वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव.. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण, पण एकदा समजला जी जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा.
March 11, 2020
माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो,
मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा काय आहेत ह्याचा वेध ह्या निमित्ताने मला घेता येतो. गेल्या सुमारे चार दशकांच्या काळात नोकरीसंदर्भात मी हजारो तरुणांचे इंटरव्यू घेतले आहेत माझ्या संस्थेसाठी योग्य उमेदवार निवडणे हा जरी हेतू असला तरी त्या प्रोसेसमध्ये मला उमेदवार असलेल्या तरुण-तरुणींची मानसिकता समजण्यासाठी त्याचा उपयोग झाला. ह्या माझ्या प्रदीर्घ अशा काळात मला काय अनुभव आले आणि त्यातून आजच्या पिढीला स्वतःच्या उत्कर्षासाठी काय करता येईल, ह्याचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हे करताना आपली प्रगती का होत नाही, ह्याबद्दल ही तरुणाई काय कारणे देते, ते आधी बघू या.
वरील सर्व किंवा काही कारणे देऊन आपल्या आयुष्यातल्या प्रगतीचा मार्ग किती अडथळ्याचा अथवा किती अशक्य आहे अशी मनोधारणा करून घेणाऱ्यांसाठी मी उदाहरणासह मार्ग सुचवणार आहे.
सर्वात प्रथम, मी पुढे जाऊ शकणार नाही ही पराभूत विचारसरणी मनातून काढून टाका. जगात प्रत्येकाला अडचणी असतात. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग अवघड असू शकतो पण अशक्य नक्कीच नसतो. दुसरे असे की, जगात पूर्णपणे निरुपयोगी अथवा टाकाऊ काहीही नसते. असे उदाहरण देता येईल की, पूर्णपणे बंद पडलेले घड्याळ चोवीस तासात दोनदा तरी बरोबर वेळ दाखवते. ह्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण तात्पर्य असे की, स्वत:मध्ये काही गुण नाही त्यामुळे मला आयुष्यात घवघवीत यश मिळणार नाही, ही भ्रामक समजूत काढून टाका.
शैक्षणिक क्षेत्रात मिळणारे देदीप्यमान यशच केवळ प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाते ही कल्पनासुद्धा भ्रामक आहे. तुम्हाला माहीत आहे काय की, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला विजय मिळवून देणारे चर्चिल, प्रसिद्ध कवी गुलजार आणि असे किती तरी जण शिक्षण घेत असताना नापास झालेले होते. पण ते हिंमत हरले नाहीत. नंतर ते किती उंचीवर पोहचले ते सगळ्या जगाने पाहिले आहे.
सांगण्याचे तात्पर्य, आयुष्यातल्या अवघड परिस्थितीत छोट्या मोठ्या अपयशाने निराश होऊन, खचून जाऊ नका. तुम्हांला प्रारंभिक सूचनांनंतर हलाखीच्या परिस्थितीतून उच्चपदी पोहचलेल्या एका व्यक्तीची मी एक सत्य यशोगाथा सांगणार आहे. ती लक्षपूर्वक वाचा. त्यामुळे तुमच्या मनातली निराशा दूर होऊन मोठ्या आत्मविश्वासाने तुम्ही यशाच्या वाटेकडे वाटचाल करू लागाल ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
नासिक जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील यशा नावाच्या मुलाची ही गोष्ट. वडिलांची पेन्शन तुटपुंजी. शेतीचं उत्पन्न जेमतेम. पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यात कसाबसा चाले. घरात खायला पुरेसे असले तरी पैशाची चणचण नेहमीच असे. महिनाअखेरीस पेन्शन मिळण्यासाठी रेव्हेन्यू स्टॅपसाठी दहा नवे पैसे सांभाळून बाजूला काढून ठेवावे लागत. यशा आणि त्याच्या भावंडांचे शिक्षण नादारीत चालले होते. शाळेतर्फे कधी तरी आयोजित केलेल्या सहलींसाठी द्यायला पैसे नसल्याने अशा सहलींना त्यांना कधीच जाता आले नाही. वह्या-पुस्तकांचा खर्च कसाबसा होत असे. आर्थिक अडचणींमुळे बरोबरच्या सुखवस्तु घरातल्या मुलांकडून बरेचदा अपमानाच्या प्रसंगांना यशाला सामोरे जावे लागले.
