(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निमित्त : कृष्ण निवासाचे…

    गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नौपाडय़ातील कृष्ण निवास ही धोकादायक इमारत कोसळली आणि ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यानंतर अशा प्रकारच्या संभाव्य धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा दाखवून बेघर करण्यात आले. त्यापैकी बरीचशी कुटुंबे सध्या रेंटल हाऊसिंग नामक असुविधांचा सामना करीत जगत आहेत. खरे तर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र दुर्दैवाने शासन आणि स्थानिक प्रशासन त्याबाबतीत फारसे संवेदनशील नसल्याचा सर्वसामान्य ठाणेकरांचा अनुभव आहे..

    एक वर्षांपूर्वी उत्तररात्री २ वाजून १५ मिनिटांनी ठाण्याच्या ‘बी’ केबिन परिसरातील ‘कृष्ण निवास’ ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. तब्बल १२ जणांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर पुढे महिनाभर बचाव कार्यात आपण कसे सहकार्य केले हे सांगण्यात जवळपास सर्व राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली होती. यासंदर्भात सहयोग मंदिर सभागृहात झालेल्या चर्चेत अतिरिक्त आयुक्तांनी एनडीआरएफ पथकाला आठ दिवसात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले. आताही हे पथक कौश्याहून येते असे समजते. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही की २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये एनडीआरएफच्या पथकाला जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनीही तातडीच्या बैठका घेऊन अशा घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा खल केला. झालेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखांब, उपायुक्त अशोक बुरपुल्ले तसेच उपनगर अभियंता राजन खांडपेकर अशा कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांची त्रिसदस्य समिती नेमण्यात आली. या समितीची चौकशी पूर्ण होताच चौकशी अहवाल ठाणेकरांच्या समोर ठेवण्याची घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप तरी या समितीचा चौकशी अहवाल ठाणेकरांसाठी खुला करण्यात आलेला नाही. आता किमान ‘वर्षश्राद्धाला’ तरी तो अहवाल जनतेसमोर येईल, अशी अपेक्षा आहे…

    या घटनेचा धसका घेऊन ‘आजी कृपा’, ‘यशवंत कुंज’, ‘शांतासदन’, ‘आई’, ‘चंद्रकला’, ‘गणेश भुवन’, ‘सावित्रीदीप’, ‘अनुस्मृती’, ‘कमळाजी भुवन’, ‘शकुंतला’, ‘श्रमधाम’, ‘पार्वती निवास’, ‘मनीषा’, या भाडेकरूंच्या रहिवास असलेल्या इमारती जीवितहानीचा दाखला देत रिकाम्या करण्यात आल्या. काही इमारती तर केवळ २४ तासांच्या नोटिशीवर खाली करण्यात आल्या. खासकरून नौपाडा प्रभागातील अशा इमारतीतील राहणारे, ज्यात विशेषकरून वरिष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती, ते अक्षरश: एका दिवसात रस्त्यावर आले. बऱ्याचशा भाडेकरूंची या घराशी जन्मापासून असलेली नाळ अशी अचानक तोडण्यात आली. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक विधवा महिला आहेत. ‘यशवंत कुंज’ आणि ‘आजीकृपा’मधील अशा महिलांनी जेव्हा आपल्याबरोबर या घरात आलेला देवघरातील ‘लंगडा बाळकृष्ण’ आणि ‘अन्नपूर्णा देवी’ उचलून आपल्या मुठीत घट्ट धरली, तेव्हा बंदोबस्तासाठी तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसांचेही डोळे पाणावले. काळाने एका झटक्यात या सर्वाना आप्तेष्टांच्या उंबरठय़ावर व्यथित जीवन जगण्यासाठी नेऊन उभे केले आणि त्यातून अनेक कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले. भाडेकरूंना इमारतीबाहेर काढताना त्यांच्या हक्कांचे रक्षण केले जाईल. आपण राहत होतात तेवढय़ा क्षेत्रफळाचे ‘हमी पत्र’ देण्यात येईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात त्याऐवजी ५० रुपये शुल्क आकारून नौपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्तांनी ज्या दिवशी या इमारती पाडल्या, त्या दिवशी असलेल्या भोगवटाधारकांच्या नोंदीमध्ये आपले नाव असल्याचा उतारा देऊन निष्कासित भाडेकरूंची बोळवण केली आहे. आतापर्यंत नौपाडय़ातील एकाही निष्कासित भाडेकरूला ‘हमी पत्र’ देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुनíवकासास आणखी तीन वर्षे लागल्यास आयुक्त बदललेले असणार. मग जेव्हा तुम्हाला निष्कासित केले, तेव्हाच ‘हमी पत्र’ का नाही घेतले, असा प्रश्न प्रशासन विचारणार..

