(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस

    इम्पीरियल बॅक ऑफ इंडियाचे १ जुलै १९५५ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयीकरण करून तिचे नामकरण ‘स्टेट बॅक ऑफ इंडिया’ असे करण्यात आले. या बैंकेची यशस्वी वाटचाल आजतागायत सुरु असून वर्तमान स्थितीत स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या देशभरांत आज २०,००० पेक्षा जादा शाखा देशाच्या सर्व काना कोपऱ्यांत कार्यरत आहेत, सरकारचे रिझ्व्ह बँकेचे समाशोधन सारखे व्यवहार स्टेट बँकेमार्फत होतात.

      July 1, 2022


  • सुरक्षित बँकिंग

    //

    बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. दयानंद नेने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट. अतिशय वाचनीय.

      March 29, 2016


  • मुंबईत अजूनही शिल्लक असलेल्या ब्रिटीशकालीन इतिहासाच्या खुणा..

    आपला, आपल्या शहराचा व देशाचाही इतिहास आपल्याला माहित हवा..जे आपला भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य क्षमा करत नाही हे अनेक विचारवंतांनी सांगून ठेवलंय..

      March 12, 2016


  • समर्थ रामदास स्वामी ………६

    समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश केलेला आहे.आज आपण समर्थांचे पहिले पत्र पाहूया ----

    निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
    अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||
    परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
    जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||
    नरपति हयपति, गजपति गडपति |
    पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||
    यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
    पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||
    आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
    सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||
    धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
    सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||
    तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
    सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||
    देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
    हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||
    उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
    धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||
    या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
    महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||
    आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
    धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||
    कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
    कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||
    तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
    ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||
    सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
    धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||
    उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
    प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||

    महाराजांची समर्थ शेवटच्या ओवीत क्षमा मागून त्यांना सांगतात कि - "आपण प्रचंड राजकारणात तटले म्हणजे अडकलेले आहात त्यामुळे आपले चित्त अनेक ठिकाणी विभागले गेले आहे तरीही काहीही कारण (प्रसंग ) नसताना मी तुम्हाला हे पत्र लिहिले आहे त्या बद्दल मला क्षमा करावी " ..!

    --चिंतामणी कारखानीस

      March 3, 2016


  • महाराष्ट्रातील निवडणूकांचा इतिहास – एक दृष्टीक्षेप..

    महाराष्ट्रातील निवडणूकांवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप

      July 2, 2014


  • प. पू. आईंचे भजन-चिंतन

    प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत आहेत. भजनात त्यांच्या स्वतःच्या काही रचना आहेत. प. पू. आईंच्या एका रचनेचे चिंतन करू या.

    उठा उठा हो भाविकजन। गंगेमाजी करा स्नान।
    विश्वनाथाचे घ्या दर्शन। त्रिविधताप निवतील।।१।।

    स्मरता सदाशिव मायबाप । जाय चित्ताचा संताप।
    आनंद होय अनुप । विघ्नसंकटे हरतील ।।२।।

    कृष्णा वेणा तुंगा नर्मदा। भीमा तापी शरयु गोदा।
    येती शिवदर्शना सदा। त्या पावन करतील।।३।।

    गंगा यमुना सरस्वती। घटप्रभा नेत्रावती।
    सांब दर्शनासी येती। तुम्हा सहज भेटतील।।४।।

    पाहोनी माध्याह्न समय। स्नाना ये गुरुदत्तात्रय।
    हर्षे डोले गंगामाय। कलिमल दूर होय म्हणूनी ।।५।।

    श्री सद्गुरु हेच भक्तांचे खरे दैवत सत्चिदानंदघन श्रीगुरु हेच ज्ञानदाते-मोक्षदाते हा पूर्ण विश्वास प. पू. आईंचा होता. म्हणूनच प. पू. महाराजांचे वाक्य हे त्यांच्यासाठी प्रमाण वाक्य होते. त्याच महाराजांचे चरणी त्या अनन्य भावे विनंती करतात आणि म्हणतात.

    "गुरुदेवा! आपण करुणा सागर आहात. आपल्याच कृपाकटाक्षाने माझा उद्धार होणार आहे. तेव्हा माझ्या उद्धाराचा सत्संकल्प आपल्या चित्ती उमटू द्या. मला आपल्या शिवाय कोण आहे? शिष्यांसाठी व्यवहारातील सर्वच नाती श्रीगुरुचरणी विरुन जाताच तो त्याच आश्रयाने आधाराने राहतो.