शालान्त परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करावे, हा त्याच्यासमोर प्रश्नच होता. कारण गावात कॉलेज नव्हते. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे पैशाअभावी अशक्य होते. पंचवीस किलोमीटरवरच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी लागणारा दररोजचा एसटीचा खर्चदेखील कुटुंबाला परवडणारा नव्हता. बरोबरीच्या मित्रांचे कॉलेजचे सत्र सुरू झाले. पण यशा तसाच रिकामा राहिला. भविष्याबद्दल काही विचार तरी कसा करणार? सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग कसे करणार? डोळ्यांसमोर अंधकार दिसत असला तरी यशा निराश झाला नाही. आज जरी आपल्याला पुढची वाट दिसत नसली तरी उद्या नक्कीच ह्यातून मार्ग निघेल अशी सर्व कुटुंबाची अपेक्षा होती. गावात राहून काही करण्याचा मार्ग दिसत नसल्याने यशाला लग्न झालेल्या मुंबईतल्या बहिणीकडे पाठवण्याचे ठरले. वडिलांनी घरातली पायलीभर करडई अंबादास तेल्याच्या घाण्यावर नेऊन विकली आणि यशाला मुंबईपर्यंत पाठवण्याचे पैसे कसेबसे उभे राहिले. यशा मायानगरीत पोहचला त्यावेळेस बहिणीच्या चाळीतल्या घरामुळे डोके टेकायला जागा मिळाली. मनात दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठलेही काम करण्याची मानसिकता आणि घरातले चांगले संस्कार ह्याचीच फक्त शिदोरी यशाकडे होती. बहिणीवर-मेहुण्यांवर आपला बोजा पडू नये म्हणून मिळेल ती नोकरी पत्करण्याच्या हेतूने यशा मेहुण्यांच्या ओळखीने भांडुपच्या एका छोट्या वर्कशॉपमध्ये इंटरव्यू द्यायला गेला. इंटरव्यू घेणाऱ्या साहेबांनी विचारले, 'मुलुंडच्या घरापासून कुठल्या बसने आलास? बसचा नंबर काय होता?' यशाला सांगता आले नाही. तेव्हा त्यांनी 'उद्या नोकरीला लागलास तर काय तुझ्या मेहुण्यांना घेऊन येणार काय?' असे खडसावून विचारले. 'तुझ्याकडे सामान्य ज्ञान नाही, चांगली तब्येत कमावली नाहीस' असे शेरे मारले. यशा अपमानित झाला. खचला मात्र नाही. उलट त्याच्यातली सुप्त महत्त्वाकांक्षा ज्वालामुखीसारखी उफाळून आली. त्याने मनोमन ठरवले, आजपासून मी अथक कष्ट करीन. दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेईन.
त्याच कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागल्यावर यशा झपाटल्यासारखा कामाला लागला. त्याने कधी शारीरिक कष्ट केले नव्हते. पण पडेल ते काम तो करीत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त सहकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करून दीड वर्षांच्या कालावधीत फिटरचेही काम त्याने शिकून घेतले. प्रयत्नाने त्याला इंजिनीअरिंग ड्रॉइंगपण समजायला लागले. त्यासाठी त्याने रस्त्यावर रद्दीत मिळणारी त्या विषयावरची पुस्तके विकत घेतली. मोठ्या कंपनीत तांत्रिक काम करणाऱ्या मेहुण्यांची मदत घेतली. नियमित फिटरच्या अनुपस्थितीत तो फिटरचे काम करू लागला. वर्कशॉपपासून तीन किलो मीटरवर असणाऱ्या भांडुपस्टेशनपासून रेडिएटरसाठी लागणारा कच्चा माल हातगाडीवरून ढकलत आणण्याचे काम यशाने न लाजता, न कंटाळता केले. आयुष्यात पहिल्यांदाच कष्टाची कामे करूनही संध्याकाळ त्याने वाया घालवली नाही. त्याने पी.डब्ल्यू.डी.वायरमनचा कोर्स केला. राहायला मुलुंडला, वर्कशॉप भांडुपला आणि कोर्स ठाण्याला. अशी त्रिस्थळी यात्रा रोजची सुरू झाली. पगार म्हणून रोज साडेतीन रुपये मिळत. रेल्वेपासाव्यतिरिक्त एकही पैसा खर्च करणे यशाला परवडणारे नव्हते. त्यामुळे रेल्वेखेरीज त्याचा इतर प्रवास पदयात्रेने होत असे.