    या सर्व इमारतींचे कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट न करता अथवा कोणताही तांत्रिक अहवाल सादर न करता केवळ प्रशासनिक २६७(१) कलमाचा आधार घेत स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती देत मूळ ठाणेकर असलेल्या या करदात्यांना बेघर करण्यात आले. त्यामुळे बऱ्याच जणांच्या नशिबी एका रात्रीत ‘बुरे दिन’ आले. पुढे तीन-चार महिने पाठपुरावा केल्यानंतर या सर्वाना रेंटल हाऊसिंग नामक १६० चौरस फुटांच्या जागेत कोंबण्यात आले. त्यामुळे आगीतून फुफाटय़ात पडावे, अशी त्यांची अवस्था झाली. दरमहा दोन हजार रुपये भाडे घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने या इमारतींच्या देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. भाडेतत्त्वावरील या इमारतींना टीएमसीकडून नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. टँकरच्या दूषित पाण्यामुळे या निवाऱ्यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

    ठाण्यातील नौपाडा प्रभागातील या सर्व अधिकृत भाडेकरूयुक्त इमारतींचा पुनर्विकास रखडण्याची कारणे म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारे दुप्पट चटईक्षेत्र. तसेच इमातींसमोरील ९ मीटरच्या रस्त्याची अट. शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. त्यात ठाण्यातील ८२% बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती बाहेर आल्यामुळे शासनाने आपला मोर्चा ही सर्व बांधकामे नियमित करण्याच्या कामाकडे वळविला आहे. त्यामुळे १८ टक्के अधिकृत इमारतींकडे किंवा त्यांच्या पुनर्विकासाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास शासनास रस वाटत नाही हीच खरी शोकांतिका. शासनाच्या अलीकडच्या हालचाली पाहता ठाण्यात ‘अनधिकृत तुपाशी आणि अधिकृत उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    या पाश्र्वभूमीवर ब्राह्मण सोसायटीतील ‘शरदचंद्र दर्शन’ या पन्नास वर्षे जुन्या इमारतींबद्दल सुखद अनुभव आला. या इमारतीस ठाणे महानगरपालिकेने अतिधोकादायक ठरवून पाडण्याची नोटीस दिली. इमारतीचे मालक शरदचंद्र लोहकरे आणि इमारतीत वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची एक तातडीची बैठक घेऊन या इमारतीचे ठाणे मनपाच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिटरकडून ऑडिट करून घेतले. तेव्हा ही इमारत दुरुस्त करून वापरण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. लगेचच महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी मिळवून इमारत दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे भेदरलेल्या समाजापुढे एक आदर्श ठेवण्यात आला.

    अलीकडेच २२ जुलै रोजी आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ‘शरदचंद्र दर्शन’ या इमारतीचा दाखला देत काही सूचनावजा मागण्या केल्या. मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरासाठी तातडीने दुरुस्ती मंडळाची स्थापना करावी, धोकादायक इमारतींना दुरुस्ती करण्याची संधी द्यावी. उपकरप्राप्त इमारतींची ‘इमारत निरीक्षक’मार्फत इमारतीच्या आयुष्यमानाप्रमाणे दरवर्षी पालिकेच्या शहर विकास विभागाकडून पाहणी करण्यात यावी, पालिकेद्वारा जमीनदोस्त केलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत कालबद्ध नियम व योजना बनविण्यात यावी आदींचा त्यात समावेश आहे.

    असो. भेदरलेल्या आणि विखुरलेल्या या भाडेकरूंना डायबेटीस, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी या दुर्घर आजारांनी वेढलेले आहे. कारण रेंटल हाऊसिंगमधील गैरसोयींचा त्यांनी धसका घेतला आहे.