    ।। ॐ नमः शिवाय ।। हा मंत्र आहे प. पू. आईंचा. या मंत्राचे दैवत शिव शंकर आहे. शंकरोतिस: शंकर:। सर्वांचे हीत करणारा-पावन करणारा तोच शंकर याचेच एक नाव विश्वनाथ हा नावाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाथ म्हणजे पिता-आश्रयदाताआहे. गंगातटी याचे वास्तव्य असते. यासाठी आपल्या भक्तांना प. पू. आई म्हणतात, “भक्तजनहो ! जागे व्हा " आत्महितासाठी जागृत व्हा गंगा जी पापहारक आहे. तिच्यात स्नान करा मग
    विश्वनाथाचे दर्शन घ्या. यांनी तुमचे अध्यात्मिक (शारीरिक), आधिभौतिक (जगतातून येणारे) व अधिदैविक (जे ताप आपल्या हाती नाहीत) हे सारेच नष्ट होतील.

    गंगा ही प्रवाहरूपाने भक्तीचे प्रतिक आहे. शिवतत्त्व जोवर जीवाच्या अंतरी असते तोवर सारेच पवित्र असते, पण शिवाने देहाचा आश्रय त्यागला की त्याचेच "शव" होते असा हा शिव विश्वाचा अंतबार्ह्य व्याप्त आहे.

    हे शिव तत्व नित्य पवित्र पावन आहे. म्हणूनच तो सदासर्वकाळ सदाशिव आहे. याचे मस्तकी गंगा वाहते. प्रत्येक जीवाचा मस्तकी ज्ञानगंगा असतेच. तिच प्रवाहित झाली पाहिजे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होताच जीवाचे क्रोधादि विकार चित्तातून निघुन जातात. जीव भक्तीरसात डुंबला की अंतरी विकार राहणार कसे? अंतरातून विकार गेले की अंतरंग भगवंत प्रेमाने परिपूर्ण भरते. परमात्मा कसा आहे? तर “आत्मा अरे रसो वै सः।" हा प्रेमरसाने भरला आहे. अंतरी प्रेमाचा झरा वाहू लागला की भक्ताला अमाप आनंद होतो. तो निष्काम होतो. लौकिकात त्याचेवर संकटे विघ्ने आली तरी त्यातले संकटत्व हरलेले असते. भक्तांसाठी ती केवळ एक घटना असते.

    पुढील ठिकाणी अनेक पवित्र नद्यांची नावे आहेत. या नद्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे आहेत या नद्यांत सुस्नात होण्यासाठी संतमहंत येतात. देवदेवता सुद्धा येतात. त्यांच्याच चरण स्पर्शाने नद्या पावन होतात. अशा या तीर्थक्षेत्री तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा पावन व्हाल, असा दिलासा प. पू. आई देतात.

    पण भक्तासाठी सर्व नद्यांचे तीर्थे म्हणजे श्रीगुरुदेवांचे चरणच असतात. गोरक्षनाथ आपल्या एका रचनेत म्हणतात.

    "गंगा ना न्हाऊ जी मै जमूना ना न्हाऊ जो मै ।
    ना कोई तीरथ न्हाऊ जी । अडसठ तीरथ है घर भीतर ।
    ताही में मल मल न्हाऊ जी..."

    याच देहाच्या उपाधित अडसठ तीर्थ आहेत. तीच विचाराने, साधनाने मी स्वच्छ-पवित्र करीन परिणामी सदाशीवाचे दर्शन नित्य याच देहमंदिरात घेता येईल.

    पुढे गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे. गंगा भक्तीचे, यमुना कर्माचे तर सरस्वती ज्ञानाचे प्रतिक आहे. कर्म भक्ती ज्ञान याच क्रमाने भक्त हळूहळू विकसीत होत जातो. आणि अद्वैत तत्वात प्रवेश कर्ता होतो. तेव्हा देहाच्या घरात चैतन्याची प्रभा असतेच याची जाणीव त्याला होते. परिणामी नेत्रातून तो जे काही पाहतो, तेव्हा त्याला तत्वदर्शन सहज घडते. "अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी" या म्हणी प्रमाणे आत ओतप्रेत भरलेला शिव-सांब बाहेर सर्वत्र आहे, याचे तत्वदर्शन घडते या दर्शनाला सहजता आली की भक्त भक्तिच्या प्रांगणात स्थिरावतो. व जीवनमुक्तीच्या प्रवासाकडे सरकतो.

    याच पवित्र नद्यांमध्ये माध्यांन्ह समयी जगताचे आद्य गुरु श्री दत्तात्रेय दररोज स्नानासाठी येतात. श्रीगुरुदत्तात्रेयांचा अवतार हा नित्य-शाश्वत अवतार आहे. युगानयुगे ते आहेतच. ज्ञानप्रचार-प्रसार हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यांच्याच चरण स्पर्शाने गंगा माता सुखाने-आनंदाने डोलू लागते. कारण दत्तात्रेयांच्या संस्पर्शाने तिच्यातील कली (कलह) मळ (निषिद्ध कर्माची इच्छा) हे दोन दोष निघून जातात.