यशाला पी. डब्ल्यू डी. चे वायरमनचे लायसेन्स मिळाले आणि त्याच सुमारास त्याच्याच ओळखीच्या एकाच्या सल्ल्यावरून तो क्रॉम्प्टन ह्या मोठ्या कंपनीत टेम्पररी म्हणून नोकरीस लागला. तिथे त्याला फिटरच्या कामाचीही संधी मिळाली. आयुष्यात पहिल्यांदाच तिन्ही पाळ्यांमध्ये काम करायची सवय लागली. काही महिन्यांतच त्या कंपनीत संप झाला आणि यशा पुन्हा बेरोजगार झाला. ह्या काळातही तो स्वस्थ मात्र बसला नाही. त्याच्या गावात तयार होणाऱ्या हिमरू शाली मुंबईत आणून त्याने त्या ठाणे, मुलुंड भागात घरोघरी जाऊन विकल्या. त्यात त्याला थोडीफार कमाई झाली.
ह्याच काळात यशाने वर्तमानपत्रात स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियनच्या तीन महिन्यांच्या कोर्सची जाहिरात वाचून तिथे प्रवेश घेतला. दिवसा कोर्स आणि संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी हिमरू शाली विकणे ह्यात तीन महिने गेले. तळोजा इथल्या इंडियन अल्युमिनियम कंपनीत भर्ती चालू असल्याचे कोर्सच्या सहाध्यायी मित्राकडून कळताच त्याने अर्ज केला. तिथे त्याला फर्नेस ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली.
इंडाल कंपनीची ही नोकरी सहाशे डिग्री तापमानाच्या भट्टीवर काम करण्याची होती. वर्षभरात यशा परमनंट झाला. आयुष्यात स्थैर्य आल्यासारखे यशाला वाटले पण पुढे शिकण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. इथूनच सरस्वतीच्या तपस्येचा त्याचा एक दीर्घ प्रवास सुरू झाला. यशाने कंपनीव्यवस्थापनाला आपले शिक्षण पूर्ण करू देण्यासाठी सहकार्याची विनंती करून कायम रात्रपाळी मागून घेतली. मुलुंड कॉमर्स कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. रात्रभर भट्टीवर काम, दिवसा कॉलेज. मुंब्रा ते तळोजा ह्या कंपनीच्या बसप्रवासात, कामातून सवड मिळाली तर यशा तो वेळ अभ्यासात घालवी. अशी चार वर्षे काढल्यावर तो उत्तम मार्कांनी बी. कॉम. उत्तीर्ण झाला. ह्याच सुमारास पर्सोनेल डिपार्टमेंटमध्ये क्लार्कची जागा निघाली आणि बाहेरच्या उमेदवारांबरोबर इंटरव्यू देऊन यशा निवडला गेला. दोन वर्षांनंतर ठाणा कॉलेजमध्ये संध्याकाळचे शिक्षण घेऊन एल.एल.बी. ही पदवी मिळवली. ह्या दोन वर्षांत कामगारांसाठी वाचनालय सुरू करण्याची कंपनीला सूचना करून त्याने त्यात पुढाकार घेतला. 'तलोजादर्शन' ह्या मासिकात कामगारविषयक कायदे, सुरक्षेसंबंधी लेखन आणि शब्दकोडी असे नियमित लेखन केले. 'कायझन' ह्या कामात सुधारणा करण्यासंबंधात असलेल्या योजनेत भाग घेऊन बक्षिसे मिळवली. खरे तर, जिथून सुरुवात केली तिथून आत्तापर्यंत बऱ्यापैकी प्रगती झाली होती. तिथेच काम करून यशा निवृत्त होऊ शकला असता. आता तर त्याचे लग्नही झाले होते. पण यशाला पुढच्या वाटा खुणावत होत्या.
यशाने मुंबई विद्यापीठाचे पर्सोनेल मॅनेजमेंटमधले पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे ठरवले. पण त्यात अनंत अडचणी होत्या. एक तर हा कोर्स पूर्ण वेळ होता. घरच्या जबाबदारीने नोकरी सोडणे शक्य नव्हते. यशाने ह्यातून सुवर्णमध्य काढला. व्यवस्थापनाला विनंती करून परत एकदा सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर फर्नेस ऑपरेटर म्हणून काम सुरू केले. दिवसा परेल येथील कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झाले. शिक्षणाचा हा टप्पा आतापर्यंतच्या प्रवासातला सर्वात खडतर टप्पा होता. राहायला मुलुंड कॉलनीत, स्टेशनपासून सहा किलोमीटर दूर. कॉलेज परेलला. रात्री नोकरी तळोजाला. त्या काळात दररोज साडेसहा तास प्रवास, साडेपाच तास कॉलेजमध्ये आणि रात्री आठ तास सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर नोकरी. घरी संध्याकाळचे फक्त चार तास मिळत. पण ध्येयावर अभेद्य निष्ठा, कठोर परिश्रमाची तयारी ह्या बळावर यशाने परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले!
