(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गौरीचे आगमन

    भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.

    कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.

      September 8, 2016


  • भोपाळ दुर्घटना

    दोन डिसेंबर, १९८४ च्या मध्यरात्री मध्य. प्रदेशातील भोपाळ येथील ‘युनियन कार्बाइड’च्या मेथिल कारखान्यात आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात असे समजले गेले.

      February 20, 2023


  • श्री आनंद लहरी – भाग १०

    आचार्यश्री आई जगदंबे ला प्रार्थना करीत आहेत की, कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरिते- हे साधुचरिते अर्थात अत्यंत सुयोग्य वर्तन करणाऱ्या आई जगदंबे ! तू तुझ्या कृपारूपी दृष्टिपाताला माझ्यावर तरसा अर्थात अत्यंत शीघ्रपणे वितर अर्थात प्रदान कर.

      February 14, 2020


  • भारतीय शब्दकोषातील पंचांगे

    पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन…..

      July 19, 2020


  • शबरीमलाच्या निमित्ताने..

    शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे.

      March 23, 2019


  • कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन

    कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन

    या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली.

      November 18, 2021


  • घोट्याचा सांधा

    घोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे.
    हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो

      April 7, 2023


  • सोल्वांग

    एका शनिवारी आम्ही सोल्वांगला जायला निघालो. लॉस एंजलीसपासून उत्तरेला दीड-दोन तासांच्या अंतरावर समुद्रकिनारी सांता बार्बाराजवळ हे शहर आहे.

      December 28, 2023


  • पाकिस्तानी अर्थव्यवस्था खिळखिळी करा

    सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन आर्थिक सहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेक साठी काढलेलं चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळ्यापर्यंत आलं आहे. अरब देशांनी दिलेलं कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचं नाही. 

      March 28, 2019


  • श्री विष्णु भुजंगप्रयात स्तोत्रम् – १३

    सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो.

      October 14, 2020