    भक्तीच्या गंगेत राहणाऱ्या-डोलण्याऱ्या भक्ताला, जे तत्त्व परमात्याने दिले ते “दत्त" शाश्वत याची जाण येते, हे तत्त्व ज्ञानस्वरूप-आनंदस्वरूप-निरंजन असल्याने, भक्त सुद्धा भगवंतासारखाच होतो. त्याचे अंतरीची पापवासना क्षय पावते, द्वैतभाव विरू लागतो त्यामुळे कलह भांडण-वाद कलीचा प्रवाह कमी होत जातो. अंतकरणाच्या तळाशी रुतलेला “मल" दोष जो निषिद्ध-नको तो कर्म करणे हा सुद्धा नाहिसा होतो - दुर जातो. भक्ताला खऱ्या अर्थाने भगवंत दर्शनाची तळमळ लागते. याच तळमळीने जेव्हा भक्त भजन करतो तेव्हा तो भगवंत तत्त्वापासून भिन्न रहातच नाही “शिव भत्वा शिवं भजेत्” यानुसार तो रजन रतो होतो. श्री सद्गुरु कृपेने भजनाच्या माध्यमातून “मजन रती" या अवस्थे पर्यंतचा अंतरीचा प्रवास आई येथे प्रगट करतात.

    क्षेत्र म्हाणजे शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. तीर्थ हे पावित्र्य दर्शवते शुद्ध भक्तीने, भावाने भजन केले नामानसंधान ठेवले तर देहाचेच तीर्थ होणे संतांना अपेक्षीत आहे. जीवापासून तार्थक्षेत्राचा प्रवास भजनाच्या माध्यमातून प. पू. आई घडवतात भजनम्हणजे केवळ गाणे म्हणणे नव्हे भजू हा धातू आहे. यात परमात्म्यतत्त्व स्वीकारणे हे आहे. प्रथम बुद्धीने स्वीकारणे नंतर भजनाच्या साधनाने साध्याची प्राप्ती करून घेणे.

    भजनातून अंतरी उतरणे अन् शिव-दत्त दर्शनाने कृतार्थता प्राप्त करुन घ्यावी हेच प. पू. आईंना या भजनातून सांगायचे आहे.

    हे चिंतनरुपी पुष्प प. पू. माता कलावतींचे चरणी समर्पीत करून शब्दांना विराम देते.

    --सौ. अलका मुतालिक, डोंबिवली.

    सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा.

      August 1, 2022


  • आहारातील बदल भाग ४३ – चवदार आहार -भाग ४

    आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले.
    बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ?
    होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना.

    म्हणजे ही पिढी बदलाला समोरी गेली. आता जी पन्नाशीला आलेली पिढी आहे, त्यांच्या बदललेल्या आहारात पिझ्झा, बर्गर, थाय फूड, साॅस हे पदार्थ आले आहेत.

    हे बदल होणारच आहेत. यालाच आपल्याला सामोरे जायचे आहे. आता ज्यांचे वय पंचवीस आहे, ते पन्नाशीच्या टप्प्यावर आले की, त्यांनासुद्धा आणखी एका बदलाला सामोरे जावे लागेल. ग्लोबलायझेशनच्या काळात, आहारात नवीन काॅम्बीनेशन्स तयार होणार आहेत. ती मान्य करताना त्यातील संभाव्य धोके लक्षात घेतले की झाले.

    आता चटणीची जागा 'साॅसने' घेतली आहे. आंब्याच्या पाकाची जागा 'जॅमने' घेतली आहे. आईची जागा 'बाईने' घेतली आहे.

    साॅस, जेली, जॅम,चीझ, मायोनीज, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ, बाईच्या ऐवजी आईने करायला सुरुवात केली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी या बदलाला आई बाबांनी सामोरे जायची, मानसिकता ठेवली पाहिजे.

    साॅस करताना जे टोमॅटो वापरले जातात, ते नीट पिकलेले बघून घ्यावेत, नीट धुवावेत, नीट शिजवावेत, शिजवताना त्यात योग्य ते स्टॅण्डर्ड मसाले घालावेत, कृत्रिम रसायनाऐवजी नैसर्गिक स्वाद असलेले मसाले घातले तर नुकसान नक्कीच होणार नाही. बाईने केलेल्या साॅसमधे काय काय घातले जाते, ते आपण वाचतो आहोतच. प्रिझर्वेटीव्ह घातले की, टिकणारच, मग त्यातील टोमॅटो कितीही किडके आणि सडलेले असतील तरीही !