गेली सुमारे तीस वर्षे यशा वेगवेगळ्या कंपन्यांत पर्सोनेल डिपार्टमेंटच्या विविध पदांवर यशस्वीरीत्या काम करत आहे. गेली सुमारे २१ वर्षे तो एका प्रसिद्ध अमेरिकन कंपनीत कार्यरत असून गेल्या पंधरा वर्षांत डायरेक्टर प्लँट पर्सोनेल ह्या पदावर कार्यरत आहे.
वाचक मित्रांनो, यशाच्या जीवनप्रवासाची, त्यातल्या चढउतारांची ही इतकी समग्र माहिती मला कशी, असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना? तो यशा दुसरा-तिसरा कोणी नसून मीच आहे!
माझ्याविषयी तुम्हांला आणखी थोडे सांगायचे आहे. ह्या प्रदीर्घ प्रवासात मी माझ्यासाठी काही नियम ठरवले, ते तुम्हांला सांगावेसे वाटतात. ते कदाचित तुम्हांला मागदर्शक ठरू शकतील.
मित्रांनो, ह्या यशाच्या वाटेवरच्या प्रवासासाठी तुम्हांला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
-माधव सावरगांवकर
July 9, 2022
आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
“मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे ”
पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा.
पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.
March 25, 2026

अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग बद्दल सर्वांना माहिती आहे, की त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. २१ जुलै १९६९ रोजी त्यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले आणि २.५ तास अंतराळ प्रवास केला . २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरलेल्या अपोलो ११ यानात आर्मस्ट्राँग होते. त्याच्यासोबत आणखी एक अंतराळवीर एडविन ऑल्ड्रिन होता.
नीलच्या वडिलांचे नाव स्टीफन आर्मस्ट्राँग आणि आईचे नाव व्हायोला लुई एंजल होते. नीलला आणखी दोन भाऊ होते, त्यांची नावे जून आणि डीन होती, नील सर्वात लहान होता.
नील आर्मस्ट्राँगचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी वापाकोनेटा, ओहायो येथे झाला.जेव्हा नील फक्त ५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा उड्डाण करण्याचा अनुभव दिला. ते लहान वयात असताना त्यांनी अनेक खगोल विज्ञानाशी निगडित पुस्तके वाचली . नील आर्मस्ट्रॉंग हे मोठे विज्ञानाचे वेडे होते.
खगोलशास्त्रज्ञ होण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि कोरिया युद्धातही भाग घेतला होता.नील एक एरोस्पेस अभियंता, चाचणी पायलट, नौदल अधिकारी तसेच प्राध्यापक होते. नंतर नौदलात, पुरुड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते ड्रायड्रेन फ्लाइट रिसर्च सेंटरमध्ये रुजू झाले. ते एवढ्यावरच थांबला नाही, या केंद्रात सामील झाल्यानंतर त्याने ९०० हून अधिक उड्डाणे केली.
२० जुलै १९६९ रोजी, आर्मस्ट्राँग आणि अपोलो ११ लुनार मॉड्यूल (एलएम) पायलट बझ आल्ड्रिन हे चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती बनले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी चंद्र मॉड्यूल ईगल अंतराळयानाच्या बाहेर अडीच तास घालवले . अपोलो ११ कमांड मॉड्यूल कोलंबियामध्ये. चंद्राच्या कक्षेत. जेव्हा आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथम पाऊल ठेवले तेव्हा ते प्रसिद्धपणे म्हणाले: "हे माणसासाठी एक लहानशे पाऊल आहे, पण हे मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे." जगभरातील अंदाजे ५३० दशलक्ष दर्शकांसाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९६१ मध्ये "मनुष्याला चंद्रावर उतरवणे आणि त्याला पृथ्वीवर सुरक्षितपणे परत करणे" हे राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करून, दशकाच्या समाप्तीपूर्वी अपोलो ११ ने अंतराळ शर्यतीत अमेरिकन विजय प्रभावीपणे सिद्ध केले. कॉलिन्स आणि आल्ड्रिन यांच्यासोबत, आर्मस्ट्राँग यांना राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी स्वातंत्र्य पदक प्रदान केले आणि १९६९ ची कॉलियर ट्रॉफी ही नील आर्मस्ट्रॉंग ना प्रदान केली. अध्यक्ष जिमी कार्टर यांनी त्यांना १९७८ मध्ये कॉंग्रेसनल स्पेस मेडल ऑफ ऑनर प्रदान केले, १९७९ मध्ये नॅशनल एव्हिएशन हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेले .
१९७१ मध्ये नासाचा राजीनामा दिल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी १९७९ पर्यंत सिनसिनाटी विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकी विभागात अध्यापन केले. नील २०० पेक्षा जास्त प्रकारची विमाने उडवली . नील आर्मस्ट्राँगने अनेक प्रकारची विमाने उडवली. यातील एक विमान ताशी ४००० किमी वेगाने उड्डाण करणारे होते.
नीलने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली होती.आर्मस्ट्राँग यांनी १९७१ मध्ये यूएस स्पेस एजन्सी नासा सोडली आणि विद्यार्थ्यांना स्पेस इंजिनीअरिंगबद्दल शिकवण्यास सुरुवात केली. नील त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदयाच्या आजाराशी झुंज देत होता. २५ ऑगस्ट २०१२ मध्ये, आर्मस्ट्राँगचे वयाच्या ८२ व्या वर्षी कोरोनरी बायपा शस्त्रक्रियेमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतांमुळे निधन झाले.
२० जुलै १९९६ हा क्षण मानवाच्या नेहमी लक्षात राहील . " माणसासाठी एक पाऊल , मानव जातीसाठी एक उत्तुंग झेप ' चंद्रविर नील आर्मस्ट्राँग ने सांगितलेले हे शब्द इतिहासात नेहमी अजरामर राहतीले !
-- अथर्व डोके.
संकेतस्थळ – vidnyandarpan.in.net
संपर्क - ७२७६१३३५११
July 13, 2022
पोलीस खात्यातील मी एक आहे. पोलीसशिपाई ते पोलीस महासंचालक. कोणीही! माझे काम कायदा राबवणे आहे. कायद्या समोर सर्व सामान आहेत हे बाळकडू मला मिळाले आहे. सद् रक्षणाय …..
September 11, 2014
१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका)
तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला 'ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग' म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ १०० वर्षांपूर्वी याची बांधणी झालेली आहे. या कामाचे नकाशे १८५१ सालापासून आखण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामास १८७० साली सुरुवात झाली व ४० वर्षांनी काम पूर्ण झालं. यासाठी अंदाजे दहा हजार कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. या मार्गावर ६९ बोगदे, ५८ पूल आणि २१ अतिशय कठीण वळणं आहेत. गलेरा हे सर्वांत उंचावरील स्थानक बोगद्याच्या आतच आहे. १०,२८० फूट उंचीवरील पूल दोन अजस्त्र शिलांमधील बोगद्यांच्या मध्यात असून, त्यांच्या खाली प्रचंड खोल घळ आहे.
२. सैतान वा भुताच्या नाकासारखी बांधलेली रेल्वे (इक्वेडोर - दक्षिण अमेरिका)
हा जगातील सर्वांत कठीण, खडतर रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गायाक्विल शहर आणि राजधानी क्वीट यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या आखणीस २५ वर्षे लागली आणि १८९९ मध्ये काम सुरू झालं. त्यानंतर २० ते २५ वर्षांनंतर हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला. वाटेतील एका सरळसोट अजस्र शिळेमधून अनेक वळणांचा मार्ग खोदण्यात आला आहे. चढण १:१८ हिशोबाने छाती दडपून टाकणारी आहे. सर्वांत उंच जागेस EI Noriz del Diablo (The Devil's nose) म्हणतात. १२ कि.मीटरचा उतरणीचा रस्ता १९९७ च्या भूकंपात उद्ध्वस्त झाला होता.
३. क्विंगानी तिबेट हेवी रेललाईन
(या मार्गाची माहिती तिबेट रेल्वे प्रकरणात दिलेली आहे.)
४. यिवान रेल लाईन तिबेट (यिचाँग टू चाँगींग-वांझाऊ)
३७७ कि.मी. लांब असलेला हा सर्वांत कठीण व अतिशय महाग रेल्वे प्रकल्प आहे. एक कि. मी. बांधण्यासाठी ९ मिलियन डॉलर्स या हिशोबाने या रेल्वे प्रकल्पाचा खर्च एकूण ३.४१ बिलियन डॉलर्स झाला आहे. ५० हजार कामगार या कामासाठी ७ वर्षं झटत होते. या मार्गावर २५३ पूल व १५९ बोगदे आहेत.