    -- महेंद्र मोने,
    ठाणे येथील जागरुक नागरिक, भाडेकरूंचे प्रतिनिधी

    दि. ३ ऑगस्ट २०१७ च्या `लोकसत्ता'मध्ये प्रकाशित लेख

      April 14, 2017


  • जनदेशाची हेळसांड !

    गेल्या वीस दिवसापासून राज्यात सत्तेचा राजकीय फड रंगला आहे. सर्वसामान्य जनतेला अक्षरशः दावणीला बांधल्यासारखे गृहीत धरल्या जात आहे. आणि तेही कशासाठी तर फक्त मलिद्याची खाती कोणी घ्यायची, हे ठरविण्यासाठी. यालाच लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य म्हणायचे का?

      November 15, 2019


  • ठाण्यातील नाट्यसंस्था – मित्रसहयोग

    मित्रसहयोग’च्या माध्यमातून आपली रंग-कारकीर्द सुरू करणारे आणि नंतर नावारूपास आलेल्या कलाकारांची यादी मोठी आहे. उल्लेख करायचा झाला तर अशोक साठे, रजन ताम्हाणे, प्रबोध कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, शिरीष लाटकर, पराग बेडेकर, पल्लवी वाघ, अभिजित चव्हाण, गजेंद्र अहिरे यांचा करता येईल. वसंत कामत, नंदकुमार नाईक, अशोक बागवे, श्रीहरी जोशी, श्याम फडके, शिरीष हिंगणे, ॲ‍ड. संजय बोरकर आणि हर्षदा बोरकर हे ‘मित्रसहयोग’चे हक्काचे नाटककार होते.

      October 14, 2022


  • किचन क्लिनीक – नारळ भाग ३

    आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात:

    १)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.

    २)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे.

    ३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात.

    ४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात कोकम,मिरची,लसूण,मीठ घालून सोलकढी करतात जेवणानंतर शेवटी भातात मिसळून खाता ही पाचक असते.

    ५)ओले खोबरे व गुळ हे मिश्रण बल व बुद्धीवर्धक आहे.

    ६)किसलेले खोबरे व खोबरेल तेल एकत्र शिजवून त्याचा पोटीस हा सुज व मार लागलेल्या जागी बांधला असता वेदना कमी होतात.

    ७)ओल्या नारळाचा रस व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण लघ्वी कमी होत असल्यास प्यावे ह्याने लघ्वी सुटायला मदत होते.

    ८)नारळाचे पाणी १ लिटर भर घ्यावे व काकवी सारखे होई पर्यंत आटवावे मग त्यात जायफळ,सुंठ,मिरी,वेलची,जायपत्री ह्यांची पुड घालून बाटलीत भरून ठेवावे हे मिश्रण पोटदुखी किंवा पोटात आग होत असल्यास १० मिली दिवसातून २ वेळेस सकाळ संध्याकाळी २ आठवडे घ्यावे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 25, 2016


  • आता लढा सुरू झालाय!

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या निकराच्या लढ्यात प्रकाश पोहरे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यामुळे दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘प्रहार’ या स्तंभासाठी ते यावेळी वेळ देऊ शकले नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी दि.

      November 19, 2006


  • प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचणारा रॉल्ड अमुंडसेन

    १४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला. त्याचे पथक सुखरुप परत आले. १८ जानेवारी १९१२ ला रॉबर्ट स्कॉटही दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचला. परंतु परत येताना तो व त्याचे लोक मृत्यू पावले.

      December 14, 2021


  • रंगभूमी – जगण्यातील असणे आणि नसणे शोधण्याचे ठिकाण !

    सांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी.

      November 9, 2022


  • करमणुकीचे जंजाळ

    दर्जेदार चित्रपट निर्मिती  गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतभर आपण अनुभवत आहोत. २१व्या शतकाची दोन दशके आपण पार केली आहेत. या कालखंडात आमूलाग्र माध्यमक्रांती झालेली आपण बघतो.

      April 29, 2024


  • कोकण विकासाची संधी

    आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे.

      April 4, 2023


  • जागतिक मराठी भाषा दिवस

    आज २७ फेब्रुवारी.  ‘जागतिक मराठी भाषा दिवस’. याच दिवसाला`राजभाषा दिवस’ असंही म्हणतात. जेमतेम सात दिवसांपूर्वी, २१ फेब्रुवारीला `जागतिक मातृभाषा दिवस’ जगभरात साजरा केला गेला.

      February 27, 2017