    जेली जॅम करताना त्यात जिलेटीन मिसळले जाते, जे अॅनिमल सोर्सपासून बनवले जाते. त्यातील छापील घटकपदार्थांची यादी "कोडवर्ड" मधे असते. त्यावर प्रत्यक्ष नाव छापण्यामधे धोका असतो, त्यासाठी ही पळवाट असते.

    कृत्रिम रंग हा आणखीन एक धोका. ते रंग प्रमाणित केलेले वापरले नसतील तर धोका आणखीनच वाढतो. आताच्या संशोधनानुसार हे कृत्रिम रंग कॅन्सरचा धोका वाढवतात.

    त्याऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर चव आणि वास आणि आरोग्य नक्की सुधारेल. म्हणून हे पदार्थ घरी करायची कृती शिकून घ्यावी. शिकायचं. पण कुठे कसं आणि कोणाकडून ?

    मोबाईल कसा वापरावा. हे घरातीलच पंचवीशीची पिढी ज्येष्ठ नागरीकांना शिकवते आहे. तसेच, या नवीन पदार्थांची चव त्यांना कशी हवी आहे तशी बनवून देण्यासाठी सुद्धा त्या पिढीचीच मदत घ्यायला हवी. ते पदार्थ स्वतः खाऊन बघितले पाहिजेत. तरच त्यातील दोष लक्षात येतील.

    पानावरील डाव्या बाजूचे पदार्थ बदलत आहेत. जे पदार्थ बदलले आहेत, तेच जास्ती गडबड करतात, म्हणून पानावरील डाव्या बाजूला होणाऱ्या बदलावर सावधपणे लक्ष ठेवले पाहिजे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    04.11.2016

      November 4, 2016


  • अग्निशमन दिवस

    मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो.

      April 14, 2022


  • पत्रकार दिन

    पत्रकारिता ही सार्वजनिक जीवनाशी निगडीत असून सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा आरोप-प्रत्यारोप होत असतात; परंतु याकडे दुर्लक्ष करून ज्या पत्रकारिता क्षेत्राने आपल्याला उभे केले त्या क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलेच पाहिजे.

      January 6, 2022


  • आहारातील बदल भाग ४८ – चवदार आहार -भाग ९

    तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव.

    हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव.

    अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव !

    कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, स्थिरता, जडपणा, घट्टपणा. शत्रू म्हणजे विकृत कफाचे हे सर्व गुण क्षणार्धात नाहीसे करणारा, हा तिखट गुण.

    कफामुळे जिथे जिथे शरीरात हे अवगुण दिसतात, तिथे तिथे त्याच्या उलट काम करणारा हा तिखट गुण.

    गळ्याचे आजार, पितांब येणे, सर्व त्वचारोग, अंगाला येणारी सूज, सांध्यांना येणारी सूज, ह्रदयात येणारी सूज, पोटात साठून राहिलेला आम यांना हलवून टाकणारी, पोटावर साठलेली फाजील चरबी या सर्वांना नष्ट करणारी ही तिखट चव.

    स्वभावाने उष्ण, तीक्ष्ण, भूक वाढवणारी, रूची देणारी, अन्नमार्गाचे संपूर्ण शोधन करणारी, बंधनांचा नाश करणारी, अल्प प्रमाणात वाढलेल्या आमाचे शोषण करून घेणारी ही तिखट चव !

    प्रमाणापेक्षा जास्त वापरली गेली तर तहान, चक्कर येणे, कंठशोष होणे, शिरा आकुंचन पावणे, कंप सुटणे, पोटात दुखणे, वेदना निर्माण होणे, ही लक्षणे निर्माण होतात.

    पातेल्याला असलेला चिकटपणा काढण्यासाठी, जोर लावून, खरडून खरडून, तळापासून उपाय केला तर कसे पातेल्याला चरे पडतील, तसे होईल.

    म्हणजे काहीवेळा तसे करणे देखील, सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखे आवश्यकपण असते.
    पाचशे हजारांच्या नोटा साठवून साठवून त्याचे रूपांतर जेव्हा विकृत आमामध्ये होते, तेव्हा त्याचा साठा हलवण्यासाठी काहीतरी जालीम तिखट निर्णय घेण्यासारखे आहे. मुळापासून सुपडा साफ. मग नाकातोंडातून पाणी येणारच !
    मीठी चाय खिलानेवाला तिखा जो ठहरा. जैसे चाय मे अद्रक.
    एक चायवाला भी इस विकृत आम को हटा सकता है !
    पण आयुर्वेद मतानुसार
    निःसुखत्वम सुखायच.
    आता तिखट वाटेल, थोडा त्रास होईल, पण अंतिमतः सर्वांनाच सुख देणारे असेल अशी ही तिखट चव !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    09.11.2016

      November 9, 2016