५. आल्प्स ट्रान्झिट रेल (स्वित्झर्लंड)
(न्यू रेल लिंक थ्रू आल्प्स माउंटन्स)
या मार्गाचं काम सन २०१६ पर्यंत पूर्ण होईल अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे. यासाठी १३ बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. सर्व रुळांचं जाळं खोल जमिनीखाली, बोगद्याच्या शेकडो मीटर खाली आहे. हे बोगदे १९१० सालात बांधलेले होते. जगातील सर्वांत लांब बोगदा ५७ कि.मीटर असून, गोथार्ड या नावाने या रेल्वे मार्गावर असणार आहे.
November 11, 2022
चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी आपले अन्नही शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे असले पाहीजे. मात्र आपण मराठी माणसांनी ज्वारी खाणे बंद केल्यानेच बहुतांश आजार बळावल्याचे स्पष्ट मत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्टा आणि कल्याण रोटरी क्लबतर्फे कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘नियोजनबद्ध आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर ते बोलत होते.
आपल्या दैनंदिन आहारात ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पाचक रस ज्वारीत ठासून भरलेला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ज्वारीच्या पदार्थाने करण्याबरोबरच जेवणातही आपण तिचा वापर केल्यास लठ्ठपणा,मधुमेह,ख हृदयरोग यासारख्या अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो, असे खडीवाले यांनी सांगितले. तर हल्लीच्या काळात अपचनाची समस्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली असून रोजच्या जेवणात पुदिना, आले आणि लसूण यांपासून बनविलेली चटणी खाल्ल्यास तुम्ही खाल्लेला दगडही (पचण्यास जड अन्न) पचवण्याची ताकद शरिरात तयार होते.
ज्याला 100 वर्षे जगायचे असल्यास लसूणासारखा छोटासा पदार्थ नाही. रोजच्या आहारात लसणाच्या किमान 3 ते 4 पाकळ्या खाल्ल्यास मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार जवळ फिरकतही नाहीत. आपल्या शारीरिक विकारांत वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर किमान अर्धा तास चालल्यास डोक्यातील आणि पोटातील वायू बाहेर निघून चांगली झोप लागते.
तर आपल्याकडे उपवास करणाऱ्या व्यक्तींना शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे हे परदेशातून आलेले पदार्थ चालतात. मात्र उपवासाला बटाट्याऐवजी शिंगाडे,रताळ्याचा वापर करणे केव्हाही शरीरासाठी चांगलेच ठरते. ज्यांचे पोट वाढलेले आहे, त्यांनी चणाडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा अधिकाधिक वापर करावा. तसेच पश्चिमोतानासन आणि सिटअप्स (डोके आपल्या गुडघ्याला लावणे) केल्याने पोट कमी होते. पोट साफ नसल्याची तक्रार असणाऱ्यांनी दिवसातून किमान 20 ते 25 बिया असणाऱ्या काळ्या मनुका खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होण्याबरोबरच चांगले रक्त, सर्दी, खोकला, पडसे, दमा यांना आळा बसतो, असे ते म्हणाले.
तसेच पालेभाज्या या जमिनीपासून कमी उंचीवर असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याला माती लागण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या खाण्यापूर्वी गरम पाण्यातून धुवून घेतल्यास त्याला लागलेले मातीचे कण निघून जाण्यास मदत होते.
तर मीठ खाल्ल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण हे साखरेमूळे होणाऱ्या अजारांपेक्षा अधिक भयानक असल्याचे सांगत शक्यतो मिठाचा वापर टाळल्यास अनेक विकार आपण टाळू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही वैद्य खडीवाले यांनी सखोल उत्तरे दिली.
October 15, 2016
भारतीय रेल्वेत संगणकीकरणाने विलक्षण क्रांती घडवून आणलेली आहे. ही प्रगती गेल्या २० ते २५ वर्षांतील असून, रोज ४००० पेक्षा जास्त जागांवरून १५ ते २० लाख तिकिटांचं भारत भरातील ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं आरक्षण केलं जातं. आता 'इ' रिझर्व्हेशनमुळे तर हजारो तिकिटं खिडकीशी न जाता आरक्षित करण्याची सोय आहे.
