(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दहावी सिंफनी

    सिंफनी ही साधारणपणे चार भागांची बनलेली असते. हे चारही भाग जरी एकमेकांशी संबंधित असले, तरी या चारही भागांचं स्वरूप स्वतंत्र असतं; तसंच या प्रत्येक भागात हजारो स्वर असू शकतात.

      January 13, 2022


  • वनशंकरी प्रातःस्मरण स्तोत्रम् – मराठी अर्थासह  

    वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे  दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते.  

      December 20, 2021


  • औषधीयुक्त हळदीचे अर्थशास्त्र !

    आयुर्वेदाची निसर्गदत्त अमूल्य देणगी म्हणजे हळद होय. हळद हे कंदवर्गीय पिक भारतीय जीवनशैलीतील एक अविभाज्य घटक, प्रत्येक घराघरांत तयार होणाऱ्या पक्वानांचा स्वाद, लज्जत आणि रंग वाढविणारा घटक होय.भारतीयांच्या सण उत्सवात, मंगलकार्यात हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे.

      June 11, 2012


  • मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

    मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का?

      September 19, 2017


  • आपलं स्वयंपाकघर.. भाग तीन

    अॅप्रन वापरणे हे अजुनही मागील पिढीतील स्त्रियांना एखादे फॅड वाटते. ‘उगाचच· कौतुक’ असा सूरही ऐकायला येतो.

      July 27, 2024


  • श्री गणेश अवतारलीला २ – श्री विनायक अवतार

    भाद्रपद चतुर्थी चा अवतार शिवपार्वती यांच्या घरी झाला असल्याने त्या चतुर्थीला स्वर्गाची चतुर्थी तर विनायक अवतार महर्षी कश्यपने आणि अदितीच्या घरी झाला असल्याने या चतुर्थीला पृथ्वीवरची चतुर्थी म्हणतात. अशा या विनायक अवताराची जन्मतिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी.

      September 3, 2019


  • आत्मनिर्भरता

    परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे.

      December 21, 2022


  • फिरकीच्या तालावर!

    टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले.

      June 28, 2024


  • वजन कमी करण्यासाठी उपास?

    'डायट' हे आपल्याकडे गेल्या काही वर्षांत बरेच फोफावले फॅड आहे. ज्यूस डायट ते केटोजेनिक डायट असे विविध डायट प्रकार घाऊक दराने आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी उपास करणे हा एक ‘अनोखा’ मार्ग काहीजण अवलंबतात. विशेषतः महिलावर्गात ही पद्धत फारच प्रसिद्ध आहे.
    “सध्या वेट ओब्सर्व्ह करतेय. डायटचा भाग म्हणून रात्री जेवत नाही.” असं वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असतं. किती मात्रेत जेवावे हे आपण याआधीच पाहून झाले आहे. आज या उपास(मारी)बद्दल पाहू. आयुर्वेद म्हणतो; चार घास कमी जेवावे. मात्र योग्य मात्रेपेक्षा कमी जेवणे हे आरोग्यास अपायकारक आहे असेही आयुर्वेदाचेच मत आहे. भूक मारून उपास केल्यास शरीराला पुष्टी प्राप्त होत नाही. पुष्टी नसल्याने बळ कमी होते. शरीराची जडणघडण (उपचय) ढासळू लागते. हा उपचयच आपली रोगप्रतिकार शक्ती ठरवत असतो. तोच कमी झाल्याने या शक्तीवरही विपरीत परिणाम होऊन शरीर आतून पोखरण्यास सुरुवात होते. याशिवाय अशी उपासमार केल्याने शरीरात वेगवेगळे वाताचे विकार (सांधेदुखी वगैरे) घर करू लागतात.
    वजन कमी करण्याच्या नादात भूक मारून रात्रीचे जेवण बंद केलेत तर सुरुवातीला चांगला फरक अवश्य जाणवतो; काही प्रमाणात वजन कमीदेखील होते. मात्र हे वजन शरीरातील अतिरिक्त पाण्याचे असते. प्रत्यक्षात मेद मात्र मुळीच कमी झालेला नसतो. शिवाय अशा प्रकारे काही किलो वजन घटवलेत तर पुढे केव्हाही नेहमीचा आहार घेण्यास सुरुवात केल्यावर त्याच्या जवळपास दीड ते दोन पट वजन वाढते हा कित्येकांचा अनुभव असेल. आरोग्य उत्तम राखून वजन कमी करायचे असल्यास; ‘योग्य आहार- संतुलित व्यायाम- आयुर्वेदीय उपचार’ ही यशस्वी त्रिसूत्री आहे.
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      October 28, 2016


  • पुण्यातील ‘राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचा’ वर्धापनदिन

    ‘चित्रपट संग्रहालय’ ही संकल्पना आपल्या देशात सिनेमाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला तरी अस्तित्वात आली नव्हती. १९५१ च्या पाटील कमिटीच्या शिफारसीनंतर, चित्रपटाच्या आगमनाच्या ६०-६५ वर्षांनंतर- म्हणजे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. प्रथम फिल्म इन्स्टिटय़ूटच्या आवारात ‘फिल्म लायब्ररी’ म्हणून तिचे अस्तित्व होते.

      February 1, 2022