.

      March 25, 2021


  • फेब्रुवारी ०१ : अजय जडेजाचा जन्म आणि अंडरआर्म इन्सिडन्ट

    संस्थानिक-पुत्र अजय जडेजाचा जन्म आणि अखेरचा चेंडू फटका मारता येऊ नये म्हणून ग्रेग चॅपेलने आपल्या भावाला हात न फिरवताच टाकायला लावला त्याचा तपशील

      February 1, 2011


  • किचन क्लिनीक – नारळ

    नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.

    माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.

    आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
    तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.

    नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.

    नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.

    तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!

    चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:

    शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.

    नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 23, 2016


  • कृष्णविवर आणि त्याचा शोध

    आईन्स्टाईनने सांगितलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धान्तामध्ये सर्वप्रथम कृष्णविवराच्या अस्तित्वासंबंधी शक्यता निर्माण झाली. गुरुत्वाकर्षणाचा काळावर कसा परिणाम होतो ते या सिद्धान्तामुळे स्पष्ट झाले. कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली.

      November 21, 2022


  • उदो बोला उदो

    उदो बोला उदो अंबा विझामाऊलीचा हो । उदो बोला उदो ।।
    उदोकार गर्जती सकल प्रधान मंडळी हो । उदो बोला उदो ।।धृ।।

    सह्याद्री पर्वती नगरी ताम्हीणीते मधी हो ।
    देवी विझाई वसली प्रधान कुल रक्षिणी हो ।।
    मूळ रूप जगन् माता अंबा विध्याद्री पर्वती हो।
    ताम्हीणीते आली भत्त*ा प्रसन्न होऊनी हो ।।1।।
    उदो बोला उदो ।।धृ।।

    सप्तशति जप होम हवने सद्भत्त*ी करूनी हो।
    श्रेष्ठ गंगा सुते विध्य पर्वती आकान्त मांडीला हो ।।
    तनु त्यागुनि विलिन झाला जगदंब स्वरूपी हो ।
    जगतामध्ये कीर्ती केली कायस्थाचे कुळी हो ।।2।।
    उदो बोला उदो ।।धृ।।

    प्रसन्न झाली अम्बा कनिष्टा कारणी हो ।
    रक्षीन तुझे कुला सूर्य चंद्र हो परी हो ।
    मागणे मागतो विध्यवासीनी चरणी हो ।
    दासा गणेश सुता ठाव द्यावा तो चरणी हो।।3।।
    उदो बोला उदो ।।धृ।।

    गायक- श्री.गजानन प्रधान.

      October 15, 2015