रेल्वेच्या या विभागाला पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पी.आर.एस.) म्हणतात. याकरता लागणारं सॉफ्टवेअर 'क्रिस' (सी.आर.आय.एस.) पद्धतीचं असून, याकरता भारतभर पाच डाटा सेंटर्स (दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद) आहेत. त्यांचे सगळे सर्व्हर्स एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतभरातून कुठूनही कुठल्याही विभागातील गाडीच्या तिकिटाचं आरक्षण मिळतं. याकरता रेल्वेचे १० विभाग केलेले आहेत. ही भारतीय रेल्वेची सर्वांत अद्ययावत संगणकीकरणप्रणाली असून, त्यासाठी भारतीय रेल्वेला २००९ सालातील 'वेबरत्न प्लॅटिनम आयकॉन अॅवॉर्ड' मिळालेलं आहे; तसंच १९९९ सालात 'कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया' यांचं 'बेस्ट आयटी यूजेस'बद्दल बक्षीस मिळालेलं आहे.
क्रिस प्रणाली अंतर्गत जवळजवळ ३५ विभागांकरता सॉफ्टवेअर्स वापरलेली आहेत. त्यामुळे तिकीटआरक्षण, तिकिटावर दिसणाऱ्या सर्व बाबी, गाड्यांचं टाईम टेबल, गाडी कुठे आहे, इंजिनं, मालगाडीचे डबे, यार्ड्स, प्रत्येक डब्यावरील प्रवाशांच्या नावांचे चार्ट्स, तिकिटांचं कॅन्सलेशन, वेट लिस्ट व रोज प्रत्येक टर्मिनलला जमणारे पैसे, अशा अनेक गोष्टींची माहिती संगणकावर मिळू शकते SATSANG Software रेल्वे टाईम टेबल व गाडीची येण्याची जाण्याची वेळ या करता वापरलं जातं. 'इंटिग्रेटेड मल्टिप्लाय ट्रेन पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (आय.एम.टी.पी.आर.एस.) द्वारे आता मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून प्रवाशांना ते प्रतीक्षा यादीत आहेत किंवा त्यांचं तिकीट नक्की झालं आहे हे कळू शकणार आहे, याकरता आता इंटरनेट उघडण्याची गरज पडणार नाही. क्रिस, सी.एम.सी., आय.एम.टी.पी. आर. एस. (concert are based on 3- Tier server client architecture with Mesh Type Topology) या अद्ययावततेमुळे जास्तीत जास्त प्रमाणात पारदर्शकता आणली गेलेली आहे. सर्वसाधारण प्रवाशाला कळू शकेल अशा सुधारणा रोजच्या रोज केल्या जात आहेत. या यंत्रणेत अकस्मात बिघाड होऊ नये म्हणून 'स्ट्रक्चरल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी' अर्थात 'रचनात्मक आपत्कालीन व्यवस्थापन धोरण' अमलात आणलेलं असून, फिजिकल डिझास्टर अर्थात शारीरिक आपत्तीपासूनही संरक्षण देण्याची यंत्रणा आहे. १०० टक्के सुरक्षित यंत्रणेकरता ज्या काही त्रुटी आहेत त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालूच आहेत. या क्रांतीमुळे रांगेत उभं राहून तिकिटं काढण्याचा जुना कंटाळवाणा प्रघात आता इतिहासजमा झाला आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
November 13, 2022
१६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महा मुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे ‘हिराॅईन्स’चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली.
April 23, 2017
दुसर्या महायुद्धानंतर, इंग्लंड आणि इतर युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या प्रगत आणि प्रामुख्याने ख्रिश्चन देशांमधे धार्मिकतेचा प्रभाव कमी होत गेलेला दिसतो. परंतु अमेरिका मात्र आपल्या धार्मिकतेला सोडायला तयार नाही असे वाटते. आजदेखील एकंदर प्रगत राष्ट्रांचा विचार करता, केवळ आयर्लंड आणि पोलंड या दोन देशांचा अपवाद सोडला, तर अमेरिका हा सर्वाधिक धार्मिक देश आहे. आजच्या आधुनिक प्रगत युगामधे, धार्मिकतेचा प्रभाव कमी होऊन, विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढावा हे साहजिकच आहे. परंतु अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशातील धार्मिकतेचा प्रभाव बघून नवल वाटतं. अगदी अलीकडे म्हणजे २००३ साली देखील, एका सर्वेक्षणानुसार ६०% अमेरिकन्सच्या मते धार्मिकतेला त्यांच्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान होते. तुलनेने केवळ २८% कॅनेडियन्स आणि अवध्या १७% ब्रिटीशांनी त्यांच्या जीवनात धार्मिकतेला एवढे महत्व दिले होते.
त्यातदेखील विशेष म्हणजे, अमेरिकन धार्मिकता ही जुन्या विचारांना मानणारी अशी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २००४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतल्या ख्रिश्चनांपैकी सुमारे ६०% लोक, पुरातन काळातल्या प्रलयाच्या आणि नोहाने आपल्या बोटीत पशु पक्षांच्या एक एक जोडीला घेऊन वाचवल्याच्या (आपला पुराण काळातील प्रलय आणि मनुची गोष्ट) गोष्टीवर किंवा मोझेसने तांबडा समुद्र दुभागून आपल्या अनुयायांना समुद्रातून चालत जायला मदत केली, अशा गोष्टींवर गाढ विश्वास ठेवून आहेत. २००५ सालच्या अशाच एका सर्वेक्षणात, ५१% अमेरिकनांनी, देवाने माणूस आहे त्याच स्वरूपात निर्माण केला, असं ठामपणे सांगितलं. सुमारे ३०% लोकांनी, माणूस उत्क्रांत होत गेला परंतु देवाने ही उत्क्रांती घडवून आणली, असं मत मांडलं. तर फक्त १५% लोकांनी, मानव हा इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांत होत गेला आणि यात देवाचा काहीही हस्तक्षेप नाही, असं मत मांडलं.
परंतु या एकेकाळच्या धार्मिक/देवभोळ्या अमेरिकेमधे देखील हळू हळू नवीन विचारांचे वारे वाहू लागले आहेत. आता आता पर्यंत सुमारे ८७% ख्रिश्चन असलेल्या अमेरिकेमधे, २००१ साली हेच प्रमाण ७६% वर आलं होतं. २००७ साली ते आणखी घसरून ७१% वर आलं. ख्रिश्चन लोकसंख्या कमी होण्याचा हा वेग वर्षाला साधारण ०.९% एवढा आहे. या वेगाने साधारणपणे २०४२ सालापर्यंत अमेरिकेत ख्रिश्चन अल्पसंख्यांक होऊन जातील.
२००९ सालच्या एका सर्वेक्षणानुसार आणखीनच धक्कादायक माहिती हाती आली आहे. १९९० साली, कोणत्याही धार्मिक संकल्पनेशी निगडीत नसलेले अमेरिकन्स ७% होते तर २००९ सालापर्यंत त्यांचे प्रमाण वाढून १५% झाले होते. पूर्वीपासून अमेरिकेचा नॉर्थवेस्ट हा भाग कमी धार्मिक म्हणून प्रसिद्धच होता. पण या सर्वेक्षणानुसार, प्रथमच नॉर्थईस्टमधे कोणत्याही धर्माला न मानणार्या लोकांची संख्या वाढली आहे. नॉर्थईस्ट म्हणजे अमेरिकेच्या धार्मिकतेचा पाया. हा धार्मिक पायाच आता ढासळायला लागला आहे, असे या सर्वेक्षणानुसार वाटते.
अमेरिकेच्या धार्मिकतेचा विचार करताना, ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचा देखील थोडा विचार करायला हवा. २००७ सालच्या एका अहवालानुसार, अमेरिकेत इतर धर्मियांमधे, १.७% मॉरमन्स, १.७% ज्यू, ०.६% मुस्लिम आणि ०.४% हिंदू होते. २००८ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीमधे रिपब्लीकन पक्षातर्फे उभे राहिलेले, मॅसेच्युसेटस राज्याचे भूतपूर्व गवर्नर मिट रॉमनी हे एक मॉरमन आहेत आणि निवडणूकीमधे, त्यांच्या प्रचारांच्या मुद्द्यांव्यतिरीक्त त्यांची धार्मिक धारणा देखील विचारात घेतली गेली होती, हे ध्यानात घेण्यासारखे आहे.
आज अमेरिकेत सुमारे ३५० हिंदू देवळे आहेत, ज्यातील बहुतेक सारी गेल्या तीन दशकांतली आहेत. यांतली काही, पूर्णपणे अगदी पाया खणण्यापासून बांधली गेलेली आहेत तर काही, जुन्या चर्चेसमधे फेरफार करून देवळांमधे बदलली गेली आहेत. मोठमोठ्या शहरांतली भव्य देवळे, त्यांचे स्थापत्यशास्त्रीय बांधकाम, कलात्मक सजावट, त्यांतील धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहून तर, आपण अमेरिकेत आहोत यावर विश्वास ठेवणंच मुश्कील होउन जातं.
-- डॉ. संजीव चौबळ
June 6, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti